lag aadhichi gosht - 12 in Marathi Love Stories by Dhananjay Kalmaste books and stories PDF | लग्नाआधीची गोष्ट (भाग 12)

लग्नाआधीची गोष्ट (भाग 12)

लग्नाआधीची गोष्ट

(भाग 12)

संजय च्या घरी

सुरज सांगता झाला-

ठरल्याप्रमाणे मी त्याला भेटायला गेलो होतो. त्याने मला व्हॉटसपला मेसेज व त्याचे लोकेशन सुद्धा पाठवले होते. कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर मी इस्लामपूरला जाण्यासाठी बस पकडली. गावातला एक वृद्ध माणूस सकाळी दुधाची किटली घेऊन दूध घालायला जात असताना मी त्याला विचारले, " बाबा ,हे संजय कुठे राहतात? , " …… वृद्ध बाबा म्हणाले, "व्हतीत हाय नव, सरळ खालच्या अंगाला जावा ,आण गेल्यावर कुणासनी भी एचारलसा तरी कोण भी सांगल." .

नंतर मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा त्याच्या घराचे दार आतून बंद होते. पण खिडकी मात्र उघडी होती. व्हॉटसपवरच्या फोटोमुळे व सपनाच्या डायरी मधल्या फोटोमुळे मी त्याला ओळखले. महाशय मला बोलावून आरामशीर झोपत होते. मी त्याला आवाज देऊ लागलो. माझा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक सुद्धा तेथे आले. मी अर्थातच त्या परिसरात नवीन होतो. त्याची आई बाहेर गावी गेलेली होती अस मला तेथील लोकांकडून समजलं. सपना बदल विचारायची माझी काही हिम्मत होत नव्हती. आवाज देऊन ही तो जागा होत नाही हे पाहून सगळ्याना शंका आली. तेथील काही लोकांनी दरवाजा बाहेरून ढकलून आत जाऊन बघितले तर संजय जिवंत नसून मेलेला आहे हे लक्ष्यात आले.

काही वेळा मध्ये पोलिस तेथे पोहोचले. पोलिस तेथे आल्यानंतर रूमची झडती घेण्यात आली. शेजारच्या टेबल वर मोबाइल व पाण्याचा ग्लास एका प्लास्टिकच्या बॅग मध्ये टाकून पोलिसांनी ती लॅब मध्ये पाठवून दिली. पोलिसांनी चौकशी केली असता संशयाचा काटा माझ्याकडे यायला वेळ लागला नाही कारण त्या ठिकाणी मीच नवीन होतो. मला पोलिसांच्या गाडीमधून पोलिसानी स्टेशनला यायला सांगितले. जाताना श्वेत वस्त्रामध्ये गुंडाळून घेतलेला संजय चा देह दुसर्‍या एका गाडी मध्ये भरताना माझ्या डोळ्याला दिसला.

(चालू वेळ)

निशाच्या डोळ्यामधून अश्रूचा ओघ वाहू लागला. ती डोळे पुसत पुसत सूरजला म्हणाली, "म्हणजे तू त्याला मारले नाहीस ना. "

सूरज तिला म्हणाला, "तुला मी गुन्हेगार वाटतो का? ". निशाने काहीही न बोलता नकारार्थी मान हलवली. सूरज पुढे सांगू लागला, "सपना पण तेथेच असेल म्हणून मी तिची डायरी व हे लॉकेट तिला देण्यासाठी घेऊन गेलो होतो. "

निशा मधूनच म्हणते," मग पुढे काय झाल पोलिस स्टेशनमध्ये. "सूरज पुढे सांगू लागला.

पोलिस स्टेशन

सुरज सांगता झाला-

इस्लामपूर पोलिस स्टेशनमध्ये मला नेण्यात आले. रात्रभराच्या प्रवासामुळे माझ्या डोळ्यावर आलेली झोप पोलिस स्टेशनमध्ये आल्यावर मात्र पूर्ण उडाली. इंस्पेक्टर राऊत यांनी मला बसायला सांगितल. मी खुर्ची सरकून भीत भीत खाली बसलो. इंस्पेक्टर राऊत यांच्या समोर एक टेबल ठेवलेला होता. त्यावर एका साच्यात बांधलेला पृथ्वीचा गोलाकार नकाशा ठेवलेला होता. आजूबाजूला निरनिराळ्या प्रकारच्या फायली एका विशिष्ट पद्धतीने मांडलेल्या होत्या.

राऊतांच्या खुर्चीच्या मागच्या बाजूच्या भिंतींवर छत्रपती शिवाजीराजे, महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर याचे फोटो लावलेले होते. आजूबाजूला बरेचसे बाक पडलेले होते. माझ्यानंतर येण्यासाठी कदाचित नंबर लावून लोक बसलेले आहेत असे मला वाटले काही मोकळे पेपर ठेवले होते व ते उडून जाऊ नये म्हणून त्यावर पेपर वेट ठेवलेले होते.

हातात पेन घेऊन इंस्पेक्टर राऊत साहेबांनी मला काय काय झालाय हे सांगायला सांगितले. मी पोलिसाना डायरी दाखविली व पोलिसाना आतापर्यंत घडलेलं सर्व वृतांत तपशिलवार सांगितला. मला एक गोष्ट लक्ष्यात आली की मी जे काही सांगितले त्यातले महत्वाचे मुद्दे त्यांनी त्या कागदावर लिहून घेतले.

माझ्या नंतर गावातल्या काही लोकांना पण बोलण्यात आले. मला बाजूला असलेल्या एका बाकड्यावर बसवण्यात आले. मी तेथे बसून त्यांच बोलण ऐकत बसलो. राऊतांच्या बोलण्यावरून मला अस जाणवत होत कि त्यांचा माझ्यावर विश्वास नाही. मी येवढ जीव तोडून सांगितल तरी त्यांनी पुन्हा दोन- तीन जणांना मी केव्हा आलो? आल्यावर काय काय केल हे विचारले. मी मान खाली घालून बसलो.

राऊत :हम बोला बाबा सांगा काही तरी ?

संजय चे शेजारी : साहेब कितीला आला ठावूक नाही पण मी आलो तवा बहिर उभा हुता ह्यो .

दुसरा एक माणूस : व्हाय व्हाय म्या बी तेच बघितल तवा सकाळच सातवाजल असल.

बाबा :साहेब, आमचा काय दोष यात त्यो पोरगा साडे सहा का सात ला आला बगा. म्याच त्याला पत्ता सांगितला

*******

Rate & Review

Mansi Manish Satam
SHUBHANGI NIKALJE
Snehal

Snehal 2 years ago

Anjani

Anjani 2 years ago

Smita Chaudhari

Smita Chaudhari 2 years ago