life is beautiful books and stories free download online pdf in Marathi

लाइफ ईज ब्युटीफुल

लाइफ ईज ब्युटीफुल
आयुष्य खूप बोअरिंग झालय का? जगण्यात अर्थ नाही असे वाटते आहे का? लॉकडाऊन मध्ये कोंडल्या कोंडल्या सारख वाटतय? अस आपल्याला वाटण साहजिकच आहे. कारण आपण आपली तुलना कायम आपल्या पेक्षा चांगल्या व्यक्तिशी किंवा आपल्या पेक्षा चांगल्या स्थिती मध्ये असलेल्या लोकांशी करतो. आज काही दोन चार शब्द सांगणार आहे ते कृपया ऐकुन घ्या... हो हो म्हणजे वाचून घ्या ओ... लहानपणापासून एक गोष्ट कायम बघत आलोय मी,... ती म्हणजे सायकल चालवणारा बाइक भेटावी म्हणून धडपडत असतो तर बाइक वाला चार चाकी गाडीसाठी, बर चार चाकी गाडी आली कि माणूस समाधानी होतो अस नाही त्याला ब्रँडेड गाडी हवी असते. ती ही भेटली अस समजा पण पुढे काय? मग आजुन निरनिराळ्या गाड्या ... त्यानंतर माणसाला हेलिकॉप्टर व वैयक्तिक विमान अशा ही गोष्टी हव्या वाटण साहजिकच आहे.... आता मला सांगा यामुळे माणूस कधी संतुष्ट होऊ शकतो का? मग....
माझ्या मते माणसाने कायम आपल्या पेक्षा कमी असणार्‍या व्यक्तिकडे बघावे व आहे त्यात समाधानी राहावे आणि जास्त पुढे पुढे पळण्यापेक्षा आहे त्या स्पीड मध्ये आयुष जगत राहावे. हा आता हे कस.... चार चाकी गाडी असणार्‍यांनी दोन चाकीकडे बघून आपण खुष आहोत हा विचार करावा. तसच दोन चाकी असणार्‍यांनी आपण सायकलवर नाही हे बघून खुष व्हायला काही हरकत नाही. आणि सायकल चालवन्यारयाने आपण पायी चालणाऱ्या माणसापेक्षा खुष आहोत हे समजून घ्यावे.. तुम्हाला वाटेल ओके मग पायी चालणार्‍या व्यक्तीने खुष नको व्हायला... बरोबर ना?.... अगदी बरोबर त्या व्यक्तीने सुद्धा ज्यांना पाय नाहीत त्यांच्यापेक्षा आपण खुष आहोत हे बघून खुष राहावे..
आता मी खुष राहण्यासाठी काही गोष्टी सांगेल त्या करून बघा आयुष्यात काही बदल वाटलं तर बाकीच्यांना सांगा व मला सुद्धा सांगा आवडेल मला ऐकायला... मी जास्त काही सांगणार नाही 3 गोष्टी सांगतो.... पहिली म्हणजे राजेश खन्ना यांचा आनंद हा सिनेमा एकदा बघा. आयुष्याचे जेमतेम सहा महिने किंवा त्यापेक्षा कमी वेळ राहिलेला असताना सुद्धा कोणी एका सुखी कसा राहू शकतो. तस बघायला गेल तर आपण प्रत्येक दिवस लास्ट चा म्हणूनच जगलो तर किती बर होईन.. नाहीतरी आपणास काय ठाऊक आहे आपल मरण कधी आहे व केव्हा आहे. आनंद सिनेमात तरी त्या आनंद ला माहीत असते आपण सहा महिने किंवा त्याच्या जवळपासच जगणार आहोत पण आपल काय काय सांगाव कधी? हो हो मी घाबरवत नाही तुम्हाला फक्त सांगून ठेवतो .... बघा एकदा विचार करून...
दुसरी गोष्ट म्हणजे कधी योगायोग आलाच तर माझी जन्मठेप हे पुस्तक वाचून काढा.. मी तर म्हणतो तुम्ही योगायोग घडवून आणा... 13 x7 च्या खोलीत कोंडलेल असून सुद्धा जगण्याची उम्मीद ठेवणे सोपी गोष्ट नाही. थोडीशी माहिती द्यावी म्हणून सांगतो त्या खोलीमधे एकच खिडकी होती तीही वरच्या बाजूला जिथून फक्त आकाश दिसायचे. मलमूत्र करायला सुद्धा जागा नव्हती एका माठा मध्ये हा सर्व कार्यक्रम उरकाव लागत आसे.. दिवसरात्र त्याची दुर्गंधी कायम पसरलेली आसे. आणि जेवण तर विचारू नका... हे वाचल्यानंतर समजेल की आता जे आहे ते खूप चांगले आहे... वाचून बघा एकदा...
तिसरी गोष्ट म्हणजे trapped सिनेमा. राजकुमार राव यांसारख्या अभिनेत्याने उत्कृष्ठ रित्या केलेला अभिनय व सिनेमाची कथा... कथेच सांगायच झाल तर आपला नट एक फ्लॅट विकत घेतो. त्याच प्रेम प्रकरण असल्यामुळे तो घाईघाईत फ्लॅट बूक करतो जेणेकरून त्याला लवकर लग्न करून तेथे राहता येईल.. कारण मुलीची तशी अपेक्षा असते. बर आता ट्विस्ट म्हणजे त्या नवीन फ्लॅट मध्ये पाण्याची व लाइटची अजून चांगली सोय झालेली नसते.. हवी तेव्हा येत जात असते... आणि फ्लॅटच काम अजून पूर्ण झालेल नसते त्यामुळे आजूबाजूला ही लोक नसतात. त्याचा फ्लॅट हा पंधरा का विसाव्या मजल्यावर असतो जिथून खाली पाहिले तर एकाही माणसाला आपला आवाज ऐकु येणार नाही.. आणि अशा निर्मनुष्य ठिकाणी तो अडकून जातो. रूम बाहेरून लॉक होती... आणि लाइट नसल्याने कोणाला संपर्क सुद्धा करता येत नाही.. रागाने मोबाईल फोडून टाकतो.... व वरुण सुद्धा कोणाला संपर्क करायला जमत नाही. तर अश्या अवस्थेत तो कसा जिवंत राहतो हे कृपया स्वतः बघा .... आणि सगळ्यात छान म्हणजे तिथून सुटका झाल्यानंतर धाकवलेला दहा मिनिटांचा भाग.... त्यामध्ये अस धाकवलेल आहे की दररोज किळसवाण्या वाटणार्‍या गोष्टी सुद्धा त्याला आता आवडायला लागलेल्या असतात...... तसच काहीतरी आता लॉकडाऊन संपल्यावर आपल्याला पाहायला भेटेल..तुम्हीच मला सांगा गेल्या दहा वर्षात कधी पक्ष्यांचा आवाज कानावर पडला आहे का आपल्या गाड्यांचे पडले असतील... शुभ्र निळे आकाश बघितल आहे का आपण? वेळ आहे पाहून घ्या...या सगळ्यासाठी एकाच गोष्ट करायला हवी एवढय़ा दिवस बंद असलेले दार उडायची आणि नवीन जग बघण्याची ...



धनंजय कलमष्टे,
पुणे