Mansoon He Nave Parav Yek - 2 books and stories free download online pdf in Marathi

मान्सून हे नवे पर्व येक (भाग-2)

अरे हो ...आज तस पण फारसे झण आले नाहीत ऑफिस ला , म्हणुन आपला आटपून निगालो होतो ..
अछा !!! फारसे झणच ना ? की बस अनू नाही आली म्हणुन ऑफिस ला राहवत नाही वाटते साहेबांना ? .... सुम्मी टिंगल उडवायचा नादात म्हणाली आणि स्वतच हसायला लागली ....
मी सुद्धा तिचा कडे बगतच हसलो ...... बस झाली हा टिंगल उडौन ......काय आपली काही पण बोलतेस .........
ती मज्जेतच मनाली मस्करी केली रे ....... तशी अनू आली का नाही रे आज ?
का? तुझी बेस्ट मैत्रीण न ती? तुला नाही माहिती का कुठे गेली ती तर......... मी सहजच बोलून गेलो
हो आता ती मला का सांगेल ..... आता तर तू आला आहेस ना ......
म्हणजे ????? मला कडल नाही ??? मी आलो आहो म्हणजे काय ???
गम्मत केली रे... ......तिचा सोबत काल सायंकाड पासून बोलली नाही न मी ....ऑफिस मधून घरी गेल्यावर मला आई ला घेऊन तिचा आत्या कडे जायच होत तर मग बोलणंच नाही झाल तीचाशी ......बर सांग तर गेली कुठे ही बावळट? सकाळी किती कॉल केलेत तर लागत पण नाही आहे तिचा कॉल ..... आणि त्यातच आज कुणी नसल्यामुडे काम पण भरपुर ...डोक्याला ताप नुस्ता......
अरे ती ना ... तिचा मामा कडे गेली आहे जरा काम होत म्हणे येईल बोलली रात्री पर्यन्त परत .........
'म्हणूनच म्हटल आज साहेबांचा मूड इतका शांत शांत का' ..... मगाशी कॉफी पित असताना पण साहेब येकटेच चुपचाप बाहेर बगत बसले ......आठवण येत असणार नाही का ?.... आणि स्वताच परत हसायला लागली .....
"मला सुद्धा हसायला आल {काय म्हणाव या मुलीला , प्रतेक वेडेस मस्करी सुचते इला ...... मी आपला मनातल्या मनात पुटपुटलो} .. नाही रे तस काही नाही ,बस बगत होतो वर आकाशात ..... पाऊसाचा आगमन होणार आता काही दिवसात ....... गावाकडची आठवण आली होती बस इतकच ........
पाऊस येण्याचं आणि गावचा आठवणीच काय नात रे ? ........सुम्मी बोल्ली
अरे आता कस शेती ला सुरुवात होणार , डोंगर रानात सगडि कडे हिर्वगार होणार .....पक्षांचा आवाज येकु येणार ..... शेतीतून रानातून रातकिडे , काजवे , आणि अस्या अनेक पाऊसाडी प्राण्यांचा आगमन होणार त्या सोबत , नदी तलाव भरून जाणार , आणि त्या सगद्यान सोबत भटकायला मज्जा जी येते ते अलगच ...... आणि त्याच सोबत पहिल्या पाऊसातील गावातील मातिचा तो सुगंध ................... शहरात कुठे हे सगड अनुभवायला मिडतो ना .... इथल्या लोकांना पाऊसचा कंटाळा येतो ..... हे असच काही नात आहे त्या गावचा आठवणीचा आणि त्या पाऊसाच ......
तुला पाऊस भरपूर आवडतो ना ? ........ सुम्मी बोलली
हो ..... तस आवडतो तर तो खूप .... तो आला की मला सुद्धा अस्स भटकायला जायला आवडते ....काही अलगच नात आहे माज त्याचा सोबत........मी बोललो
ती सुद्धा माजा कडे बगत बसली ...... काही विचार करत..............
थोडा वेड शांततेत गेला ...... मीही आपला आवरायला लागलो लॅपटॉप ब्याग मध्ये घातला ...........
चला मॅडम , भेटुया मग उद्या ....... आणि मी निगणार तितक्यात ती बोलली .......
अरे थांब की तुला काही सांगायच आहे ?............
बोल ना काय ? ........ मी तिचा कडे बगत म्हणालो ........
ती हलकीसी स्माइल देतच म्हणाली ,गेस कर ना काय असेल तर ?
मी मस्करी करायचा नादातच म्हटल..... सुम्मी तू लगण वगेरे करतो आहेस की काय ? ........आणि मोठ्याने हसलो ......
हट रे वेळ्या .....काही पण काय तुझ .......ती लाजतच म्हणाली ..........
बर बर ,मग काय सांगायच आहे तुला .....?
अरे गेस्स कर न वांग्या .....आता अनू अस्ती तर लगेच गेस्स केल असतं आणि स्वताच हसली ......
अरे देवा आता हे काय नवीन ...... मला कस कळणार तुला काय सांगायचे आहे ते ? ...बर तू पार्टी वगेरे देतो आहेस का कसली ?...की कोणी आवडायला लागलं आहे वाटते ...... अस्स असेल तर पार्टी नक्की हवी ह ..... कुठलाही कंजूस पणा चालणार नाही......मी परत तिला चिडवायचा नादात बोल्लो आणि हसलो ......
ती ही वेड्यागत तोंड करून म्हणाली हो तूच तर आवडलासना...... तूच दे की पार्टी स्वताला ......
मी मजेतच म्हटल घ्या गरिबाची उडवून ........
यावर हसतच सुम्मीनी माजा माथ्यावर टपली मारली .आणि स्वताच मोट्यांनी म्हणाली बॉस नी आपल्या ऑफिस चा स्टाफ सोबत येक ट्रीप प्लेन केली आहे ..... या येणार्‍या महिन्यात .
काय ? बॉस नी ?...... सूर्य पच्चिमेकडून निगाला की काय ?....मी थोडा शॉक होऊनच बोल्लो
अरे तेच बोल्लेत खूप महीने झालेत आपण कुणी फिरायला गेलो नाहीत तर जाऊया सगडे काही दिवसा साठी म्हणून ...तशी मीच आयडिया दिली म्हणा त्यांना ... प्रौड मोमेंट केल्यागत बोल्ली ती ...
अरे मस्तच की तशी हुशार आहेस हा तू ..... मग कदी जाणार आहोत ? डेट वगेरे फिक्स झाली का ? आणि किती दिवसाण करिता ? ....... आणि कुठे ?...........
ते तू डिसाइड करायच कुठे जायच ते ....... सुम्मी म्हणाली
काय?... मी ?........ थोड शॉक होऊनच
हो तूच ......
अरे पन मीच का ?........
तूच भटकतो न ऑफिस मधून सगद्यात जास्ती म्हणून तूच बगणार आणि सगड्यांना सांगणार ........कुठे जायच ते त्यातला जो स्पॉट आवडेल सगड्यांना तिथे जायच सगड्यांनी अस्स ठरलं आहे ......सुम्मी बोल्ली
अरे पण बाबा ,मी राणा वनात डोंगर कपारीत नदी तलाव बगत फिरत असतो ....... मी कदी मंदीर मध्ये तर कदी तंबू मध्ये झोपत असतो ...... तुम्ही भटकणार का माजा सोबत ....तेही सुमारे पाच सात दिवस ? जमेल का तुम्हाला भटकायला तस ? जंगलात जे भेटेल ते खात असतो .... ना तिथे तुमचं मोबाइलच नेटवर्क असतो ना काही .......?तुम्हा सगड्यांना सवय नसणार याची ?........मी आपला बोलतच गेलो...........
अरे बस बस बस किती बोलतोस थांब जरा .......बग आम्हाला पन अनुभवाचा आहे न तसला प्रवास ? आम्हाला पण बागायच आहे ते निसर्गातील सुंदर रुप ? किती सुंदर फोटोग्राफी करून आंतोस तू फिरायला गेल्यावर ... सगड्यांना आवडतात आणि त्या मुडेच आम्ही सगड्यांनी तिथे जायचा प्लान केल ..........आता सगडे तयार आहेतच तर तू का नाही म्हणतोस ?...... ते आम्हाला काही माहिती नाही तू बगणार काही स्पॉट आणि आम्हाला सांगणार ...... नाहीतर तुझ नाव बॉसलाच सांगते हा ...ती हसतच मनाली ......
हो घ्या आता गरीब माणसाची उडाऊन ...... मी म्हणालो
माणूस शिकला ..... देवा .......... आमचा सोबत राहून राहून ...... आणि यावर आम्ही दोगेही हसायला लागलो
बर मग साहेब बगा हा येकादी चांगला स्पॉट आम्हाला सुद्धा ट्रेकिंग कराची आहे .......तू लवकरात लवकर बग आणि सांग आम्हाला , ओके बाय ........ जा आता घरी आरामात ....डंबो कुठला ....आणि वेड्यागत करत परत माजा माथ्यावर टपली मारत म्हणाली....... लवकर सांगा बर का वेळ नाही हा आपल्या कडे ......
कसली जिद्दी आहेस न तू खरच ....मी तिचा कान पकडत मनालो .....
बर मी विचार करून कडवतो तुम्हाला ........
सुम्मी नि मानेनेच हो म्हटलं ......चांगले स्पॉट निवडा साहेब आम्ही कदी न बगितलेले , काही नवीन ....... चला मी माज उरल सुरल काम आटपते ...भेटू उद्या मनत सुम्मी तिचा टेबल कडे वडली ..
जाताना चिडवल्या गत करत म्हणाली उद्या अनू आली की लागेल हा तुमचं मन ऑफिस मध्ये ............ सो टेंशन नॉट ...... बाय बाय
मी हसतच बाहेर निगलो , कसली भारी वागते ना ही मुलगी ...... या दोघी पण पागल सारखेच वागत असतात खरच......
अनूचीच जिवलग मैत्रिणच ना आखरीला ..... तिचाच सारखी ....... खर तर ही तिचा सारखी की ती ईचा सारखी देवच जाने ......
..................................... मी ही तसा आता ऑफिस च बाहेर निघालो ........घड्याळ बगितल तर सायंकाळचे सहा वाजत होते ..... सूर्यादेव आजुन आकाशात होते पण त्यांची जाणीव मात्र आता होत नवती ...... ते कदी त्या वाहणार्‍या काळ्या पांढर्‍या ढगानचा आडोस्याला लपत असत .....आणि कदी हलकेसे बाहेर येऊन आपली तांबूस किरणे अंगावर पाडत असत .............आकाशात मात्र तांबूस पिवड्या रंगाच्या छट्टा उभारल्या होत्या ...... कदाचित सूर्यादेव जाणीव करून देत आहे त्या पक्षांचा थव्यांना की आता घरी जयची वेड झाली आहे तुमची ..............

.......पुढील भागात .............
========================================================================