reshmi nate - 1 books and stories free download online pdf in Marathi

रेशमी नाते - १

विराट 💓पिहु

दे‌खमुख परीवार...

सुमन देखमुख:- देशमुख परीवाराची लहान सुन‌,विराटची आई.. विराट १९वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले...कोवळ्या वयात वडिलांचे छप्पर गेले ..जे दिवस मस्ती करायचे होते त्या दिवसात घराची जबाबदारी येऊन पडली,घरातला,सर्वात मोठा मुलगा....त्यात वडिलांचा,आधार नाही...त्याने त्यांचा फॅमिली बिझनेस जॉईन केला...बिझनेस कडे लक्ष देता देता...शिक्षण पुर्ण केले...त्याचे वडील असताना चार हॉटेल होते....त्याने,बिझनेस जॉईन केल्यावर त्याने स्वतःच्या,हिमतीवर अजुन तीन हॉटेल उभे केले...लहान वयात त्याने,खुप‌ नाव,कमवलेले, होते.‌‌..

वीरा-विराटची छोटी बहिण कॉलेज मध्ये शिकते.त्याचा,जीव कि,प्राण त्याची बहिण एका वडिलांसारख त्याने तिला,जपलं तिला कधीच वडीलांची उणीव,भासु दिली नाही...

रोहिणी- दामोदर (विराटचे मोठे काका -काकु)विराट त्यांना मोठी आई मोठे बाबा म्हणत होता.घरात तो त्यांना खुप मान द्यायचा मोठ्या आईच्या शब्दाबाहेर नाही....त्यांना एक मुलगा होता...विराट पेक्षा लहान खुप दिवसांनी त्यांना मुलाचे सुख मिळाले होते...त्याचे नाव नमन- वीरा पेक्षा एक वर्षाने मोठा दोघे एकाच कॉलेज मध्ये होते. अल्लड,मस्तीखोर विराटचे प्रेम खुप होते .नावाला चुलत पण. वीरा नमन मध्ये कधीच फरक केला नाही...
विराटची आजी ...असे सगळे मिळुन सात जण एकत्र राहत होते.


सुधा -रमेश (विराटची आत्या)एकलुती एक बहिण म्हणुन तिला,त्यांच्या शेजारीच बंग्लो बांधुन दिला,होता...दिवसभर तर इथेच असायची ...नावाला,घर असे....त्यांना दोन मुले होती... दिया,रिषभ .ते ही कॉलेज मध्ये होते..दामोदर ने रमेशला त्यांच्या फॅमिली बिझनेस मध्ये घेतलं होते..




पिहु सरनाईक...

पिहुची छोटी फॅमिली( रेवती भीमराव )आईबाबा,आणि तिची छोटी बहिण (प्रांजल). बस...मिडल क्लास फॅमि ली छोट्या छोट्या स्वप्नातच खुश राहणारे...

पिहुचे बाबा बॅकेत जॉब करतात.. आई घरातच असते.
पिहु आणि तिची बहिण प्रांजल शिकत होत्या.

विराट दिसायला स्मार्ट, डॉशिंग ,उंच ,गोरा वर्ण पिळदार शरीर ,काळेभोर तेजस्वी डोळे ,चेहयावरुन कॉनफिड्नंट‌ अॅरोगन्ट ,‍खडुस कामाव्यतीरीक्त कोणाशी जास्त‌ संबंध ठेवणार नाही..त्याच्यासाठी फक्त फॅमिली,स्वतःच नाव इज्ज्त ‌खुप प्रिय.

पिहू दिसायला नाजूक ,उंच थोडीशी सावळी ,काळे,चॉकलेटी डोळयांचा कलर ,हसताना गालावर पडणारी खळी मुळे चेहरा खुलून जाईल, नाजूक गुलाबासारखे ओठ ओठांना चिटकून असणारे काळे तीळ पुढच्याच मन ओढून घेईल ..उफ्फ लाजणं तर.काय सांगायच..... गाण्याची आवड भरपूर कोकिळा सारखा आवाज ...
.
.
.
.
.
..
.




देशमुख मॅन्शन पूर्ण दिव्यांनी ,लाइटिंग उजळून गेले होते...

रोहिणी;-मला एक पण मीडिया इथे दिसायला नकोय ,आधीच नीट डोक्यात तेव्हा हे रमेशराव...

रमेश( हसत) :- नाही ताई तुम्ही मला म्हणाला मी केलं नाही असं होईल का तुम्ही काळजी करू नका एकही बातमी किंवा फोटो लीक होणार नाही एवढे वर्ष काम केले घरातला माणूस आहे मी ...

रोहिणी:-( हाताने बस ) कामाला लागा वरात येईलच थोड्यावेळात लवकर... रोहिणी आत निघून जाते .


सुमन :- वीरा झालं का किती वेळची ताट करतेस नवरी दारात येऊन थांबेल

वीरा :- (मोठी स्माईल क‌रत) हो गं मॉम झाले...उगाच गडबड करते...हे बघ किती छान सजवली मी‌ आरतीची थाळी...
(मॉम विराच्या डोक्‌यावरून हात फिरवतात)

(रोहिणी कडक आवाजात) कार आलीये...चला,सगळे.,

सगळे गाडीच्या आवाजाने दराच्या दिशेने निघाले....

वीराने ताट रोहिणीकडे दिले....

गेटमधुन कार ऐन्टर‌ झाली...सगळ्यांची लगबग चालुच होती...दार उघडुन विराट बाहेर आला नवरदेवच्या रुपात तर तो अजुन खुलुन दिसत होता...तिकडुन ड्रायव्हर ने दार उघडले..‌हळुच पाऊल खाली टाकत पिहु उतरली..तिच नवरीच रुप बघुन‌ सगळ्यांचे चेहरे प्रस्नन झाले...दोघांचा जोडा लक्ष्मी नारायणासारखा दिसत होता...पिहुने हळुच नजर वर करत बघितले...दोन क्षण ती हरवुनच गेली...ऐवढा मोठा बंगला तिने फक्त सिरीयल्स ,मुव्ही मध्येच बघितला होता...तिने पटकन नजर खाली घेतली...आतुन खुप‌ घाबरलेली होती....तिच्या बरोबर आलेली कलवरी तिची मावस बहिण सोनिका ...बंगला बघुन चकित झाली.

सोनिका:-दीदी ,किती़ सुंदर घर आहे...एका महलात आल्यासारख तसे पिहुने तिला डोळ्यानेच शांत बसायला,लावले
तशी ती लगेच शांत बसते....

दोघेही दारात उभे राहतात..पिहुने विराटवर हळुच नजर वळवली.विराट समोर बघत होता..तिने पटकन घाबरुन खाली बघितले....

रोहिणी ने दोघांची आरती केली.

सुमन :- पिहु बाळा माप ओलंड उजव्या पायाने

पिहुने हसत माप‌ ओलंडले...कुकंवाच्या पायाने ती आत आली..सगळे तिला नाव घेण्यासाठी फोर्स करत होते...

पिहु:- उंबरठ्यावरती माप देते,सुखी संसाराची चाहुल
विराट रावांच्या जीवनात टाकले मी आज पहिले पाऊल.
(अस बोल्यावर विराट ने त्याच्या मॉम कडे नजर टाकली.)

सगळे चिडवायला लागले...

वीरा:- दादा तु आता...घे लवकर....

विराटने वीराकडे,रागाने बघितले.ती लगेच बारीक चेहरा करत शांत झाली.

रोहिणी:- (विराटकडे बघुन )बस आता,रात्र खुप झालीये...उद्या,बघु,....अस म्हणत दोघा़ना,आत घेतले...,

सुमन:- पिहु बेटा ये ...सुमन पिहुला घेऊन रुममध्ये घेऊन जाते...

वीरा:-मॉम दादाच्या रुममध्ये ..

(सुमन विराकडे बघत) आज नाही पुजा झाल्याव‌र..

ओहहह.मला माहीत नव्हते ,वीरा हसत बोलते.

सोनिका हसुन पिहुच्या दंडाला दंड‌ मारते.पिहु लाजते.

सुमन:- जा आता आराम करु दे वहिनीला ..पिहु,काही लागलं कि सांग हहह.माझी रुम शेजारीच आहे.

ती मानेनेच हो बोलते..वीरा मॉम निघून जातात.

ते गेल्यावर सोनिका ने दार लावलं... दिदी काय मस्त घर आहे,गेस्ट रूम ऐवढी भारी तर,तूझी बेडरुम कसली असेल...हहहह


पिहु:-आता बोलून झालं तर‌ मदत कर ना,किती हेवी आहे हे सगळ...तिचा त्रासिक चेहराच सांगत होता की तिला दागिने,साड्या हेवी आवडत‌ नाही..


सोनिका:-ओ..सॉ‌री ,थांब तु बस मी काढायला मदत करते‌

पिहु स्वतःला मिरर मध्ये स्वतःला निहाळत‌ असते..


सोनिका:-ओहहह ,जीजुची आठवण येतीय का..

पिहु:-‌तु‌ मार खाशील हहह..इथे टेंशन ने जीव चालालय,माझा..सोनु

(सोनिका शांत होते.ती शेजारी बसुन पिहुचा हात हातात घेते.)दिदी एक विचारू ...

(पिहु तिच्या डोळ्यांत‌ बघत)

तुला जीजु जरा ऑड वाटले नाही का ,लग्नात पण शांत‌ घरी पण शांत चेहरयाव‌र कायम‌‌ आट्याच असतात..रागाने लुक देतात.‌लगेच सगळे शांत ...

पिहु:- सोनु असतो गं काहींचा स्वभाव ..त्यांना मला अॅक्सपेट करायला वेळ लागेल मला ही वेळ लागेल अस लगेच थोडी मन जुळतात. पंधरा दिवसात लग्न झालं माझ्यासारखच त्यांच ही मनात हुरहुर असेलच ना..

सोनिका:-पण दिदी तु का तयार झाली ऐवढ्या लवकर..

पिहु:-हे बघ आता बोलुन काय?? मोठ्यांच्या मध्ये आपण बोलु शकतो का.

सोनिका:-चल‌ दिदी झोप उद्या परत काहीतरी रसम असतीलच ..
दोघी झोपतात.सोनिका दमल्यामुळे झोपून जाते,पण पिहुला झोपच ‌येत नव्हती. तिला सगळच नविन होते.अश्या वातावरणात कधी ती राहीलीच नव्हती...कशी ती ह्या मध्ये मिक्स होणार तिलाच कळत नव्हते..विचार करता करता ती झोपी गेली..सकाळीच सहा वाजता जाग आली.. डोळे उघडले थोडी दचकली ती...रुम नविन दिसली..सहा वाजलेत म्हणून पटकन उठुन अंघोळ करायला बाथरुममध्ये गेली...बाथरुम बघुन त‌र‌ ती आवाक झाली.तिला काहीच समझत नव्हते..दाराव‌र नॉक केल्याचा आवाज आला तिने बाहेर येऊन दरवाजा उघडला...समोर सासु होती..तिने पटकन खाद्यांवर‌ पदर‌ घेतला...

सुमन:- येऊ का ???

पिहु बाजुला सरकते हो‌ या ना...आई ते...ते मी अंघोळ तिला काय बोलायच समझतच नव्हते..

सुमन:- पिहु ये तुला नळ कसे चालु करायचे ते‌ सांगते....पिहुला आई सगळ नीट सांगते गरम पाणी शॉवर‌ कस चालु करायचे.

पिहुला थोड‌ रीलिफ झाले. आई....मी लगेच आले..

सुमन:-सावकाश ये घाई करु नकोस..आणि हे धर (आईंनी पिहुच्या हातात जरी काठाची मरुन कलरची पैठणी आणि गेरु फिनीशींगचे दागिनांच्या हातात बॉक्स ठेवला.).हे सगळ घालुन ये ... तु ह्या घरची मोठी सुन आहेस..मी,आवरायला,पाठवते कोणालातरी तुला हहह.

पिहु मानेनेच हो बोलते...आई डोक्यावरून हात फिरवत गोड स्माईल करुन निघुन जाते.

पिहु सोनिका आवरून घेतात.वीरा दिया रुममध्ये येतात..

वीरा:-वहिनी किती सुंदर दिसतेस तु...

पिहु,लाजतच तिला,थँक्स म्हणते..

दिया:-वीरा चल लवकर वहिनी ला घेऊन मोठ्या मामींना उशीर झालेला आवडत‌ नाही..मग आपलं काही खर नाही

(पिहु सोनिका ऐकमेंकीना कडे बघतात.)

वीरा:-हो हो गं...चल वहिनी...(चौघीजणी बाहेर येतात...पुजेची तयारी झालीच होती..विराट पण येऊन बसला होता..

रोहिणी:-विराट बस ,ये..

विराट ने वर नजर‌ करत आट्या पाडतच‌ पाटावर जाऊन बसला.

सुमन :- ये बेटा बस.

पिहु,हळुच त्याच्या शेजारच्या पाटावर घाबरतच येऊन बसली...पुजा चालु,झाली विराटने एकदा पण नजर फिरवली नाही ,तर पिहु सारखीच त्याला,चोरुन बघत‌ होती...पण त्याच लक्ष नसल्याने ती निराश होऊन खाली बघु लागली....


पुजा संपते....पाहुण्यांची जेवण‌ं वैगेरे आटपुन एक एक जायला, निघतात...

संध्याकाळी सगळे दोघांना शेजारी बसवतात...समोर एक परात ठेवुन त्यात दुध फुलांच्या पाकळ्या होत्या

सुधा:-नीट बघा हहह (हसत अंगठी दोघांसमोर धरत‌ )रिंग कोणाला सापडेल ते जिंकेल मग तुमच्यावर तीच व्यक्ती राज करेल.हह
विराटच तर लक्ष पण नसते,तो त्याच्या मोबाईल मध्ये डोक घालुन बसला होता...

सुमन:-(कडक आवाजात)विराट मोबाईल द्या इकडे ,

विराट ने मोबाईल बंद‌ करुन खिश्यात‌ टाकला.त्याने सुधा कडे बघत आत्या... कितीवेळ लागणार आहेत...

सुधा:- का रे...ऐवढी घाई कसली...सुधा हसत बोलली...तसे सगळे हसायला,लागले.

त्याने रागानेच कटाक्ष टाकला सगळे लगेच शांत‌..


सुधा:-चला,चला गेम कडे,लक्ष द्या.‌.सुधा ने रिंग दुधात फिरवली..हहह चालु,करा...

पिहु ने घाबरतच दुधात हात घातला...विराटने पिहूच्या हाताकडे बघितले त्याने हात घातला..पण दुधात फिरवलाच नाही..पिहु हात फिरवताना तिचा हात विराटाच्या हाताला लागला तिने पटकन घाबरुन हात दुसरीकडे घेतला.त्याने तिच्या वर तेव्हा नजर फिरवली...पिहुने रींग काढुन समोर धरली...

सोनिका एक्साईटेड होत :- येयये दिदी जिंकली

वीर चेहरा बारीक करत :- का‌य दादा तु पण ना...

सगळे हसतात.

सुधा:-चला आता हातातले हळकुंड सोडा ..पिहु तु दोन्ही हातांनी आणि विराट तु एकाच हाताचा वापर करायचा..

विराट ने हातातल्या वॉच वर नजर टाकली...

वीरा पिहुचा हात विराट समोर धरत:-दादा हहहह काढ...

विराट ने हाताकडे बघत एका झटक्यात घाट काढली

वीरा:-आता वहिनी तु ...

पिहु हात लावु कि नको असा विचार करत थरथर हात कापतच होता..ती विराटच्या हाताला हात लावणार कि विराट ताडकन उठला...

सगळे दचकलेच, हा असा का,उभा राहीला..सगळे उठुन उभे राहीले..पिहुला,तर कळलच नाही काय‌ झालं ती तर पुर्णपणे ब्लँक झाली.

सुमन:-विराट,...एकच रसम आहे झालं मग...

विराट मनगटावरची दोरी लुज करत:- मॉम ...(थोडा पॉज घेत) मॉम मी तुला तीन दिवसाचा टाईम दिला होता. तो संपला आणि आता पंधरा मिनीटात मला निघायच..त्याने ते,हळकुंड काढुन सुमनच्या हातात देऊन ताडताड निघुनच गेला...सगळे शांत त्याच्याकडे बघु लागले.पिहुच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती.कसे बसे तिने अश्रु आवरलेले होते...

रोहिणी:- जेवण करुन घ्या आणि,आराम करा वीरा ,वहिनी ला, घेऊन जा ...

सुमन पिहुच्या हात हातात घेते..बाळा घाबरू नकोस हहह विराटची महत्तावाची मिटींग आहे ...

ती,मानेनेच हम्म म्हणते.

विराट रागानेच रुममध्ये जातो...रागाने डोळे लाल भडक झाले होते...त्याने एका हाताने कुर्त्याचे बटण ओढले तसे सगळे तुटुन गेले... डोक्याला लावलेले कुकु ट्युशु पेपर ने पुसन काढले रागात बडबड चालुच असते...(मागे सुमन येऊन उभी राहाते.)
( विराटला चाहुल लागते ,तो रानात मागे वळतो)

झालं समाधन ऐकदाच ..तुला मी फक्त तीन दिवस म्हणालो होतो...ह्यापुढे तुझी मर्जी माझ्यावर‌ थोपवु नकोस..तो आत जाऊन चेजिंग रूममधुन सुट घालुन आला

सुमन:-(विनवणीच्या सुरात) विराट अस करु नकोस नवी नवरी घरात आहे...ती का‌य‌ विचार करेलं..

विराट:- रीअली मॉम (तो कुचक हसत)‌हे तु आधी विचार करायाला हवा होता..तुझ्या हट्ठामुळे तु त्या मुलीच आयुष्य उधवस्त केलयं...तो दोष तु मला देऊ नकोस..

सुमन:-( मॉम गालावर हात ठेवते)प्लिज विराट अस करु नकोस .

(विराट मॉमचा हात काढुन हातात घेतो)मॉम तुला सांगायला जड जात असेल तर मी बोलतो त्या मुलीशी ओेके..

(सुमन रागातच ओरडते)विराट मुलगी काय‌ लावलं नाव आहे तिच पिहु विराट देशमुख आहे ती..

तो मॉमचा हात सोडत परत आवारयला लागतो...(तो जाोरत हाक मारतो). ..मनी (नोकर)

मनी पळतच रुममध्ये येतो...हा हाहा.. भैय्या..

तो मनीकडे रागाने बघतो...त्याच्या लूकनेच कळते मनीला तो लगेच पळतच रुमाल ,शुज ,ऑफिस बॅग आणुन ठेवतो.

विराट रागानेच त्याच आवरत असतो..

सुमन:- विराट रात्र झाली तु..पुढे बोलायच्या आत (मागुन ‌रोहिणीचा आवाज येतो)

रोहिणी:- बाहेरच्या देशातून क्लांईट येणार आहेत....त्यांना पिक करुन येईल तो परत

सुमन:- ताई तुम्ही मला सांगितले नाही ...आणि आज कस काय‌जाऊ शकतो.

रोहिणी:-( टोमण्यात)काय म्हणुन सांगु तु लग्नात ऐवढी बिझी होती.

सुमन शांत बसते...


विराट मॉमकडे बघत..सुमनचे डोळे भरलेच होते ...पण जाताना कस थांबावायच म्हणुन तिने डोक्यावर‌ुन हात फिरवला..
विराटला ही वाईट वाटत होते..तो‌ पुढे जाऊन परत मागे वळुन मॉमला मिठी मारत कपाळाला ओठ टेकवुन रागातच निघुन गेला...

रोहिणी :-पिहुला का‌य सांगणार तु....आज पहिली रात्र तिची किती स्वप्न बघुन आली असणार सुमन खुप चुकलीस तु...विराटच्या मनाविरुध्द वागलीस...का‌य‌ भेटलं तुला सांग.

सुमन:- मला माहित आहे ताई ...पिहुला काय सांगायच आणि किती दिवस तो लांब राहणार कधी ना कधी त्याला अॅकस्पेट करावे लागणारच पिहु त्याची बायको आहे.मुलाच्या भविष्यासाठी आई चांगलाच निर्णय घेते ...अस म्हणुन सुमन‌ तिथुन निघुन आल्या.
हळुहळू पावले टाकत पिहुला का‌य सांगाव कस बोलाव ..काहीच कळत नव्हते..

वीरा सोनिका मला,सगळ घर दाखवत‌ होती...

पिहु आजी बरोबर गप्पा मारत‌ बसली होती...

सुमन आत येत:-पिहु बेटा चेंज करुन घे...किती वेळ घालुन बसणार सवय नसेल ना...

पिहु :- हो करणार होते..पण ते..मी..

तु पाहीले घाबरायच सोडुन दे. हे घर तुझ हक्काच आहे माहेरी कशी रिलॅक्स राहत होती..तशीच राह..वेळ लागेल तुला संगळ्यांना समजुन घ्यायला नंतर नंतर सवय होईल...

आजी:-अग सुमन तिला आता पाहुण्यांच्या रुममध्ये झोपवु नकोस जा रुममध्ये घेऊन ..

सुमन हसत:-‌हो आई ...चल पिहु तुला तुझ्या रुममध्ये घेऊन जाते...

पिहुच्या चेहरयावर लाजण,घाबरणे सगळे भाव मिश्र झालेले दिसत होेते..छाती धडधड करु लागली..

सुमन रुमचा दार उघडुन आत येत :-ये बेटा पिहु हळुच पाऊल टाकत आत येते...(ती रुमवर नजर टाकत इकडेतिकडे बघते.)..बेड. छान गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवला होता...सगळीकडे मंद लाईट्स लावते होते..तिला सगळ बघुन घाबरल्यासारख झालं ..ज्या,माणसाला ती नीट ओळखतच नाही आज,एका रुममध्ये राहायच ...

पिहु हे चेंजिग रूम आहे ,इथे सगळे तुझे कपडे आहेत..बघ .आणि इकडे विराटचे सामान आहे..आता तुलाच सगळ लक्ष द्याव लागणार मी करत होते..सगळ आता तुला सोपवते ..

पिहु लाजते...

हहह एक सांगते त्याला सगळ सामान परफेक्ट लागते.ते काय मी तुला नंतर शिकवेन पण आता एक बोलायच होतं...

पिहु प्रश्नआर्थी नजरेने बघते..

तुला तर‌ मी सांगतिले आहे...आपला बिझनेस किती मोठा आहे विराटला जेवायला वेळ नसतो...कसे बसे त्ताने तीन दिवस लग्नासाठी काढले ग...पण़ आज अर्जंट‌ मीटींग आहे...त्याला यायला उशीर लागेल..

हे ऐकुन पिहु शॉक होतच बघते...मन तर‌ चलबिचल झाले होते..

प्लिज तू नाराज होऊ नकोस.. सुमनच्या डोळ्यात पाणी येते...

पिहुला तर‌ काय बोलाव कळतच‌ नाही...

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

हाय फ्रेंडस .नविन स्टोरी, नविन प्रवास,नविन अनूभव ...कसा वाटला भाग नक्की समिक्षेद्वा‌े कळवा..



क्रमश: