प्रेम भाग -13

           सोहम च बोलणं ऐकून, नीशाला फार मोठा  धक्का बसला .हा सोहम नक्की काय बोलतोय?  तो जे बोलतोय ते नक्की खरं आहे की नाही ? का हा माझी मस्करी करतोय . तो जे बोलतोय ते जर खरं असेल तर,  मी काय  करू?  सोहम असं का वागला असेल?  त्या अंजलीच्या पोटातील मुलाशी एवढा कसा सोहमला लळा लागला ? की, मला विसरला .मझ्या प्रेमाला विसरला, मला दिलेल्या वचनाला विसरला .मझ्या साठी सोहम गेला होता ना,  मुंबईला मग हे काय अंजलीच प्रकरण ...कोण ही अंजली, आणि हिच्या मुलाशी सोहम चा काय संबंध आहे . तो खरचं मला विसरला तर नसेल  ना?  माझं काही चुकलं तर नसेल ना?   का त्याचं मझ्यावरच  प्रेम कमी जाहले . एवढं  मझ्यावर प्रेम करणारा मझा सोहम मला विसरला कसा?  तो मझ्याशी लग्न करणार होता .मग त्या  अंजलीशी लग्न कसा करू शकतो? तीच रडणं काही केल्या थम्बेणा. तीच रडणं ऐकून तिचे बाबा बाहेर आले . निशा एवढं का रडते, ते तिच्या बाबांना काही कळेना ? ते एकसारखे तिला त्याबद्दल विचारत होते .पण, ति काही केल्या त्याना  सांगेना . फक्त एकसारखी रडत होती .नीशाला खूप दुख जाहाले होते .
                  ईकडे सोहम चा आणि अंजलीचा साखरपुडा आज होता . अंजली खूप नट्लि होती, जणू काही राजकुमारी च .कोणालाही भुरळ पडेल, अशी तिची आज काया होती . सोहम ही तयार  होऊन बाहेर आला होता .त्याचा चेहरा पडला होता . त्याला एकसारखी निशाचीच आठवण येत होती . जास्त पाहुण्यांना बोलवायचे नसल्यामुळे मोजकेच लोक साखरपुडायला हजर होते . सगळी व्यव्सतीथ तयारी अंजलीच्या आई बाबानी केली होती . आलेल्या पाहुण्यांची चांगली सरभाराई होत होती . अंजली आणि सोहम नी एकमेकांना अंगठ्या घातल्या. सगळ्यानी टाळ्याचा गजर केला . अंजलीने सोहम ला  मिठाई भरवली .सगळ्यांच्या आग्रहस्त्व सोहम ने ही अंजलीला मिठाई भरवली . सगळे खूप खुश होते . पण ,साखरपुड्याला आलेल्या  पाहुण्यांपैकी एक मुलगा मात्र  अंजली आणि सोहमच्या साखरपुडा पाहून खुश नव्हता . तो एकसारखा अंजलीला पाहत होता . पण, तिचे लक्ष जाताच तो लपत असे . ई तर फारसं कोणाचं लक्ष त्या मुलांकडे नव्हते .पण, सोहम च लक्ष मात्र त्या मुलाकडेच होत . पण जेव्हा त्याच्या लक्षात आले, की सोहम च लक्ष त्याच्याच कडे आहे .तेव्हा मात्र तो घाबरला. आणि सोहम ची नजर चुकवून तो त्या सख्र्पुड्या  तून गायब झाला .
             सोहम ने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला .पण तो अचानक गायब झाला. तो मुलगा कोण होता?  आणि तो अंजली कडे असा का बघत होता ? अनेक प्रश्न सोहम ला पडत होते .त्याला सख्र्पुड्याला कोणी बोलावले?  का तो स्वतःचा च आला .खूप प्रश्न सोहम ला पडत होते .आणि त्याची उत्तरे फक्त अंजलीच देऊ शकत होती . पण, सोहम असं ही वाटत होत की, आपण जो विचार करतोय तस कदाचित नसेल ही,  त्या मुलाचं आणि   अंजली च  काही कनेक्शन ही नसेल .आपण उगीच असा विचार करतोय . ह्या सगळ्या बदल अंजलीला  विचारू ही शकत नाही,  तिला वाईट वाटेल, आणि जर तिने स्वताला त्रास्स करुं घेतला ,तर तिच्या बाळाला ही त्रास होईल .  म्हणून त्याने हे सगळं तिला बोलायचं टाळले. पण, तरीही प्रश्न उभाच होता .की, तो मुलगा कोण?  आणि त्याला साखरपुडा ला कोणी बोलवल . सोहम विचारात पडला .एकदम त्याच्या डोक्यात उजेड पडला .तो धावत पळत कॉलेज च्या लब्ररी मधे आला .  त्याने तिथल्या  लब्ररी च्या सरांना  सांगून मागील पाच वर्षांच रेकॉर्ड  मागवून घेतले .त्यानी कॉम्प्युटर वर त्याला मागील पाच वर्षाचं रेकॉर्ड  असलेलं  फा ई ल ओपन करून  दिली .सोहम चा शोध सुरू झाला. तो शब्दं न शब्द वाचत होता .डोळ्यात तेल घालून प्रेतेक फा ई ल पाहत होत . पण त्या मुला विषयी माहिती काही मिळेना . सोहमला जवळ जवळ चार तास जाहले होते, तो त्या मुलविषयी माहीत शोधत होता .आता घरून फोन ही यायला लागले होते .तो अचानक आला होता ,त्याने घरी कोणालाच ह्या विषयी सांगितले नव्हते .आणि सोहम नी मनाशी पक्के ठरवले होते की ह्या मुलाचा शोध लावल्या शिवाय तो घरी जाणार नाही . पण घरून खूप फोन यायला लागल्यावर त्याने त्या मुलाचा शोध तिथेच सोडला, आणि तो घरी आला . घरी आल्यावर सगळ्यानी त्याला अनेक प्रश्न विचारले . त्याने तात्पुरती उत्तरे देऊन वेळ मारून नेली . पण, त्याच्या  आई ला कसला तरी संशय आला .सोहम  तिच्या पासून काहीतरी  लप्व्तौय . आणि जेव्हा कधी  सोहम तिच्या पासून असं काहीतरी लप्व्तौ, तेव्हा तिच्या घरासाठी ते योग्य नसतं .पण,परत सोहम ची आई विचारत पडली, नक्की सोहम च्या मनात काय चल्लाय ते कसं कळणार? त्याला त्याबद्दल विचारलं तर तो काहीच सांगणार नाही .आणि जेव्हा जेव्हा सोहम ने काहीतरी लप्व्ल्य,तेव्हा तेव्हा त्याने काहीतरी वेगळाच विचार केलेला असतो, जो ह्या घरांसाठी योग्य नसतो . त्यानी सोहमवर लक्ष ठेवायचं ठरवलं. तो कुठे जातो, कोणाशी बोलतो, कोणाला भेटतो .सगळ्यांवर लक्ष ठेवायच ठरवले.
                     ई कडे सोहम अंजलीच्या रूम मधे आला .दिवसभराच्या धकाधकीने   अंजली फार द्म्ली होती .त्यामुळे  बेड वर झोपून आराम करत होती . सोहम ने तिच्या गोळ्या चा  डब्बा घेतला .आणि तिच्या संध्याकाळ च्या गोळ्या काढल्या. त्याने तिला उठवली, तिच्या हातात गोळी दिली .पाण्याने भरलेला ग्लास तिच्या पुढे केला .  अंजली ने ही गोळी खाल्ली, पाणी पिले .आणि ती पुन्हा बेडवर झोपी गेली . सोहम ही तिच्या गोळ्या व्यव्सतीथ डब्यात।ठेवून झौपय्ला निघाला . तो च अंजलीने त्याचा हात घट्ट धरला . आणि तशीच ती झोपी गेली .सोहम ने मागे वळून तिचा हात हातातून सोडवण्याचा प्रयत्न केला .पण ती त्याचा हात काही सोडेना. मग, सोहम ही तिचा हात तसाच पकडून तिथे बसला .  आता त्याला खरं परीस्तीथी च गम्बिर्य कळलं होत . त्याच्या मनाचा खूप गोंधळ उडणार होता . त्याच्या  भावनांचा खेळ उडणार होता . जिच्यावर त्याचं मनापासून प्रेम होत,   तिच्या शी आता तो कधीच लग्न  करू शकणार होता .आणि ज्या अंजलीच्या मुला साठी तो तिच्या शी लग्न करणार होता, ती अंजली आता त्याच्या प्रेमात पडली होती .आणि तिने त्याचं अधिकाराने ,त्याचं प्रेमाने, त्याचं आपुलकीने तिने त्याचा हात हातात घेतला होता .पण, तिला कुठे माहीत होत, की सोहम च प्रेम दुसरचं कोणी तरी होत . अंजलीवर तर त्याने माणुसकी दाखवली होती . तिच्या पोटातील बाळाला त्याचं नाव देऊन तिच्यावर एक प्रकारचे उपकारच केले होते .पण, सोहम च तिच्यावर प्रेमच नव्हतं.
त्याच्या डोक्यात तर असा प्लान होता की, अर्जुन ला  शोधून अंजली ची आणि तिच्या बाळा ची जबाबदारी त्याच्याकडे द्यायची होती . आणि मग निशा ला आपलंसं करून तिच्याशी लग्न करायचं होत .आणि त्याला पूर्ण विश्वास होता की, अर्जुन नक्कीच कुठे तरी असणार आणि तो त्याला नक्की भेटणार . आणि त्यादिवशी निशा ला ही तो हेच सांगत होता .पण तिने काही न ऐकता फोन कट केला .***

Rate & Review

Sunil Diwate

Sunil Diwate 2 months ago

Trupti Kulkarni

Trupti Kulkarni 1 month ago

vikas Awatade

vikas Awatade 2 months ago

Sanchita

Sanchita 2 months ago

Anjali bagal

Anjali bagal 2 months ago