perjagadh - 3 books and stories free download online pdf in Marathi

पेरजागढ- एक रहस्य.... - 3

३) मृत्यूचे आगमन...



पेरजागडची छवी मनात ठेवून मी त्या दुसऱ्या दिवशी सकाळीच परत आलो. आज कितीतरी दिवसांनी मनामध्ये परत एकदा असमर्थता जाणवत होती. खरं तर ती माझं प्रेम होती. आणि आजही मी तिच्यावर तितकंच प्रेम करत होतो जितकं आधी करत होतो. मी कित्येक वेळा तिला विसरण्याचा प्रयत्न केला, पण नाही जमलं ... जेव्हां आज इतक्या दिवसांनी ती मला भेटली तर साहजिकच ती माझ्या मागावर असणार.आणि शेवटी ती माझ्या मित्राला घेवुन ती माझ्या घरी आलीच.

काय झालं काय आहे?काय चाललंय तुझं?

मी तुला कालच सांगितलं गडावर.

ते माझं उत्तर नाही पवन.. आज खरं खरं सांग ... चार वर्ष झाली आज... मी पण निश्चय केला आहे... शेवटचं असेल तरी सांग .. पण आज मी ऐकल्याशिवाय इथुन जाणार नाही.

यावेळेस तिचा निश्चय बघुन मलाही जरा गोंधळल्यागत झालं होतं... थोडं फार हृदय आक्रोश करू लागलं होतं. जे झालं त्यात कुणाचीही चुकी नव्हती. पण कदाचित माझा नकार हर एक प्रकारे तीच्यावर अन्यायच होता. थोडं नरमीत येऊन मी तिला म्हटलं. आपण बाहेर जावून बोलूया.
आठवतेय का रितु, तुझ्याशी ओळख झाल्यावर मी पंढरपुरला गेलो होतो. सद्याला धरुन एकुण पाच जण होतो आम्ही..

हो माहिती आहे मला? पण त्याचा इथे माझ्याशी काय संबंध..

जर तुला जाणुनच घ्यायचे आहे तर पुर्णच जाणुन घे.. कारण तुला सोडल्याची जितकी खंत तुला आहे तितकीच मला पण आहे.जग कसं आहे डोळ्यादेखत असलेल्या गोष्टीला सत्य मानतात. पण त्याही पलीकडे अश्या अनेक गोष्टीचा वास असतो की आपण त्याची जाणीव कधीच करु शकत नाही. कारण जे घडणे आहे ते कधीतरी घडणारच ना.

पंढरपूर हे वारकऱ्यांचे देवस्थान आहे.प्रत्येक आषाढी कार्थिकिला वारकऱ्यांना तिथे देव दिसतो.त्यादिवशी मला तिथे माझा काळ भेटला. त्या गर्दीतून जातांना अचानक मला कुणीतरी हाक मारली.माझ्या नावाची ती हाक ऐकताच मी थांबलो. खरं तर मला न ओळखीच्या प्रदेशात असं हाक मारल्यामुळे मी थोडा भांबावून गेलो होतो. पण कोण आहे ते बघण्यासाठी मी मागे फिरलो. जसं मी मागे वळून बघितलं, रस्त्याच्या कडेला एक वृद्ध इसम बसुन होता. त्याने शुभ्र वस्त्र परिधान केले होते. त्यांची पांढरी शुभ्र दाढी होती. डोक्यावर पांढरा शेला होता. आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होते.

मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे गेलो. त्यांनी माझं नाव -गाव ,अत्ता-पत्ता एव्हाना मी काय करतोय? कुठे जातोय? हे सगळं सांगितलं. मी अजुन आश्चर्यचकित झालो. पण म्हटलं माझं एकट्याच इतकं निरीक्षण, इतकी माहिती, हे स्वार्थापायी तर सांगत नसणार. नक्कीच यामागे काहीतरी कारण असणार. त्यामुळे ते जे सांगत होते ते मी सुन्न होवुन ऐकत होतो. तितक्यात माझे मित्र पण माझा शोध घेत आलेले होते.
ते म्हणाले.... बाळांनो तुम्ही इथे आलात... पण तुमचं नशिब काय म्हणते? माहीत आहे काय? उत्सुकता फार चांगली गोष्ट आहे, पण काही वेळा उत्साह वेगळ्या वळनाला लावते.तुमच्या बाबतीत सांगायचं म्हणजे काळ तुमच्या मागे लागला आहे, त्याचा तुम्हाला नेम सुद्धा नाही.

आजचं विश्व म्हणजे कलयुग म्हणुन संबोधल्या जाते.कारण डोळ्या समोर जे घडते त्यालाच सृष्टी म्हटले जाते.इथे सत्य काय? वास्तव काय? अस्तित्व काय? कशाचाही लेनं नाही, किंवा आपण कसे जगत आहो त्याचं पण भान नाही. बस जसं जग जगते तसं जगायचं आणि जसं जग मरते तसेच मरायचं.

आजचं जगणं म्हणजे एक व्यसन झालंय. कशाचातरी आधार घेऊन, कशावर तरी विश्वास ठेवून, जगणे म्हणजे जगणं नाही होत.

नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते सांगा.
(आमच्या पैकी एक म्हणाला)

मृत्यु.... तो इसम म्हणाला...
मी समजलो नाही महाराज..( मी म्हणालो.)

तुम्हाला सांगण्याचे धाडस नाही, पण हे खरं आहे. जे नियती सादर करते, त्याच्या हाताखाली आम्ही पण बांधले गेलो आहोत. संसाररुपी वास्तव्य इतके विशाल आहे, की निरंकार वास्तव्य त्यात लोप पावले आहे. अट्टहास हाच असतो की कुणीतरी त्याच्या हाताखाली येणार असते. ती एक वेळ असते जी वाईट असते, घातक असते,कारण तीलापण मर्यादा असतात आणि अस्तित्व पण असते. ज्याच्या नावाने ते कोरलेले असते त्याचा अंत हा होणारच.

चला रे या म्हाताऱ्याला वेड लागलंय, कोणत्या जमान्यात कुटल्या गोष्टी करत आहे?(सदू म्हणला)

बाळा आता तु नुसता ऐकत आहेस? पण जेव्हा तु या गोष्टींना समोर जाशील ना, तेव्हा तुला कळेल की मृत्यु काय असते ते?

जेव्हा येईल ना तेव्हा बघु, ए चला रे ... आणि तो सगळ्यांना घेवुन जाऊ लागला.. पण जातांना त्याने एक थैली माझ्या हातात दिली ... मला घ्यायची तर नव्हती पण .. महाराजांनी आग्रह केला. ठेव बाळा समोर तुझ्या कामी येईल. पण एक लक्षात ठेव. नियती आहे, तिला कोणी बदलू शकत नाही, मी पण नाही. तरी जे मी करु शकतो ते या थैलीत मी तुझ्या साठी दिले आहे. बाकी सर्व त्या विधात्याच्या मनात काय आहे तोच जाणे. बम भोले म्हणून त्यांनी जयघोष केला.पण मला एक आश्चर्य वाटलं की मी तिथून नजरे आड होतपर्यंत ते माझ्याकडेच बघत होते.

मित्र त्यांच्या बद्दल बोलत होते . ऐ खरंच असं होईल का? तो इसम खरं बोलत असेल का? खरचं काळ आपल्या मागे लागलाय का? पण असं कधी होतय का? मृत्यु असा सांगुन येतो काय. आणि तो इसम असा रस्त्याच्या कडेला बसुन आपल्या मनात भीती निर्माण करण्यासाठी बोलला असेल. जेणेकरुन नंतर आम्ही त्याला यावर उपाय विचारू आणि मग तो काही चुकीची कारणे देवुन आपला स्वार्थ साधण्यासाठी आमचा वापर करणार. सोडा रे जास्त काही टेन्शन नको घ्या. सदु म्हणाला... काही होणार नाही झोपा आता सर्व.

पण माझ्या मनात एक वेगळीच आशंका निर्माण झाली होती.राहुन राहुन नको ते विचार येत होते.एकदा विचार आला की एकदा त्या थैलित काय आहे ते बघावे? आणि माझ्या असं काय कामात येणार होते ते. तशी ती थैली हलकेच वाटली मला,मग असं काय विशेष असेल तिच्यात...

तेवढ्यात सद्या मला म्हणाला... ओ साहेब आता तुम्ही पण झोपा. जास्त विचार नका करु, नाहीतर तुला रातभर झोप नाही लागेल. त्या इसमाच्या बोलण्यावर विश्वास ठेवशील तर.आणि हसु लागला.

पण सगळ्यात आधी मृत्युने त्यालाच गिळले.
काय बोलतोस? केव्हा आणि कसं झालं? (आता मात्र ती आणि मित्रसुद्धा गंभीर झाला. ऐकण्यास सर्वांना विजेचा झटका लागल्या सारखे त्यांचे तोंड पडले होते.)

" हो हे खर आहे मला खंत वाटते की मी त्याला वाचवू नाही शकलो.एका रात्री सुमारे १२ वाजता त्याचा मला फोन आला. तो खुप घाबरलेला होता.

ऐ यार पवन.... लवकर माझ्या घरी ये ना मला खुप भीती वाटते रे...

काय झालं रे...?

अरे यार मला खुप चित्र विचित्र आकृत्या दिसतात. रात्र झाली की वेगवेगळया दिशेनी मला भयानक आवाज येतात. कुत्री माझ्या घरा जवळ जोर जोरात विव्हळत असतात.कुणीतरी रात्री माझे हात घट्ट पकडुन ठेवल्याचं मला जाणवते. आणि माझा गळा दाबत आहे असं वाटते. मला रोज चाबकाचे फटके मारत असतात. गेल्या काही दिवसापासून हे असच चालु आहे. मला असं वाटतं आहे माझा मृत्यु जवळ आला आहे.आत्ताच मी पुन्हा झोपेतुन उठलो आहे. तु ये ना प्लीज ...

अरे वेड्या काही होणार नाही तुला. त्या इसमाचं बोलणं मनावर घेतले असेल तु, ते मनात ठेवलं असेल आणि भुताची सिनेमा पण तु खुप बघतो. पाणी पी आणि झोपून जा...

अरे नाही यार मी खरचं सांगतोय.एक प्रचंड मोठा व्यक्ती, रेड्या वर बसुन मला आपल्या सोबत नेण्यासाठी प्रयत्न करतो. मला चाबुक मारतो. आणि खुप जोर जोरात हसत असतो. तेवढ्यात मला जाग येते.

अरे वेड्या स्वप्न म्हणजे एक आभास असते. आपण झोपताना ज्या गोष्टींचा विचार करता करता अर्धवट सोडून देतो. ती गोष्ट आपली बुद्धी त्या कल्पनेत आपल्याला रंगवते. ज्यामुळे स्वप्नांची निर्मिती आपल्याला माहिती होते. पण मुळात तसलं काहीही नाही. तू झोप मी उद्या येतो तुला भेटायला.

मग काय काय झालं? तू गेलास का त्याला भेटायला...

हो गेलो होतो... खरी जाणीव मला तिथूनच कळली होती, कारण ज्या दिवशी मी सदयाला बघितलं. त्यादिवशी तो त्रासला होता. एखादा वाघ आपल्या सावजाला खेळून खेळून मारत आहे, अशी त्याची अवस्था झाली होती. कारण आत्ताच सांगितलेलं स्वप्न हे एक आभास असते. असं मी म्हटलं होतं.पण स्वप्नात होणारे चाबकाचे वार त्याला प्रत्यक्षात मिळत होते आणि तेही त्याला अंथरुणावर अस्तित्वात.

मग समोर... पवन..

आणि त्याच रात्री सद्या मला सोडून गेला.
ठरल्याप्रमाणे स्वप्निल आभासात मी बाजूच्याच बेडवर झोपून होतो. त्याच्याकडे बघितल्यावर असं वाटत होतं, की कोणीतरी त्याच्या छातीवर बसून त्याची नरडी दाबण्याचा प्रयत्न करत आहे.पण असं काहीच दिसायला येत नव्हतं सद्या मात्र ओरडत होता, पवन वाचव..... मला.... पवन वाचव..... हा बघ.... बसलाय..... उरावर.

तो कळवळत होता, आणि मी बाजूला राहून फक्त बघत होतो. कारण काय कराव आणि काय नको हे मला पण सुचत नव्हते. शेवटी सदाने श्वास सोडले. मी त्याच्या लॅब रिपोर्ट सुद्धा बघितले, पण मला हवा तसा काहीच पुरावा मिळाला नाही. त्याचा मृत्यू हे सगळं नॉर्मल पद्धतीने झालं आहे असंच प्रूव झालं. पण तेव्हाही माझ्या डोक्यात नाही आलं की हे सगळं काय चालू आहे.

हे सगळे योगायोगही होऊ शकते पवन.... त्यात इतकी चिंता करण्याचा काहीही प्रश्न उद्भवत नाही. कारण काहीवेळा माणसाचं भीतीने शरीरावर नियंत्रण सुटून जातं आणि एखाद्या वेड्यासारखा तो करू लागतो, हे असेही काही प्रकरण होऊ शकते.

योगायोग एकदा होते रितू, पण येथे तिघेजण आहे जे मृत्यूच्या आहारी गेलेत. आणि त्यात सगळ्यात आधी जाणारा सदू होता. सद्याच्या मयती साठी जेव्हा आम्ही सगळे जमा झालो. तेव्हा मी कित्येकांना ते सांगण्याचा प्रयत्न केला. पण कोणी माझं ऐकलं नाही. उलट मला वेड्यात काढून निघून गेले.

त्यानंतर अमर गेला, प्रदीप गेला, आणि एक म्हणजे ज्या पद्धतीने सद्या मरण पावला होता, अगदी त्याच पद्धतीने त्या दोघांना पण मृत्यूने नेले होते. तेच शोपनिक भास आणि तेच क्रुर हास्य. ...आणि तो चाबकाचा फटका ....आता फक्त आम्ही दोघेच उरलोत रितू. आता तूच सांग कसं काय करावं मी? ज्या अर्थी मी त्यांना वाचवू शकलो नाही .....तर तुला काय वाटतं? मी स्वतःला वाचवू शकेन काय? आणि आणि इतकं सगळं मला माहित असताना मी तुझ्याशी एकरुप व्हायचा कसा प्रयत्न करायचा. हे स्वार्थ झालं, आणि मला नाही करायचं हे.

हे बघ रितू तू समजूतदार आहेस. शिवाय सुसंस्कृत आणि सुस्वभावी आहेस.जर मी तुझा नाही झालो तरी तुझं काही कमी होणार नाही. उलट मी तुला एक नवीन जीवन देतोय असं समजून तू लग्न कर.मला विसरून जा, कारण मला माझे उरलेले आयुष्य असं कोणावर झोकून जायचं नाही आहे.जे झालं ते माझ्यासाठी कमी नाही आणि मी ते टाळूही शकत नाही.

मला मान्य आहे पवन, तू ते टाळू शकत नाहीस.पण मला असं सोडून जाऊ नकोस, कारण मला तू हवा आहेस.कारण जितकं तू भोगलं आहेस ना,चार वर्ष मी पण माझ्या प्रेमाला तुटताना इतक्या जवळून बघितलं आहे.चार वर्षे तुझ्या विरहाचं दुःख मी पण सोसलं आहे.आता शेवटी मरणाला तरी मला अलग नको करू.

नाईलाज आहे रितु ... आणि प्लीज तुला माझी शपथ आहे, मी आहे तसा असु दे मला. अजून कोणाला हरवण्याची ताकद उरली नाही माझ्यात... सगळ्यात आधी मला नमन चा शोध घ्यायचा आहे. कारण तो कुठे गेला आहे मला माहिती नाही. तो सद्याच्या मयतीला आलेला होता. त्यानंतर फक्त फोनवरच त्याची माझी बोलनी व्हायची.पण हल्ली त्याचा नंबर पण लागत नाही आहे.

मला निघायला हवं रितु....मी फार काळ नाही राहू शकणार... ही नियती आहे ...आणि तुलाही तसंच वागावं लागणार ....ती रडत होती आणि मी निघून चालला गेलो.

आयुष्यात माझ्यासाठी दुसऱ्यांदा ती रडत होती. पहिल्यांदा मी तिला सोडून जाताना,आणि आता परत तिला सोडताना.खरं तर मी पेरजागडावर नमनचा शोध घेण्यासाठी गेलो होतो, कारण त्याच्या मित्राकडून मला कळलं होतं की यंदा त्याचा गडावर फिरायला जायचा प्लान ठरला आहे म्हणून. पण शिवाय नमनला सोडून परत एकदा माझी आणि रितुची भेट झाली.