niragas chehre aani manusakiche hruday - 2 books and stories free download online pdf in Marathi

निरागस चेहरे आणि माणुसकीचे हृदय...! भाग 2

मागील भागातून समोरचे लिखाण....!

तरी पण आदर्शला विश्वास बसत नाही. इकडे पाहता-पाहता साडेनऊ वाजले असतात. त्याला कामावर जायचे आहे, त्याला लक्षातच येत नाही.
तो पुन्हा मोठ्या हिमतीने त्या भाविक समोर प्रश्न करतो. ही छोटीशी मुलगी कोण आहे? तिचं नाव काय? भाविक म्हणतो...! ही छोटीशी माझी बहीण आहे. तिचे नाव वैष्णवी आहे. ते बाळ अगोदर बोलण्यासाठी हिचकत होता. पण आता तो बिनधास्तपणे बोलू लागला.
आदर्श तर खूपच हादरून गेला होता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून व नाव ऐकून त्याला वाटत होते की, हे कुणीतरी मध्यमवर्गीय कुटुंबातले असले पाहिजे. तरी पण तो त्या मुलांना प्रश्न करतो. तुम्ही दोघे बहिण भाऊ इथपर्यंत कसे आले. आज पर्यंत येथे तर कुणीच नव्हते. मी सतत या रस्त्याने येत जात राहतो. तुम्ही दोघे कधी दिसले नाही मला...!
भाविक उद्गारतो...! आम्ही आजच सकाळी शेजारच्या गावाहून आलो.
परत आदर्शच्या मनात वेगवेगळे विचार यायला लागते. काय विचारू आणि काय नाही. या द्विधा मनस्थितीत आदर्श विचार करायला लागला. न राहवून तो भावीकला प्रश्न करतोच. तुझ्या आई बाबा चे काय झाले. 'ते मला समजू दे भाविक...!' आदर्शला बोलतो.
त्यावर भाविक मोठ्या अंतकरणाने बोलतो. कौटुंबिक वैमनस्यातून दोन लहान काकांनी आई बाबाला ठार केले. आणि आम्हा दोघा भावंडांना आजोबांनी गावाच्या बाहेर एका ट्रक वाल्यांना सांगून दूर एखाद्या गावाला सोडून दे म्हणून बोलले. त्या ड्रायव्हरच्या हातात शंभराची नोट दिली. आजोबा रस्त्यावरच रडू लागले
आदर्श तर शांतपणे मोठ्या अंतकरणाने ऐकत होता. ही सर्व गोम आदर्शच्या लक्षात आली. ह्या प्रॉपर्टीपाही लोक कोणत्या थरापर्यंत जातात. हे आणखी दाखवून दिले या समाजाने...!
आज तर आदर्श मनात सुट्टीच काढण्याचा विचार केला. परत त्याच मित्राला फोन करून सांगून दिले. आज मी येऊ शकत नाही म्हणून. आदर्श मनातल्या मनात इतका कसला होता की, त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा पडायला लागल्या. थोड्या वेळाने तो भानावर आला. आदर्शने गाडी फिरवली आणि भाविकला वैष्णवीला गाडीवर बसायला सांगितले. आपल्या घराकडे गाडी वळवली. घराच्या बाहेर गाडी आलेली पाहून मुलगा आई जवळ जातो. व म्हणतो...! आई आई बाबाची गाडी आली आहे. आदर्शची पत्नी बाहेर येते, आदर्श त्या दोन भावंडांना उतरायला सांगतो. ते दोघे उतरते.
आदर्श आपल्या पत्नीला सांगते, या मुलांची आंघोळ घालून दे. तन्वी काही न म्हणता ऐकते व त्या दोघांची अंघोळ घालून देते.
तन्वी नंतर आदर्शला म्हणते, ही मुले कोण आहे? तुम्ही इकडे कसे आणले? त्यावर आदर्श शांतपणाने सर्व घडलेली हकीकत तन्वीला सांगते. तन्वी खूप हळवी होते. ती गोष्ट ऐकून तिच्या डोळ्यातून पाणी येते.
आदर्श आपल्या मुलाला मांडीवर घेऊन बसतो. मयूर हे तुझे मित्र आहेत, त्यांच्यासोबत खेळायला जा. तुझी खेळणी त्यांना खेळायला दे म्हणून मयुरला सांगते. मयूर वैष्णवी व भाविक एका रूममध्ये खेळायला जाते.
आदर्श व तन्वीच्या मनात एकच प्रश्न येत असते. या दोन भावंडांचे करायचे काय? आपल्याला तर दुसरे मूल होणार नाहीच आहे. त्यावर तन्वीच्या मनात येते. आपण चांगल्या डॉक्टर कडे जाऊन विचारणा करू. पण आदर्शच्या मनात दुसरेच विचार येतात. वैष्णवीला दत्तक घेण्याचा. पण या दोन भावंडांना तुटू द्यायचे नाही. त्यांना विलग करायचे नाही. म्हणून तो मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो.
त्यांच्या शेजारच्या भोसले वहिनीला मुल बाळ काही होणार नाही. ही गोष्ट तन्वीच्या कानावर पडली होती. एखादा मुलगा दत्तक घेण्याचा विचार होता. ही गोष्ट तन्वीने आदर्शच्या कानावर टाकली. आदर्शने जीवन भाऊ भोसलेंना फोन लावून पत्नीला सोबत घेऊन यायला सांगितले. आदर्श आणि जीवन यांची मैत्री जणू लहानपणापासूनच होती. नेहमी त्यांचे येणे-जाणे असायचे.
आदर्शच्या घरची घंटा वाजली. तन्वी उठून दरवाजा उघडला तर जीवन भाऊ माधवी वहिनी दरवाज्यावर उभी होती. तन्वी त्यांना आत बोलावते आणि बसायला सांगते. तन्वी त्यांना पाणी आणून देते. चहा पिता का म्हणून विचारते. त्यावर आदर्श उच्चारतो...! त्यात काय विचारायचे आहे. मांड चहा.
भाविक, मयूर, वैष्णवी इकडेतिकडे खेळताना जीवन भाऊच्या नजरेस पडते. न राहवून आदर्श बोलण्या अगोदरच जीवनच्या मनात त्या निरागस चेहऱ्याकडे पाहून करुणा दिसून येते. तो निरागस चेहरा, सडपातळ, सावळा रूप, तेजस्वी चेहऱ्यावरील हावभाव हे पाहून जीवन आदर्शला विचारू लागतो...! हा मुलगा व मुलगी कोण आहे? तुमचे नातेवाईक आहे का? असेल तर त्याचे माता पिता दिसत नाही.
आज घडलेली सर्व हकीकत जीवन व माधवी यांच्यासमोर मांडतो. तेव्हा त्या भोसले दांपत्यांना ही निरागस चेहऱ्यांच्या काका बद्दल मनात द्वेष तयार होतो. हा समाज इतका विकोपाला गेला आहे की, जीवन संपविण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. अशी माधवी उद्गारते.
त्यावर आदर्श आपल्या मनात असलेली गोष्ट जीवन आणि माधवीच्या कानावर टाकतो. आपण दोघे लहानपणापासूनचे मित्र आहोत. आज या दोन निरागस चेहऱ्याकडे पाहून माणूस किती भयानक विकृतीच आहे .त्या दोन भावंडांना पोरके करून त्यांना काय मिळाले. ती फक्त दोन गुंठे जमीन. या मुलांनी काय केलं होतं.
तन्वी आतमधून चहा घेऊन येते व बोलू लागते. या अनाथ झालेल्या मुलांना मातापित्यांचे सुख तर भेटले पाहिजे. त्यांना एकत्र ठेवूनच ते सुख चांगल्या तरेने फुलतील. आदर्श त्यावर बोलतो...! जीवन मी तर वैष्णवीला दत्तक घ्यायचं ठरवलं. तुम्हालाही मूलबाळ होत नाही. तन्वी नेच माझ्या कानावर टाकली गोष्ट. तुम्हीही एखादा मुलगा दत्तक घेण्याच्या तयारीत आहे म्हणून.
म्हणूनच मी अगोदर तुम्हाला फोन करून बोलावलं.
यावर जीवन उद्गारतो...! आदर्श तुम्ही केलं ते खूप चांगला आहे. पण उद्या चालून कोणी त्यांचा हक्क मागितला तर मग काय करायचं.
त्यावर आदर्श म्हणतो की, माझ्या मनात इतका विचार आला की या दोघा भावंडांची तूट होऊ नये म्हणून मी पहिला शब्द तुमच्या दोघांच्या कानावर टाकला आहे.
त्यावर माझी म्हणते की, आपण या दोघा भावांना अनाथाश्रमात टाकून नंतर रीतसर नोंदणी करून दत्तक घेऊ शकतो. त्यात आपल्या हातात एक सबळ पुरावा मिळेल.
ही गोष्ट आदर्श, तन्वी, जीवन यांना पटते. व आपल्या शहरातील जोशी काकांच्या अनाथ आश्रमाला भेट द्यायची इच्छा होते. मग सर्वजण जोशी काकांच्या आश्रमाला भेट देण्यासाठी तीन वाजता निघते. तेव्हा चौघेजण व भाविक, वैष्णवी व मयूरला सोबत घेऊन जातात. ते एकमेकांमध्ये इतके रमले की जणू सख्खे बहिण भाऊच आहे जणू.
जोशी काकांच्या रूम मध्ये ही सर्व मंडळी जातात.
आदर्श आज सकाळी घडलेली शंकराच्या मंदिराच्या बाजूची सर्व हकीकत जोशी काकांना सांगते. त्या क्रूर काकांनी जे घडवून आणलं आणि त्याचं कुटुंब उध्वस्त केलं व आजोबांनी कशातरीने यांना गावाच्या बाहेर नेऊन ट्रक ड्रायव्हरच्या स्वाधीन केलं. याबद्दलची सर्व हकीकत जोशी काकांना सांगितली.
तसेच जीवन हा भाविकला आणि मी वैष्णवीला दत्तक घेण्याचा विचार करत आहे. कारण या दोघा भावांना एकत्र ठेवूनच त्यांचे संगोपन करणे सोयीचे होईल. यात जोशीकाका तुमचा काही मोलाचा सल्ला घ्यायचा आहे म्हणून आम्ही कडे आलो आहोत.
जोशी काका म्हणतो की, तुमच्या मनात आलेला विचार माझ्यासमोर मांडल्या बद्दल खूप खूप अभिनंदन...!
आज तुमच्या सारख्या पिढीची जरूरत आहे, या भारत मातेला...!
तुम्ही ज्या स्पष्टपणे त्या निरागस चेहऱ्यानचे पालकत्व स्वीकारण्याची व त्यांच्या नात्यात तूट पडू नये म्हणून घेतलेला निर्णय अभिमानास्पद आहे.
त्यासाठी मी सांगते ते नीटपणे ऐका...!
त्या दोन्ही भावांना अनाथाश्रमात दाखल करून घ्या. वकीलाच्या हाताखाली दत्तक घेतल्याचे प्रमाणपत्र कोर्टाकडून काढून घ्या जोशी काका म्हणते.आजच भाविक व वैष्णवी ची आश्रमात नोंदणी माझ्या नावानेच स्वतः करतो. व चार पाच दिवसांनी तुम्ही जीवन व माधवी आणि आदर्श व तन्वी एकत्र येऊन दत्तक पालकत्व स्वीकारा.
परत जोशी काका म्हणते, या आश्रमात असणाऱ्या निरागस चेहऱ्याना तुमच्यासारखे विचार करणाऱ्या पालकत्वाची आवश्यकता आहे.
तेव्हा अशा असंख्य चेहऱ्यांना माणुसकीचे हृदय कसे असते त्याची जाणीव होईल. खरच तुमच्यासारख्या माणसांची जरूरत या देशाला आहेत. तुम्ही जे कार्य केलं, त्याबद्दल शब्द खूप अपुरे पडत आहे आदर्श...!
जोशी काका आदर्शला म्हणतो...! तू खूप मोठ्या मनाचा आहेस, तुम्ही जो पुढाकार घेतला आणि त्या जीवनला सहभागी करून घेतल. त्याबद्दल माणुसकीचे हृदय जिंकलं बेटा तू...!
आदर्श बोलतो...! काका मी जे केलं ते "माझ्या आई बाबाच्या शिकवणीतूनच केल आहे. त्याचे श्रेय माझ्या आई बाबाला द्यावे लागेल." असे बोलून निघण्याची परवानगी मागतो.
परत जातांना माधवी व तन्वी जोशी काकांच्या पाया पडते. व त्या दोघांना म्हणजे भाविक वैष्णवीला आपल्यासोबत नेण्यात काही हरकत तर नाही ना म्हणून विचारते.
जोशी काका म्हणते. ठीक आहे त्यांना घेऊन जा मी आत्तापासूनच कागदपत्र बनवण्यास सुरुवात करतो. पण चार-आठ दिवसांनी रीतसर कोर्टाकडून दत्तक प्रमाणपत्र घेऊन या तेव्हाच तुमच्या स्वाधीन होईल खऱ्या अर्थाने.
अशा तऱ्हेने आदर्श व जीवन या दोघांना दत्तक घेऊन हरवलेले पालकत्व स्वीकारतो आणि सामाजिकतेचे भान म्हणून त्यांना एकत्रच ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होतो.
ही कादंबरी आवडली असेल तर नक्की शेअर करा.
आणि कादंबरी काल्पनिक असून सर्व पात्र आणि मांडणी डोक्यात आलेल्या विचारातून मांडली आहे. तर कुणाच्या जीवनाशी जुळली असेल तर योगा योग समजावा.
धन्यवाद...!