Tuji majhi lovestory - 3 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी लव्हस्टोरी... - 3

भाग-३
रात्री सगळे जेवायला बसले असतात...सिद्धार्थ जरा त्याच्या आईवर रुसलाच होता..पण एका बाजूने तिच म्हणन बरोबर तर होत..तेवढ्यात शांतता भंग करत रविंद्र सिद्धार्थचे बाबा...बोलतात...

"सिद्धार्थ बाळा... जरा बोलायच होत.."

"हा बाबा बोला ना..."

"नको आधी जेवण पूर्ण करु मग बोलुयात.."

"ओके बाबा..."

सगळे जेवण अटपुन उठतात आणि हॉल मध्ये येऊन बसतात.....

"बाबा बोला ना काय बोलणार होता तुम्ही..?"

"सिद्धार्थ... आम्ही तुझ्यासाठी एक मुलगी पाहिले.."

"बाबा पण अहो...."

"थांब सिद्धार्थ... मला माहित आहे तुला काय बोलायच आहे... आम्ही तुला जबरदस्ती नाही करत आहोत... आमच एकदा एक मग तू ठरव.."

"हम्म्म्म..ओके बाबा..."

"बग सिद्धार्थ.. आज पर्यंत मी हा विषय तुझ्याजवळ कधी काढला नाही....आज पहिल्यांदा बोलतोय..बाळा तुझ वय आता २६ आहे.. अरे आता लग्न नाही करणार मग काही वर्षांनी ३० वर्ष गाठशील तेव्हा करायच का..सांग बर.."

"नाही बाबा पण..."

"सिद्धार्थ अरे तुझ्या वयाचा जेव्हा मी होतो तेव्हा तुला जन्माला येऊन ४ वर्ष झाले होते बाळा.... अरे काम काय होत राहतात.. पण बग...आयुष्य हे एका प्रवासा प्रमाणे असत.. त्या प्रवासात जोड़ीदार लागतोच.. आपल अस कोणी तरी...हक्काच..."

"हो बाबा खर आहे तुमच"

"बाळा आम्ही एक मुलगी पाहिले...छान आहे मुलगी तू म्हणत अशील तर..."

"बाबा तुमच म्हणन पटलय पण थोडा वेळ दया ना..."

"हे बग बाळा वेळ घे पण आम्हाला नंतर वाटल की खुप वेळ देऊन झाला तुला...मग तेव्हा मात्र आम्ही बोलू तस कराव लागेल..."

"Sidhu तुझ्या मनात कोणी मुलगी असली तरी सांग..आम्ही तीच मुलगी करु...रश्मी"

"हो नक्कीच.. बाळा... रविंद्र"

"ह्म्म्म पण तस काही नाही..बाबा"

"हम्म Sidhu काका बरोबर बोलतायत जोड़ीदाराची गरज खुप असते बाळा...हे आता नाही कळत लग्न झाल्यावर कळते... मला ही लग्नाआधी असच वाटायच पण सागर सोबत लग्न झाल आणि मग समजल...सायली"

"हो ताई.."

"बर तुझ्या निर्णयाची वाट पाहू..."

"हम्म बाबा....."

"ओके आम्ही चालो झोपायला....गुड़ नाइट.."

"हा आई बाबा गुड़ नाइट.."

"सायु ताई..बोलायच आहे ऐक ना.."

"हा बाळा बोल न..."

"ताई आमच्या ऑफ़स मध्ये एक मुलगी आले नवीन...माझी personal secretary आहे ती तर...तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हा लव्ह At फस्ट साइड झाल...पण ताई मला जानून घ्यायच आहे की... हे प्रेम आहे की आकर्षण... कस कळेल मला ते ताई.."

"अरे बाळा बग...जिच्यावर तुझ खर प्रेम आहे तर..तिकडे सुरुवात अकर्षणानेच होणार...कारण प्रेमाची सुरवात Attraction ने होते...पण.. ते आकषर्ण फक्त सुरुवातीला असत.. नंतर जर खरच तिच्यावर तू प्रेम करतोस तर तीच रूप पाहण्यापेक्षा... तीच वागण, बोलण, स्वभाव, अशा गोष्टी समजून घेशील...तिलाच तू तुझी लाइफ पार्टनर म्हणून बघशील...तिच्या सगळ्या गोष्टी मध्ये ती तुला छान, सुंदरच दिसेल...जिला पाहुन अस वाटेल की बस..आता हिच्याच सोबत जगायच आणि मरायच अस वाटेल...तेच खरे प्रेम...आता हे सगळ तुला वाटत असेल तर बग...पण प्रेम कस असाव आत्म्याला स्पर्श करून जाणार... बाकी ज्याचा त्याचा वेगळा अनुभव.."

"हा ताई..Thank You"

"चला आता झोपा...जा"

"हो ताई..."

"बर Sidhya नाव काय त्या मुलीच?😃"

"कृष्णा😲😅"

"Ohhhhhh अस आहे तर...छान आहे नाव😃चला म गुड़ नाइट"

"गुड़ नाइट ताई"

सायली तिच्या रूम मध्ये जाते....मग सिद्धार्थ सुद्धा जातो...सायली बोलेल तो सगळ आठवतो...आणि मग झोपी जातो....नेहमी सारख सकाळी परत त्याची घाई सुरु होते...आणि तो ऑफिस ला जायला निघतो...असेच दिवस जात राहतात... कृष्णा दिव्या नंतर मोकळे पणाने थोड़ी का असेना..सिद्धार्थ सोबत बोलू लागली होती...त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती....सिद्धार्थ ला जानवू लागल होत की तो तिच्यावर मनापासून प्रेम करायला लागलाय..सायली ने सांगितलेल सगळ खर ठरत होत...

कृष्णाला आता ऑफिस मध्ये येऊन...४ महीने झाले होते...बाकी सगळ्यांशी खुप चांगल्या पद्धतीने तिने जुळवून घेतले होते...या दरम्यान मानव आणि दिव्या एकामेकाना आवडू लागले...

नेहमी सारखा सिद्धार्थ ऑफिसला निघाला..जाताना त्याला कृष्णा बस स्टॉप वर उभी दिसली...त्याने कार थांबवली..

"हेय कृष्णा....आज उशीर झाला का....आणि आज एकटीच?"

"हो सर ते...दिव्या मानव सोबत गेली😅ती जात नव्हती मीच म्हंटल जा😅"

"Ohhhhhh...😂चल मग तू माझ्यासोबत...."

"पण सर मी....."

"अग बस चल..."

"ओके सर."

ती कार मध्ये जाऊन बसते...खुप वेळ देघेही शांत असतात...मग सिद्धार्थ शांतता भंग करत बोलतो....

"तुला माहित आहे कृष्णा... आज फर्स्ट टाइम माझ्या सायली ताईला सोडून दूसरी मुलगी माझ्या बाजूच्या सिटवर बसले😳"

"हो सर....बर सर तुमची आधी गलफ्रेंड होती का? सॉरी खुप पर्सनल होत असेल तर..."

"नो नो इट्स ओके....तर माझी आधी कोणी गलफ्रेंड नव्हती..कारण प्रेम आत्म्याला स्पर्श करणार असाव...उगाच करायच म्हणून नाही"

हे ऐकून कृष्णा एकटक त्याच्याकडे बघत राहिली...सिद्धार्थच लक्क्ष गेल... त्याने आज पहिल्यांदा कृष्णाच्या डोळ्यात त्याच्यासाठी वेगळ्या भावना पाहिल्या😳पण काही न बोलता नजर चोरु लागला...मग ऑफ़िस आल....आणि ते आपापल्या कामाला लागले....वेळ झाल्यावर ते आपल्या घरी निघुन गेले....

कामावरुन सिद्धार्थ घरी येतो तर...घरी सायली, सागर(सायलीचा नवरा), त्याचे काका,आले असतात....तो जाऊन काका च्या पाया पडतो....

"अरे काका कसे आहात?"

"मी मस्त ..."😊

"सागर भावजी कसे आहात... आज वेळ भेटला तर यायला.."

"हो काय करु कामतुन वेळ मिळत नाही..पण आज खास कारण आहे आम्ही इथे जमणयाच ..."

"कारण????"

"Sidhu... I'm pregnant 😳....सायली"

"काय😱😀😍🎉"

"हो"

सिद्धार्थ जोरजोरात उडया मरतो...खुप खुश होता तो आज....सगळेच खुप खुश होते...🎉मग सायली बाळ होईपर्यंत इथेच राहणार...तिची आई या जगात नाही...म्हणून रश्मी यांनी तिची सगळी जबाबदारी घेतली....सायलीचा नवरा सागर ही... पाहुंचार घेऊन मग घरी वळतो...सगळे गप्पा मारत बसले असतात...

"सिद्धार्थ... तुझा निर्णय अजुन आला नाही तर...मग आता..."

"हा बाबा ते......"

"आता आम्ही बोलतो तेच कर....उद्या सन्डे आहे...आपण उद्या जातोय मुलीला बघायला... संध्याकाळी ६ वाजता..ओके"

"ह्म्म्म ओके बाबा"

अणि सगले झोपायला जातात....नकळत सिद्धार्थ च्या डोळ्यातून पाणी येत......आणि तो सायलीच्या खांद्यावर डोक ठेवून रडू लागला पण फायदा काही नव्हता ...कारण एक प्रकारे त्यांच म्हणन बरोबर होते....आणि तस ही त्याला पण माहित नव्हतं की कृष्णाच त्याच्यावर प्रेम आहे की नाही?.…....

●To be continued........●

(बघुया आता आपल्या कृष्णा सिद्धार्थच पुढे काय होत......मी आशा करते तुम्हाला माझी कथा आवडत असेल...🙏..)