Guntata Hruday He - 3 books and stories free download online pdf in Marathi

गुंतता हृदय हे !! (भाग ३)

चक्क आर्या आपल्याशी बोलत आहे याचा आधी समीरला विश्वासच बसत नव्हता..पण त्याने स्वतःला सावरलं..

आणि म्हणाला, "अगं, आज एका क्लायंट बरोबर मीटिंग आहे..म्हणून थोड्या तयारी साठी लवकर आलो..जाईन आता ५-१० मिनिटात."

तो पुढे म्हणाला,"आज कधी नवे ते, तू पण तर लवकर आलीयेस. काही खास कारण? तुझी पण मीटिंग वगैरे??"

"तसे काही नाही. Anywy you carry on. मी निघते..मला भरपूर काम आहे..पुन्हा बोलू bye" असे बोलून आर्या कँटीन मधून निघून गेली..

आजचा दिवस रोजच्यापेक्षा खूपच बोर होता स्निग्धा नव्हती ना!!

ती असली की, नेहमी ऑफिसमध्ये आवाज,गोंधळ असायचाच..

तोपर्यंत दुपार ही झाली..तिला लंच एकट्याने करायलाही बोरं झालं होतं. पण भूक पण लागली होती म्हणून ती लंच साठी कँटीन मध्ये निघाली......

इतक्यात तिला शेखर म्हणजेच तिच्या बॉसचा फोन आला आणि त्याने तिला कॅबिन मध्ये तातडीने बोलवले.

आर्याने लंचबॉक्स पुन्हा आत ठेवला आणि ती शेखरच्या कॅबिनमध्ये गेली.

शेखरने आर्याच्या हातात एका नवीन प्रोजेक्ट ची फाईल दिली आणि ह्या प्रोजेक्टचा इंचार्ज त्याने तिला बनविले पण तिला ह्या प्रोजेक्ट मध्ये समीर मदत करेल..हे ही सांगितले.

आर्याला खूपच आनंद झाला..कारण हा तिचा पहिला असा प्रोजेक्ट होता जिथे ती इंचार्ज होती..म्हणजे ह्या प्रोजेक्टसंबंधीचे सगळे निर्णय ती घेणार होती..

पण ह्या आनंदावर काही सेकंदातच विरजन पडले, जेव्हा तिला कळले की हा प्रोजेक्ट तिला समीर बरोबर करायचा आहे.

"झाले म्हणजे पुन्हा सगळं क्रेडिट हाच घेऊन जाणार", आर्या मनात पुटपुटली.

तेवढ्यात समीर पण तिथे आला व त्याने शेखर आणि आर्याला आजच्या मीटिंगचे प्रोजेक्टबद्दलचे डिटेल्स दिले..आणि लंच नंतर त्यावर डिस्कशन करू असे सांगितले.

समीर आणि आर्या दोघेही आपापल्या डेस्ककडे निघाले..

हो, तुम्ही एकदम बरोबर विचार केलात!!

ती आजची सकाळची मीटिंग.. त्याच प्रोजेक्ट संबंधात होती..जिथे समीर गेला होता..

आर्या स्वतःच्या डेस्कजवळ आली, इतक्यात तिचे लक्ष समीरकडे गेले..तो ही तिलाच बघत होता..त्याने तिला छानशी स्माईल दिली..

आर्याला काहीच कळत नव्हते की, नक्की काय चालयल!!

ती बॉटलमधले पाणी घटाघटा प्यायली आणि विचार करत मनातच म्हणाली, "आज स्निग्धा काय नाही आली तर कायकाय घडले ऑफिसमध्ये आणि तो प्रोजेक्ट?? त्याबद्दल सगळं जर समीरला माहीत आहे तर मग मी त्या प्रोजेक्टची इंचार्ज कशी? बापरे, डोक्याचा भुगा होईल आता. जाऊ देत..आधी लंच करू मग बघू."

असे बोलून ती कँटीन मध्ये लंच साठी गेली..

तर तिथे समीर पण तिला जॉईन झाला लंच साठी..

तिला समिरशी काय बोलावे हे सुचत नव्हते..

समीरला ही हे कळले..मग काय त्यानेच बोलणे सुरू केले आणि आर्याला comfortable केले..

कधी नव्हे ते आज दोघेही एकत्र लंच करत खूप बोलले..

आर्याचे समिरबद्दल खूप सारे गैरसमज झालेले ते सगळे हळूहळू क्लिअर होत होते..

त्यांनतर त्यांची प्रोजेक्ट संबंधात शेखर बरोबर सुद्धा मीटिंग झाली आणि खूप साऱ्या महत्वाच्या माहितीवर ही चर्चा झाली..

आज आर्याला दुपारनंतर फोन बघायची पण फुरसत नव्हती..ती घरी सुद्धा उशिरा आली..आणि अजून काही दिवस तिला असाच उशीर होईल असेही तिने घरी सांगितले..आणि सरळ झोपी गेली..

दुसऱ्या दिवशी तिने सकाळीच स्निग्धाला फोन केला..तर तिच्या आईने मेसेज दिला की, स्निग्धा अजून तरी ३-४ दिवस ऑफिसला येऊ शकणार नाही.

मग काय आजपण आर्या एकटीच ऑफिसमध्ये निघाली..आज तिला ऑफिसमध्ये बोर होण्याचं कारणच नव्हत, ते कारण म्हणजे तिचा प्रोजेक्ट पार्टनर, समीर पटवर्धन..

नाव जसे डॅशिंग, तसाच तो सुद्धा...कोणीही मुलगी बघताक्षणीच प्रेमात पडेल असा..

आर्या समीरबरोबरच काम खूपच एन्जॉय करत होती..तो खूपच हुशार होता..म्हणूनच तर तो अस्मिता pvt ltd चा टॉप एम्प्लॉयी होता..

प्रोजेक्टच काम अजून तरी २-३ दिवस चालणार होते..शेखरने त्याच्यासाठी एक वेगळी कॅबिन ही त्या दोघांना दिली होती..

त्यामुळे दोघांच्या कॉफी पासून ते जेवणापर्यंतचा सगळा वेळ तिथेच जात होता..

पण यामुळे ऑफिसमध्ये त्यांची चर्चा खूपच गरम होती..ऑफीसमधल्या मुली तर आर्यावर खुपच जळफळत होत्या..

आर्याला ही हे कळत होते..पण आर्याला त्याची काहीच फिकर नव्हती..तिला फक्त तिच काम परफेक्ट व्हावे असे वाटत होते.

पण ही झाली आर्याची बाजू पण आपल्या समीरच काय?? ते तरी विचार करा..

समीर तर आर्यावर तिला पाहिलेल्या पहिल्या दिवसापासून फिदा होता..पण आर्याशी कधी मोकळेपणाने बोलायची संधी त्याला मिळालीच नव्हती..

नेहमी ती स्निग्धा अगदी ग्लू सारखी चिकटून बसलेली असे आर्याशी..मग बोलणार पण कधी..म्हणून त्याने शेखरला राजी करून आर्याला ह्या प्रोजेक्टच इंचार्ज बनवायला सांगितले होते..

सगळे काही त्याच्या प्लॅननुसारच सुरू होते..आणि सोने पे सुहागा म्हणजे स्निग्धा आजारी पडली त्यामुळे त्याला या ३-४ दिवसात आर्याच्या अजून जवळ जायला मिळाले होते.

तसेच, तो प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर समीर आर्याला मागणी ही घालणार होता..मग आर्याच उत्तर काहीही असो..त्याला त्याची फिकर नव्हती..पण तो अजून हे प्रेम मनात लपवून ठेवू शकत नव्हता..

इथे अनिशला समजत नव्हते की, आर्याला काय झालयं?

कारण न चुकता तो रोज आर्याला 'गुड मॉर्निंग' हा मेसेज सेंड करत होता..

पहिला दिवस सोडला तर तिने नंतर त्याच्या मेसेजला रिप्लाय ही केला नव्हता..म्हणून त्याने आज तिला फोन करायचं ठरवले..

पण फोन करून बोलणार तरी काय?

त्याच्याकडे ठोस असे कारण ही नव्हते..तो विचार करू लागला..

समीर आणि आर्या खूपच आनंदित होते..आज त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं चीज होणार होते..ठरल्याप्रमाणे प्रेझेन्टेशन खूपच छान पार पडले..क्लायंटला ही हे काम खूपच आवडलं..त्यामुळे शेखर सुद्धा ह्या दोघांवर खूपच खुश होता. तसेच सगळ्या स्टाफने ही दोघांचे फारच कौतुक केले.

आर्याला खूपच भरून आले. कारण हे तिचे स्वतःच असं पाहिलं प्रोजेक्ट होतं..समीर जरी मदतीला असला तरी सगळ्यात जास्त मेहनत ही आर्याची होती..

इतक्यात शेखरने समीरला इशारा केला आणि समीरने ही तो ओळखला..तो आता आर्याला काही बोलणारच होता की.........

अचानक आर्याचा फोन वाजला.

आर्याने फोनच्या स्क्रीनवर बघितले तर तो फोन अनिशचा होता...

आर्या मनातच म्हणाली, "अनिशचा फोन??"

क्षणभरासाठी तिने समीरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि समीरला म्हणाली, "मी आलेच २ मिनिटात" व तिने अनिशचा कॉल रिसिव्ह केला..

तिने फोन उचलताच अनिशने आर्यावर नुसता प्रश्नांचा भडिमार सुरू केला.

तो म्हणाला,"आर्या तू ठीक तर आहेस ना? तुला माझा कोणत्या गोष्टीबद्दल राग आला आहे का? तू फक्त पहिल्या दिवशीच मेसेजचा रिप्लाय दिलास, बाकी दिवशी तू माझा मेसेज ओपन करूनही नाही बघितलास..काय झालय तुला? तू अशी का वागते आहेस माझ्याशी??"

बापरे, आर्याच्या लक्षात ही आले नव्हते की, तिच्या मेसेज न करण्यामुळे असे काही तरी होईल..

पण तिला हे ही जाणून घ्यायचे होते की, अनिशची ही फक्त काळजी आहे की, त्याच्या मनात दुसरंच काहीतरी चाललय..असे असंख्य विचार तिच्या मनात चालूच होते.

तेवढ्यात अनिश समोरून म्हणाला,"आर्या are you there???"

आर्या पटकन भानावर आली आणि म्हणाली, "हो, अरे, किती काळजी करशील. मी एकदम ठणठणीत आहे. इतके दिवस मी ऑफिसच्या कामात खूपच व्यस्त होते. म्हणून खूप दिवस व्हाट्सएप ओपन करून नाही पाहिले आणि मी तुझ्यावर का रागविन. तुझं आपलं काहीतरीच असतं."

तिचे बोलणं मधेच तोडत पटकन अनिश म्हणाला,"माझ्याबरोबर आज कॉफी प्यायला येशील? प्लीज"

आर्याला काय बोलावे हे सुचतच नव्हते..

चक्क अनिश तिला भेटायला बोलवत होता..

ती मंद हसली आणि म्हणाली, "हो नक्कीच..का नाही"

अनिश हे ऐकून खूपच खुश झाला..तो म्हणाला, "मस्त..मी तुला जागा आणि वेळ मेसेज करतो..मग आपण भेटू..अरे हो, अजून एक..कृपा करून आज तरी निदान माझा मेसेज वेळेवर वाच म्हणजे झालं"

मग दोघेही हसले आणि त्यानंतर दोघांनीही फोन ठेऊन दिला..

क्रमश:

(हा भाग आवडल्यास ह्या कथेला लाईक, शेअर करायला विसरू नका, तसेच ही कथा आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.)

@preetisawantdalvi