Guntata Hruday he - 8 books and stories free download online pdf in Marathi

गुंतता हृदय हे!! (भाग ८)

अनिशने आर्याबरोबर अमेयची ओळख करून देत असताना तो तिला म्हणाला, 'आर्या हा आमच्या रेडिओ स्टेशनचा सुपरस्टार "RJ अमेय" म्हणजेच समीर पटवर्धन..

तुला आश्चर्य वाटलं असेल ना! पण हे खरं आहे की, सगळी मुंबई ह्याला RJ अमेय च्या नावाने ओळखते..पण ह्याचं खरं नाव समीर..'

तो पुढे बोलू लागला, 'समीर, meet my wife आर्या जोशी आणि बरं का, मला ही हे आताच कळलं की ती पण तुझी फॅन आहे..but buddy ur late, कारण तुझ्या ह्या सुंदर फॅनला मी आधीच पटवलं आहे" आणि त्याने समीरच्या हातावर जोरात टाळी दिली व तो आणि समीर दोघेही हसू लागले..

आर्याला काय आणि कसं रिऍक्ट व्हावं हेच कळत नव्हतं.. तिने ही दोघांनकडे बघून smile केली आणि समीरला हात मिळविला..स्निग्धा ही समीरला पाहून खूप खुश झाली. पण जेव्हा तिला कळलं की, समीर हाच RJ अमेय आहे..तेव्हा ती थोडी दुःखी झाली.

शेवटी अनपेक्षितपणे का होईना पण समीर हाच आर्याचं पहिलं प्रेम होतं पण ते अमेय ह्या RJ च्या रुपात.

समीरने त्याला महत्वाचं काम आहे हे सांगून त्या कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

कारण अजून काहीवेळ खोटं हसू चेहऱ्यावर आणणं त्याला कठीण जात होतं.

त्याने एकवार आर्याकडे पाहिलं आणि मनातल्या मनात तिला तिच्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

आर्यालाही कळतनकळत त्याच्या मनातल्या भावना समजल्या. तिने ही त्याला नजरेने निरोप दिला..

आज आभाळ खूपच दाटून आलं होतं..पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि त्या पाण्यामध्ये समीरचे अश्रूही मिसळून गेले.

तो मनातल्या मनात देवाला हेच सांगत होता..

🎶🎶अगर मिले खुदा तो
पूछूंगा खुदाया
जिस्म मुझे देके मिट्टी का
शीशे सा दिल क्यों बनाया🎶🎶

साखरपुडा खूप छान पार पडला.

पण पूर्ण साखरपुड्यात RJ अमेयचाच बोलबाला होता.

दिवसभराच्या लगबगीने सगळे थकून गेलेले. म्हणून सर्व झोपी गेले.

पण आर्याला मात्र झोप येत नव्हती.

ती आज घडलेला प्रसंग सारखा आठवत होती.

ती मनात सारखी हाच विचार करत होती, "RJ अमेय आणि तो पण समीर. विश्वासच होत नाहीये. ज्याच्या आवाजाची मी इतकी मोठी फॅन होते. तो सतत माझ्या डोळ्यासमोर होता आणि मला हे कळलच नाही. समीरने मला प्रपोज सुद्धा केलं होतं. पण तो समीर होता. आणि माझं प्रेम तर अनिशवर होतं, मग मी समीरला कशी हो म्हटली असती. पण जर मला आधी कळलं असतं की, समीरचं RJ अमेय आहे, मग काय झालं असतं. काय चाललय काही कळत नाहीये. पण खरं हेच आहे की, माझं अनिशवर खूप प्रेम आहे."

इतक्यात अनिशचा फोन येतो. तशी आर्या पटकन भानावर येते. अनिशची बोलल्यावर आर्याचा मूड फ्रेश होतो. ती स्वतःशीच पुटपुटते, "तसे पण समीर हा माझा खूप चांगला मित्र आहे, तो कधीच माझी निवड नव्हता". असे बोलूंती झोपी जाते.

दुसऱ्या दिवशी सकाळी,

एव्हाना सगळ्या ऑफिसमध्ये ही बातमी पसरते की, समीर हाच RJ अमेय आहे म्हणून.

शेखरला ही आता कळून चुकते की, समीर पुन्हा ऑफिसमध्ये येणार नाही. म्हणून तो सगळ्या ऑफिस स्टाफला समीरच्या जॉब सोडण्याबद्दल सांगतो आणि लवकरच कोणीतरी नवीन व्यक्ती त्याच्या जागी नियुक्त केली जाईल हे ही सांगतो.

सगळ्यांचे आनंदी चेहरे ही बातमी ऐकल्यावर पडतात. स्निग्धाला ही फार दुःख होते.

ती लगेच आर्याला फोन करून सर्व काही सांगते. आर्या सुद्धा हे सगळे एकूण चकित होते.

ती समीरला फोन लावण्याचा खूप प्रयत्न करते पण त्याचा फोन स्विच ऑफ येत असतो.

राहून राहून ती स्वतःलाच ह्या सगळ्याला कारणीभूत मानत असते. पण ती हे कोणाला सांगूही शकत नसते.

इथे समीर एक नव्या शहरात एक नवीन ओळख बनवायला निघतो.

आता त्याला कोणाला काही सांगायची गरज नसते की लपवायची.

त्याला अमेयला मागे टाकून समीर म्हणून जगायचे असते. तो ट्रेनमध्ये चढतो..

पण अजूनही त्याच्या डोळ्यासमोर फक्त आर्याचाच चेहरा दिसत असतो.

अचानक कुठेतरी गाणं वाजत असतं..

🎶🎶तुझको मैं रख लूँ वहाँ
जहाँ पे कहीं है मेरा यकीं
मैं जो तेरा ना हुआ
किसी का नही..किसी का नहीं
ले जायें जाने कहाँ हवाएँ, हवाएँ🎶🎶

समीर आर्याच्या आठवणी मनात ठेवून जीवनाच्या एका नव्या प्रवासाला निघतो.

बँगलोर, भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर.

बँगलोर शहराला भारताची माहिती तंत्रज्ञान (IT) उद्योगाची राजधानी किंवा भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणूनही ओळखले जाते.

असो, समीरला बँगलोरच्या एका खूप मोठ्या IT कंपनीत नोकरी मिळते.

२ दिवसानंतर त्याला ऑफिसमध्ये रुजू व्हायचे असते. पण त्याआधी तो बँगलोर शहर फिरायचं ठरवतो.

त्याची राहण्याची सोय कंपनीने तिच्या कॉम्प्लेक्स मध्ये केलेली असते.

तिथे त्या कंपनीतले काही सहकारी आपापल्या कुटूंबासोबत, तर काही एकटे राहत असतात..

अत्याधुनिक सोय-सुविधा असलेली ती कॉम्प्लेक्स असते.

त्या बिल्डिंगच्या समोर एक मोठं गार्डन सुद्धा असतं..समीरला बऱ्यापैकी ती जागा आवडते.

तो दोन दिवसात जमेल तितकी माहिती काढून आसपासची ठिकाणे फिरायचे ठरवतो...

तो राहत असलेल्या माळ्यावर २ फ्लॅट असतात..एका फ्लॅटमध्ये समीर तर दुसऱ्या फ्लॅटमध्ये कोणी प्रमोद शास्त्री म्हणून राहत असतं..

हे समीरला त्या फ्लॅटच्या नावाच्या फलकावरून कळते..सुदैवाने त्याचे शेजारी हे एक मराठी असतात हे बघून समीरला हायसं वाटतं.

समीरच्या दिवसा जेवणाचा प्रश्न ऑफिसमुळे सुटतो पण रात्रीच्या जेवणाचं काय करायचं..

म्हणून जवळ कुठे खानावळ वगैरे असेल तर प्रश्नच मिटेल असा मनात विचार करून समीर शेजारच्या शास्त्री यांच्या दारावरची बेल वाजवतो..

प्रमोद शास्त्री स्वतःच दरवाजा उघडतात..समीर त्यांना स्वतःची ओळख करून देतो व त्यांना तो शेजारच्या फ्लॅटमध्ये राहायला आल्याचं सांगतो..

तसेच त्याने बेल वाजवण्याचं कारण ही शास्त्री यांना सांगतो..

शास्त्री समीरला आत बोलवतात आणि त्यांच्या पत्नीला म्हणजेच सुमती शास्त्री यांना हाक मारतात..

शास्त्री कुटूंबाचे प्रमुख प्रमोद शास्त्री हे त्याच IT कंपनीत मोठ्या हुद्यावर असतात..

जिथे समीर रुजू होणार असतो..त्यांची बायको सुमती ही गृहिणी..तसेच त्या दाम्पत्याला गौरी आणि वेदांत नावाची मुले असतात..

गौरी २ वर्षांपूर्वीच तिच्या पुढच्या शिक्षणासाठी परदेशी गेलेली असते आणि वेदांत त्याच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतो.

त्या दिवशी रविवार असल्यामुळे सगळे जण घरात असतात.. एकंदरीत ते छोटं पण सुखी कुटुंब असतं..

गप्पांच्या ओघात हे कळते की, सुमती काकू ह्या स्वतः खानावळ चालवत असतात..त्यामुळे समीरचा जेवणाचा प्रश्न सुटतो..

शास्त्री काकांना एकंदरीत समीरचा स्वभाव बऱ्यापैकी आवडतो..तसे पण, एकाच ऑफिसमध्ये असल्यामुळे सतत त्यांच्या भेटीगाठी तर होणारच असतात..

असेच काही दिवस जातात..

समीर हळूहळू त्याच्या ऑफिसच्या कामामध्ये रुळू लागतो..

काही दिवसातच त्याने त्याच्या हुशारीची छाप सर्वांवर पाडलेली असते..

त्याचे बॉस ही त्याच्यावर खूप खुश असतात..

तसेच समीर ही त्यांची ह्या कंपनीच्या उज्वल भविष्यासाठी केलेली योग्यच निवड होती..याचा त्यांना अभिमान ही वाटतो..

त्याचबरोबर शास्त्री कुटूंबाशी ही समीरचे काही दिवसातच ऋणानुबंध जुळतात..

आता तर, सुमती काकी त्याला रोज रात्री घरीच जेवायला बोलवत असतात..

तसेच वेदांत ही कधीमधी अभ्यासात काही अडलं तर समीरची मदत घेत असतो..

एकंदरीत फार कमी दिवसात समीर एका अनोळखी शहरात स्थिरस्थावर होतो..

तसेच शास्त्री कुटूंबाचा एक सदस्य ही..

तरीही आर्याच्या आठवणी काही त्याच्या मनातून जात नसतात..

कधी कधी तर त्या आठवणींतून तो त्याच्या अश्रूंना वाट मोकळी करून देत असतो

आणि म्हणत असतो,

🎶🎶ये रूह भी मेरी, ये जिस्म भी मेरा
उतना मेरा नही, जितना हुआ तेरा..
🎶तूने दिया है जो, वो दर्द ही सही
तुझसे मिला है तो ईनाम है मेरा🎶🎶
🎶मेरा आसमाँ ढूंढें तेरी ज़मीं
मेरी हर कमी को है तू लाज़मी🎶🎶
🎶ज़मीं पे ना सही, तो आसमाँ में आ मिल
तेरेे बिना गुज़ारा, ऐ दिल है मुश्किल🎶🎶

क्रमश:

(ह्या कथेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व वाचकांचे आभार🙏 तसेच हा भाग आवडल्यास तो आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद🙂)

©preetisawantdalvi