So Coitus - (Part 1L) books and stories free download online pdf in Marathi

तो सहवास - (भाग १ ल)

पु .ल.ची सगळी पुस्तकं वाचून झाली होती.साल १९९९च त्यावेळेस असा काही नव्हता मोबाईल वैगरे सगळा काही पुस्तकं च होती .आणि पू ला च असा मी असामी पुस्तकं वाचत होते मी आणि वाचत वाचत अचानक च मोठ्याने हसू लागले .घरचे आले ना असा काय झालं ही अशी का मोठ्याने हसत आहे मी मात्र आपल्याच धुंदीत हसत होते .आई ने विचारला अग पोरीच्या जातीने असा मोठ्याने हसू नये मी मात्र तशीच हसत होते आई बोलत होती अग अता लग्नाचा वय झाला तुझ असा आई म्हणली आणि माझा हसणं बंद झाला.आजकालच्या युगात मुलींचं शिक्षण काय ? हे खूप महत्तवाचे आहे लग्नासाठी पण त्यावेळेस असा काही नव्हत १० वी झाली की लगेच वडीलधारे नातेवाईक मित्रमंडळी सगळे स्थळ बघायला सुरू करायची . मी तशी घरात लहान होते माझ्या भाऊ बहिनी मध्ये म्हणून थोडासा जरा लाड होता घरात म्हणून बाबा ना हट्ट करून मी ११वी ल एडमिशन घेतला .खरतर मला मराठी साहित्यात खूप रस होता .म्हणून मी कला विभागात एडमिशन घेतला.११वी खूप छान गेली .मार्कस ही खूप छान पडले मला बाबांनाही आनंद झाला कारण आमच्या घरात आम्हा बहिनिंमध्ये ११वी पर्यंत शिक्षण झालं नव्हतं .१२वी सुरू झाली होती अर्ध वर्ष झालं होतं १२विचा सहामाही परीक्षा जवळ आली होती आणि मला यावेळेस ही पहिला यायचा होता आणि माझा सगळा अभ्यास झालेला होता आणि मी माझ्या विरंगुळा घालवायचा यासाठी पुस्तकं वाचत होते आणि मध्येच या आई ने लग्नाचा विषय काढला आणि माझा सगळा मूड च खराब केला .आणि उद्या पेपर आहे म्हणून मी उद्याचा आवराय ला घेतल आणि झोपून गेले.उद्याचा दिवस उजाडला मी घाईघाईने सगळ नीट घेतला आणि कॉलेज मधे गेले .पेपर सुरू झाला . पेपर खूप सोपा गेला मला आणि मी लगेच घरी गेले .पण घरी गेल्यावर घरचं चित्र काही वेगळाच होता आत्या आली होती आणि आत्या सोबत कोणीतरी बाई आली होती आई बाबा आजी आजोबा आणि दादा काहीतरी बोलत होते .तेवढ्यातच आत्या माझ्या जवळ आली आणि लाडाने म्हणायला लागली आत्या आमच्या लाडूबई नवरी होणार.मला काही कळतच नव्हतं मी तिथे फक्त शांत उभी होते काय घडत आहे कळतच नव्हता तेवढ्यात आई ने आत्या ला आवाज दिला .आई ल माझ्या मनातील घालमेल कळली असावी .आणि मी लगेच माझ्या खोलीत गेले .मला माझ्या समोर फक्त माझे स्वप्न दिसत होते मी माझ्या लग्नाचा विचार ही केला नव्हता इतक्या लवकर .घरचे सगळे खुश होते .म्हणून मी ही हो ला हो म्हणले हळूहळू मुलगी बघ्याचा कार्यक्रम च दिवस आला सकाळपासून माझ्या मनात भीती निर्माण झाली की तो मुलगा कसा असेल मला समजून घेतील का ते असे खूप सारे प्रश्न डोक्यात सुरू होते तेवढ्यात ताई जवळ आली आणि म्हणाली अग कीर्ती आली हो पाहुणे मंडळी लवकर तयार हो आणि खाली ये हो लगेच .मी तयार झाले आणि चहा आणि पोहे घेवून हॉल मध्ये गेले .मी सहज त्या आलेल्या मुलाकडे पहिला आणि लगेच खाली बघितला त्याने ही चहा घेतला आणि माझ्याकडे चोरून नजरणे पहिला तशी मी लाजली आणि खाली पाहिलं मी .तो मुलगा पहिल्यांदा पाहिल्यावर च मला भोवला देखणा सुंदर सोज्वळ असा होता तो आणि नोकरी ही तशी छान होती त्याची असा आई म्हणाली मला .आणि बाबा ना ही तो खूप आवडला घरात सगळ्यांना हे स्थळ आवडलेला होता .पण माझ्या मनात हेच चालला होता की तो मला पुढे शिकू देईल का ?