To Sahvas - 2 books and stories free download online pdf in Marathi

तो सहवास - (भाग_२)

मी असाच विचार करत होते . तेवढ्यात बाबा जवळ आले आणि त्यांनी मला विचारला मुलगा आवडला ना तुला?मी जरा लाजले आणि खाली मान घालून हो म्हणाले पण मी लगेच बाबा ला विचारले बाबा लग्न १२वी झाल्यानंतर झाला तर? बाबा नी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले हो चालेल पण एकदा त्या पाहुण्यांना ही विचारतो ते की म्हणतेत चालेल ना तुला ?मी हो म्हणाले कारण माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता.पण ताई म्हणाली होती की मुलगा प्राध्यापक आहे डी. ई ड कॉलेज ला म्हणजे शिक्षणाचा महत्त्व त्यांना समजेल च आणि मला ते पुढचा शिक्षण घेवू देतील.असेच सहामाही परीक्षा संपली आणि मला सुट्ट्या लागल्या १० दिवस सुट्ट्या होत्या .त्यामुळे माझा तर ठरला होता की या सुट्ट्या त मी व.पू. काळे यांची पुस्तकं वाचण करणार .मी मस्तपैकी सायंकाळ च आई च्य हाताचा चहा पीत होते .आणि तेवढ्यात बाबा ल एक पत्र आलं ते मी पाहत होते की पत्र कोणाचा आला आहे बाबा ला उघडून बघितला तर ते पत्र आत्या च होता .मी ते तसंच टेबल वर ठेवलं आणि आई ला स्वंपाक घरात मदत करायला गेले .बाबा ऑफिस मधून घरी आलेले होते मी त्यांना चहा घेवून गेले .बाबा म्हणाले अग कीर्ती आत्या च पत्र आल का?मी हो म्हणाले आणि टेबल वरचा पत्र बाबा ना दिला.आणि तिथे मी तशीच उभी राहिले की त्या पत्रात काय असेल? तेवढ्यात बाबांनी आई ला अव्वाज दिला अग सुमन इकडे ये बघ ताई काय पत्रात म्हणत आहे ते.आई पटकन हॉल मध्ये आली आणि म्हणाली काय हो काय म्हणत्यात नणंद बाई बाबा म्हणाले अग त्या पाहुण्यांना आपली कीर्ती पसंद आहे .सागर ला कीर्ती आवडली आहे त्यांचा होकार आलाय.ते म्हणत आहेत की साखरपुडा पुढच्या आठवड्यात करायचा का?आहो लगेच त्यांना टेलिफोन बूथ वरून कळवा की आम्ही तयार आहोत.बाबा लगेच बाहेर गेले आणि आई इकडे दादा ला सांगत होती अरे किती काम आहेत आता आपल्याला सगळ्या नातेाइकांना कळवा व लागेल फराळ च करायचा आहे हॉल ठरवायचं आहे किती काम पडलेत ?आई च आनंद तर गंगणात मावेना.मी ही खुश होते .सगळेजण तयारीत दंग होते .आणि तो दिवस उजाडला .मी माझ्या रूम मध्ये तयार होत होते तेवढ्यात माझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या .मला खूप आनंद झाला सगळा काही खूप छान चाललं होतं.पण मनात एक कुठेतरी माझा मन मला खात होत की मी माझा शिक्षण माझा सहित्यावरचा प्रेम सगळ काही आता यापुढे शिक्षण पूर्ण होईल का ?मनात खूप प्रश्न सुरू होते .आणि ताई च आवाज आला अग कीर्ती तुला बोलवलं आहे चल ये लवकर तयार होवून.घर खूप सुंदर सजवलेले होत.खूप भारी जय्यत तयारी झाली होती.सगळे पहूनेमंडली आली होती .आणि तो क्षण आला मला सगळ्यांनी त्यांच्या सोबत उभ केल .मला खूप वेगळं वाटत होतं. मी हळूच त्यांच्याकडे पहिला आणि त्यांच्या नजरेत मला स्वतः ला पाहून एक वेगळीच भावना माझ्या मनात आली आणि साखरपुड्याचे पुढचे विधी सुरू झाले आम्ही एकमेकांना आंगुठी हातात घातली आणि पेढा खाऊ घातला .सगळे साखरपुड्याचे विधी झाले होते .आणि सगळे आपल्या आपल्या कामात गुंग होते .त्यांनी मला पहिला आणि विचारला तुला मी पसंद आहे ना सगळा तुझ्या मर्जी ने च होत आहे ना .मी लगेच क्षणाचाही विलंब न लावता हो म्हणाले त्यांना एव्हाना कळल च असेल की या सगळ्याला माझा होकार आहे ते.मी त्यांना माझ्या शिक्षणाचा विचारणार तोवर माझ्या सासूबाई आल्या मी लगेच त्यांच्या पाय पडले .तोच सासूबाई म्हणल्या बाई सूनबाई अमाची गुणाची दिसते.आणि मी खाली बघून लाजले .ह्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि पाहतच राहिले .आणि हळूच मला म्हणताय कसं सोंचाफ्याचा फुल जसा फुल्ल्यावर खूप सुंदर दिसत ना तशीच तु लाजून हसल्यावर दिसतेस .त्यांच्या या बोलण्याने मला खूपच भारी वाटलं की बाई ग किती हे साहित्यावर प्रेम माझी सुतुती सुद्धा किती सुंदर केली त्यांनी आणि हो सगळ्यांनाच आपली सुतूती केल्यावर छान वाटतच मला खूप छान वाटला त्यांनी परत मला सगळ्या त्यांचे मित्रमंडळी नातेवाईक याच्याशी ओळख घडवली मला छान वाटला की ते माझा खूप आदर करत होते.सोहळा खूप छान पार पडला .