College Friendship - 2 books and stories free download online pdf in Marathi

कॉलेज फ्रेइन्डशिप - 2

भाग २

दुसऱ्या दिवशी सायली सगळं पटकन आवरून कॉलेज ला जायला निघाली , पण तिला सगळं आवरता आवरता खूप उशीर झाला. यात भर म्हणून काय बस पण वेळेवर यायला तयार नाही. तिची खूप चीड चीड झाली. Already उशीर आणि त्यात पुढे काय वाढून ठेवल तिला माहीतच नाही.

इथे रोहित तिची खूप वाट पाहत होता तो देखील वैतागला, शेवटी त्याने निशा शी बोलण्याचा विचार केला, आणि निशा जवळ जाऊन निशा सोबत नॉर्मल बोलणं सुरु केल, जेणेकरून तिला असा वाटायला नको कि फक्त सायली विषयी विचारायचा म्हणून हा बोलतो आहे. शेवटी त्याने तिला सायली विषयी न राहून विचारलाच तिने लग्गेच नाक मुरुडल, आणि रोखत बघत मी काय तिची PA आहे का असा म्हणून विषय बदलायचा प्रयत्न केला. तिला मधेच थाबमवत रोहित ने तिला आठवण करून दिली कि तिला प्रोफीसोर ने रेस्पॉन्सिबिलिटी दिली होती कि सायली तुझी Friend आहे सो आज च्या प्रेसेंटेशन विषयी तू तिला सांगणार आहेस. ती निरुत्तर झाली, या वरून रोहित ने अंदाज लावला कि सायली ला यातील काहीच माहित नाही. तोच तो तिचा Phone No मागणार तर प्रोफेसर क्लास मध्ये आल्या , आणि लगेच प्रेसेंटेशन देण्या साठी एक एक ग्रुप चे नाव घेऊ लागले.

रोहित ला काहीच समजत नव्हत तस त्याने प्रेसेंटेशन तर रेडी केल होत, पण सायली लवकर आली असती तर तिला समजून सांगून दोघांनी एकत्र प्रेसेंटेशन दिल असत. Finally तो आवाज त्याच्या कानी पडला, त्याने वळून पहिल ओढणी सावरत हातातली बॅग पकडत हळूच आवाजात May I अस म्हणत ती आत आली. प्रोफेसर काही तरी instruction देत होत्या ते तिच्या डोक्यावरून जात होत. रोहित कसा बसा सायली जवळ येऊन बोलण्या चा प्रयत्न करत होता, पण सायली त्याला ignore करत होती. ती चिडून त्याला बोलते कळत नाही का तुला मला नाही बोलायचं ते, हे सगळं पाहून निशा मात्र खूप खुश होत होती. आता मात्र रोहित ला देखील खूप राग आला , गेले ४ दिवस मी हीच विचार करतो आहे आणि हि स्वतःला महाराणी समजते काय, मला काही हौस नव्हती हिच्या शी बोलण्याची सोड .............. अस स्वतःशीच पुटपुटत तो जागेवर येऊन बसला.

एव्हाना सायली च्या लक्षात आले होते कि आज प्रेसेंटेशन द्याचे आहे, आणि ती रागात निशा कडे देखील पाहत होती. पण निशा खूप चॅन प्रकारे जस काही झालाच नाही हा आव आणून तिला इग्नोर करत होती. सायली ना राहून निशाला विचारते आता एवढ तरी सांग माझा पार्टनर कोण आहे. निशा जेलीस होऊन रोहित कडे पाहत तो काय तोच तिथे बसला आहे. सायली ला खूप वाईट वाटत आणि तिला समजत देखील नाही काय केल पाहिजे. ती वारंवार रोहित कडे वळून पाहत होती रोहित च मात्र लक्ष नव्हत.

आणि रोहित शांत होत पुन्हा एकदा विचाराव का हा विचार करत असतो, तोच त्याला सॉरी असे शब्द कानावर पडतात. तो डोकं वर करतो पाहतो तर वाक्य सायली असते. तो २ मिन तसाच तिला पाहत राहतो. सायली परत Excuse me अस म्हणते आणि तो भानावर येतो. पटकन सावरायच म्हणून तो सॉरी वगैरे नंतर आपला number रेसिस नंतर आहे सो पटकन तुला सगळं समजावतो, मी सगळं रेडी केल आहे आता तुला फक्त लक्षात ठेवून माझ्या सोबत बोलायचं आहे. हे सगळं एकूण तिला फार वाईट वाटत, पण वेळ नसल्याने तीही तो जे काही सांगतो आहे ते सगळं नीट एकूण प्रेसेंटेशन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात बेल वाजते आणि सगळे break साठी निघून जातात. रोहित त्याचा phone पाहतो तर त्याच्या वडिलांचा त्याला दोनदा phone येऊन गेलेला असतो सो त्यांच्याशी बोलण्या साठी निघून जातो. तोच मागून निशा येते आणि बोलते खूप खुश असशील ना रोहित सोबत प्रेसेंटेशन करायला मिळत आहे, ज्याच्या शी मुली बोलण्याचा खूप प्रयत्न करतात तो तुझ्याशी बोलतो आहे हे पाहून . सायली २ मिन काहीच बोलत नाही आणि प्रेसेंटेशन कडे लक्ष देते.

Break संपतो, रोहित ला टेन्शन आलेल असत कारण रोहित खूप हुशार असतो क्लास मधला टॉपर, पण त्याला अश्या मुली सोबत प्रेसेंटेशन द्यायच असत जिच्या विषयी त्याला काहीच ठाऊक नाही, तो एकदा सायली कडे पाहतो तिला खुणेनेच विचारतो झाल ना, ती देखील मान हलून हो बोलते. दोघेही प्रेसेंटेशन सुरु करतात प्रेसेंटेशन इतक सुंदर होत कि प्रोफेसर खुश होऊन म्हणतात क्या बात हे रोहित I know that You are very talented but, Sayali you are also done very well, keep it up guyssss... अस म्हणत प्रोफेसर तर निघून गेल्या पण सायली च्या चेहर्यावर जो आनंद होता तो मात्र कोणाला तरी देखवत नव्हता ....

बघू या मग रोहित आणि सायली Friend बनतात कि अजून काही घडणार आहे..........