TO GET HER.... books and stories free download online pdf in Marathi

तिला सावरताना भाग -१

सोमवारचा सकाळ होती . अलार्म पाचव्यांदा वाजत होता . सकाळचे ९ वाजले होते . घड्याळ बघताच असा जागा झालो जसा की युद्ध सुरू होणार असेल ,आणि शेवटचा सैनिक मीच उरला असेल . लवकर शॉवर घेतली . तयार झालो , बाईक काढली आणि ऑफिसला निघालो .
शेवटी अर्धा तास उशीर झालाच . कधीही उशिरा न पोहचलेला मी आज मात्र उशिरा पोहचलो होतो.
रवी - " आज सूर्य कुठून उगवला ग रचना ?"
रचना चिडवत म्हणाली - " उत्तरेकडून वाटतं..."
मग सगळे हसले .
मी. - " काय करायचं शेवटी चुकी माणसांकडूनच होत असते . तुमच्याकडून थोडीच होणार आहे 😂😂.."
मग मी जोरात हसलो सगळे मला अस बघत होते जसे की ते मला आता खाणारच आहे .
रचना - " पुरेपुरे आता कामाला लागा . कामचोर सगळे."
सगळे कामात मग्न झाले . मला तस माझं काम म्हणजे माझी एक प्रेयसी असल्यासारखीच आहे . एकदा मग्न झालो तर थेट लंच ब्रेक लाच उठायचो. तेवढ्यात जसिका चा ( रिसेप्शन ) फोन माझ्या डेस्क वर आला .
जसिका -" बॉस तुला बोलवत आहेत अर्णव "
मी - "का?"
जसिका - " माहिती नाही डिअर"
जसिका आमच्या ऑफिसची रिसेप्शन सांभाळणारी स्त्री होती . खूप सुंदर आणि आम्हा सगळ्यांची खूप काळजी घेणारी . पण ती विवाहित स्त्री होती.
मी बॉस च्या केबिन मध्ये जात म्हणालो
मी - " मे आय कम इन सर? "
बॉस - " येस कम इन अर्णव . बस बस " खुर्चीत बसताच बॉस म्हणाले.
बॉस - " अर्णव ... तू खूप मेहनती आहेस आणि आपल्याला एक नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे . हा प्रोजेक्ट आता पर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे . त्यामुळं मी तुला हे प्रोजेक्ट हेड करायची संधी देत आहे ."
मी -" thank you sir "
बॉस - " तू आणि तुझा ग्रूप लवकरात लवकर याचा रिपोर्ट तयार करा "
मी - " हो सर . "
बॉस - " आणि हा अजून एक ... एक नवीन मुलगी ऑफिस ला जॉईन होणार आहे ... ती खूप स्मार्ट आहे... तिला पण तुझ्या ग्रूप मध्ये अॅड्ड कर "
मी - " ओके सर. अँड थंक यू सर 😄😄"
मी खुशीतच बाहेर आलो . जसीका म्हणाली
जसिका - " खूप खूष आहे डिअर .. व्हॉट हॅपेनेड?"
मी - " नवीन मोठा प्रोजेक्ट करायचं आहेे आणि मी लीड करणार आहे."
जसिका - " बेस्ट ऑफ लक डिअर"
जसिका हंड शेक करत म्हणाली
मी माझ्या डेस्क वर आलो . रचना डेस्क जवळ येत म्हणाली
रचना - " काय झालं जनाब ?. खूप खुश दिसत आहात आपण "
मी - " नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे . मी लीड करणार आहे आणि आपल्याला ते पूर्ण करावं लागणार आहे "
रचना - " ओहो .. क्या बात है?... अरे मग मीटिंग घे ."
मी - " अजून नाही . एक नवीन मुलगी ऑफिस जॉईन करणार आहे आज आणि तिला आपल्याला आपल्या ग्रूप मध्ये अॅड् करावं लागणार आहे . ती आल्यावरच मीटिंग घेऊ आपण ."
नवीन मुलगी येणार असं ऐकताच रवी डेस्क जवळ येत म्हणाला
रवी - " कोण येणार आहे .. कशी आहे ती?"
रचना - " आला बघ इम्रान हाश्मी😁😂 "
रचना म्हणाली . मग आम्ही दोघे टाळी देत हसलो .
मी - " आणि ऋचा कुठ आहे अजून आली नाही? "
रचना -" आज तिला बर वाटत नाही अस ती फोनवर सांगत होती " रचना म्हणाली
ऋचा एक शांत, सरळ मुलगी . ती सुद्धा मिस नाही तर मिसेस होती म्हणजे लग्न झालं होत तीच . आपण बर आणि आपलं काम बरं असं होती ती.
मी आणि रचना नवीन प्रोजेक्ट संबंधी इनिशियल कंडीशन पाहत होतो . रवी मात्र नवीन मुलगी कशी असणार याचच विचार करत होता .
रवी - " रचना .. एक विचारू ?"
रचना -" प्रोजेक्ट संबंधी असेल तर विचार .. त्या नवीन मुलगी कशी आहे असं विचारू नको "
रवी - " छी... अर्णव तुला तर माहिती असेल ना? "
मी - " नाही रे ... मला काम करू देत 😕😕."
तेवढ्यात तिचा आगमन झाला. गोरीपान अशी , डोळ्यात काजळ , मॉडर्न ड्रेस घातलेली , जीन्स काय जीन्स टाईप शॉर्टवर आणि कामात हेडफोन्स घातलेली , एका हातात सिगरेट , एका हातात तिचा पर्स , सिगरेटचा धूर सोडत जणु काही ट्रेन असल्यासारखं , हाय हिल्स घालून कॅट वॉक करत , अशी वाटतं होती जशी अप्सरा मॉडर्न विश्वात आली असेल .
जसिका जवळ येत ती सिगरेटचा धूर सोडली .
जसिका -" यु कँट स्मोक हियर .... इट्स इंजौरिअस टू हेल्थ डिअर ".
ती धूर सोडत म्हणाली- " आय नॉ . इट्स माय हेल्थ अँड इट्स माय सिगरेट . सो इट्स मी चॉइस."
जसिका - " ओके ... तुझा नाव काय डिअर?"
ती म्हणाली - " पूजा शर्मा ... मी नवीन आहे इथे . इट्स माय फर्स्ट डे ."
जसिका - " ओह... बॉस तुझे वेट करत आहे डिअर ... यू कॅन मीट हिम .."
ती आत गेली . रवी जसिका जवळ आला.
रवी - " जसिका... ती आहे का नवीन मुलगी?... नाव काय तीच?"
जसिका - " हो ... पूजा शर्मा .. का ?"
रवी - " काहीही नाही ग सहजच"
जसिका - " पण ती खूपच मॉडर्न दिसतय . सिगरेट पिती ही... आणि मॉडर्न ड्रेस ... आय होप ती चांगली असावी ."
रवी - " आजकाल असच असतात ग मॉडर्न पोरी . सुंदर आहे पण ती "
जसिका -" हा.... ते तर आहे . काजळ खूप शोभत तिला"
रवी - " चल बाय . लंच ला भेटू"
जसिका -" बाय"
पूजा बाहेर आली आणि माझ्या जवळ असलेला डेस्क वर आली. मी माझ्या प्रयसी सोबत मग्न होतो म्हणजे कामात मग्न .
ती - " तू अर्णव का?"
मी - " येस"
पूजा -" ओके ... आय एम पूजा ... तुझ्याकडं लायटर आहे का?"
मी -" मी सिगरेट नाही पित "
मी कामात इतकं मग्न होतो की तिच्याकडं बघितल सुद्धा पण नाही . ती तिच्या डेस्क वरून उठली आणि बाहेर गेली तेव्हा मला जाणवलं ' कोण तर मला लायटार मागितल आणि ते सुद्धा एक मुलगी 😨😨.कोण आहे ही?'
ती बाहेर जाऊन आली आणि ऑफिस मध्ये सिगरेट पियु लागली . रवी तिच्या जवळ आला .
रवी - " हाय .. आय एम रवी .."
पूजा त्याला असं लूक दिली जस तो तिला भिक मागायला आला असावा.
पूजा - " मग मी काय करू?"
रविचा तर पार चेहराच पडला. नंतर एक्सायट मेंट मध्ये म्हणाला.
रवी - " मी पण याच ऑफिसला आहे . मी तुझ्या ग्रूप मध्ये आहे "
पूजा - " ओह.... आय एम पूजा "
रवी हसत म्हणाला .
रवी - " मग आम्ही तुला पू ( 💩) म्हणू शकतो "
पूजा - " खूपच फालतू जोके होता 😒😒."
रवी - " सॉरी..😅😅.."
पूजा - " गो टू हॅल..😏😏"
तिथेच असलेली जसिका जोरात हसू लागली .पूजा तर केव्हाच निघून गेली होती .रवी जसिका जवळ येत म्हणाला " काय पोरगी आहे ही? ... आग आहे नुसता ... हा एक मात्र आहे जसिका की सुंदर तर आहे खूप ..💖💖... काजळ तर ... हाय मै तो मर ही जाऊंगा जसिका... कुछ करो?"
जसिका - " आग से प्यार करोगे तो जल जाओगे ..😂😂"
पूजा माझ्या डेस्क वर आली .
पूजा - " मीटिंग घ्यायचं का ?"

१ वाजत आलेले होते. पूजा , रचना , रवी आणि मी कॉन्फरन्स रूम मध्ये मीटिंग साठी जमलो . रूचा आजारी असल्याने ती आज आलेली नव्हते . मी प्रोजेक्टचे हेड असल्याकारणाने मला मीटिंग हेड करावी लागत होती.

मी - " वेलकम टू ऑल फॉर थिस मीटिंग . सर्वातप्रथम आपल्याला मिळालेली पोर्जेक्ट आपल्या कंपनीला खूप पुढे घेऊन जाऊ शकतो . तर या प्रोजेक्ट आपल्याला लवकरात लवकर आणि उत्तमरित्या पार पाडायचं आहे. चुकीला माफी नाही."

रवी - " काय फिल्मी डायलॉग मारतो रे? 😌... मुद्यावर ये ना?"

रचना -" गप रे रव्या ... अर्णव काँटिणू कर."

अर्णव - " ओके... तर आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपल्याला नवीन सॉफ्टवेअर वर काम करायला पाहिजे. तर प्लॅन असा आहे की रचना तुम्ही सगळे डाटा गोळा करा आणि त्यानंतर मी आणि रवी त्या प्रोजेक्ट वर काम करू . इस इट ओके?"

रवी - " पण रुचा च काय?"

अर्णव - " ऋचा प्रोजेक्टची रिपोर्ट तयार करून देईल ? "

रचना -" हा ओके."

पूजा - " एक मिनिट .. रचना आणि मी फक्त डाटा का गोळा करावे ? . मी पण पॉर्जेक्ट करू शकते ना .😡. आणि तुम्हीही डाटा गोळा सगळे करू शकता . मग आम्ही लेडीज च का गोळा करायचा . का तुम्ही आम्हा लेडीज ना कमी लेखत आहात ?... का सगळे क्रेडिट फक्त तुम्हीच घेणार आहेत काय?... असच असत समाजात कोणी एक मुलगी वर येतं असेल तर काही मुलांना सहन होत नाही .... इक्वलिटी कुठे अस्तित्वातच नाही.. आणि तुम्हा मुलांना तर फक्त मुलगी चुली भांडी करणारे , सगळे सहन करून गप्प बसणारे , आणि फक्त मुलबाळ सांभाळणारे वाटतं असणार ना?... रात्री कोणी एका ठिकाणी जाव म्हणल की कोणी एकटा येतो आणि रेप चा प्रयत्न करतो . या जगात मुलींना जगायचं मुश्किल झालेलं आहे . तुम्ही मूल मात्र लग्नात हुंडा मागता आणि त्यांच्या आईवडिलांचा जगणं मुश्किल करून ठेवता . जर एका मुलीवर बलात्कार झाला असेल तर कारण सांगता की ' मुली कमी कपडे घालतात ,मग बलात्कार तर होणारच ना..चूक तर मुलगीचीच आहे ..'😠... आता इथ ऑफिस मध्ये पण तसाच होत आहे . समान संधी एका मुलीला लाभतच नाही ... असा किती वेळ चालणार ?"

कॉन्फरन्स रूम मध्ये आता वातावरण गरम झालं होत . रवी आणि रचना फक्त पूजा कडे बघत होते . तेवढ्यात ....

मी -" इनफ इस इनफ .... मी फक्त एवढ्यासाठी सांगत होतो की हे सॉफ्टवेअर फक्त मला आणि रविलाच ऑपरेट करता येत.... आणि तुम्हाला शिकवायला कमीत कमी ३ महिने लागतील आणि तेवढा आपल्याकडं टाइम नाहीयेे...... आणि कुठला मुद्दा कुठे घेऊन गेलीस ... आणि काय??... हो समान संधीचे वाक्य तर तुम्ही म्हणुच नका..😠... एका बस मध्ये महिलांचं सीट वर तुम्ही बसता कारण ते तुमचा हक्क आहे आणि पुरुषांच्या सीट वर पण बसता?? ... का हे आमचं हक्क नाही का?.. इथ कुठ जात तुमची इक्वॉल्टी??? ... मुलींना पिक्चर बघायचं असत तर तिकीट काढताना मात्र मुलांना पाठवता ... इथ कुठ जात तुमची इक्वलिटी ?..😠.. मान्य आहे की हुंडा घेणारे मुले एकदम निच असतात पण हे कितपत योग्य आहे की तुम्ही मुली मुलाचं पगार बघून लग्न करता . ते हुंडा नाही होईल काय?.... आता दिल्ली च उदाहरण बघा ना .आता मुलींना किंवा महिलांना फुकट मेट्रोमध्ये प्रवास करायला मिळेल , म्हणजे एक गरीब मजूर पैसे देऊन जायचं आणि एक श्रीमंत मुलगी फुकट फिरायच ... इथ कुठ गेलं तुमची इक्वलीटी ?? ...😠...आणि कारण काय म्हणाव की मुलींच्या सेक्युरिटी साठी हे नियम आहेत... मान्य आहे की बलात्कार करणारे सैतान असतात ... मी तर म्हणतो त्यांना रस्त्यावर मारा... पण कित्येक मुली बलात्काराच्या नावाखाली मुलांना ब्लॅकमेल करतात माहिती का?... आणि आम्हाला शिकवतात इक्वालिटी... शी....😠😡"
इतक्यात जसिका आली .
जसिका - " हे इट्स लंच टाईम...... काय झालं इथ?...😐"
मी फाईल जोरात आदळून बाहेर गेलो . सगळे अजून कॉन्फरन्स रूम मधेच होते. पूजा तर माझ्याकडेच बघत होती. रचना आणि रवी तर चिडीचूप झाले होते . मी तरतरीत ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये गेलो. जिथं आम्ही रोज टिफीन खातो. माझा राग डोक्यावर चढला होता .
मी बडबड करत होतो." काय समजते ही स्वतःला ... "
इतक्यात आवाज आला " पूजा शर्मा समजते... ."
ती माझ्यापुढे कोक ( पेप्सी) च कॅन देत म्हणाली .
मी - " मला नकोय ...😠"

पूजा - " बघ ... नाहीतर मी कुणाला सहजा कोक ऑफर करत नाही ..."

मी कोक घेतलो .
मी - " धन्यवाद ..."

पूजा - " ओह... मराठीत आभार मानत आहात ."

मी - " हो ...😤"
आमच्या दोघात एक वेगळेच शांतता पसरली.
पूजा -" सॉरी... मी जास्तच बोलून गेले.😑"

मी -" ओह...😏😏 तुम्हाला सॉरी पण बोलता येत तर ?"

पूजा -" हो येत तर...😅... मी जरा जास्तच बोलत असते ना?"

मी -" ह्म... आणि मी पण सॉरी ... एवढ बोलायचं नव्हतं मला.... 😑"

पूजा -" सो.... आय एम पूजा ...( ती हाथ पुढं करत म्हणाली).... फ्रेंड्स????"

मी - " 😁... आय नॉ यू आर पूजा .... ( मी पण हॅण्ड शेक करत म्हणालो ) .... अँड आय एम अर्णव ...😁"

मग आमच्यात काही क्षणासाठी नजराला नजर भिडली गेली . मग आम्ही काही क्षणासाठी जग विसरून गेलो होतो.
तेवढ्यात ....

रवी -" अरे ... कॅन आय जॉईन यू बोथ? ...😂😂"

आम्ही दोघे दाचकलोच आणि आमचे दोघांचे हाथ अजून तसाच होता . मी लगेच हाथ काढून घेतला. तेवढ्यात जसिका आणि रचना त्यांचे त्यांचे टिफीन घेऊन आले .

जस्मिन -" मैत्री झाली वाटतं दोघात..😊"

रवी -" मैत्री नाही अजून खूप काही 😂😁"

रचना -" गप रे तू ...😤...( रवीला मारत रचना म्हणाली )

रवी - " मस्करी केली ग... मारती कशाला?"

मी - " सॉरी गाईस ... मीटिंग फुकटात गेला...."

पूजा -" मी काय सॉरी नाही बोलणार ....म्हणजे सॉरी बोलून फॉर्मलिटी कशाला आता.. कामाला लागू की ?.."

रचना -" यू आर राइट पू...."

रवी अचानक हसू लागला.

जसिका -" काय झालं रवी ?..."

रवी -" ती हिला पू (💩) म्हणाली..😂😂😂"

रचना -" तुझ खूप झालं ह आता...."

ती आणि रवी आता पकडा पकडी खेळत होते का ती त्याला मारायला गेली कुणास ठाऊक?
सगळे हसत होते. पण ती मात्र नाही.

मी -" हे ... खूप झालं आता चला टिफीन खाऊयात ... खूप काम आहे अजून..."

पूजा - " तुम्ही चालू करा .... आय एम ओके ... तुझ्याकडं लाईटर आहे का?...( ती मला विचारत होती .)"

मी -" का तू टिफीन नाही आणत?... आणि एवढं सिगरेट पित जाऊ नकोस . "

पूजा -" नसेल तर नाही म्हणून सांग ना ... कशाला भाषण देता रे ... तुला भाषण द्यायला आवडत वाटतं?.... ऑफिस मध्ये पण आणि इथ... "

मी -" मित्र म्हणालीस ना ... म्हणून म्हणालो मित्र मानत असेल तर ये आणि टिफीन खा बघू ... नाही तर अजून मोठा भाषण द्यावं लागेल मला 😂😁"

जसिका -" हा डिअर... कम ऑन ... लेट्स टेक थीस...अँड सिगरेट पित जाऊ नकोस.( जसिका तिला टिफीन ऑफर करत होती .)

मी -" हा ... ये बघू"

पूजा -" ओके ... "

आम्ही सगळे टिफीन खाऊ लागलो. लंच टाईम संपला .सगळे कामाला लागले . मात्र पूजा मात्र थोड्यावेळाने आली .

मी -" तू सिगरेट पिऊन आली ना?"

पूजा -" येस ."

मी -" आय नॉ दॅट....आम्ही सांगितल्यावर थोडी तू थांबवणार आहेस हे सगळं...."

पूजा -" यू नॉ दॅट ना.... सॉरी...😅"

परत आम्ही कामात व्यस्त झालो. कधी ५:३० वाजले कळालेच नाही.

रवी -" अर्णव ... काही काम आहे का ?... म्हणजे मी जातो नाहीतर थांबेन तुझ्यासाठी..."

मी -" नाही ... तू जा .... आणि हा उद्या लवकर पाहिजेल तू इथ ... कुठलही कारण नको मला .."

रवी -" हो बॉस.... येतो लवकरच...बाय अर्णव आणि पू 😂"

पूजा -" 😤... बाय बाय..."

रचना -" अर्णव .... मी पण जाते रे... माझं तर निम्म काम झालंय... काही काम आल तर फोन कर.... "

मी -" हो ... बाय..."

रचना -" बाय अर्णव ... बाय पूजा..."

पूजा -" बाय ... टेक केअर ..."

६:१५ वाजत आले होते.

मी -" चला एकदाच संपलं आजच काम ..."

मी सगळं टेबल आवरून निघू लागलो . खाली येताच तिथं मागून आवाज आला " अर्णव ..."
मागे वळून बघितलं तर पूजा होती .

मी -" अरे ... तू गेली नाही का अजून?"

पूजा -" नाही गेले.... मला वाटल कोणी पोरगी तुला काही करेल म्हणून थांबले..😂😂😂"

मी -" काहीपण काय?... तू गाडी नाही आणत?"

पूजा -" मला नाही आवडत गाडी चालवायला ..."

मी -" का?"

पूजा -" असच..."

मी -" चल मग सोबत जाऊ चालत ..."

पूजा -" खरंच ?"

मी -" हो..."
आम्ही बाहेर आलो. ती परत सिगरेट काढली .

मी -" बास कर ना आता... किती पित असतीस सिगरेट ?"

पूजा -" आय एम चैन स्मोकर.... "

मी -" एक दिवस बिना सिगरेट च राहून दाखव बघू ..."

पूजा -" अशक्य..."

मी -" प्रयत्न करायला काय हरकत आहे?"

पूजा -" पण का करायचं?"

मी -" बर एक काम करू ... आपला प्रोजेक्ट जर उत्तम झालं तर तू एक दिवस बिना सिगरेट पिता राहायचसं
... बोल मंजूर ?"

पूजा -" आणि नाही उत्तम झालं तर तू मला बिअर पियू घालायचं 🍺"

मी -" तू बिअर पण पितीस?"

पूजा -" हो मग नाय तर काय?"

मी -" ओके .... ठीक आहे.."

आम्ही बाहेर आलो . तसा अंधार होत आला होता .
पूजा -" ऐक ना?."

मी -" बोल..."

पूजा -" आज काम आहे का काय?"

मी -" नाही ग... का?"

पूजा -" आज मला कंपनी पाहिजे होती ..."

मी -" कशासाठी?"

पूजा -" खूप दिवस झाले रे ... एकटीच बसत असते मी चौपाटीवर ... आज तू पण जॉईन हो ना ?"

मी -" होईन पण... मला काहीही होणार नाही ना?😂😂😂"

पूजा -" नाही नाही...😁"

चौपाटीवर पोहचताच मन कसं प्रसन्न वाटतं . सगळे कसं मस्त वाटत होत . म्हातारे लोक ,लहान मुले, कपल्स तिथे फिरायला येतात . सगळे आपल्या कामाचे ताण विसरायला इथ येतात. कोणी भेळच आस्वाद घेत असतात , तर कोणाचं तर समुद्राच्या पाणी मध्ये खेळच चालत असत .आम्ही दोघे समुद्राकडे तोंड करून बसलो .

पूजा -" मस्त वाटत ना?"

मी -" हो.."
ती अजून एक सिगरेट काढून पीयू लागली .

मी -" डोन्ट स्मोक... "

पूजा -" आय नॉ यार...."😑

मी -" तुला एक विचारू?"

पूजा -" ह्म्म.."

मी -" तुला ही सवय कधी पासून लागली?"

पूजा -" सांगीन रे परत कधी तरी आता मला मस्त एन्जॉय करू देत हे निसर्ग ...."
तेवढ्यात पाऊस आला. सगळे लोक पळू लागले . कुठ मिळेल तिथं थांबू लागले . मी पण पळू लागलो. तिथं उसाच्या गाड्यापाशी येऊन थांबलो. पण ती मात्र हलली नाही. ती मनोसक्त भिजत होती. तिचे ते ओले केस खूपच छान वाटत होते . ती जरी मॉडर्न ,सिगरेट आणि ड्रिंक करणारी असली तरी तिचं मन खूप छान होत. तिचे गुलाबी ओठ , आणि त्या डोळ्यावर चे काजळ तर माझे लक्ष खेचून घेत होते .

पूजा मात्र मला बोलवत होती . मी नकार दर्शवत होतो पण ती पळत आली आणि मला पाऊसात घेऊन गेली . आम्ही दोघेही खूप भिजलो . माझं लक्ष तिच्यावरून हटेच ना... काहीतरी नकीच होत होत...💕💕

*****************************************

क्रमशः

ऋषिकेश मठपती

पुढील भाग लवकरच... नक्की कमेंट करा...