Her Meeting - 2 books and stories free download online pdf in Marathi

तुझी ती भेट ... भाग -२

तो सुद्धा झोपी गेला होता... उद्याच्या सकाळची त्याला वाट बघावं लागणार होती..
सकाळच्या त्या कोवळ्या ऊनाची किरणे त्या विंडो मधून कार्तिकच्या चेहऱ्यावर येत होते. तरी सुद्धा त्याला जाग आली नव्हती. कॅलिफोर्निया च्या त्या एअरपोर्टवर ती फ्लाईट कधीची येऊन थांबली होती...
तेवढ्यात एक एअरहोस्ट्स येऊन कार्तिकला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. ती त्या कुंभकर्णला हलवून जागा करू पाहत होती.

एअरहोस्ट्स -" सर... एक्सक्युज मी सर... please wake up sir... we are in California airport sir... please wake up.."

कॅलिफोर्निया नाव ऐकताच कार्तिक दचकून जागा झाला.

एअरहोस्ट्स -" Sir... we are in California Airport... "

कार्तिक-" एवढं लवकर... शॉर्टकट घेतलात काय??"

एअरहोस्ट्स ला हसू येत होत पण ती कंट्रोल करत म्हणाली.

एअरहोस्ट्स-" Sorry sir....."

कार्तिक-" काय नाही.... स्नेहा ... स्नेहा कुठे आहे???"

एअरहोस्ट्स-" All were already check out from the flight sir..."

तो झोपेतच स्वतः ला दोष देत होता. शेवटी तो उठला आणि बॅग्स घेऊन चेक आउट करू लागला. त्याच्या मनात कसली तरी पोकळी निर्माण झाली होती. कदाचित त्याला स्नेहाच्या त्या सुंदर रूपांनी मोहित केलेली होती. चेक आउट करताना त्याच्या डोक्यात तिचाच विचार येत होता. तिचे ते डोळे , तीच आवाज , तिचे ते सुगंधी परफ्यूम .. किती मोहित करून जाणार होती ती ??... तो चेक आऊट करून कधी बाहेर आला त्यालाच कळाल नाही.. बाहेर येताच तो मोबाईल ऑन करतो . ऑन करताच त्याला मेसेज येऊ लागले.... त्यात घरच्यांचा सुद्धा मेसेज होता. तो त्यांना कॉल करू पाहत होता , पण मग विचार केला की आता तिथे रात्र झाला असेल. म्हणून तो कॉल करायचा विचार सोडून देतो... मेसेज मध्ये लिहिलेला होता की ' हे कार्तिक... पोचला असेल तू कॅलिफोर्निया ला... बर ऐक तिथे एअरपोर्टवर जयंतीलाल पटेल यांचे कोणीतरी थांबले असतील.. ते माझे मित्र आहेत... तेच तुला तुझ्या रेंट घेतलेला रूम जवळ सोडतील... काळजी घे ... बाय...'
तो जसा बाहेर आला तेंव्हा त्याला एक बोर्ड दिसला ज्यावर लिहिला होता " कार्तिक प्रधान" .. ते बोर्ड एक व्यक्ती धरून उभा होता . कार्तिक आपले लगेज घेऊन त्याच्याकडे गेला .

कार्तिक -" हॅलो..."

तो -" हाय... "

कार्तिक -" I'm Kartik Pradhan..."

तो -" ओह... तो वो तुम ही हो..."

कार्तिक -" हा... ओर आप??"

तो -" पटेल साब का ड्रायव्हर... "

कार्तिक -" ओह... चलिये चलते है..."

तो -" हा चलो... "

कार्तिक लगेज त्या कार मध्ये ठेवला आणि कार मध्ये बसला.. कारच्या विंडो मधून कार्तिक बाहेर बघत होता. तर मोठे मोठे बिल्डिंग , मोठे मोठे मॉल्स, मोठे डिजिटल बॅनर्स.. कॅलिफोर्निया वाटलं तसच निघाल, अगदी स्वच्छ शहर, सगळे आपापल्या कामात बिझी, अगदी तसाच होता. थोड्या वेळात त्यांची कार पटेल यांच्या बंगल्यात शिरली.
कार्तिक ची भेट जयंतीलाल सोबत झाली.ते बाहेरचं उभे होते. त्यांना भेटताच कार्तिक त्यांच्या पाया पडून भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली. त्यांच्या वाइफ ची सुद्धा पाया पडून त्यांच्या मनात जागा केली . कारणही तसंच होत कारण ते लोक खूप वर्षांनी इतका संस्कारी मुलगा पाहत होते. त्यांचे मुल युरोप मध्ये शिक्षण घेत होते. कार्तिकला बघून त्यांना त्यांच्या पोरांची आठवण येत होती. ते दोघेही खूप खुश होते. कार्तिकला आत घेऊन गेले आणि त्याची खाण्याची व्यवस्था बघू लागले. व्यवस्था झाल्यावर सगळे लंच करायला बसले.

कार्तिक - " तो अंकल आप कितने साल से है याहापे??"

पटेल -" १५ साल हो गये... "

कार्तिक -" ओह... तो आपका मन नही करता इंडिया वापस जानेका ?"

पटेल -" करता है ना... फिर यहा की बिझनेस कोण संभालेगा??"

थोडी वेळ शांततेत गेल्यावर पटेलची वाइफ कार्तिकला म्हणाली.

ती -" तो कार्तिक बेटा ... आगे क्या करनेका ख्याल है?"

कार्तिक -" पढाई खत्म करके इंडिया जाऊंगा.. वाहापे रिसर्च करूंगा..."

ती -" अच्छा ख्याल है .😊"

ते दोघेही त्याच्यावर खूप खुश होते.

कार्तिक -" अंकल... मुझे अपने युनिव्हर्सिटी के पास रहेना है??"

पटेल -" क्यू??... तुम यहाँ भी रह सकते हो ??"

कार्तिक -" नही अंकल... आपको तकलीफ होगी. ओर वेसे भी मै यहाँ आता रहुंगा ना... मुझे कुछ डाऊट आया तो मै तुरंत प्रोफेसर से मिल सकता हु ना..."

पटेल -" लेकीन खाने का कैसे करोगे??"

कार्तिक -" मै खुद पकाऊंगा .. डोन्ट वरी...मुझे कुकिंग आता है..."

पटेल -" अच्छा है... जैसे तेरी मर्जी.. लेकीन मिलने जरूर आना.."

कार्तिक -" हा आऊंगा ना.."

पटेल -" तो मै तुम्हे अमित सिंह के पास भेजुंगा उनको पेईंग गेस्ट की जरुरत है... ओर डोन्ट वरी वो तुम्हे खाना भी देंगे... तेरी पापा से बोला मैने बोला है की तेरा सब इंतेझाम मै करुंगा... तो तुम्हे वहापे जाना होगा..."

कार्तिक -" ठीक है...😊😊"

लंच संपताच पटेल आणि कार्तिक लगेज घेऊन अमित सिंह च्या घरी निघाले. तिथे पोहचताच कळाल की त्यांचं इथे एक लहान अस हॉटेल आहे आणि तिथे इंडियन फूड सुद्धा मिळत असे. पटेल कार्तिक ची ओळख त्यांच्याशी करून दिली. सगळे सूचना त्याला देऊन ते तिथून निघून गेले. सिंह कार्तिकला घेऊन त्यांच्या घरी घेऊन गेले. अमित सिंह हे पंजाबी होते. सकाळी ते हॉटेलला जात होते. ते गेल्यावर अख्ख घर मोकळी आणि शांत वाटत होती. त्यामुळे कार्तिक साठी ती खूप चांगली जागा होती.

रात्र होत आली होती. डिनर संपताच कार्तिक आपली रूम आवरला. रूम रेडी झाल्यावर श्वेताचा कॉल आला.

श्वेता -" हाय... कार्त्या .. काय करत आहेस??"

कार्तिक -" हाय श्वेते ... आता जस्ट रूम आवरलोय. मम्मी डॅडी कुठे आहेत?"

श्वेता -" इथेच आहेत ... "

राजीव -" हाय कार्तिक .... मग कसं आहे कॅलिफोरनिया ??"

कार्तिक -" जस अपेक्षा करत होतो. तसाच आहे..."

राजीव -" पटेल सांगत होते. तू स्वतः रूम घेऊन राहणार होतास.. आणि कुक करणार होतास??"

कार्तिक -" होय... स्वावलंबी झालो तर चांगलेच ... नाही का?"

श्रध्दा -" काही गरज नाही... तू जिथे आहे तिथे रहा... काही गरज नाही स्वतः राहण्याची.."

कार्तिक -" फोन लाऊड स्पीकर वर आहे का???"

श्वेता हसत म्हणाली.

श्वेता -" होय.. 😜😜"

कार्तिक -" होय मम्मी.."

त्या नंतर श्रद्धाचे सूचना आणि कार्तिक ची ' हो ' एवढच चालू होत... कॉल कट करून तो झोपी गेला. उद्या त्याला एडमिशन सुद्धा घ्यायचे होते.

सकाळची वेळ... कार्तिक उठला तर तिथे ना पक्ष्यांची किलबिल होती , ना देवांची आरती जी त्यांची मम्मी सकाळी करत होती. होती तर फक्त वाहनांचा आवाज.... थोडा वेळ घराची आठवण काढून तो आवरायला गेला. सगळं काही डॉक्युमेंट्स घेतला आणि तयार झाला... तयार होऊन तो खाली आला तर सिंह फॅमिली ब्रेकफास्ट करत होते .

अमित -" ओये कार्तिक... आजा यार नाश्ता करलो .."

कार्तिक -" तो अंकल क्या है आज ब्रेकफास्ट को???"

अमित ची वाइफ -" आलुदे पराठे है.."

कार्तिक -" पंजाबी कॅपिटल ... 😜😜"

अमित -" मतलब??"

कार्तिक -" मतलब हमारे यहापे आलू के पराठे को पंजाबी कॅपिटल बोलते है..."

त्याच्या बोलण्यावरून सगळे हसले. असेच चेष्टा मस्करी मध्ये त्याची सकाळी उत्तम जात होती... नाष्टा आटपून तो स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ला निघाला. तिथे पायी जायला १० मिनिटे लागत होते , त्यामुळे काही वाहनाची गरज भासली नाही.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी हे काही साध सूध युनिव्हर्सिटी नव्हती. त्या युनिव्हर्सिटीचे कॅम्पस बघत कार्तिक तर भारावून गेला होता. कारण इथले वातावरण खूप वेगळं होतं . बाहेर मोकळी हवा असो वा नसो इथे तर खूप मोकळी हवा होती आणि फ्रेश सुद्धा... कार्तिक एडमिशन घेण्यासाठी थेट ऑफिस मध्ये गेला... त्या ऑफिस मध्ये गर्दी होती . पण नक्कीच भारतापेक्षा जास्त तर नव्हतीच... त्या गर्दीत त्याला ओळखीचा सूवास येऊ लागला. तो विचार केला ,' हा वास कुठला आहे???... पहिला कुठ तर हा वास आला होता... कुठे ???'.तो आठवतच होता तेवढ्यात पुढे त्याला मोहित करणारी ती परी येऊ लागली होती.. स्नेहा त्या ऑफिसमधून बाहेर येऊ लागली होती. कार्तिक तर तिला बघून विसरूनच गेला की तो ऑफिस मध्ये आहे ... ती त्याच्या समोरून गेली तरी तो तिच्याच रुपात हरवून गेला होता.... तेवढ्यात ऑफिस मध्ये एक कर्मचारी त्याला म्हणाला ," Hey man... you want to come or not..."

त्याच्या बोलण्याचा आवाजाने कार्तिक दचकून जागा झाला. मग त्याला आठवल की तो तर एडमिशन घेण्यासाठी आलेला आहे.तो त्यांना म्हणाला, " Yeah yeah... I'll come there.."
मोजून फक्त १५ मिनिटे मध्ये त्याच काम संपलं. त्याला सुद्धा खर वाटत नव्हतं की त्याचं काम एवढं लवकर संपला. तो विचार करून लागला की ,' एवढं वेळ जर भारतात लागली असती तर किती वेळ वाचला असता..' तो विचार करत ऑफिसच्या बाहेर आला तर त्याला आठवल की स्नेहा इथेच कुठे असेल.. तो आता तिच्या मोहित रूप असलेली परी ,स्नेहाला शोधत होता ... खूप वेळ शोधून झाल्यावर तो शेवटी थकला आणि त्याला भूक सुद्धा लागली होती... काहीसा दुःखित तो कॅन्टीन मध्ये आला.... तिथे बघतो तर काय स्नेहा कॉफी पित बसलेली होती. तिच्या त्या मोहित करणारे डोळे बघून कार्तिक त्याच्या भूक असलेल्या पोटाला सुद्धा विसरला. ती तिच्या कॉफीचा कप तोंडाला लावत असताना तिचे ते सिल्की केस तिच्या तोंडावर येत होते... तिच्या नाजुक बोटांनी केसांना कानामागे घेत होती.... कार्तिक न कळत तिच्या खुर्ची जवळ येऊन थांबला होता... स्नेहा त्याला बघून छानशी स्माइल दिली. पण कार्तिक अजुन त्याच्याच विश्वात होता.तिच्या त्या स्माइलनी तर अजुन तो घायाळ करू लागली होती.... स्नेहा त्याच्या पुढे हात हलवत होती.. मग कुठे तो या विश्वात आला..

स्नेहा -" हे हाय... "

कार्तिक -" हाय.... "

स्नेहा - " तू तेच ना फ्लाईट मधला... १ सेकंड.. कार्तिक .. करेक्ट???"

कार्तिक -" हा... हाय स्नेहा..."

स्नेहा -" सीट ना.."

तिला पण या दुसऱ्या देशात आपल्या देशातून कोणीतरी आहे म्हणून आपुलकी वाटत होती..कार्तिक तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला..

स्नेहा -" तू काय घेणार??"

कार्तिक -" तू देणार ??"

स्नेहा -" नाही ..वेटर देणार..😂😂"

या बोलण्यावरून दोघेही हसू लागले... कार्तिक सँडविच ची ऑर्डर दिला... असेच गप्पा चालू होते... थोड्यावेळात त्याची ऑर्डर आल्यावर तो मस्त ताव मारत होता....

स्नेहा -" तू कधी सँडविच खाला नाहीस काय??"

कार्तिक -" का?"

स्नेहा -" एवढं भरभर खात आहेस म्हणून विचारलं .."

कार्तिक -" कोणताही माणूस भूक लागल्यावर असाच खातो..."

तो खात असताना काही मुली कार्तिकला बघत होते. ते मुली फोरेनर होते .... लहान जीन्स शॉर्ट्स, टी शर्ट घातलेले, केस ब्राऊन येलो कलर केलेले आणि मोकळ्या सोडलेल्या , ते एकटक कार्तिक कडेच बघत होते.. ही गोष्ट स्नेहाच्या नजरेत पडल्याशिवाय राहिली नाही... ते बघून स्नेहा म्हणाली..

स्नेहा -" कार्तिक ...."

कार्तिक सँडविच खात म्हणाला..

कार्तिक -" ह्म..."

स्नेहा -" तिथे बघ.. "

कार्तिक तिच्या दाखवलेल्या दिशेनी बघितला तर तिथे काही मुली कार्तिक कडे बघत होते आणि कार्तिक होताच तेवढा हँडसम तर... कार्तिकला ते बघितल्यावर त्याचा तोंड फिरवला.. तोंड झाकत तो स्नेहाला म्हणाला

कार्तिक -" अग हे मला अस का बघत आहेत??"

स्नेहा -" त्याला लाईन मारणे म्हणतात... 😂😁😁"

स्नेहा त्याची मज्जा घेत म्हणाली...

कार्तिक -" आपण इथून निघुया का??"

स्नेहा -" का??? .. अरे बस ना... बघ किती चांस आहे बघ तरी..."

कार्तिक -" अग तू चल की..."

स्नेहा -" पण बिल???"

कार्तिक वैतागून त्याच्या पाकीट मधून पैसे काढून स्नेहाला दिला...

कार्तिक - " हे धर ... पे कर... आणि बाई चल इथून पहिला..."

स्नेहा -" माझं सुद्धा बिल पे करू???"

स्नेहा चेस्टेत म्हणाली...

कार्तिक -" हो ग बाई... जा पे कर.."

स्नेहाला हसूच कंट्रोल होत नव्हता... ती बील पे करून आली.. दोघेही कॅन्टीन मधून निघाले आणि त्या युनिव्हर्सिटीचे मोठे असलेले लॉन मधून चालत जात होते.. पण स्नेहा अजुन हसतच होती...

कार्तिक -" आता बस कर की.."

स्नेहा -" तेंव्हा तुझा हा चेहरा बघण्यासारखा होता..😂😂😂"

कार्तिक -" हो का???..😒😒😒"

स्नेहा -" ओके बाबा सॉरी... पण तू असं का बाहेर येऊ वाटलं??"

कार्तिक -" त्याची नजर बघितली होतीस ना... अस वाटत होत की आता मला किडनेप करतील.."

स्नेहा अजुन जोरात हसू लागली... पण कार्तिक तिच्या हसरा चेहरा बघून अजुन खुश होत होता... असेच गप्पा चालू होते.. कॉलेज तर अजुन मंडेला चालू होणार होते.. दोघेही आता एकाच युनिव्हर्सिटी मध्ये होते तर ते दोघेही नंबर एक्सचेंज केले ...

कॉलेज सुरू होऊन काही दिवसच झाले होते. युनिव्हर्सिटी मध्ये आतापासूनच कर्तीकची चर्चा सुरू झाली होती... तो फिजिक्स आणि बिओलॉजी मध्ये खूपच उत्तम होता... त्याचे बेसिक्स खूप क्लिअर होते.. त्यामुळेच की काय तो इतका उत्तमपणे उत्तर देत होता... स्नेहा सुद्धा काही कम नव्हती.. ती सुद्धा उत्तम विद्यार्थिनी होती.. तिची सुद्धा चर्चा केमिस्ट्री विभाग मध्ये होत होती... युनिव्हर्सिटी मध्ये त्या दोघांना इंडियन कपल म्हणत होते...

महिना होऊन गेला होता.. दोघंही आता बेस्ट फ्रेंड्स झालेले होते.. रात्रभर कॉल्स, मेसेज आणि युनिव्हर्सिटी मध्ये तर ते लेक्चर व्यतरिक्त सगळीकडे एकत्रच होते..

मंगळवारचा दिवस होता.. युनिव्हर्सिटी मधून कार्तिक घरी येत होता.. तर अमित सिंह आज लवकरच घरी आलेले होते.. कार्तिकला काहीतरीच वेगळच वाटलं..

कार्तिक -" अंकल .. आप इतनी जलदी ??.. सब कुछ ठीक है ना??"

अमित ची वाइफ रडत होती..

कार्तिक -" आंटी ... कुछ तो कहिये.."

अमित -" कार्तिक बेटा.. मेरी दादी अब नही रही..😭😢"

एवढं बोलून अमित रडत होते.. कार्तिक त्यांना सावरत होता ..

कार्तिक -" सॉरी... अंकल.."

अमित -" कार्तिक बेटा ... हमें इंडिया जाना होगा... "

कार्तिक -" हा... कोई प्रॉब्लेम नही है.. आप मेरी चिंता मत करिये.. आप जावो इंडिया... मे रह लुंगा कही भी.."

अमित -" ऐसे कैसे बेटा... खाना कैसे बना लोगे.."

कार्तिक -" आप चिंता मत करो अंकल.. मै पहिले भी खुद ही बनाना चाहता था.. आप सिर्फ मुझे घर दिखाईये मै रहुंगा वहापे.. आप इंडिया जा इये.."

अमित थोडा वेळ विचार करत म्हणाले..

अमित -" ठीक है.. एक घर है.. ओर वो भी युनिव्हर्सिटी के पास ही है.. लेकीन एक प्रॉब्लेम है.."

कार्तिक -" क्या???"

अमित -" वहा एक लडकी रहती है..."

कार्तिक थोडा वेळ विचार करून म्हणाला..

कार्तिक -" कोई बात नाही अंकल.. "

अमित -" ओके बेटा ... मै तुम्हारा सामान वहा पे लेके जाता हुं..."

कार्तिक - " अंकल.. आप चिंता मत करीये... सिर्फ अड्रेस देदो.. मै खुद जाउंगा..आप सिर्फ उनको बताओ की मै आ रहा हुं.."

अमित - " ठीक है बेटा.. बस एक महिने की बात है.. थंक यु.. "

कार्तिक -" अरे अंकल कोई बात नाही है.. आप जाईये ... "

अमित त्याला अॅड्रस देऊन ते इंडिया जाण्याची तयारीत लागले... कार्तिक आपला लॅगेज घेऊन जाऊ लागला.. सगळ्यांना बाय म्हणत तो त्या दुसऱ्या घरी निघाला..

थोड्यावेळाने तो तिथे पोहचला... एक हॉलिवूड हॉरर घरा सारखं ते घर वाटत होती... त्या घर मध्ये वरचा फ्लोअर बंद होता... राहण्याची व्यवस्था फक्त खालच्या फ्लोअर ला होते.... त्या घरात एक बेडरूम , एक किचन आणि आजूबाजूचे घर सुद्धा चिकटूनच होते.. घरासमोर एक लहानस गार्डन बघून त्याला नवलच वाटल की त्याच्या युनिव्हर्सिटी जवळ इतकं मस्त घर सुद्धा असेल.. तो घरात जाताच बघितला तर घर तर अगदी जुनाट वाटत होती.. तो बेडरूम गेल्यावर त्याला सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसल.. त्याच बेडरूम मध्ये टेबलावर एक फोटो फ्रेम होती.. तो बघत कार्तिक म्हणाला ," ही आहे तर इथ राहणारी मुलगी.."ती सुद्धा इथलीच वाटत होती.. ब्राऊन आणि येलो अशी केस , पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेज होती, ती एक हॉलिवूड अॅक्टरस पेक्षा काही कम नव्हती... ती फ्रेम परत ठेवत कार्तिक म्हणाला ," चला कार्तिक राव... आवरा घराला... " तो कामाला लागला...सगळी काम संपल्यावर तो थोडा आराम करत असताना बेल ची रिंग वाजली... तो उठून दार उघडला तर पुढे ती फोटो फ्रेम मधली मुलगी होती... ती मुलगी आणि कार्तिक एकमेकांकडे बघत होते... हीच ती वेळ होती जी कर्तिकच्या जीवनात एक वेगळीच वळण देणार होती... 😊😊😊

********************************
क्रमशः

ऋषिकेश मठपती

( एक वेगळा प्रयत्न मी या भाग मध्ये केलेला आहे.. हिंदीचा वापर सुद्धा मी केलेला आहे... आय होप तुम्हाला आवडेल... आवडल्यास नक्की कळवा .. पुढील भाग लवकरच... कमेंट करा ... धन्यवाद..🙏🙏🙏)