Live in ... Part - 1 books and stories free download online pdf in Marathi

लिव इन... भाग - 1

रावी एक पंजाबी मुलगी ..... रावी ही जरी पंजाबी असली तरी, तिचे आई महाराष्ट्रियन होती आणि वडील पंजाबी ....तिच्या आई वडिलांचे लव मरेज झालेल ...रावी वर महाराष्ट्रियन आणि पंजाबी दोन्ही सांस्क्रुतिचे संस्कार झलेले.... रावी आणि तिची फेमिली मुंबईत च राहत असल्यामुळे , तिच्या वर मराठी भाषेचे संस्कार झलेले. तिला मराठी खूप चांगले बोलता येत होते .... रावी ही खुल्या विचारांची होती .स्वप्नाळू होती .देव वैगेरे ती काही मानत नव्हती .मनात येईल तस मस्त आयुष्य जगायचं ....हे आयुष्य परत नाही .त्यामुळे हे आयुष्य जगताना आपली सगळी स्वप्ने पूर्ण करायची .रावी ला एक छोटा भा ऊ होता .वडील चा बिज़्नेस ....आई किटी पार्ट्या मधे बिज़ी.... त्यामुळे तिचा भाऊ आणि ती नोकराकडूनच मोठे जाहाले... रावी चा त्यामोठ्या घरामध्ये जीव गुदमाराय्चा....
त्यामुळे तिने मुंबई तून बाहेर जायचे ठरवले .तिने पुढील शिक्षणासाठी हैदराबादला जायचे ठरवले. तस तिला कोणत्याही गोष्टी साठी आई वडिलां नी नकार दिला नव्हता . पण, तरीही तिला आई वडिलांपासून दूर
जायचे होते ..... तिने पुढील शिक्षणाचा विषय काढला... आणि आई वडील दोघानी ही तिला हैदराबादला जायला परवानगी दिली . रावी जाण्याची तयारी करू लागली .
ह्या कहीनीहीतील हेरॉईन रावी आहे, तर, हिरो अमन महाराष्ट्रीन मुलगा, पुण्यात रहायचा .पक्का पुणेकर होता ...हाडा मासणे सूध्हा ...त्यात हा ब्राह्मण कुटुंबात जन्मला आलेला ...मासे, मटण ला कधीही न शिव नारा ....आणि कोणी खाल्ले, तर त्यानी ते खाऊ नये, म्हणून सल्ले देणारा. अमन ची आई ही ग्रुहिनि होती, अमन च्या आजी आजोबांची काळजी घ्याची, मुलांना काय हवं काय नको ते पहायचे ....त्याच्या आवडीचे चमचमीत पदार्थ करून त्याना खाऊ घालायचे ...आणि घरगुती असणारे आपले साडी चे दुकान चालवायचे, हे तिचे दिवसभर चे काम, अमन चे बाबा पोलीस हवालदार, पण शीस्तीने कडक ....मुलांना शिस्तीत ठेवणे, हे त्याचे मह्तावाचे काम ...हवाल दारकी बरोबर ते वेळ असेल तशी ते पूजा ही सांगायला जात .त्यांना आपण ब्राह्मण आहोत, ह्याचा खूप अभिमान होता .अमन ला एक छोटी बहीण ही होती, सगळे तिला राधा म्हणायचे ...यंदा ती दहावीत होती .अमन चे आजी आजोबा ही त्याच्या सोबत रहायचे, मुले काय करतात, कुठे जातात ह्यावर त्याचे बरीक लक्ष असायचे . अमन मात्र दिलखुलास होता,, सगळ्याना मदत करायची, सगळ्याची प्रेमाने आपुलकीने बोलायचा .त्याच एकच स्वप्न होत .खूप पैसा कमवायचा .गाडी, बंगला घय्चा .पण मेहनत करून .... त्यासाठी खूप शिकले, पहिजे ....ही त्याच्या बावांची शिकवण ...अमन आता पुढील शिक्षणासाठी हैदराबादला जाणार होता ....
रावी आणि अमन दोघांनीही एकाच कॉलेज मधे अड्मिशन घेतले होते, दोघे ही आता अप्ल्याअप्ल्या फेमिली ला सोडून होस्टेल मधे राहणार होते . आता आपल्या ह्या हिरो आणि हेरॉईन ची भेट कुठे होते, कशी होते आणि पुढे काय होते, हे वाचाच ..... अमन आणि रावी आता हैदराबाद मधे आले ले आहेत . रावी मुलींच्या होस्टेल मधे आणि अमन मुलांच्या होस्टेल मधे सेटल झालेले आहेत . आणि आज त्याच फर्स्ट लेक्चर आहे . आणि आज रावी नेहमी प्रमाणे उशिरा उठली .गजर वाजून वाजून गेला ....तिच्या रूम मधील मुली कधीच आपापले आवरून कॉलेज मधे पोहचल्या सूध्हा, तरी रावी अंथरूणात च ....अचानक तिला जाग आली आणि ती पटकन आवरून कॉलेज मधे पळाली. आणि आपला अमन सकाळी सकाळी उठून योगा करत बसला, आणि जाहला उशीर .....दोघे ही पळत पळत कॉलेज मधे येत होते . पण तरीही उशीर झाल्यामूले त्यांना त्यच्या सरांनी फर्स्ट लेक्चर ला काही घेतले नाही ...वरून पहिल्याच दिवशी लेट म्हणून चांगलीच कानउघडणी केली .ते ऐकून अमन ला थोड वाईट वाटल .आणि तो लाइब्ररी कडे वळला ,आणि आपली रावी पोटाची आग वीझ्वय्ला कँटीन कडे ..... वळली..
रावी पंजाब ची असल्यामुळे, तिला नोँवेज खाण्याची आवड होती .पण कँटीन मधे नोँवेज फक्त सनडे ला च मिळायचे.. ई तर वारी फक्त वेज जेवण ते पण आळंनी आणि कमी त्तीख्त ... जेव्हा रावी ला हे समजले, तेव्हा तिने प्रिन्सिपल कडे कंप्लेंट करायची ठरवली .....आणि एथे अमन लायब्ररी मधे काही ठराविक पुस्तके फक्त काही ठराविक मूलानाच मिळत असे, हे जेव्हा अमन ला समजले, तेव्हा त्यानी प्रिन्सिपल कडे कंप्लेंट करायचे ठरवले . मग काय अमन नी पुणेरी बुधीने आणि रावी ने पंजाबी बुध्ही ने प्रिन्सिपल च डोक खाल्ले. आणि आपल्याला पहिजे ते मिळवले .शेवटी त्या दोघाना वैतागून प्रिन्सिपल ने दोघांचे ही म्हणे, मान्य केले, आणि कँटीन मधे रोजच वेज बरोबर नोँवेज बनवण्याची परवानगी दिली .आणि लायब्ररी मधली सगळी पुस्तके सगळ्याना देण्याची ही परवानगी दिली .प्रिन्सिपल ऑफीस मधे रावी आणि अमन ची पहिली भेट जाहाली .रावी ला अमन चा पुणेरी सडेतोड पणा आवडला .तर अमन ला रावीचा मुलगी असून ही तिच्या अंगात असलेला बिनधास्त पणा .. दोघांची पहिली भेट तर मस्त जाहली, दोघांनी एकमेकाना , हेलो, केल. मग, पुढे गप्पा चालू झल्या त्या काही मग तासभर थम्ल्या नाहीत . मग दोघे ही आपपल्या होस्टेल वर निघून गेले .पण जाण्या आधी दोघानी आपपल्या फोन नंबर ची देवाणघेवाण करयला विसरले नव्हते .मग काय पहिली भेट, रात्र रात्र मोबाइल वर चाटिनग करने, हळू हळू कॉलेज मधे सोबत जाणे, मित्रा सोबत एकत्रित फिरायला जाणे, फंक्शन च्या वेळी गिफ्ट देणे एकमेकां ना ....अस सगळ रावी आणि अमन मधे चालू होत .. कॉलेज मधे तर सगळ्याना अस वाटत होत, की रावी आणि अमनच प्रेम प्रकरण चालू आहे .पण, ह्या दोघाना त्याबद्दल काहीच वाटत नव्हते .ते दोघेही एकमेकांची साथ एन्जॉय करत होते .दोघानाही ही मैत्रीच वाटत होती .
वर्ष होत आल होत, अमन आणि रावीच्या मैत्री ला ...एकमेकांची मैत्रीत दोघेही खूप खुश होते .पण आता परीक्षा जवळ आली होती .अमन ने परीक्षेवर फोकस दयचा ठरवल होत .त्यामुळे त्याने बाकीचे सगळे प्लान रद्द केले .तो रात्र न दिवस अभ्यासात बुडून गेला होता . त्याच्या उलट रावी होती, अमन आणि रावीचे सगळे मित्र अभ्यासात बुडून गेले होते, त्यामुळे नो चात्तिँग, नो मूविंग, नो बाहेर फिरायला जाणे... ह्या सगळ्यामुळे रावी ला खूप कंटाळा आला होता ...तिला अश्या कंटाळवाणा आयुष्या पासून सुट्टी हवी होती, म्हणून तर, ती हैदराबादला फेमिली पासून दूर आली होती . कोणी पुस्तके सोडून रावी बरोबर यायला तयार नव्हत, त्यामुळे रावी स्वताच एकटीने बाहेर कॉफी प्याला ,जायचे ठरवले .
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रावी तीच उरकून कॉफी प्याला जायला निघाली, होस्टेल जवळच एक मौल होता, तिथेच रावी निघाली होती, तिथे जाऊन थोडस शॉपिंग करू, फिरू, आणि कॉफी पण पिऊ ह्या उदेषाने ती निघाली होती . रावी मौल्ल मधे आली, तिथली गर्दी पाहून तिची सगळी मरगळ निघून गेली .ती एका लडिएस शॉप मधे शिरली .तिने काही ड्रेस ही खरेदी केले . थोडी तीमौल्ल ही फिरली .मग ती खाण्याच्या ठिकणि आली, तिने कॉफी ऑर्डर केली .ती कॉफी येण्याची वाट च पाहत होती .तेवढ्यात तिथे एक मुलगा आला, रावी एकटी बसली होती, आणि तो ही एकटा च होता, त्यामुळे आपण एकत्र टेव्बल वर बसू म्हणून त्यानी विनंती केली, रावी ही तयार जाहली .