Live in ... Part - 4 books and stories free download online pdf in Marathi

लिव इन... भाग - 4

अमन चे बाबा अमन ला म्हणाले, अमन मी तु आल्यापासून तुला विचारेन विचारेन अस म्हणतोय, पण विसरून च जातो, तुज कॉलेज कस आहे? यंदा चे पेपर कसे गेले? आणि मार्काचे काय? ह्या ही वेळेने पहिला नंबर ना? बाबांना मधेच थांबवत आई म्हणाली, अहो, काय तुम्ही त्याला टेन्शन देताय, तस तो हुशार च आहे, त्याला चांगले च मार्क मिळणार, आणि हो, अमन निकाला च जास्त टेन्शन नको घेऊ ...... प्रत्येक वेलेनी पहिलाच नंबर आला पहिजे, अस काही नाही .....ह्या वेलेनी नाही आला नंबर तरी चालेल .....अरे नवीन कॉलेज आहे, नवीन अभ्यास क्रम आहे .....आता आई आणि बाबा दोघांना ही मधेच थांबवत अमन म्हणला .....आई आणि बाबा तुम्हाला महिती आहे, ना मी परीक्षेच टेन्शन घेतो, ना अभ्यासाच ....ना निकालाच ...आणि ह्या वेलेनी मला चांगले पेपर गेलेत, त्यमुळे मार्क्स चांगले च मिळणार ...पण मझ्या हे ही लक्षात आले आहे ....तुम्हाला मला ह्या बदल काही काहीही विचारायचे नाही तुम्हाला मला दुसरंच काही तरी विचारायचे आहे? तर, प्लीज तुम्ही ते विचारू शकता .
मग अमन च्या बाबानी च विषय pकाढला, अमन तुला कसला त्रस्स, टेन्शन वैगेरे असल तर अह्मला सांग? आह्मी तुला जेवढी जमेल तेवढी मदत करू ........ ...फक्त .... कुठल्या ही मुलीशी तूझा कसला ही संबध नको, प्रेमप्रकरणे वैगेरे काहीही नको .....ह्या घरात जर कुठली मुलगी सून म्हणून आली, तर ती फक्त ब्राह्मण मुलगी असेल..... बाबांचा चड्लेला सूर पाहून आई मधे च बोलली, अहो ...हे सगळ माहीत आहे.... त्याला..... आपले संस्कार नाही जाणार फुकट .... हुशार आहेत आपली मूल .....यावर काहीही न बोलता बाबा निघून गेले .
आता खूप दिवस होऊन गेले, अमन परत होस्टेल ला जायला निघाला, आई त्याची तयारी करत होती, बाबांनी त्याच तिकीट काढून आणले होते .जेव्हा पासून अमन परत जायला निघाला, होता, तेव्हा पासून त्याच्या चेहऱ्यावर वेगळा च आनंद होता , त्याचा तो आनंद काही केल्या त्याच्या आई वडिलां च्या नजरेतून सुटला नाही ..पण, मित्र मैत्रिणी ना भेटण्याचा आनंद असेल, म्हणून त्याचा हा आनंद असेल, म्हणून त्याचे आई वडील काही बोलले नाही .
रेल्वे आली, अमन नी सगळ्यांना बाय केले .आई च रडणे चालूच होते . अमन रेल्वे मधे बसला, रेल्वे चालू जाहाली . आता ह्या पुढे सगळ चांगल होईल, असा आत्मविश्वास का कोणास ठावूक पण अमन मधे आला होता . त्याचे डोळे आता कॉलेज च्या वाटे वर लागले होते .
अमन होस्टेल मधे आला होता .बहुतेक मुले होस्टेल मधे परत आली होती . जिकडे तिकडे घरी सुट्टीत काय काय मजा केली . ह्याची च चर्चा चालू होती . अमन होस्टेल मधे येताच त्याने आपल्या सगळ्या गँग ला फोन केला .सगळे जण होस्टेल मधे आले . पण अजून ही रावी चा काही च तपास नव्हता . ती होस्टेल मधे आली च नव्हती .उद्या पासून कॉलेज च नवीन वर्ष चालू होणार होत.
आणि पहिल्या दिवशी च रावी नसणार ....बरं.... सुट्टीत तिने एकदा ही अमन ला किंवा त्याच्या गँग ला फोन केला नव्हता . आणि त्यानी केल्या ला फोन ला तिने साध उत्तर सूध्हा दिले नव्हते . रावी अशी कधीच नव्हती .तिला तर सतत फोन लागायचा. सतत मेस्सेज, वीडियो कॉल, फोन करणे .हे तीच चालू असायच . त्यामुळे तिने फोन बघितला,नसेल अस नाही ....मग, अस का? अमन ला अनेक प्रश्न पडत होते .त्या पडणाऱ्या प्रश्नांना मुळे त्याला काही झौप येईना .सतत तो ह्या कुशीवरून त्या कुशीवर होत होता .शेवटी पहाटे पहाटे त्याला झौप लागली .
अचानक कसला तरी आवाज ऐकू येऊ लागला .त्या आवाजा मुळे अमन ला जाग आली .पाहतो तो काय जवळ च असलेले घड्याळाचा गजर होत होता . अमन ने तो गजर बंद केला ...आणि घड्याळ त पहिल आठ वाजले होते . नऊ वाजता त्याला कॉलेज वर पौह्चय्चे होते .त्यमुळे त्याने उठून आवरायला घेतले . अमन उरकून खाली कँटीन मधे आला . आज नाष्टयाला रावी च्या आवडीचा आलु पराठा होता . अमन ला त्याचा आणि रावी चा कॉलेज मधला पहिला दिवस आठवला .कँटीन मधला ते पहिल्या दिवसाचे भांडण, प्रिन्सिपल ऑफीस मधे तिने बिनधास्त पणे मांडलेले विचार ....सगळ सगळ अमनला आठवत होते . ते सगळ आठवून त्याच्या चेहऱ्यावर हसू पण आल . पण, रावी नसल्यामुळे सगळ कस सुन सुन वाटत होते . अमन ला रावी ची खूप आठवण येत होती .पण, त्या पेक्षा त्याला जास्त टेन्शन आले, की रावी अजून गर्ल्स होस्टेल वर का नाही आली? एवढ्या सुट्टीत तिने कोणालाच फोन का नाही केला? आणि जर कोणी केलाच तर का नाही उचलला .... झलेल्या प्रसंगाबदल तिने घरी कोणाला संगितले तर नसेल ना? म्हणून तिच्या घरच्यांनी तिला परत होस्टेल वर पाठवले च नसेल तर .....अमन च्या मनात विचारांची पाल चूक चुकली..... एवढ्यात त्याचे लक्ष हातातल्या घडल्ल्या कडे गेले .नऊ वाजून गेले, होते . कॉलेज ला जायला उशीर होईल, म्हणून अमन उठला, आणि कॉलेज ला जायला निघाला .
कॉलेज मधे येताच, अमन ला रावी ची आठवण आली , सगळेजण आपल्या आपल्या ग्रूप सोबत होते . अमन च्या गँग ने ही अमन ला आवाज दिला . अमन आवाजा च्या दिशेने निघाला . खूप दिवसानी भेटल्या मुळे जोरदार गप्पा चालू होत्या . पण, ह्या सगळ्यात अमन ला काडी चा सूध्हा रस नव्हता . त्याला राहवून राहवून रावी चा सहवास च आठवत होता . तीच ते गडबडीत कॉलेज मधे येणे, सगळ्यांची मजा मस्करी करणे, लेक्चर मधे जौक्क्स करणे .सगळ्या वर जीव टाकून प्रेम करणे, गरज पडल्यावर मित्रा साठी ऐख्या जगाशी भांडणे .....हे सगळ मिस करत होता अमन .
एवढ्यात अमन च्या ग्रूप मधील, रीधीमा अमन ला आणि ग्रूप ला म्हणाली, अरे ,चला सगळेजण ...फर्स्ट लेक्चर चालू होईल .आणि पहिल्याच दिवशी लेट नको ..... रीधीमा च बोलण ऐकून सगळे क्लास कडे निघाले .क्लास मधे जाताच, प्रत्येक जाणा नी आपली आपली जागा पकडली .अमन नी ही त्याची जागा पकडली, पण, त्याच्या शेजारची रावी ची जागा रिकामी च होती .त्याची नजर त्या जागे वर खिळली..... ऐत्क्यात गोड आवाजात कोणी तरी म्हणल, मी बसू का एथे ? आवाज ऐकताच अमन नी वर पहिल, एका क्षणासाठी त्याला वाटले, रावी च आली, पण ती रावी नव्हती ,ती रीधीमा होती .... अमन नी नजरेने तिला बस म्हणल . सर अजून न आल्यामुळे, क्लास मधे गोंधळ चालू होता .एवढ्यात एक मुलगा क्लास मधे आला .नवीन च होता .त्याच्या बरोबर एक मुलगी ही आत मधे आली . खूप सुंदर दिसत होती ती ....रेड कलर चा गुड्ग्याच्या वरती असणारा वन पीस घातला होता .त्यावर मचिँग कानातले, केस मोकळे सोडलेले ...आणि मचिँग असे शूज.... हातात पुस्तके .... सगळी मुले तिच्याकडे बघत च बसली होती .अमन ने ही एक नजर तिच्याकडे टाकली ...पाहतो तो काय .....रावी.....