Tinch Heart beat... - 4 books and stories free download online pdf in Marathi

तिचं Heart beat..... - 4















💕 तिचं Heartbeat...(भाग4)..💕


दुसऱ्या दिवशी सकाळी सुगंधा लवकर उठून काम आवरते,
मुलांचं पण सगळं करते......आता वेळ असते तिला कॉलेजमध्ये जाण्याची......पण चेहरा फार दुखत असतो.....गालावरचे बोटांचे ठसे गेलेले नसतात......ती एक scarp घेऊन चेहऱ्यावर गुंडाळते........ तरीही डोळ्याखाली काळं जमा झालेलं असतं.....ते दिसतंच..... ती एक black गॉगल घालते.....पण फोन तिच्या नवऱ्याकडे म्हणजे विक्रम कडे असतो.....विक्रम सुगंधाला सांगतो....
......"तू जा कॉलेजला....मी येतो आज तुला घ्यायला!...."
...."हम्मम.....ठीक आहे...."

" न जाने आज क्या होगा,,
भरी महफिल में आज कोई बदनाम होगा!..."💔


पुढे काय होणार आहे हे तिला माहीत नसतं......सुगंधा कॉलेजमध्ये पोहोचते......इकडे विक्रमकडे आज सुगंधाचा फोन असतो.... याची कल्पना अनंतला नसते.....सुगंधा मात्र आज उदास असते.....scarp काढत नाही....तिचे lecture सहकार्यांना देते....सांगते.....सर्दी, डोकेदुखीने त्रास होतोय.....meeting attain करते........आणि आता विक्रमची वाट पाहते कारण आज तो तिला घ्यायला येणार असतो.........तीच डोकं विचारांनी फार जड झालेलं असतं.....
विक्रम इकडे सुगंधाच्या फोनवरुन मेसेज करतो.......
"hiii अनंत,कॉलेजच्या बाहेरच्या कॉफी शॉप मध्ये 10 मिनिटात भेटू.....नक्की ये...."

. "ok....."
अनंत हा मेसेज वाचून खूप खुश झाला.....त्याने विचार केला..... आज मॅमला ती poem सांगायची का?.....नको.... रागावल्या तर
कदाचित.....पाहुयात....जाऊन तर...…काय म्हणतात.....तस आज त्या दिसल्या पण मूड ऑफ़ आहे वाटतं त्यांचा!.....काय बरं झालं असेल?....गेल्यावर विचारतो......नोट्स पण देणार असतील बहुधा......अनंत कॉफ़ी शॉप जवळ पोहोचतो.......

सुगंधा आणि विक्रम आधीपासूनच कॉफी शॉपमध्ये हजर असतात......विक्रम सुगंधाला अनंतला मेसेज केल्यानंतर कॉलेजमधून शॉपमध्ये घेऊन येतो.......अनंत कॉफी शॉप मध्ये आल्याबरोबर सुगंधा जवळ येऊन बोलतो...."..मॅम,तुम्ही बोलावलंय, नोट्स बनवल्या काय तुम्ही!....."
सुगंधा त्याला पाहून गांगरते.....मी तर याला नाही बोलावलं.....म्हणजे विक्रमनी बोलावलं याला.......आता काय होईल?......
अनंत तर तिला पाहून शॉक होतो......चेहरा विचारात पडतो त्याचा.......तिच्या चेहऱ्यावरचे व्रण पाहून..... मेंदू सुन्न होतो......काय झाले असेल बरं?......कौटुंबिक हिंसाचार....... पण का?......काल रात्री तर मॅम व्यवस्थित होत्या......आज अस काय झालं?......विक्रम सर तर सुशिक्षित आहेत मग यांच्यात असं काय होऊ शकत?......मॅमवर त्यांनी हात का उचलला असेल?........विचारांनी त्याचं डोकं पिंजून काढलं होतं......
कसं बोलावं?....काही कळत नव्हतं..........

"मॅम ने नाही मी बोलावलं तुला?....काय रे,मेसेज काय करतोस,माझ्या बायकोला?....तुझी टीचर आहे ना ती!...मग तेच relation ठेवायच,समजलं ना!....कोणत्या नोट्स रे?.....बहाणा चांगला आहे बोलण्याचा!......शिस्तीत रहा!.....आताशी शिंग फुटताहेत!.....उडू नको जास्त!...कळलं ना!....माझी बायको आहे ती!...मेसेज नाही करायचे तिला!......कोणती poem लिहली रे तिने तुझ्यावर?....काय चाललंय हे सगळं?....कधीपासून चालू आहे?....लाज नाही वाटतं!....पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस......"

"सर,मी फक्त नोट्स घ्यायला आलो होतो.....नोट्स देणार होत्या मॅम म्हणून!....तुमचा काहीतरी गैरसमज झालाय!....असं काही नाहीये.....मॅम,तुम्ही बोला ना,काहीतरी!...."
"ती काय बोलेलं.....झालंय आमचं बोलणं रात्रीचं..... असं काय असेल तर ती तोंडाने थोडी ना सांगणार आहे?....मांजर सांगते का,दूध पिलं असं!....पण लोकांना कळतंच ना!......चल निघ आणि पुन्हा बोलू नको,तिच्याशी!..."
अनंत निघतो....त्याला हे सगळं समजण्याच्या पलिकडे असतं..... काल रात्री बरोबर बोलल्या.... आज काय झालं.....खरंच माझ्यामुळे मारलं असेल का?....अरे पण एकदा समजून घ्यायला हवं होतं ना!.....त्यांची आणि माझी काहीच चूक नव्हती.....एखाद्याला personal मेसेज करणं इतकं चुकीचे ठरेल, असं त्याला स्वप्नात देखील वाटतं नव्हतं......जाताना एकदा अनंत सुगंधाकडे पाहतो....मनातल्या मनात sorry म्हणतो.....आपल्या एक मेसेजमुळे इतकं काही घडेल असं वाटलं नव्हतं......

"💕 कितना दर्द छुपा हैं, तेरी इन खामोश निगाहों में,
छलका दे गम,बदल दु मैं इसे अपनी खुशी से !...."💕

सुगंधाच्या मनात विचारांचे तुफान आलेलं असत....आता काय होणार या विचारांनी......घरी गेल्यावर विक्रम तिलाच ओरडतो....सांगतो....आता पुन्हा त्याच्याशी बोलू नको....बोललीस तर घरातून निघून जा!....नेहमीप्रमाणे ती हो म्हणून आपल्या कामाला लागते.....कारण डोक्यात जरी वादळं असलं तरीही काम तर करावे लागतेच.....आता तर तिने त्याच्याशी न बोलण्याचे ठरवुन घेतले.....आता मात्र विक्रम तिचा फोन रोज चेक करू लागला.....रोज तिला टोमणे मारू लागला......कुठं, का,कशाला किती अशा रोजच्या प्रश्नांची उत्तरं देता देता तिला कंटाळा येत होता..... पण काय करणार?.....संसार सोडून थोडं ना जाता येत कुठे?...त्यात मुलं ही होतेच....ती सगळं सहन करत होती फक्त मुलांसाठी!....एक दिवस हे सगळं थांबेल, याची वाट पाहत होती......
इकडे अनंत तिला रोज कोणत्या ना कोणत्या बहाण्याने sorry म्हणत होता.... पण ती त्याच्याकडे लक्ष देत नव्हती.... तिला त्याच्याशी बोलायचं नव्हतं.....किंबहूना तिला तिचा संसार अधिक प्रिय होता.......
सतत 15 दिवस अनंत रोज तिला sorry म्हणत होता....शेवटी तिलाही वाईट वाटलं...किती ताणायच एखाद्याला.....म्हणून सुगंधाने अनंतला माफ केलं.....
अनंतने सुगंधाला ते कवितेच पण दिल आणि म्हणाला,"तुमची कविता फार छान होती....लिहता का तुम्ही?..."
"नाही रे,आधी लिहायचे....."
"आता लिहायला काहीच हरकत नाही, लिहत जा...."
"बघूया,करू try...."
हळूहळू त्यांच्यात बोलणे वाढत चालले होते....ते बोलायचे पण फक्त कॉलेजमध्ये..... मोबाईलवर नाही....
अनंतचा प्रॉब्लेम सुगंधा लगेच solve करायची आणि सुगंधालाही त्याच्याशी बोलून मन मोकळं करता यायचं.....तो तिला सतत हसवण्याचा प्रयत्न करत असायचा......त्यांच्यात आता मैत्री होऊ लागली होती......

क्रमशः

(ही कथा पूर्णता काल्पनिक आहे,त्यामुळे तिचा कोणाशीच संबंध नाही, जर कोणाशी चुकून निघाला तर हा केवळ निव्वळ योगायोग समजावा)

.......Heartsaver....