Reshmi Nate - 14 books and stories free download online pdf in Marathi

रेशमी नाते - 14

विराट मॉमला कॉल करतो..मॉम कॉल उचलतात...

मॉम ..

(त्या तुटकच बोलतात )हा बोल..

मॉम पिहुला फोन दे ...रूममधला पण उचलत नाही आणि कॉल पण लागत नाहीये...

ती असयाला तर हवी तुझा फोन उचलायला...

तो थोडा दचकतो...मॉम...पिहु..

हो गेली घर सोडून कायमची,आता परत येणार नाही..

मॉम,...तो ओरडुनच बोलतो...

हो विराट ती गेली आहे...तु तिच्याशी अस वागशील वाटलं नव्हतं मला ...(.त्या शांत होतात)तु घरी आल्यावर बोलू तू काम करत बस...मला माहित आ‌हे कळालं तरी तु तुझ काम करूनच येणार .अस बोलून सुमन फोन ठेवून कंठ दाठुन रडू लागतात..

व‌ि‌राट ही शांत डोळे झाकुन बेडवर स्वतःला झोकून देतो..त्याच्या एका चुकिच्या गोष्टी मूळे एवढ सगळ होईल त्याला वाटलं नव्हतं तो डिवोर्सच कस काय इतक्यात विसरला त्यालाच कळलं नाही...

मनी रुमचा दार वाजवतो...

सुमन डोळे पुसुन दाराकडे बघतात..हा बोल मनी,

आई, मोठ्या आईंनी जेवायला बोलवलं आहे.

हा आले सांग...

सुमन फ्रेश होऊन बाहेर येतात...

सुमन पिहु कुठे दिसत नाही..कुठे गेली का-रोहिणी

सुमन नजर चोरुनच बोलतात.. ती माहेरी गेली आहे...

रोहिणीला तर आंनदच होतो..पण त्या तस न दाखवता ...का,अस अचानक..

रोहिणी हा कुठला प्रश्न गेली असेल दामोदर बोलतात..

अहो पण विचारलं काल पासुन दिसत नाही काय झालं आहे का तिला...रोहिणी ठसक्यातच बोलते.

ते असच आता सुट्टया आहेत ना म्हणुन सुमनला आत्ताच कोणाला सांगायच नव्हत..कारण त्यांना विश्वास होताच विराट ‌पिहुला परत‌ आणणार...
.
.
.
.
विराट त्याच काम‌ करुन सहा दिवसांनी घरी येतो....यायला त्याला रात्रच होती.तो रुमचा दार उघडतो. रुममध्ये भयाण शांतता होती...त्याने लाईट्स ऑन केल्या..सगळीकडे नजर फिरवली...तो कधी रात्री आला का पहिले बेडवर नजर टाकत होता...पिहु झोपलेली दिसत होती..आज तस काहीच नव्हतं...रूम मध्ये सामान जागच्या जागी ठेवले होते...पिहु नसल्याने उदास रुम दिसत होती..तो एक पाऊल पुढे पूढे येत त्याच लक्ष फ्रिजकडे गेले..तो जवळ जात फ्रिज उघडुन बघतो...तिची सवय त्याला माहित होती..चॉकलेट काढुण रॅप‌र परत बॉक्स मध्ये ठेवयाची आणि विराट ते रॅपर काढुन डजबिन मध्ये‌ टाकायचा...आपकसुक त्याच्या चेहरयाव‌र ते आठवुन हसु आले.तो गॅलेरीत गेला.ती सारखी सोफ्यावर लोळत बुक्स रीड कर काही तरी स्नॅक्स ‌खा ते पण सामान ती ति तिथेच ठेवत होती..विराटच उचलुन बूक्स बाकीच सामान नीट ठेवत होता तो किती तरी वेळा सांगायचा..ती चिडतच हा हा म्हणायची...नंतर नंतर त्याने सांगणच सोडुन दिलं आणि स्वतःच करायचा...हेडफोन तर जिथे बसून लावलं ति‌थेच सोडुन सगळया रूमभर शोधत‌ बसायची...त्याला सगळ आठवुन हसू येत होते...डोळ्यात पाणी तरळत होते पण डोळ्यातुन एक थेंब त्याने गाळला नाही...तो सोफ्यावरच शांत बसला...सोफ्याला मागे टेकून पिहुचा चेहरा त्याच्या समोर येत होता...जोरात वादळ सुट‌ले होते..आकाश चांगलच भरुन जोरात गरजु लागले...विजा ही चमकु लागल्या....आंगाला वा‌रा भिडत होता...पण विराट जागचा काही हलत नव्हता....

पिहुला बाहेरच्या आवाजाने जाग आली..ती उठुन ‌ खिडकी जवळ आली...वारा खुप सुटला होता...(हे आज येणार होते...आले असतील ती मनातच बोलु लागली.)..तसाच विराटचा चेहरा आठवुन तिच्या डोळे परत वाहु लागले...त्यात आकाश एवढे गर्जत होते पण पाऊस पडायचा नाव घेत नव्हता....

सुमन आजीच्या रुममध्ये येतात..आई तुम्हाला थंडी वाजत नाही ना...

नाही गं ....वादळ पण सुटलं आहे...पण काय पाऊस पडत‌ नाही जो पर्यंत पाऊस पडत‌ नाही तो पर्यंत हे शांत होणार नाही..,

सुमन ‌खिडकीतुन बाहेर‌ बघतात,आई नाही पडणार पाऊस आतच घुटमळत राहणार स्वतःच दुख कधी मनमोकळ करणार नाही..तसच हे वादळ आतच सामावुन जाणर..सगळयांचा विचार करेल पण स्वतःला किती त्रास होतोय हे दा‌खवणार नाही..सुमनचे डोळे काटोकाट भरत वाहत होते.विराटला किती त्रास होत असेल पण तो कधीच कोणापुढे स्वतःच मन हलक करणार नाही...

.
.
.
.
सकाळी पिहु झोपेतुन खाली उठुन येते...प्रांजु मम्मी कुठे दिसत नाही..आणि तु किचन मध्ये कधीपासुन काम करायला लागली..पिहु हसत बोलु लागली.‌‌

मी फक्त दुध गरम करत होती..ते पण तुलाच...मम्मी ऑर्डर देऊन गेली...

पण मम्मी पप्पा कुठे आहे.

ते पप्पा मम्मीला डॅाक्टरकडे घेऊन गेले...

पिहु घाबरतेच - काय झालं आणि तू आत्ता सांगते‌.उठवयाच नाही का...

अगं दी काही नाही झालं ..आता ठिक आहे ..बी.पी वाढल होते..जेव्हा तुझा़ फोन आला होता..मग चक्कर येऊन पडली..तीन चार दिवस झालं दररोज चेकअपला बोलवलं .

पिहुला ऐकुन टेंशनच आलं एक फोन मी केला एवढा त्रास झाला़ आणि मी कायमची इकडे आले डिवोर्स देऊन तेव्हा दोघं काय रियॅक्ट करतील....

पिहु उठलीस रेवती आत येत बोलते.

पिहु पटकन जाऊन रडतच मिठी मारते..मम्मी तु सांगितलं का नाही..

रेवती डोक्यावरुन हात फिरवत... काही नाही झालं त्या प्रांजु ला आणि तुझ्या पप्पांना काही काम नाही.‌..पिहु ...रडू नको मी ठिक आहे,अहो तुम्हीच सांगा..

भिमराव पिहुला जवळ घेऊन बसतात..चिऊ तूझी मम्मी आता म्हतारी झाली मग त्रास होणारच नीट ‌खायच प्यायच नाही आणि दावाखाना लागुन घ्यायचा मागे, ते पिहुला हसु यायव म्हणुन बोलले.

काय म्हणाला मी म्हातारी तुम्हच वय‌ होत चाललं रेवती चिडुनच बोलते.

पिहु डोळे‌ पुसुन हसु लागली.
.
दि आता टीव्ही लावला नाही तरी चालेल एंटरटेनमेन्ट दोन दिवस तरी संपणार नाही ..प्राजंल हसत बोलु लागली.

प्रांजु दुध सगळ उतु गेलं रेवती किचनमध्ये जाताच ओरडुन बोलली.

पिहु प्रांजु एकमेंकीनकडे बघतात..दि ते आता मी सटकते...अस म्हणुन प्रांजल पळुन गेली..

पिहु हसतच किचनमध्ये आली..मम्मी तु जा आराम कर मी करते सगळ ...

काही नको मी आता बरी आहे..किचन चा आवतार ,कसा केला बघ सकाळपासून तुझ्या पप्पांनी आणि प्रांजुने...काही येत नाही,आधी तु होती तर बघत होती...आणि प्रांजु तर किचन मध्ये येतच नाही..आली तर दहा काम वाढवुन ठेवते..

पिहु रेवतीचा हात पकडुन -मम्मी तु इथे बस ,मी सगळ करते..आणि प्रांजुला सवय नाही...नसते एकद्याला सवय...उगाच मागे लागु नको तिच्या तिला करायच असेल तर‌ करेल नाही तर राहू देत...

रेवती चेअर वर हसुन बसतात.

पिहु आवरत असते,रेवती पिहुला निरक्षण करत बोलतात.पिहू मोबाईल कुठे आहे .आणि विराटचा फोन सुध्दा आला नाही...

पिहु दचकतेच,ते..ते..मम्मी येताना मोबाईल बंद‌ पडला ..

विराट ने फोन नाही केला..‌घरच्या नंबर नाही तर पप्पांना माझ्या करायचा,तु सुध्दा केला नाही..

अगं मम्मी ते...दिल्लीला गेलेत कामात असतील.आणि मी केला रेंज चा प्रोब्लेम होतोय .पिहु नजर चोरुन बोलू लागली..

हा पण एवढ कसलं काम चार दिवस झाले..आली..तु..

मी करेन काम झालं कि,मम्मी किती डोक खातेस , तू आराम कर मी स्वंयपाक झाला कि तुला बोलवते...पिहु ओरडतच रुममध्ये पाठवते.रेवती हसत रुममध्ये जातात..

अहो

हहह. बँकेत जाण्यासाठी भिमराव आवरत असतात...

संध्याकाळी येताना पिहुसाठी मोबाईल घेऊन या ,खराब झाला आहे तशीच बसली चार दिवस झाले विराटने पण फोन केला नाही...तिच्याकडे मोबाईल असला कि त्याला पण नीट बोलता येईल ..

हो आणतो.माझ्या एवढ लक्षातच आलं नाही ...

.
.
.

ऊन चेहरयावर आल्यावर विराटला जाग येते...तो सोफ्यावरच बसल्या जागी झोपला होता..तो नीट बसत हातातल्या वॉच कडे बघतो.अकरा वाजले होते. तो बाथ घेऊन आला. त्याची नजर पिहुच्या वॉडरोबवर‌ गेली.त्याने वॉडरोब उघडले.सगळ्या साड्या ,ड्रेसेस तिने नीट रचुन ठेवले होते.त्याने तिच्या साड्यावरुन हात फिरवला..आणि तो कबोर्डचा किस्सा आठवुन स्वतःशीच हसला.
(पिहु तिची सॅक उघडुन सगळे बुक्स चेक करत होती.विराट रुममध्ये येत तिच्यावर नजर टाकतो..,तिने सगळे बुक्स टेबलावर‌ पसरुन काय तरी शोधत होती.‌

.तो जवळ गेला पिहु ,..

.अंह...ती खाली बघुन बोलली..

काय हरवलं आहे का ,

हो ,माझे एक बुक सापडत नाही..किती वेळच शोधत आहे...

त्यासाठी सगळ नीट ठेवायच असते मग हरवत नाही,तो लॅपटॉप‌ उघडत बोलु लागला..

तिने एक नजर रागाने टाकत त्याच्या रॅककडे वळली....

पिहु तिकडे काही नाही आणि हात लावु नकोस तु सगळ हलवुन इकडे तिकडे करशील..

अहो एकदा चेक करते ना,ती चिडत बोलली‌.

चेक ,मी काय करु तुझ बुक घेऊन...मला माहीत आहे तिथे काही नस़णार...

अहो म्हत्तावाच बुक आहे, एकदा नीटं चेक करते वाटलस तर तुम्ही

.
नो,समोरच बघूनच कळलं कस चेक करते...तु त्या रॅकला हातच लावायचा नाही.

ती चिडुन परत दुसरीकडे चेक करु लागली..

त्याने तिच्या वर नजर टाकली,तो उठुन रॅककडे गेला,आणि उघडून बघु लाग‌ला...पिहु बघ,

पिहु हसतच गेली‌‌...ती त्याला सरकुन बघु लागली..

पिहु हळु ,आणि सग्ळ‌‌या फाईल्स मध्ये अंतर आहे,इथुनच दिसत हे काही नाही ‌ये,

पिहु पण नजर फिरवते....ती बारीक चेहरा करत हहह.आता कुठे असणार,

एक मिनीट,तो विचार करत दोन दिवसा पुर्वी तु फोन वर बोलताना हातात बुक होते,आणि तु आत जाऊन आली पण बुक नव्हते हातात म्हणजे चेंजिग रुममध्ये तो बोलता बोलता आत गेला..

पिहु हसत किती बारीक लक्ष आहे...पण तिच्या काहीतरी लक्षात येताच,ती पळतच गेली..

तो तिच वॉर्डरोब उघडणार कि त्याला धक्का देऊन कबोर्ड ला टेकुन उभी राहते...

तो तिला लुक देत, ही कुठली पध्दत ,

अ..अ..ते.मी बघते...

हो आपण दोघे बघु ना तो कबोर्ड उघडणार ती हात पकडते,मी शोधते ..तुम्ही काम करा तुमच् ती वरवर हसत बोलते..

पिहु मी हेल्प करतोय...पण तु अशी का करते...काय झालं काय आहे,वॉर्डरोब मध्ये,

ते...ती विचारात पडते..

तो तिच लक्ष नाही हे बघुन पटकन वॉर्डरोब उघडतो..

पिहु घाबरुन डोळ्यांवरच हात ठेवते...

त्याच्या अंगावर सगळ्या कपड्यांचा ढीगच पडतो,ओ..😠माय माय....तो तिच्या कडे बघतो..पिहु हे काय आहे..अस ठेवतात का,

पिहु घाबरत हसत त्याच्या सोमरचे कपडे‌ घेत ते दोन दिवस वेळ भेटला नाही मला😅😅म्हणुन..

.ओहह... दोन दिवस तुला ना थोडी पण शिस्त नाहीये ..स्वतःच सामान कस ठेवावे कळतच नाही मग शोधत बसायच इकडेतिकडे ..काय वॉर्डरोबची हालत केली...माझ बघ तो त्याच उघडुन दाखवतो,

पिहु तोंड वाकड करते मला बोर होते असलं काय‌ करायला विकमधुन एकदाच करते मी ,

तो कपाळाला हात मारतो...तुझ बुक ह्यातच सापडणार ,.
पिहु श‍ोधते तर तिथेच होते..हे बघा..

तो हाताची घडी घालुन बारीक डोळे करतो. ते सगळ आत्ता नीट ठेवायच तो तिच्या हातातुन बुक ओढुन घेतो,मगच मिळणार आहे....

अहो...अत्ता .

(तो बाहेर जाता जाता )हो आत्ताच ...

पिहु वॉर्डरोब कडे नजर वळवते ...आणि कपड्याकडे ..काय माणूस आहे मीच घालणार आहे कस ही ठेवु...ती परत जे कपडे पडले होते..ते कोंबुन ठेवुन रागानेच दार बंद करते..बाहेर येऊन बेडवर ब्लँकेट ओडुन झोपते..

विराट स्टडी मधुन नजर टाकतो..पिहु झालं इतक्या लवकर...

नाही करणार मी तुम्हाला करायच असेलं तर करा,पिहु ब्लँकेट तोंडावर ठेवुनच बोलते.आणि तुम्हाला पटत नसेल तर,मी गेस्ट रुममध्ये राहते..

तो ते ऐकुन उठुनच तिच्याजवळ येत रागाने ब्लँकेट ओढतो,वॉट डीड यु से,

पिहु दचकतेच ती उठुनच बसते,...

आता बोल काय म्हणाली,

त्याचा आवाज बघुन तिला काहीच सूचेना,ते..तूम्ही सारख हे करू नको ते करू इथे हात लावु नको म्हणता हो माहीत आहे तुमची रुम आहे...

तो तिला थांबवत तेच बोललं अजुन हे तोंडात कस आलं नाही.माझ तुझ बोलायचच असते,फक्त स्वतःच्या वस्तु नीट‌ ठेव बोलले कि राग येतो......गेट अप...

अ...तिला कळलच नाही..

आय सेड गेट अप..

ती घाबरतच उठते.

.
जा कुठे जाऊन राहायच आहे तिथे राह ..जे बोलते ना ते पण करायच असते..

मी ..ते...ते.

हो काय म्हणालीस होती..गेस्ट रुममध्ये राहते.ना गो...गेट आऊट तो जोरातच ओरडुन बोलतो.

तिचे डोळेच भरून येतात..ती रागानेच रुमच्या बाहेर निघून जाते..

त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते.दात ओठ ‌खातच तो मूठ आवळु लागला..त्याला वाटलं आता तरी हक्क दा‌खवुन माझी रुम आहे अशी वागेल पण नाही....गेली लगेच

पिहु डोळे पुसतच पोर्चमध्ये जाऊन बसते..काय समजता काय‌ माहीत...

विराट परत स्टडीमध्ये जाऊन लॅपटॉप घेऊन बसतो...त्याची नजर दाराकडेच जात होती आता येईन मग येईन‌....त्यालाही कळतं आपण खुपच रुडली बोललो...आता तिला सवय नाही तर सारख का़ मागे लागायच‌‌‌‌.थोड्यावेळाने तो त्याच काम करुन उठुन बाहेर येतो.त्याला ती पोर्च मध्ये दिसते.स्वतःहुन ‌‌येणार नाही.कोणापुढे झुकलो नाही पिहु तु बरोबर ‌मला झुकायला लावते...तो दात ओठ खातच स्वतःशीच बोलतो...तो तिच्या शेजारी येऊन उभा राहतो..पाऊस ही चालुचंअसतो. गार वारा पण सुटला होता... गार लागत असल्याने पिहु पाय दुमडुन हात फोल्ड‌ करुन विचार करत बसली होती...

पिहु ,चल आत गार वारा सुटला आहे..तो बाहेर बघतच बोलतो..

आधी हकलुन द्यायच नंतर चल बोला‌‌यच पिहु चिडूनच बोलली .

तो स्वतःवर कंट्रोल ठेवते..तो हसून तिच्याकडे बघतो...पिहु कोण चालु केलं होतं...

.ती एक नजर बघत...ते तुम्ही सारख बोलता मला,आवडत नाही.ती बारीक चेहरा करत बोलते...

हो का ...तिकडे कोणी बोलत‌ नाही का,मम्मी‌ पप्पा हहह.

ती आठवतं.तिची मम्मी त‌‌र पाच पाच मिनिटाला ओरडत होती..हे अस का ते नीट ठेव...ती तततपपपप करत...हा...नाही...कोण
बोलत‌ नव्हते...ती एका दमात बोलुन मोकळी झाली.

हम्म ,परत‌ नाही बोलणार‌ ...सॉरी,ते तुझ्या वस्तु सापडत नसल्या कि तु पॉनिक होते..म्हणुन तुला बोललो.‌नीट ठेवत जा..बाकी ...,ती रूम तुझीच आहे...कशीही ठेव आधी सवय होती..मला पण तुझ्यामुळे मला पण आता सवय झाली रूम‌ अशी बघा याची...

ती नजर रो‌खुन बघते...तुम्ही मला टोमाणा मारतायेत...

तो हसु दाबत नाही..छे मी तुला कधी टोमाणा मारेल का ...चल किती गार आहे उठ ‌...अस म्हणुन विराट पुढे जातो

ती हसत खाली पाय ठेवतच होती..तर खाली पाल बघुन चेअर वरच उभी राहत किंचाळते...आआआ...

विराट दचकुन मागे बघतो...काय झालं..

ते...ते...(ती बोट खाली करुन )पा...ल..‌आहे.

विराट बघतो...(हसत) ती मगास पासुन ति‌थेच फिरत आहे...

का..काय...मला नाही दिसली...

आता दिसली ना,चल तो जवळ येत हात करत बोलतो...

नाही....उतरु कशी तिला हकला..

काय ,तु पालीला घाबरते...अगं ते भुत तर त्याच्यापेक्षा डेंजर असतात..त्याला नाही घाबरत..हहह...

ते..सगळ खोट असते.आणि हे रियल आहे

विराट कपाळालाच हात मारत..तो तिच्या गुडघ्यांना हाताचा विळखा घालत उचलतो...

पिहु दोन मिनीट ब्लँकच होते...ती त्याच्या ‌खांद्याला पकडते..अ...हो...सोडा मी चालते..

विराट गालात हसत तिच्या चेहरयाकडे बघत होता..दोघांचा चेहरयात थोडसच अतंर होते...दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते..विराट ची नजर तिच्या गुलाबी ओठांवर गेली..‌ दोघांच्या ओठामध्ये अंतर‌ कमीच होते..पिहुला जाणवतच तिचे ओठ थरथर कापायला लागले..
तिचा कावराबावरा चेहरा झाला होता..

अ...हो...मी

शु ssss...तो स्टेप चढत बोलतो..

ती शांत होत नजर दुसरी कडे फिरवते...विराट ची नजर हटतच नव्हती..

रुममध्ये आल्यावर त्याने तिला खाली सोडलं.ती जाणार‌ कि विराट हात ओढुन तिला जवळ ओढत मागुन मिठीत घेतल दार लॉक केलं.
पिहु घाबरतच हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती...

पिहु...तो कानाजवळ हळुच बोलला.‌‌

त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगाला गोड शहारा येत होता...
त्याने तिचे केस मागे घेत.. .खाद्यावर‌ हनवुटी ठेकवुन दोन्ही हात पुढे पोटावर ठेवले..
..

पिहुला काहीच सुचेना...तिने घट्ट डोळे झाकले..विराट पिहल्यांदा इतक्या जवळ आला‌ होता..त्याच्या उबदार स्पर्शाने पिहुचे हात त्याच्या हातावर‌ गेले...

पिहु,डोन्ट से अगेन ...ही रुम तुझी आहे,

हहह..ते ..मी तुम्हाला घाबरवण्यासाठी म्हणले.ती हळुच बोलली...

परत बोलू नकोस,मला फक्त तु जवळ हवी...अस म्हणत त्याने तिच्या गालाला गाल घासला..

अहहह..ती डोळे उघडुन गालाला हात लावत‌ त्याच्या कडे बघु लागली...

तो गालात हसत काय झालं..

टोचली ना,...ती कपाळ्यावर आठ्या पाडत त्याला कोपरयाने धक्का दिला .

तो ही हसत मागे सरकला...जोरात टोचली का ...बघु तो तिच्या गालाला हात लावणार कि ती‌ लाजुन मागे सरकतच बेडवर जाऊन झोपली...विराट ही तिच्या जवळ जाऊन झोपला )

व‌िराट आवरुन ख‌ाली आला,...

सुमन ची नजर पडताच ती जवळ आली...वि‌‌राट तु कधी
आला...,

काल रात्री,तो डायनिंग टेबलावर बसत बोलतो.

त्याचा चेहरा उतरलेला दिसत होता...रोहिणी समोर असल्याने सुमनने त्याच्या शी बोलण टाळलं आणि गीताला हाक मारली.

गीता नाश्ता आण ,विराटचा...विराट रुममध्ये ये,ऐवढं बोलुन सुमन रुममध्ये गेल्या...

विराट ने एक नजर मॉमवर टाकली...आणि ब्रेकफास्ट करुन सुमनच्या रुममध्ये गेला...

मॉम ,...

सुमन ने दार लावुन घेतले...त्या रागानेच विराट कडे बघत होत्या..विराट हे काय आहे...(त्या डिवोर्स पेपर समोर धरत बोलु लागल्या.)

त्याने ते हातातुन घेतल्या..आणि फाडुन टाकल्या....सॉरी मॉम मी हे आधी करायला हवे होते...पण

पण वेळ हातातुन गेली विराट ..तु अस काही करु शकतो मला वाटलं ही नव्हतं बोलताना त्यांचे डोळे भरुन आले..त्या चेअर वर बसत- अरे रेवतीने किती विश्वसाने तिच्या मुलीचा हात दिला होता...त्यांना कळाले तर किती वाईट वाटेल ...मला ना स्वतःचाच राग येतो...मी एका मूलीच्या आयूष्याशी खेळली...काय काय स्वप्न बघुन आली असेल आणि तु आल्या आल्या तिला अस ..

विराट गिल्टी होत- सुमनच्या समोर गुघड्यांवर बसला..‌मॉम चुकलो मी मान्य आहे...तेव्हा माझ्या डोक्यात फक्त राग होता...आणि मी सहा महिन्याने पिहुला डिवोर्स देऊन त्रिशा बरोबर..

सूमन शॉक होत त्याच्याकडे बघतात..तो बोलायच थांबतो..

विराट तु असा विचार करत होता...त्या तोंडालाच हात लावतात..

मॉम ते आधी मी तसा विचार केला होता..पण जेव्हा पासुन पिहुच्या प्रेमात पडलो मी सगळ डोक्यातुन काढुन टाकलं...

हो काढणारच आता तसही तुला जे हवं होत ते मिळालं आहे...सूमन रागातच बोलतात.

मॉम तुला ही वाटतं मी पिहुला मी फक्त तुझ्यासाठीच अॅक्सपेट केलं.....पिहुच एक समजू शकतो,ती अजुन ट्रस्ट करत नाही पण तू तर करते ना...लुक अॅट माय आईज मॉम,तो सुमनचा चेहरा स्वतःकडे फिरवत बोलतो...

सुमन चे डोळे भरुन येतच असतात.....

मॉम ,पिहुला त्रिशा आणि माझ्याबद्दल कळाले,

काय कस काय...

आय‌ डोन्ट नो,बट मला पुर्ण ‌खात्री आहे हे सगळ त्रिशाच काम आहे तिनेच काही तरी वेगळं सांगितले असणार,

म्हणून मी तूला आधीच सांग बोलले होते...

मॉम ,तिला आधी सांगितले असते तरी तिने माझ्यावर विश्वास ठेवला नसता, ...

हो रे पण आता...तिला कुठल्या तोंडाने ‌ये बोलु मी ...

ते माझ्यावर सोड...मी हॅन्डल करतो...पहिले मला त्रिशाला बघायच..खुप अती होतयं आता

विराट तु काही करणार नाहीये...तिच्याशी बोलायला सुध्दा जाऊ नकोस.

मॉम ,रिलॅक्स...

पिहुची आठवण येतेय‌ ना,सुमन रडत बोलतात.

विराट हलका हसला,मॉम मी ठिक आहे काळजी करु नको मी काय मजणु सारखा स्वतःला काही करणार नाहीये,आणि मला माहीत आहे ती फक्त माझीच आहे‌ गोल फिरुन माझ्याकडेच येणार आहे..

विराट तु प्रेमाने घेऊन येणार आहेस तिच्या इच्छे विरुध्द काही करणार नाही..ऑलरेडी ती खुप हर्ट झाली आहे.

मॉम,तु चांगलीच ओळखतेस मला विराट हसत बोलू लागला...

सुमन ही हसतात...तु सुधरणार नाहीयेस...

चल मी निघतो काम भरपुर आहे...आणि पिहुच माझ टेंशन घेऊ नको ...विराट निघुन जातो..

सुमन विचारातच पडतात.विराट एवढा रिलॅक्स होत बोलतो...तुझी आई आहे किती आतून काळीज तुझ तुटतेय ना,मला कळत‌ंय.

विराट गाडीत बसून डोळे झाकुन मोठा श्वास घेतो.. तो मोबाईल काढुन पिहुचा फोटो बघत किस करतो..पिहु थोडा वेळ वेट केला असता तर मला एक चान्स देऊ वाटला नाही तुला...इतके दिवस माझ्यासोबत राहीली पण,वाटल नाही मला एकदा बोलून तु निर्णय घ्यायचा होता ना,

तो ऑफिसमध्ये येतो. कामात लक्षच लागेना.सारखा पिहुचा चेहरा समोर येत होता...तो मोबाईल घेऊन फोन लावतो.पण तिचा स्विच ऑफ होता...त्याने घरच्या लॅनलाईनवर लावला..

रेवतीने फोन उचलला‌‌.हॅलो,

व‌िराटला का‌य बोलाव पहिले कळतच नाही...हॅलो आई,मी विराट..

हा..बोल रेवती हसत बोलतात...

कसे आहात सगळे .

हो आम्ही सगळे ठिक आहेत ...तु आलास का दिल्ली वरुन ..

हो कालच आलो,ते ..ते पिहुला

.हो हो देते हा,तिचा मोबाईल बंद पडला ना,एक मिनीट हहह.

हम्म,

पिहु इकडे ये ....

पिहु व‌रुनच काय म्हणते...तिचा आवाज ऐकून विराटला बरे वाटते...

पिहु खाली,ये काय‌ करतेस,रेवती चिडुनच‌ बोलते..

आले काय झालं ...पिहु पण चिडुनच बोलते...

विराट चा फोन आहे...

अअ..हे ऐकुन पिहु दचकतेच...

अग धर,रेवती हातात फोन देतात...पिहु वरवर हसत फोन कानाला लावते,

पिहु...

पिहु त्याच्या आवाज ऐकून स्तब्धच होती...

विराट परत बोलतो,पिहु....तु ऐकतेय ना ,

रेवती तिला इशारा करत बोल म्हणतात..आणि निघुन जतात.

पिहु मम्मी गे‌ल्यावर..तुम्ही फोन का केला ती तुटतकच बोलते.

त्याला वाईट वाटते...पण तो स्वतःला सावरतो,हाऊ आर यू...

जिंवत आहे काळजी करु नका...तुम्ही सोडलं तर मरणार नाही...

पिहु काय बोलतेस. हि कुठली पध्दत बोलायची तो ओरडुनच बोलतो...

मग काय बोलु काय राहीलं आहे का बोलायला...

आता माझ ऐक ,

काय ...कुठल्या नात्याने तुमचा आणि माझा काहीही संबंध नाहीये...मी डिवोर्स पेपर आईंना दिले आहेत बघा...

हो , मी ते फाडुन टाकले...आता ही तु माझी वाईफच आहे विराट बोलतो...

का बाहेर एक घरात एक हवी का तुम्हाला.. काय उच्च विचार आहेत...

पिहु...तो जोरताच ओरडतो‌‌..तोंड संभाळून बोल माझ्या कॅरेक्टर बद्दल बोलतेस तु...

हो बरोबर बोलते मी आणि परत मला फोन करून त्रास देऊ नका..अस् म्हणून पिहु रागाने फोन ठेवून देते..तिचे रागाने डोळे भरून येतात...

तो रागाने समोरच्या चेअर ला लाथ मारतो...ती चेअर जोरातच पडते...आवज ऐकुन मानव आत येतो..विराट कायं झालं...तो चाचरतच विचारतो...

मानव माझ्या आजच्या सगळ्या मिटींग कॅन्सल कर..
हो पण काय झालं एवढा का चिडला,तो चेअर नीट ठेवत बोलतो.

मानव म‌ला एकट्याला सोड‌...जा तो विंडोच्या बाहेरच बघत बोलतो..मानव ही निघून जातो.पिहुच बोलण त्याच्या मनालाच लागलं होते.रागाने डोळे आग ओकत होते...

करता नहीं क्यूँ तू मुझपे यकीं
क्यूँ मेरे दिल की तू सुनता नहीं

हम्म.. तेरे बगैर कितना तन्हा सा हूँ
आलम ये दिल का तू समझे कभी

है पता ये तुझे
ना जी सकूँगा बिन तेरे
फिर भी क्यूँ मुझसे जुदा

तू.. तू ही है
तू ही तो है मेरा जूनून

तू ही है
तू ही तो है दिल का सुकून
तू है जिसके बिना
मैं जि ना सकूँ

आ फिर जियें शामें वही
चल फिर वही हम बातें करें
बैचेनियों के फिर शिलशिले हों
फिर दिल मेरा ये आहें भरे

ज्यादा नहीं तो थोड़ी सही
दे दे मुझे वो ही ज़िन्दगी
आ मेरे नजदीक तू
ये फासले मुझको घेरे
है पता ये तुझे
ना जि सकूँगा बिन तेरे
फिर भी यूँ मुझसे जुदा..

तू.. तू ही है
तू ही तो है मेरा जूनून
तू ही है
तू ही तो है दिल का सुकून
तू है जिसके बिना जि ना सकूँ
(कुबूल निगाहों की
ना हो वो दुआ
जिसमें यार के
दीदार की तलब ना हो
मेरी तो हर दुआ में
तू ही है, तू ही है)

है ये पता जाना ही है
राहों से तेरी दूर मुझे
मुमकिन नहीं है मेरे लिए
पर भूलना ही होगा तुझे
इश्क के आगे है दो जहान
ऐ दिल ले चल मुझको वहां

फिर भी क्यूँ दिल कहता..

तू.. तू ही है
तू ही तो है मेरा जूनुन

त्याने त्रिशाला फोन केला...

विराटचा कॉल बघून त्रिशा उड्याच मारू लागली...तिने पटकन कॉल रिसीव केला...हॅलो विराट

तो स्वतःला नॉर्मल करतो...हाय,त्रिशा...

हा बोल ना विराट आज आठवण कस काय माझी...

मला तुझ्याशी बोलायच आहे...

माझ्याशी त्रिशा खुशच होती...हो हो..बोल ना..

भेटून बोलु..

हो हो नक्की घरी ये कोणीही नाहीये...मॉम डॅड बाहेर गेलेत आणि ब्रो आज उशिरा येणार आहे...

हम्म ...तो फोन ठेवुन टाकतो.तो विचारातच पडतो पिहुला अस काय सांगितलं त्रिशाने.

सात च्या आसपास विराट त्रिशाच्या घरी जातो...बेल वाजल्याने
त्रिशा पटकन दार उघडते.,..विराट तिच्यावर नजर न टाकताच आत येतो...

त्रिशा हसतच दार लावते..

तो एक नजर घराकडे फिरवतो...त्रिशा त्याच्या जवळ येऊन बसते...हा बोल काय बोलायच आहे..

तो तिच्या कडे बघुन हसतो,लग्नाची मागणी घालायला आलोय..अस तुला ऐकयाच असेल‌ तर हे तू आयुष्यभर ऐकु शकणार नाही.

त्रिशा आवाज चढवतच बोलते...विराट पिहुला तु डिवोर्स दिला आहे...मला माहित आहे.आणि तुला हे प्रोजेक्ट जर चालु ठेवायच असेल ना,तुला माझ्याशी लग्न करावाच लागेल..

विराट हसतो...

विराट मला माहित आहे हे तुझ ड्रीम प्रोजेक्ट आहे.तु कधीच अस होऊ देणार नाही.म्हणुन तर‌ ब्रो ने तूझ्याशी पार्टनरशीप‌ केली आहे.त्याने नकार दिला तर हे प्रोजेक्ट तो कधीही थांबु शकतो..

तुझ डोक कुठेपर्यंत चालत हे मला माहित आहे. अश्या पोकळ धमक्या देऊन काही फायदा नाही..‌..मी हे बोलायला आलो नाही...

त्रिशा त्याच्याकडे रागाने बघते...

तु पिहुला काय म्हणालीस,तो नजर रोखूनच बघत बोलतो.

मी काही च बोलले नाही ,विचार हवं तर ...

हम्म ,(विराट उठतो)ओके...आता नीट ऐक माझ पिहुवर प्रेम आहे. ती माझी लाईफ आहे...तुझ्यामुळे तिला काही त्रास झाला तर मी विसरुन जाईल आधी आपण एक चांगले फ्रेंड होतो...

त्रिशा रागाने त्याच्या कॉलर पकडत त्याच्या डोळ्यांत बघते....विराट तु चार पाच महिने तिला ओळखतो ..आणि मी दोन व‌र्ष मागे लागले माझ प्रेम‌ तुला दिसलं नाही..काय आहे तिच्यात ते‌ माझ्यात‌ नाही..तिने चार महिने काय दिलं एवढ हहह..ती तुझ्या जवळ जरी आली ना मी तिला सोडणार नाही.

विराटने रागाने समोरचा ग्लासातलं पाणी तिच्या तोंडावर फेकलं
ती पटकन त्याची कॉलर‌ सोडत तोंडावरच पाणी पूसत त्याच्याकडे बघते...

मी तुझी प्रोपर्टी नाही एवढा तु हक्क दाखवायला . पिहुला तर आपल्या दोघांमध्ये आणायचच नाही.ह्या पुढे पिहुच्या आसपास जरी भटकली आणिं तिच्याशी बोलायचा सुध्दा प्रयत्न केला तर बघ ...आणि जरा शांत डोक्यानें विचार कर हे असे गेम्स खेळुन पिहुला काहीतरी चुकीच सांगून मी तुझा होणार नाहीये...मला जास्त बोलायला लावु नको त्रिशा तुझ्या आईवडिलांचा तर विचार कर...नाव आहे तुमच ...हट्ट वस्तुंसाठी करायचा असतो...आणि हे माझं लास्ट समजवण आहे.‌ह्या पुढे तु माझ्या आणि पिहुच्या लाईफ इंटरफेयर केला ..तर पुढच मी काय करेन मलाच माहीत नाही..अस बोलुन विराट रागानेच दार उघडतो आणि वारयाच्या गतीने निघुन जातो.

त्रिशाचे डोळे वाहू लागले.विराट..ssssती जोरातच ओरडते...

विराट घरी येतो...त्रिशाने तर डोक उठवुन ठेवलं आहे..तो स्वतःशीच बडबड करत होता. आणि पिहुला माणसं का कळत नाही...इतकी फुल असेल वाटल नव्हत....विराट पिहुला फोन लावतो...आता रींगं जात होती...तो खुश झाला‌...

पिहु हॉल मध्ये‌ गप्पा मारत होती...तिचा मोबाईल वाजल्याने तिच लक्ष गेलं विराट च नाव ‌येत होते...तिने बघुन रागानेच कट केला.त्याने परत‌ लावला...तिचा फोन परत वाजला.मम्मी पप्पा तिच्याकडे बघु लागले...ती हसत परत कॉल कट कंपनीचा आहे...

विराटच्या लक्षात येते अजुन पिहुने घरी कहीच सांगित लं नाही....
.
.
.

सकाळी नऊ वाजले तरी विराट खाली कस काय आला नाही म्हणुन सुमन रुममध्ये येतात.‌.विराट ला हाक मारतात.तो रुममध्ये पण नाही गे ला कुठे ..मनी विराट दिसला का,

सकाळीच,गाडी घेऊन गेलेत..

हम्म,सुमन विराटला कॉल करतात...

हॅलो मॉम,

कुठे आहेस सकाळपासुन दिस लाच नाही नाश्ता न करताच गे ला आज...

मी पुण्याला आलोय..

काय,सुमन शॉक होताच,विराट तु अस काही करणार नाही ये...परत घरी ये काय म्हणतील चार पाच दिवस. त‌‌र झाले येऊन आणि तु..

मॉम मी तिला घ्यायला नाही चाललो फक्त बोलायच आहे ती कॉल रिसीव करत नाही..

विराट तु ऐकत का नाहीस..थोडा वेळ तर दे ना तिला...

मॉम कालचा एक दिवस कसा काढला मला माहित आहे...ह्यासाठीच मी नजर‌ चुकवुन आलो...तू ला कळालं असते तर तु जाऊ दिले नसते.

विराट ऐकत जा तू परत घरी ये,,,...तो पर्यंत विराट ने फोन कट केला.१० वाजेपर्यंत तो पुण्यात आला ..पहिले तो हॉटेल मध्ये गेला...तिथेच त्याला १२ वाजले .

भिमराव बॅंकेत प्रांजल कॉलेज ,घरात पाहू आणि रेवती होती...

मम्मी तू कुठे निघाली, रेवतीला आवरलेले बघून पिहू विचारते ,

मी मावशी कडे जाऊन येते सोनूला पाहुणे येणार आहेत बघायला येते का तू....

नको जा ..नंतर कधी तरी येईन सांग

अगं चल ना,आल्यापासून कुठेच गेली नाही ...घरातच आहेस ...

मम्मी तू होऊन ये आणि सोनूला घेऊन ये येताना किती दिवस झाले भेटले नाही...

ठीक ये बघू येत असेल तर घेउन येते ..मी येते दोन तीन तासात ...दार नीट लावून घे ...रेवती जाता जाता तिला सूचना देऊन जातात ...

हो..हो...गं ...लवकर ये..

हम्म..रेवती निघून जातात ...पिहू जेवण करून टीव्ही लावू बसली ...जवळपास १ च्या दरम्यान बेल वाजली ..

पिहु विचार करतच उठली आता कोण आले ...

तिने दार उघडले ...समोर विराट😲 ती शॉक होतच त्याला बघत राहली...

विराटला तिला बघून चेहऱयावर मोठी स्माईल आली.त्याने तिच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवत भानावर आणलं ...

पिहू भानावर येत ...तुम्ही काय करतायेत इथे ती कपाळावर आठया पाडून चिडूनच बोलली.

तुला बघयाला आलो...तो गालात हसत तिचे गाल ओढतो....

ती रागाने बघत दार लावणार कि तो हाताने दार पकडतो...पिहु,हे तुझ जस घर आहे ना,माझ हीं आहे सरक आत येऊ दे..तो तिचा हात पकडुन आत येतो..आणि दार लावतो..

हे...हे...बघा...हहह घरात कुणी नाहीये...पिहु थोडी दचकतच बोलते...

त्याच्या मनात लड्डुच फुटत होते...आता नीट तरी बोलता येईल...घाबरते काय नसले तरी काय झालं मी तुझा बॉयफ्रेंड नाहीये,हसबंड आहे...

ती हात झटकुन सोफ्यावर जाऊन बसते...तो ही ब्लेझर काढुन टाय लुझ करतो...आणि तिच्या शेजारी बसतो,

ती उठुन दुसरया चेअर वर जाऊन बसते..

पिहु पाणी वैगै‌ेर काही विचारायची पध्दत आहे कि नाही..

मी काय नोकर नाही तुमची ,आणि तुम्ही जबरदस्ती घुसुन आला आहे आत...ती मोबाईल बघतच बोलली.

नोकर नाही पण वाईफ आहेस ना,तो उठुन तिच्या चेअरच्या शेज‌ारी बसत हसत बोलला..

हे बघा विराट देशमुख. बस झालं प्लिज निघा आता ती हात जोडुनच बोलते...

अग हात‌ काय जोडते..तो तिचे हात हातात घेत बोलतो...मी जातो,पण मला भुक लागली आहे ..सकाळी ट्रव्हल करुन पहिले काम संपवलं मग तसाच इकडे आलोय...फक्त ज्युस घेतला आहे मी..तो उगाच नाटकी चेहरा करत बोलतो.

ती हात काढत लांब रहा हा‌‌...सारख. हात लावायची गरज नाहीये...ती किचन मध्ये जाते..

विराट हसत तिच्यामागे जातो....ती जेवण गरम करत होती..आर्धी नजर त्याच्याकडेच होती...तो कधी काय करेल सांगता येत नव्हतं😂

विराट गालात हसत पॉकेट हात घालत एक एक पाऊल टाकत तिच्या जवळ येत होता...तस तिच हृद्य श़‌ंभरच्या स्पीडने धडधडु लागलं.विराट तिला निहाळत होता...तिने लुझ क्राॅप टॉप लाईट ऑरेंज कलरचा घातला होता...खाली ब्लॅक प्लाझो घातला होता...मेकअपचा लवेश ही नाही ,केस क्लचरने वर फोल्ड केले होते...आर्ध खाली आले होते.एका हाताने केसांचा बटा मागे सारत होती.ती सारखीच टॉप शोल्डर वरुन वर घे कुठे खाली ओढ..असच काहीतरी चाललं होते..विराट हसत तिच्या जवळ आला...ती थोडी बाजुला सरकत त्याला ताट वाढु लागली.

विराटला तिला जवळ घेण्यासाठी हात पुढे घेतो...तर ती दुसरीकडे जाते.. चुकून बरणीला त्याचा हात लागला,आणि खाली पडली
oopss..सॉरी तो क्यूट फेस करत म्हाणला..

पिहुने रागाने बघितलं...तुम्ही डायनिंग टेबलावर बसा..

हो हो जातो...जस्ट चील..तो बाहेर जाऊन बसला.
तिने त्याच ताट आणलं ...

त्याने तिला बघुन गोड स्माईल दिली तिने त्याला इग्नोर केलं आणि वर निघून गेली...

त्याच जेवण झ‌ालं तरी ती अजुन खाली आली नाही...शेवटी हाच वर आला....ती शांत ‌खिडकीच्या बाहेर बघत उभी राहीली होती...डोळ्यातुन पाण्याचे थेंब गालावर पडतच होते...तिला चाहुल लागली तिनेच लगेच डोळे पुसुन वळली,...तुमच जेवण झालं ना जावा आता ...

पिहु आपण शांतीने बोलु ना,...तुझा काहीतरी गैरसमज होतोय..फोन वर बोलण समोरासमोर बोलण्यात ‌खुप अंतर असते...

हे बघा तुमचा आणि माझा आता काही ‌ एक संबंध नाहीये आणि मला काही समजुन घ्यायच नाही....सहा महिन्यासाठी रहायला जागा दिली खुप खुप‌ आभारी आहे मी...

पिहु तु काय बोलतेस..तुला माझ एकदा तरी ऐकुन घ्यायव लागेल.तो चिडतच बोलतो.

काय ऐकायच ..तुमची आणि त्रिशाची ट्रीप कशी झाली हे सांगणार आहात का,...

वॉट ,ती कधी आली माझ्याबरोबर,

तुम्ही तर सहा मिहन्यानी तिच्या बरोबर लग्न सुध्दा करणार आहात...हे सगळ ठरलं असून का आलात इथे ...

(त्याला ही आता पिहुचा राग येत होता...पण तो स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता..)पिहु बस आता शांत हो..हे बघ

मला तुमच काहीच ऐकायच नाहीये..जावा..ती रागातच ओरडुन बोलु लागली...

पिहु ..मला बोलु तरी दे तो दात ओठ दाबतच मुठ आवळतच बोलु लागला‌‌...

कळत नाही का ...तुम्हाला..
तो क्षणात तिच्या जवळ आला. तिच्या कमरेला एका हाताने पकडलं आणि एका़ हाताने मागून केसांना पकडत उचलून तिच्या ओठांवर ओठ ठेवले...दोन सेंकद पिहुला काही कळलंच नाही..जेव्हा त्याच्या ओठांचा चावा तिच्या ओठांना होऊ लागला...ती त्याला बाजुला करण्यासाठी दंडाला मारु लागली...पाय ही आपटतच होती...पण विराट काही हलता हलेना ‌त्याची पकड मजबुत असल्याने तिला ही तिचे ओठ वेगळे करता येत नव्हते..विराटचा सगळा राग तिच्या नाजुक ओठांवर निघत होता...काही क्षणांनी पिहुला ही त्याचा स्पर्शं‌ हवाहवासा वाटु लागला.ती ही शांत‌ होत त्याला साथ देऊ लागली..विराट ला जाणवताच त्याने त्याची पकड लुझ करत तिच्या केसांचा क्लच काढुन केस मोकळे सोडले..केसांमधुन त्याचे हात फिरु लागले...पिहु ही त्याच्या स्पर्शात विरघळू लागली...
त्याचा हात तिच्या शोल्डर आल्यावर पिहु ‌ने घट्ट त्याचा शर्ट पकडला...त्याच्या लक्षात येताच तो भानावर येत ..तो बाजुला होऊन .तिला मिठीत घेतलं ..दोघांचे श्वास गरम झाले होते...पिहु घाबरुन जोरजोरातच श्वास घेऊ लागली.तिने त्याला घट्ट पकडलं होत. तो ही तिच्या केसांनावरून हात फिरवत शांत करत होता...

पिहु...रीलॅक्स... तु शांत हो...

ती त्याच्या शर्टातच तिचा चेहरा लपवुन रडु होती...

पिहु इकडे बघ ना रडू नको..सॉरी,खरच मला कळलं नाही...त्याने एका हाताने तिचा दंडला पकडत थोड बाजुला केलं ..
पिहु अजुन हुंदके देतच रडू लागली... त्याने परत तिला आपल्या मिठीत घट्ट पकडले...तिचा टॉप शोल्डरव‌रुन ‌खाली आला होता.तो त्याने नीट वर घेतला..त्यालाच गिल्टी वाटत‌ होतं..

शांत हो ना ,...त्याने तिचा चेहरा ओंजळीत‌ घेतला.

पिहुची नजर खालीच होती...त्याने तिच्या ओठांवर नजर टाकली तर तिचे ओठ लालसर झाले होते...

पिहु,सॉरी इकडे बघ...चुकलो..मी पण तु काही ऐकूनच घेत नाही..

मला त्रिशाबरोबर लग्न करायच होतं ..अस म्हणाताच तिने नजर वर करत त्याच्या डोळ्यांत पाहिलं.

हो माझ आणि त्रिशाच लग्न ठरलं होत...फक्त एक बिझनेस डील म्हणुन त्या व्यतीरीक्त आमच्यात काहीच नाहीये...मॉमला हे मान्य नव्हते...आणि तिने हट्ट केला म्हणुन मी तुझ्याशी लग्न केलं लग्नानंतर मी सहा महिन्याने तुला डिवोर्स देऊन परत त्रिशाबरोबर लग्न करुन ती डील करणार होतो...

ही डील तुम्हाला मिळाली नसते..तर तुम्ही सोडणारच होता ना,मला...

नाही गं सोना... ऐकुन तरी घे.....ह्या दोन,महीन्यात तुझ आणि माझ नात बदलुन गेलं आहे‌...कस ते मला ही कळलं नाही...पिहु तुला खरच वाटतं मी आत्ता पर्यंत जे काही तुझ्यासोबत वागत आलोय‌ते
सगळं नाटक आहे ...

तिने नजर फिरवली,मला माहित नाही तुमच्या मनात काय आहे आणि काय नाही...

तु समजुन घेण्याचा प्रयत्न का करत नाही..त्रिशाचा आणि माझा काहीच संबंध नाहीये..तुला कधी दिसलं का,मी तिच्याशी बोलाताना,

माझ्या समोर नाही तर मागे बोलतच असणार...

हो पिहुु..तो तिच्या कोपरयाला पकडत जवळ ओढतो..वेडी आहेस का,मी काय सांगतो...तुझ एक वेगळच तो आवाज चढवतच़
बोलतो...
पिहु दचकुन डोळे घट्ट बंद करते..

पिहु माझ्या लाईफ मध्ये तुझ्या आधी कोणीही मूलगी नव्हती..तु पहिलीच मूलगी आहे ती माझ्या इतक्या जवळ आहे...आणि शेवटपर्यंत तुच राहणार...आय लव्ह यु पिहु...तो तिच्या कानातजवळ येऊन हळुच बोलतो..

पिहु डोळे उघडून ब्लँक होत त्याच्याकडे बघते..

तूझ्या व्यतीरिक्त मी कोणाला ही माझ्या हृदयात स्थान देणार नाही...तो तिला मिठीत घेतो...माहीत आहे तु अजुन ही हे सगळ खोट मानत असेल..पण माझ्या फिलींग ‌खरया आहे...आणि मला घाईसुध्दा नाही तु कधीही तुझ उत्तर दे...मी आयुष्यभर तुझी वाट बघेल..अस म्हणत तो तिचा चेहरा वर करत, कपाळावर किस करतो...
पिहु रागाने त्याला ढकलते आणि बाथरुममध्ये जाते...

तो दार वाजवतो...पिहु,...ओपन द डोर...

पिहु रडतच चिडुन बोलते...मला आत्ता काहीच कळत नाही..तूम्ही जावा...

ठिक मी जातोय,पण स्वतःला त्रास करुन घेऊ नकोस...एकदा बाहेर ये एकदाच,मी ‌‍खाली आहे...ये दार लावुन घे...

पिहु थोड्यावेळाने फ्रेश होऊन बाहेर येत खाली येते.....

तो तिच्या जवळ येत तिचा हात पकडुन सोफ्यावर बसवतो...आणि तिला पाणी देतो....

पिहु पण पाणी पिते.... तो ग्लास बाजुला ठेवुन तिच्या डोक्यावरुन हात फिरवत मी चाललो काळजी घे..

ती रागाने एक‌लुक देते...ती उठुन दार उघडते..आणि हातानेच इशारा करत जा म्हणते..

तो गालात हसत ब्लेझर हातात घेऊन दारपर्यंत जातो..परत वळून तिला पटकन हग करतो..सॉरी सॉरी सॉरी अस म्हणत तिच्या गालावर किस करतो...

विराट ‌‌sss....ती जोरात ढकलते...,😠

तो हसतच तिला हात करत बाय माय ऐंजल ..अन्ड आय लव्ह यु 😘😘😘😘तो फ्लँक किस देत म्हणतो..

पिहु जोरातच दार लावते...तिला त्याच बोलण ऐकुन पोटात बटरफ्लाय उडत होते...राग ही येत होता...मन ही चलबचल होता होते..तिला तिचच कळत नव्हते‌..विराटचा,स्पर्श तिला ही का आवडु लागला...

विराट आज एवढा खुश होता.. आज फायनली त्याने त्याच्या फिलींग पिहुला सांगितले..

रिमझिम पाऊस पडत होता...छान गार वारा त्याच्यासोबत आज पुर्ण निसर्ग त्याच्या बरोबर आंनद साजरा करत होत असल्याच भासत होते..त्याने एफ एम लावला..

(हे गाण रुपाली धुमाळ यांची रीकवेस्ट होती..जेव्हा विराट त्याच लव कनफेस करेन तेव्हा हे गाणं अॅड करा...एन्जॉय रुपाली😊😊🤗)

इश्क़ मुबारक

दर्द मुबारक
इश्क़ मुबारक
दर्द मुबारक
इश्क़ मुबारक
दर्द मुबारक

तेरी बारिशें

भिगाये मुझे
तेरी हवाएँ
बहाये मुझे
पाँव तले मेरे

ज़मीन चल पड़ी
ऐसा तो कभी
हुआ ही नहीं

ऐ मेरे दिल मुबारक हो
यही तो प्यार है
ऐ मेरे दिल मुबारक हो
यही तो प्यार है

इश्क़ मुबारक
दर्द मुबारक
इश्क़ मुबारक
दर्द मुबारक

इश्क़ मुबारक
दर्द मुबारक
इश्क़ मुबारक
दर्द मुबारक

ऐसा लगता है क्यूँ तेरी आँखें जैसे

आँखों में मेरी रह गई
कभी पहले मैंने

ना सुनी जो

ऐसी बातें कह गई
तू ही तू है जो हर तरफ मेरे
तो मुझसे परे
मैं जाऊँ कहाँ
मेरे दिल मुबारक हो
यही तो प्यार है
ऐ मेरे दिल मुबारक हो
यही तो प्यार है

जहाँ पहले-पहल तू
आ मिला था
ठहरा हूँ वही मैं अभी
तेरा दिल वो शहर है…

विराट ग्लास ओपन करुन एक हात बाहेर काढुन पावसाचे थेंब त्याच्या तोंडावर घेऊन हसू लागला त्या थेंबाना मध्ये जणु पिहूचा सहवास आहे ...💓💓😍😍😍

रात्री नऊ च्या आसपास तो घरी येतो..त्याचा मुड एकदम रीलॅक्स झाला होता..
सुमन तो आल्यावर रुममध्ये येतात..विराट काय गरज होती..जायची त्या ओरडुनच बोलतात..

मॉम...तिला फक्त मी बोलायला गेलो होतो...तिचा गैरसमज झाला आहे...तेच बोलायच होते..

अरे हो पण अजुन तिने घरी कोणाला सांगितले नाही...मी ती शांत झाल्यावर बोलणारच होते...तु असा अचानक गेल्यावर काय म्हणतील...

मॉम कोणीही नव्हतं घरी..

काय आणि तु तिला ओरडुन चिडून तर बोलला नाही ना...खर सांग विराट ,तु काय बोलला..तू आणि शांतीने बोलणार शक्यच नाही..

त्याला किस आठवुन तो गालातल्या गालात हसतो..

अरे हसतो काय काय बोलला तिला अजुन काही तरी वाढवुन ठेवलं असणार तु सुमन चिडतच बोलतात...

‌काही नाही मॉम तु पण ना तो नजर चोरुनच फ्रेश होण्यासाठी निघुन जातो..

अरे सांग ना पिहु काय बोलली...चिडली का अजुन ,तो काहीच बोलत नाही..‌म्हणुन सुमन निघुन जातात...

तो मिरर मध्ये स्वतःला बघुन हसतच असतो..त्याने शर्ट काढला...त्याची नजर गळ्याच्या खाली गेली‌..पिहुचे नेल्स लागले...आज पिहु काही न बोलून ती ही त्याच्या प्रेमात विरघळली आहे हे विराट लक्षात आले..

पिहु तु ही माझ्या प्रेमात पडली आहे पण राग काही कमी होईना...आणि विराटला सोप्या गोष्टी करायला मज्जा येत नाही....मी तुला माझ्या प्रेमानेच जिंकणार...विराट हसत स्वतःशीच बोलू लागला‌‌...

तो फ्रेश होऊन तिला फोन लावतो...इकडे पिहु त्याच्याच विचार करत बसली होती..त्याचा फोन बघून तिने कटच केला...
त्याला ही समजलं ही फोन उचलणार नाही...त्याने तिच्या मम्मीला कॉल लावला...

हॅलो ,

आई..

हा बोल

पिहु फोन उचलत नाहीये...कट करते‌य तिला थोड सांगा समजावुन तो हसू दाबतच बोलतो...

रेवती भिमरावांनाकडे बघत काय झालं पिहु का फोन उचलत नाही...

मी दिल्लीला तिला घेऊन गेलो नाही म्हणुन खुप चिडली तेव्हा पासून रुसुन बसली आहे...

हो‌ का म्हणुन अशी आली का ,

हम्म..तो नाटकी चेहरा करत म्हणु लागला.

तु काळजी करु नको मी सांगते..आणि ती करेल थोड्यावेळाने फोन ...

हो..हो..तो हसतच फोन ठेवुन देतो..सॉरी आई,पण पिहुला मनवण्यासाठी थोड फार खोट बोलाव लागते ..

काय झालं भिमराव विचारतात..

काही नाही ओ, पिहु रुसुन आली इकडे व‌िराटने सांगितले...तिला दिल्लीला जायच होते..उगाच आपण टेंशन घेत होतो..
आल्यापासुन तिचा चेहरा का उतरला...रेवती हसत बोलतात..

भिमरावांना ही बरे वाटते दुसर काही कारण नाही म्हणून आल्यापासुन ते पिहुला विचा‌रणार होते.पण ती स्वतःहुन सांगायची वाट बघत होते...पण निघा‌लं छोटस कारण...म्हणून दोघेही रीलॅक्स होतात..

पिहु आणि प्रांजल दोघी बोलत‌बसल्या होत्या प्रांजलची बडबड चालु होती...पिहु ला तर ती काय सांगते ते कानाला ऐकुच येत नव्हते...तिला फक्त‌ विराट हे बोलच कानात घुमत होते..

रेवती रूममध्ये येतात...प्रांजू आल्यापासुन तोंड चालु आहे..जा अभ्यास कर...

काय गं मम्मी ,

जा बोलले ना,

प्रांजल चिडुनच तिच्या रुममध्ये जाते...

मम्मी बसली होती ना,

तु विराटला फोन कर,एवढं काय रूसायच ,काम करायाला गेला होता...तिथे फिरायला गेला नव्हता..एवढं चिडायला..

पिहुला काहीच कळत्‌ नाही,मम्मी काय बोलतेस...

मला विराटचा फोन आला होता त्याने सगळ सांगितले...

काय...पिहु शॉक होतच बोलते..मम्मी तु त्यांच ऐकुन मला बोलते..

मग अजुन काय आहे का..कारण ,आल्यापासुन बघतोय आम्ही दोघं तुझा चेहरा पडलाय पण तु सांगेल म्हणुन शांत बसलो होतो...पण आज विराटने सांगितले मग कळालं

मम्मी मला झोप‌ आली आहे जा तु पण झोप ...

पिहु हट्ठीपणा करु नको पहिले फोन कर बाळा ऐकुन तरी घे ...काय म्हणतोय..कुठल्या नवराबायकोमध्ये भांडण होत नाही..मग अस रुसून यायच का,...आणि आता फोन उचलत नाही...रेवती फोन घेऊन तिला लाव म्हणतात...

पिहुला ही आता नाईलाज असतो..ती फोन लावते...विराट एका रिंगमध्येच फोन उचलतो..हॅलो...डीयर वाईफी ,😍😍

😒 पिहु शांतच असते...रेवती तिच्याकडे बघत असतात..पिहु मोबाईल काढुन मम्मी तुला बोलायच का,😠

नाही गं,

मग जा जाऊन झोप आता नजर ठेवणार आहे का माझ्यावर 😖

रेवती तिच्या दंडला मारत निघून जातात..

पिहु परत कानाला मोबाईल लावते...काय ओ ..किती खोट बोलतात...

😜 मी तुझ्यामुळे खोट बोललो..आणि ते व‌र्क झालं..मला माहित आहे तु कोणाला नाही पण तुझ्या आईला घाबरते..म्हणजे मला पण घाबरते..

तुम्हाला कोण बोललं मी तूम्हाला घाबरते....😠

ओहह ,खुपच राग येतोय...हहह..तो गॅलेरीत जाऊन थांबतो..घुगुंरु वाजवतो..पिहुला आवाज आल्याने ती खिडकी कडे बघते...तुम्ही माझ विल चैन चोरुन घेऊन गेलात...😫😫

विराट जोरात हसतो...आणि त्या विल चैनला किस करत तु चोरलले चालत मग मी का मागे पडु...😎

मी काय चोरले सगळ सामान नीट ठेवले एकही साडी दागिने घेतले नाही...सगळ तसच आहे..हे अस म्हणता म्हणुन मी काही मागत नव्हते...

विराट कपाळालाच हात मारतो..पिहु... मी ते बोलत नाही तु माझ हार्ट चोरलं आहे..😍ते मला परत दे...

काय ,तुम्ही हे फिल्मी डॉयलॉग मारायचे बंद‌ करा..

हम्म,काय करत होती...माझाच विचार करत असशील...आज ऐवढा खास दिवस होता ना आपल्यासाठी....

अहहं काय,तिला कळलच नाही.

,अगं आज आपण फस्ट किस केलं मग आपल्यासाठी तो मुवमेंट. खासच असणार ना,😉

पिहुला काय बोलाव कळतच नव्हते...चेहरयावर लाजेची लाली पसरत होती...

तु ब्लश करतेस ना...

पिहु स्वतःला सावरत ..ते...मी....ते ..तुम्ही स्वतः...ती पुढच बोला‌यच थांबली..

हहह ..मी स्वतः...काय...😍

काही नाही ‌,ती फोन ठेवणार कि तो तिला थांबवत....पिहु लिसन तु फोन कट केला तर मी सरळ अईंना कॉल करण‌ार आहे...

काय वेड लागलं आहे..का,😠माझ्या घरच्यांना त्रास का देतायेत...

त्यांना नाही गं तुला देतोय..😁

इइई.....

विराट हसत फोन कट करुन विडीयो कॉल करतो...ती फोन
उचलुन दुसरी कडे चेहरा फिरवते.

पिहु बघ ना,..माझ्याकडे...

ती मानेनेच नाही बोलते.

तो मोबाईल समोर धरुन सोफ्यावर आडवा होता..पिहु झोप ..पण मोबाईल चालुच राहू देत...

कश्याला ,..तिने त्या्च्याकडे बघतिले

तुला बघत झोपायच मला...तो गालात हसुन बोलतो...गुडनाईट किस तु तर देणार नाही मी देतो..😘अस म्हणत तो मोबाईल किस करतो..

पिहु मोबाईल समोर ठेवुन पाठ करून ब्लँकेट ओढुन झोपुन टाकते...तो हसतच तिला बघत कधी झोप लागते त्यालाच कळतच नाही.

💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖

(कसा वाटला भाग नक्की कळवा काही चुकले असेल तर क्षमस्व )

क्रमश: