Kiti saangaychany tula -2 books and stories free download online pdf in Marathi

किती सांगायचंय तुला - २

सगळ्यांची कॉफी पिऊन झाली असते.
सयाजी राव दिप्ती ला म्हणतात, " कॅप्टन खूप छान होती ह कॉफी, मला आवडेल तुझ्या हातांनी बनवलेली कॉफी रोज प्यायला. करशील ना माझ्या साठी रोज?"
"येस सर"- दिप्ती अगदी ऑफिसर स्टाईल मध्ये म्हणते.
तसे सगळे हसतात.
"चला मी रात्री च्या जेवणाच बघते"- अस म्हणून सुचित्रा ताई किचन कडे जातात.
"मी पण लाइब्ररी मध्ये बसतो थोडा वेळ."- सयाजी राव.
दिप्ती हातातल्या घडी कडे बघते आणि चेहऱ्यावर थोडे काळजी चे भाव आणून श्रुती कडे बघून म्हणते, " श्रुती अग सात वाजले, आपण काहीच सुरुवात नाही केली अजून. चल लवकर उठ. काय डेकोरेशन करायचं , कुठली थीम ठेवायची सगळ ठरवायच आहे. सामान काय लागणार, खूप काम व्हायचं आहे अग. फक्त पाच दिवस आहेत आपल्या कडे."
" अरे हो हो...थांब जरा दम तर घे. तुला काम असल की तुझ स्वतः कडे लक्ष नसते. आली तेव्हापासून याच कपड्यांमध्ये आहेस, आधी चेंज करून ये मग सुरू करू काम. मी तो पर्यंत एक अर्जंट कॉल करून घेते."- श्रुती नंबर डायल करून मोबाईल कानाला लावत म्हणते.
" अरे हो विसरलेच होते मी, आता येते लगेच....पण माझी रूम..?" - दिप्ती पायऱ्या चढत विचारते.
" अरे हो तुला तर रूम दाखवलीच नाही मी. माझ्या रूमच्या डावी कडली रूम आहे ना..... ऐकुन तर घे पूर्ण." - श्रुती
पण तो पर्यंत दिप्ती गेलेली असते.
" डावी कडली रूम, हीच असणार."- दिप्ती स्वतःशीच बोलत रूम च्या आत जाते आणि समोर बघते तर शिवा नुकताच बाथरूम मधुन आंघोळ करून आलेला असतो ते ही शर्ट लेस. हिने आत यायला आणि ह्यानी तिच्या कडे बघायला एकच वेळ येते. ती पटकन मागे वळते आणि दरवाजा उघडायचा निष्फळ प्रयत्न करते.पण तो काही केल्या उघडत नाही. दिप्ती ची उडालेली धांदल बघून शिवा हसून देतो.
"तुम्ही इथे कश्या?"- तिच्या मागे उभा राहून शिवा म्हणतो.
" ही माझी रूम आहे. " - दिप्ती दरवाजा कडेच बघत
म्हणते.
" ही माझी रूम आहे, तुमची रूम माझ्या रूम च्या बाजूची"- शिवा
" पण मला श्रुती ने हीच रूम सांगितली होती, तिच्या रूम च्या डावी कडली रूम."- दिप्ती निरागसपणे म्हणते.
" अर्धवट ऐकलं तुम्ही, तिला म्हणायचं असेल तिच्या रूम च्या डाव्या बाजूची रूम आहे ना त्याच्या बाजूची रूम. गेस्ट रूम आहे ती"- शिवा क्लिअर करत म्हणतो.
" हो का , मग मी ऐकल नसेल बहुतेक पूर्ण, आय एम सो सॉरी, जाते मी."- दिप्ती
"एक मिनिट, तुम्ही दरवाजा कडे बघून का बोलताय. भीती वाटते माझ्या कडे बघून बोलायची. माझ्या कडे बघा आणि मग बोला."- शिवा थोडा चिडून म्हणतो.
" नाही.. कशाला, मी जाते रूम मध्ये माझ्या."- दिप्ती दरवाज्याच्या हेण्डल ला ओढत म्हणते.
तसा शिवा तिचा हात पकडतो आणि तिला स्वतःच्या दिशेने फिरवतो. दिप्ती पटकन डोळे बंद करते.
" आता डोळे का बंद केले. उघडा ते"- शिवा चांगलाच चिडून म्हणतो.
ती मनात विचार करते, "आता ह्यांना कस सांगू तुम्ही शर्ट नाही घातलं आहे ते. "
शिवा तिच्या दोन्ही बाजूंना घट्ट पकडून तिच्या वर ओरडतो. " माझ बोलण अस कोणीही इग्नोर केलेलं आवडत नाही मला, मला राग आणू नका, मुकाट्याने डोळे उघडा."
दिप्ती थोडी अडखळत म्हणते " उघडते मी डोळे पण तुम्ही प्लीज आधी शर्ट घाला."
तसा तो भानावर येतो आणि त्याला आठवते की तो शर्ट न घालता तसाच बाथरूम च्या बाहेर आला होता.
तो पटकन बेड वर ठेवलेला टीशर्ट उचलतो आणि घालतो.
" उघडा आता डोळे"- शिवा थोड्या चिडक्या स्वरात म्हणतो.
दिप्ती डोळे उघडते. पण नजर मात्र जमिनी कडेच असते..
तिला अस बघून शिवा मनात विचार करतो, "मला एकदा बघता यावं म्हणून मुली काय काय नाही करत आणि मी चक्क ह्यांच्या समोर उभा असताना ह्या जमिनीकडे बघत आहेत."
त्याला त्याच्या दिसण्याच थोड फार घमेंड तर असतच. आणि दिप्ती बघत नाही आहे म्हटल्यावर ह्यचा इगो दुखावला गेला होता. पण ह्याला कोण सांगणार, हिला मुलांपासून लांब राहायला आवडत. आणि त्यात तर हिने असा शर्टलेस बघितला ह्याला. काय झालं असेल बिचारी च.
" तुम्हाला माझा चेहरा आवडला नाही का हो?"- थोड तिरसट पणे शिवा दिप्ती ला विचारतो.
" मी जाऊ का माझ्या रूम मध्ये, श्रुती वाट बघत असेल माझी, खूप उशीर झाला आहे आधीच."- दिप्ती कशीतरी दरवाज्याकडे वळत म्हणते. आणि जोर लावून दार उघडते..
" हे माझ्या प्रश्नाच उत्तर नाही आहे" - शिवा आता आणखीच चिडून म्हणतो.
दिप्ती काहीही न बोलता दरवाजा उघडून रूम च्या बाहेर निघून जाते.
आता मात्र शिवाचा राग शिगेला पोहोचला असतो. तो स्वतःशीच म्हणतो " मला इग्नोर करायची हिम्मत कशी झाली ह्यांची. दाखवावच लागेल ह्यांना शिवा दिक्षित काय आहे ते."
दिप्ती पटकन फ्रेश होऊन खाली हॉल मध्ये येते. श्रुती सोफ्यावर तिची वाट बघत बसलेली असते.
"का ग एवढा उशीर का झाला तुला?"- श्रुती
" काही नाही, ते चुकीच्या रूम मध्ये गेले होते म्हणून."- दिप्ती
" पूर्ण ऐकुन तर घेत जा मग, चल आता काम सुरू करूया"- श्रुती
दिप्ती हो म्हणून मान हलवते आणि श्रुतीच्या बाजूला जाऊन बसते.
" एक मिनिट, थांब मी दादा ला पण बोलावते खाली, तो पण मदत करेल आपल्याला"- अस म्हणून श्रुती शिवा ला कॉल करते.
"हॅलो दादा खाली ये लवकर , दिप्ती आणि मी डेकोरेशन काय करायच ते डीसाईड करत आहोत."
" ठीक आहे येतो." अस म्हणत शिवा कॉल कट करतो आणि मनात काही तरी ठरवून खाली जायला निघतो.
शिवा खाली येऊन सोफ्यावर बसतो, बरोबर दिप्ती च्या समोर. तिला रागाने लालबुंद होऊन बघत असतो.
" आता तुला कशाचा राग आला आहे एवढा?"- श्रुती त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणते.
" काही नाही, ते आहे ऑफिस च मॅटर. तू कशासाठी बोलावल मला "- शिवा स्वतःला सावरत श्रुती कडे बघत म्हणतो.
" गणेशोत्सवानिमित्त डेकोरेशन काय करायचं ते ठरवायचं आहे ना. म्हणून तर दिप्ती आली आहे आपल्या कडे. खूप छान करते ही डेकोरेशन."- श्रुती
" म्हणजे तुझी मैत्रीण इव्हेंट प्लॅनर आहे तर?"- शिवा दिप्ती कडे बघून श्रुती ला म्हणतो..
" तसचं समज हवं तर." श्रुती हसत उत्तर देते.
" एवढ छान डेकोरेशन करतात ह्या?"- शिवा
"छान? अरे खूपच सुंदर करते ती,तू बघशील ना बघतच राहशील"- श्रुती अभिमानाने म्हणते
" अस होय, मग मी सांगतो थीम, बघुयात काय करतात.."- शिवा
"तू चेलेंज करत आहेस काय तिला?"- श्रुती
" तसचं समज हव तर.... मला पण बघायचं आहे काय विशेष करतात तर..?"- शिवा
" सांग तू थीम, करेल ती. होना ग दिप्ती"- श्रुती दिप्ती कडे बघून म्हणते.
" तू कशाला बोलत आहे त्यांच्या कडून, त्यांना बोलता नाही येत का, की भीती वाटते माझी?"- शिवा हाताची घडी घालत म्हणतो.
" काय थीम आहे सांगा, करेल मी"- दिप्ती थेट त्याच्या डोळ्यात डोळे घालुन म्हणते.
" ओके, डेकोरेशन इको फ्रेंडली झालं पाहिजे. कुठले हि कागद , प्लॅस्टिक किंवा आर्टिफिशियल गोष्टींचा
उपयोग करायचा नाही. जमेल ना तुम्हाला?"- शिवा बोलण्यात थोडा घमेंडणे म्हणतो.
" ठीक आहे "- दिप्ती आत्मविश्वासाने म्हणते.
शिवाचा दिप्ती वर शाब्दिक वार बघून श्रुती ला कळायला वेळ नाही लागत की शिवाच काही तरी बिनसलंय दिप्ती सोबत..
ती शिवा ला काही विचारणार तेवढ्यात सुचित्रा ताई तिथे येतात.
" झालं का तुमचं ठरवून ? श्रुती जा बाबांना बोलावून आण मी ताट वाढायला घेते"- सुचित्रा ताई.
" दिप्ती तू जाऊन बोलवून आण बाबांना, मला बोलायचं आहे दादा सोबत थोड."- श्रुती शिवा कडे बघून म्हणते.
तशी दिप्ती हो म्हणून लाइब्ररी कडे जाण्यासाठी वळते, पण लगेच मागे वळून श्रुती ला विचारते." लाइब्ररी कुठे आहे?"
तसा लगेच शिवा उत्तरतो, " सरळ जाऊन डावी कडे... आणि अर्थवट नका ऐकत जाऊ नाही तर मघाशी झालं ते होईल."
दिप्ती काहीही न बोलता निघून जाते. श्रुती शिवा कडे बघून डोळे वर करून काय झालं म्हणून विचारते. तसा तो तिला टाळतो. आणि डायनिंग टेबल वर जाऊन बसतो. आता दिप्ती लाच सगळ विचारायचं अस ती ठरवून डायनिंग टेबल कडे वळते.
" काका मी आत येऊ का?"- दिप्ती दरवाज्यावर नॉक करून सयाजी रावांना विचारते.
" अरे ये ना आत, त्यात परवानगी कसली" - सयाजी राव हसत उत्तर देतात.
" नाही, परवानगी घेतलेली बरी, नाहीतर दुपार सारखं व्हायचं"- दिप्ती
तसा सयाजी रावांना दिप्ती आली होती तेव्हाचा प्रसंग आठवतो. आणि दोघेही हसतात.
" जेवायला बोलावले आहे काकूंनी"- आपली नजर लाईब्ररी मध्ये चौफेर फिरवून ती म्हणते.
"बस येत होतो आता"- सयाजीराव हातातले पुस्तक बुक शेल मध्ये ठेवत म्हणतात.
" काका, जर मी इथे आले तर काही हरकत नाही ना तुम्हाला ? मला खूप आवडत वाचायला."- दिप्ती बुक शेल ला स्पर्श करत म्हणते.
" मला काही हरकत नाही, तसेही इथे मी आणि शिवा दोघच येत असतो. शिवा ला ही आवड आहे वाचनाची. वेळ मिळेल तसा इथे येतो तो.खूप हुशार आहे माझा मुलगा, फक्त राग खूप येतो त्याला. होईल हळू हळू तो ही कमी"- सयाजी राव चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणतात.
पण दिप्ती ला त्यांच्या डोळ्यातली काळजी स्पष्ट दिसली होती. त्यांचं काळजी करणे साहजिकच होते शिवा रागात काय करेल ह्याचे त्याला सुध्दा भान राहत नव्हते.
" चला, जाऊया जेवण करायला."- अस म्हणत सयाजी राव बाहेर येतात. दिप्ती पण त्यांच्या मागे निघते..
जेवण झाल्यावर सयाजी राव आणि सुचित्रा ताई नेहमी प्रमाणे पाय मोकळे करण्यासाठी बागेत जातात. शिवा त्याच्या रूम मध्ये जातो. श्रुती आणि दिप्ती हॉल मध्येच बोलत बसतात. पण काही वेळातच दिप्ती ला झोप येते. तिचे डोळे बघून श्रुती तिला रूम मध्ये जाऊन झोप म्हणून सांगते. दिप्ती तिच्या रूम मध्ये येते. लाईट लावते तेच शिवा तिचा एक हात मागे मुरगळत तिला स्वतः कडे वळवतो. ती ओरडायला नको म्हणून स्वतःचा एक हात तिच्या तोंडावर ठेवतो.
" मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही अजून पर्यंत"- शिवा थोड्या त्वेषाने म्हणतो.
त्याचा हात आपल्या हाताने बाजूला करत दिप्ती उत्तर देते " तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे माझ्या कडे."
तसा तो रागाने टेबल वर असलेला काचेचा ग्लास जमिनीवर आपटतो. सगळी कडे काचा पसरतात. एवढ करून त्याचा राग शांत होईल तो शिवा कसला. आता चक्क बाजूला असलेली फुलदाणी भिंतीवर जोरात फेकतो.
त्याला अस तोडफोड करताना बघून दिप्ती शांतपणे म्हणते " आणखी काही फोडायच असेल तर फोडून घ्या. मग मी सगळ सोबतच आवरते."
त्याच्या रागावर दिप्ती ची अशी प्रतिक्रिया त्याला अनपेक्षित होती.
तिला आश्चर्याने बघत शिवा म्हणतो, "तुम्हाला काहीच नाही वाटल मी एवढा तुमच्या वर चिडलो , एवढा रिएक्ट झालो..?"
" नाही वाटल काहीच."- दिप्ती पसरलेल्या काचा उचलत म्हणते.
" पण का, का काहीच नाही वाटल? बहुतेक माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर असेल तुमच्या कडे."- शिवा थोडा उत्सुक होऊन म्हणतो.
" तुमची बहीण आहे ना, श्रुती. तिला राग आला की ती पण असच काही ना काही फोडायची. एक दिवस तर चक्क मोबाईल आपटला तिने. चार वर्षे सोबत राहीलो आम्ही.सवय झाली आहे मला आता अश्या तोटफोडीची. तुम्हाला आणखी काही तोडायच आहे? तोडू शकता "_- दिप्ती शिवा कडे बघून थोड हसत म्हणते.
तसा शिवा पण तिच्या बोलण्यावर हसतो.
"आणि तसं पण रागाने आपली व्यक्ती दुरावते, कधी कधी कायमचीच"- अस म्हणताना दिप्ती थोडी गंभीर झाली असते..
दिप्ती आताही काचा उचलत असते आणि अचानक एक काचेचा तुकडा तिच्या हाताला लागतो. आणि ती वेदनेने कळवळते. शिवा च लक्ष तिच्या हाताकडे जाते.. तिच्या हातातून रक्त वाहत असते.
तसा तो तिच्या हाताला पकडून तिला उभ करतो आणि तिच्यावर ओरडतो. " बघून नाही करता येत का लागलं ना आता तुम्हाला."
दिप्ती त्याच्याकडे बघते. तेव्हा त्याला जाणीव होते की हे आपल्या मुळेच तर झालं . तो तिला सॉरी म्हणून फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो. तिचा हात आपल्या हातात घेत कॉटन ने रक्त साफ करतो.
दिप्ती त्याच्या चेहऱ्याकडे बघत विचार करते. "थोडावेळ आधी किती रागावले होते हे माझ्यावर आणि आता एवढी काळजी. जखमेवर अँटीसेप्टिक लावल्या मुळे तिच्या हाताला जळजळत.. तशी ती भानावर येते. आपला हात शिवाच्या हातात बघून ती पटकन हात काढून घेत म्हणते " ठीक आहे मी. एवढ काही नाही लागलं."
तो पुन्हा तिचा हात हातात घेतो.
ती पुन्हा हात काढून घेत म्हणते " खरचं ठीक आहे मी, मला...,"
" आता एक शब्द नाही बोलायचं, एवढ रक्त निघत आहे तरी नाही लागलं म्हणताय. ड्रेसिंग करून झाल्यावर देतो परत तुमचा हात. घेऊन नाही जाणार आहे सोबत"- शिवा दिप्ती ला थोड रागवत म्हणतो.
तशी ती गप्प बसते. ड्रेसिंग करून झाल्यावर तिचा हात सोडत शिवा म्हणतो, " घ्या तुमचा हात, तुम्हीच ठेवा आणि काळजी घ्या त्याची." आणि दरवाजा कडे वळतो.
" थँक्यू.."- दिप्ती गालात हसून म्हणते..
तसा शिवा मागे वळून बघतो आणि म्हणतो, " थँक्यु तर मला म्हणायला हवं तुम्हाला, माझा राग एवढ्या लवकर जात नाही आणि मला जेव्हा राग येतो तेव्हा अस कोणी समजून घेत नाही. तुम्ही समजून घेतल. बरं वाटलं थोड. आणि परत एकदा सॉरी. माझ्या मुळे त्रास झाला तुम्हाला. आणि ते राहुद्या तसचं, मी पाठवतो कुणाला तरी"- शिवा पसरलेल्या काचा कडे बघून म्हणतो.
दिप्ती हसून " इट्स ओके.." म्हणते.
" गूड नाईट.." म्हणून शिवा त्याच्या रूम मध्ये निघून जातो.
इकडे डेकोरेशन कसं करायचं हा विचार करता करता दीप्तीला झोप लागते.
पण शिवा मात्र दिप्ती चा प्रत्येक शब्द आणि शब्द आठवत स्वतःशीच विचार करतो " किती समजदार आहेत त्या आणि आपण कसे वागलो त्यांच्याशी." मनात काही तरी ठरवून तो पण झोपी जातो..

****क्रमशः