Kiti saangaychany tula - 4 books and stories free download online pdf in Marathi

किती सांगायचंय तुला - ४

गजाननाचे आगमन म्हटले की किती उत्साह, रौनक आणि प्रसन्नता असते वातावरणात आणि गजाननाच्या भक्तामधेही. तसचं वातावरण आज दिक्षित वाड्यामध्ये होते. सगळीकडे फक्त धावपळ सुरू असते. सगळी पूजेची तैयारी सुरळीत व्हावी म्हणून सगळे आपापले काम चोख पणाने करत असतात. दिप्ती रांगोळी काढण्यात मग्न असते.. ते ही फुलांच्या पाकळ्या ची. शिवा ने इको फ्रेंडली म्हटल्यावर रांगोळी पण इकोफ्रेंडली होती.
हळूहळू सगळे जवळचे नातेवाईक येण्यास सुरुवात झाली असते. सयाजीराव यांचे लहान भाऊ अशोक राव आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आले असते. अशोक राव यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलगा श्रीकांत, शिवा पेक्षा काही वर्षांनी मोठा होता. आणि मुलगी काव्या शिवा पेक्षा लहान. काव्या च्या जन्मानंतर काही वर्षांनी अशोक रावांची बायको मेघा ताई यांना देवाज्ञा झाली.पण सुचित्रा ताई त्यांना आपल्या मुलांसारखे प्रेम दिलं. मयुरी श्रीकांत ची बायको आणि त्यांची गोड मुलगी आदिश्री. शिवाचा खूप जीव होता तिच्यावर. आणि ती होती पण तशीच मस्तीखोर, बोबडे बोलणारी पण तेवढीच गोड ,बाहुली सारखी दिसणारी. आल्या आल्या आदिश्री शिवा कडे पळत येते.. तो फोन वर बोलत असतो.
"काका, मी आले" - ती मागूनच शिवा ला पायाला पकडुन म्हणते..
तसा शिवा फोन कट करून तिला बघतो..
" ओये माझा बच्चा, आला तू," अस म्हणत शिवा तिला कडेवर उचलतो..
थोड्यावेळ तो असच तिच्याशी बोलत असतो. इकडे मयुरी आणि काव्या दिप्ती जवळ येऊन तिची रांगोळी बघत असतात. श्रुती तिला मदत करत असते.
"किती सुंदर काढली ग तू रांगोळी."- मयुरी तिची प्रशंसा करत म्हणते
दिप्ती हसत तिचे आभार मानते. काव्या डोळ्यांनीच श्रुतीला ही कोण आहे म्हणून विचारते.
" अरे हो, मी ओळख करून देते, मयुरी वहिनी ही दिप्ती माझी मैत्रीण आणि दिप्ती ह्या आमच्या वहिनी साहेब, श्रीकांत दादा म्हणजे काकाच्या मुलाची बायको. आणि ही माझी बहिण काव्या , काकाची मुलगी."
तिघी पण हाय हॅलो म्हणतात. मयुरी दिप्ती जवळ बसून तिची मदत करते आणि दिप्तीची आणखी विचारपूस करत असते तेवढ्यात आदिश्री तिथे धावत येते आणि तिच्या मागे शिवा असतो.
"काका मला पकड"- आदिश्री धावता धावता शिवा ला म्हणते.
"आदू थांब, पडशील नाही तर"- शिवा तिला थांबवत म्हणतो.
पण ती त्याचं काही ऐकत नाही आणि धावता धावता तिचा तोल जातो तशी ती रांगोळी वर येऊन पडते. त्यामुळे रांगोळी पुसली जाते.
थोड्यावेळ काय झालं म्हणून सगळे आदिश्री कडे बघत असतात. तशी तिची मम्मा ( मयुरी) तिच्या जवळ जाऊन तिला एका हाताने उठवत थोड रागवत म्हणते
" आदिश्री काय केलं हे, बघून नाही धावता येत तुला, काम वाढवत असते नेहमी. बघ काय करून ठेवलं, सांगितलं होत ना मी मस्ती नाही करायची म्हणून." आदिश्री खाली मान घालून हमसून हमसून रडत असते. तिला अस बघून दिप्ती ला खूप वाईट वाटते. ती आदिश्री कडे जाते, तिला स्वतः जवळ घेऊन म्हणते, " बाळा लागलं नाही ना तुला कुठे?"
आदिश्री फक्त नाही म्हणून मान हलवते.
" आदु सॉरी म्हण त्यांना पटकन"- मयुरी थोड्या वरच्या स्वरात म्हणते.
तशी आदिश्री दोन्ही कान पकडून तिला सॉरी म्हणते. दिप्ती तिचे हात खाली घेत मयुरी ला म्हणते ," काही हरकत नाही आणि लहान आहे ती, ह्या वयात मस्ती नाही करायची तर कधी करायची, आपल्या एवढ वय झाल्यावर ."
त्यावर मयुरी म्हणते, " अग पण तुझी रांगोळी बिघडली ना"
"आपण पुन्हा काढू,"- दिप्ती हसत म्हणते. आणि आदिश्री कडे बघते, ती आताही रडत असते. तिला हसवण्यासाठी दिप्ती गुदगुल्या करते आणि आदिश्री हसायला लागते.
तिला अस बघून दिप्ती म्हणते, " तू करशील मला मदत?"
आदिश्री हसून हो म्हणते.
शिवा फक्त त्या दोघींना बघत असतो. सयाजी राव आणि सुचित्रा ताईंना दिप्ती च खूप कौतुक वाटतं.
श्रुती, काव्या, मयुरी आणि आदिश्री सगळे दिप्ती ला मदत करतात. संध्याकाळ झाली असते त्यांना पुन्हा रांगोळी पूर्ण करायला. रांगोळी पूर्ण झाल्यावर सुचित्रा ताई त्या सगळ्यांना तैयार व्हायला सांगतात. सगळ्या आपल्या रूम मध्ये निघून जातात. घरातील पुरुष मंडळी बाप्पा ला घरी घेऊन येण्यासाठी गेलेली असते.
दिप्ती रूम मध्ये येऊन फ्रेश होते आणि तैयारी करण्यासाठी बॅग उघडत असते तर तिला रूम बाहेर कसला तरी आवाज येतो, काय झालं म्हणून ती दार उघडते तर समोर आदिश्री इकडे तिकडे पळत असते आणि मयुरी तिच्या मागे एक क्युट ड्रेस घेऊन फिरत असते. दिप्ती ला खूप हसू येत हे बघून. ती हसत असतानाच आदिश्री दिप्ती च्या मागे लपते.
" आदू, ये इकडे लवकर, तुला रेडी केल्यावर मला पण तैयारी करायची आहे."- मयुरी थोडी त्रासून म्हणते. आदिश्री तिला दिप्ती च्या मागून डोकावून मान हलवत नाही म्हणते.
तसा मयुरी चा पारा चढतो " आता येते की देऊ एक धपाटा." ती हात उगारत म्हणते.
दिप्ती तिला थांबवते.
" अग हीची तैयारी झाली की मग मी मोकळी तैयारी करायला. पण ही ऐकतच नाही आहे."
दिप्ती एक हाथ पुढे करून म्हणते," द्या इकडे मी करते तिला रेडी."
" पण तुझी तैयारी व्हायची आहे ना "- मयुरी
" मी लवकर रेडी होते मला जास्त वेळ नाही लागणार, द्या तिचा ड्रेस, तुम्ही जाऊन तय्यार व्हा."- दिप्ती हसून म्हणते.
"हो मला हीच रेडी करणार."- आदिश्री दिप्ती ला आणखी मिठी मारत म्हणते.
" बरं घे.आणि जास्त त्रास नाही द्यायचा ह्यांना कळल ना"- मयुरी आदिश्री कडे बघून म्हणते आणि हसून निघून जाते.
दिप्ती अादू ला रूम मध्ये आणते. तिचे हातपाय धुवून देते आणि तिला ड्रेस घालून देत असते तेव्हा आदिश्री म्हणते, " तुझ नाव काय आहे?"
दिप्ती तीच नाव सांगते. ती तिला तैयार करून देत असते तर आदिश्री ची अखंड बडबड सुरु असते. दिप्ती ला पण तिची बडबड खूप गोड वाटत असते.
" तुला माहिती आहे सगळे मला ओरडतात, मी मस्ती केली की रागावतात. फक्त शिवा काका मला ओरडत नाही. म्हणून तर तो माझा बेस्ट फ्रेंड आहे." काही तरी आठवून आदिश्री पुन्हा म्हणते " तू पण मला रागवल नाही. किती छान आहे तू. तू माझी फ्रेंड होशील?"- एक हात पुढे करून आदिश्री दिप्ती ला विचारते.
"मला आवडेल,पण..." - दिप्ती थोडी तिची उत्सुकता ताणून म्हणते.
"पण काय? बोलना"- आदिश्री केविलवाण्या स्वरात म्हणते.
" मी त्याचं मुलांशी मैत्री करते जी त्यांच्या मम्मा च ऐकतात." - दिप्ती थोडी भाव खात म्हणते.
आदिश्री थोडा विचार करते आणि म्हणते,"मी ऐकणे मम्माच खरच. आता होशील ना माझी फ्रेंड?"- आदिश्री केविलवाणा चेहरा करून म्हणते.
दिप्ती हसत तिला हात देत हो म्हणते. आदिश्री दिप्ती ला तिच्या शाळेबद्दल सांगते.. मित्र मैत्रिणी बद्दल सांगते. असच दोघी बोलत असतात. तेवढ्यात दारावर थाप ऐकु येते. दिप्ती दार उघडते आणि बघते तर समोर मयुरी उभी असते.
"झाली का तैयारी?"- मयुरी बाहेरून आत डोकावत आदिश्री ला विचारते. आदिश्री हो म्हणून मान हलवते. आणि येऊन मयुरी ला मिठी मारून म्हणते " आय एम सॉरी मम्मा, मी परत तुला नाही त्रास देणार, गुड गर्ल सारखी वागणार."
मयुरी ला आश्चर्य वाटते की हिला काय झालं लगेच.तशी ती दिप्ती कडे बघते आणि डोळ्यांनीच काय झालं म्हणून विचारते. दिप्ती हात दाखवून सगळ ठीक आहे म्हणून सांगते. मयुरी डोळ्यांनीच तिला थँक्यू म्हणते. आणि लवकर आवरून खाली ये अस सांगून आदिश्री ला घेऊन निघून जाते.दिप्ती तीच आवरायला घेते.
इकडे खाली सगळे आलेले असतात. आता फक्त वाट होती ती बाप्पाच्या आगमनाची. आणि तो ही क्षण आला असतो.. शिवा आणि श्रीकांत बाप्पाना घेऊन मेन गेट वर उभे असतात. आणि गेट च्या आत मध्ये ढोल ताशा पथक उभे असते. तेवढ्यात दिप्ती तैयार होऊन खाली येते तशी श्रुती तिचे डोळे झाकते आणि म्हणते," तुला म्हटलं होत ना तुझ्या साठी सरप्राइज आहे म्हणून." तिला तसचं बाहेर घेऊन येते आणि ढोल ताशा पथकाच्या मधोमध उभी करते. तसा तिला ताशांचा आवाज ऐकू येतो. श्रुती चा हात डोळ्यांवरून काढून ती सगळी कडे बघते आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात, तिच्या डोळ्यात नकळत पाणी येते..
ती श्रुती ला मिठी मारते..
श्रुती तिला म्हणते " कसं वाटल सरप्राइज..?"
" खूप मस्त"- दिप्ती डोळे पुसत म्हणते.
हे ढोल ताशा पथक दिप्ती च्या हृदयाच्या अगदी जवळ होते. पुण्यामध्ये शिकत असताना स्वतःला बिजी ठेवण्यासाठी दिप्ती ने एक सांस्कृतिक मंडळात सहभाग घेतला होता. तिथे ती रांगोळी, डान्स, गायन, ढोल ताशा अस सगळ शिकली होती. कितीतरी वर्षानंतर ती पुन्हा तिच्या सांस्कृतिक ग्रुप ला भेटली असते. तिच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असतात. श्रुती ला माहिती होत की दिप्ती केव्हा स्वतःला विसरून जगते. अश्या खूप कमी गोष्टी होत्या ज्यामधे दिप्ती स्वतःचे दुःख विसरून जगत होती. म्हणून तर मुद्दामहून श्रुती ने आज ह्या पथकाला बोलावले असते. पथक मधून एक श्रुती ला ढोल आणून देतो आणि श्रुती तो दिप्ती च्या गळ्यात घालून डोळ्यांनीच इशारा करून वाजव म्हणते.. दिप्ती एक नजर सयाजीराव आणि सुचित्रा ताई कडे बघते. ते पण हसून संमती दर्शवतात. दिप्ती ढोल वाजवायला सुरुवात करते. पथकातले सगळे तिला साथ देतात. ती बेभान होऊन वाजवत असते. तिला अस बघून शिवा च्या काळजाचा ठोका चुकतो. तो भान हरपून दिप्ती ला बघत असतो. तिच्या निरागस आणि हसणाऱ्या चेहऱ्याला बघून घायाळ झालेला असतो. पांढरा लाल रंगाचं कॉम्बिनेशन असलेला पंजाबी ड्रेस. त्यावर लाल रंगाची मेचींग ओढणी. मेकअप तर केलाच न्हवता. त्यातही आज झालेल्या आनंदाने तीच उजळणार रूप, केसांची घातलेली सागर वेणी, कपाळावर टिकली च्या आकाराचे कुंकू. कानात लाल रंगाचे झुमके, दिसायला तेवढीच साधी तरी किती सुंदर दिसत होती ती. फक्त आज तिने चश्मा नव्हता लावला, त्यामुळे तिचे पाणीदार डोळे शिवाच्या काळजात खोलवर रुजले होते. तिच्या डोळ्यात तर तो पुरता हरवून गेला असतो. किती तरी वेळ ढोल ताशांच्या आवाजात दीक्षित वाडा दुमदुमत असतो आणि संपूर्ण वेळ शिवा फक्त दिप्ती कडेच बघत असतो. श्रुती ला शिवा ची झालेली अवस्था बघून हसायला येत.. सयाजी राव आणि सुचित्रा ताई पण त्याच्या कडेच बघत असतात. थोडा वेळाने ढोल ताशांच्या आवाज बंद होतो. पण शिवा च पूर्ण लक्ष दिप्ती वर असते. श्रीकांत त्याला हाक मारत असतो पण त्याला केवळ दिप्ती चा हसरा चेहरा दिसत असतो. श्रीकांत त्याला हात लावून हलवतो. तसा शिवा भानावर येतो.
"कुठे हरवला होता ? किती वेळचा हाक मारत होतो मी, चल आता आत"- श्रीकांत थोडा वैतागून म्हणतो.
सगळे जण बाप्पाना घेऊन आत मध्ये येतात. रितीनुसार बाप्पांची स्थापना केली जाते आणि महाआरती ला सुरुवात होते. सगळे भक्तिमय वातावरणात मग्न झाले असतात. महाआरती संपल्यावर प्रसाद वाटप केले जाते. मात्र चर्चा रंगली ती डेकोरेशन ची. वाड्यात उपस्थित सगळे लोक फक्त डेकोरेशन ची प्रशंसा करण्यात मग्न असतात. चौकोनी ओट्यावर माती टाकून त्यात गहू पेरला होता त्या मुळे छोटस हिरवगार शेत तिथे उगवले अस वाटत असते. त्या शेतात मातीने बनवलेली घरे असतात. छोटी छोटी झाडे लावली असतात. संपूर्ण शेताच रूप दिलं होत चौकोनी ओट्याला. त्याच्या अगदी मधोमध चौरंग. चौरंगाला बैलगाडी सारखं सजवल होत, त्या वर शेड उभारले असते.. जसे गावाकडच्या बैलगाडीला असते तस. चौरंग समोर मातीची बैल जोडी ठेवली असते. आणि त्यांच्या मानेवरून दोरी बांधून ती बाप्पाच्या हातात दिली असते. जणू काही बाप्पा बैलगाडी चालवत आहे असं ते वाटत होते. ह्या सगळ्याला चारचांद लावले होते ते बाप्पाच्या मुर्तीने. केसरी फेटा बांधून बाप्पा खूप छान दिसत असतात. ही सगळी सजावट करण्यात दिप्ती ला श्रुती आणि शिवा ने ही खूप मदत केली असते. बघणाऱ्याचे डोळे ते बघून तृप्त झाले होते. सगळे त्या तिघांची खूप प्रशंसा करतात.
श्रुती आणि दिप्ती ढोल ताशा वादक सोबत बोलत असतात. त्यातले खूप जण दिप्ती पेक्षा वयाने लहान होते, म्हणून त्यांचं आणि दिप्ती च खूप जमायचं. इकडे शिवा त्याच्या मित्रासोबत बोलत असतो.. पण अधून मधून तो फक्त दिप्ती ला बघत असतो. सयाजी राव त्यांच्या मित्रा सोबत बोलत असतात.
आणि इशाऱ्यानेच दिप्ती ला बोलवून घेत ओळख करून देत म्हणतात. "कैलास ही दिप्ती, आर्मी ऑफिसर आहे आणि दिप्ती हा कैलास, माझा बालपणी चा मित्र, उद्योगपती आहे. पण यांचे मोठे चिरंजीव आर्मी मध्ये आहे बर का, आज आला नाही तो, नाहीतर तुझी भेट झाली असती त्याच्या सोबत"
दिप्ती कैलास रावांना हात जोडून नमस्कार करते.
" तुला बघून आनंद झाला खूप, ढोल छान वाजवते तू"- कैलास राव तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतात.
"थँक्यू सर "- दिप्ती गोड हसून म्हणते.
"अरे हो आमची बाहुली कुठे गेली? आज भेटली नाही ती मला "- कैलासराव इकडे तिकडे बघत म्हणतात.
तशी श्रुती मागून त्यांचे डोळे झाकते. तिचा हात धरुन कैलास राव तिला स्वतः समोर आणतात आणि जवळ घेत म्हणतात, " मला वाटलं आम्हाला विसरली असेल बाहुली आमची."
"तुम्हाला कसं विसरणार मी, ह्या घरात मला कोणीच प्रेम करत नाही , फक्त तुम्हीच करता, माहित आहे किती आठवण येते मला तुमची,"- श्रुती आणखी त्यांना घट्ट मिठी मारत लाडिकपणे म्हणते.
तसे सगळे हसायला लागतात..
"सयाजी तुझ्या सोबत मला काही तरी पर्सनल बोलायचं आहे. आपण सोफ्यावर बसून बोलू"- कैलास राव श्रुतीला बाजूला करत म्हणतात.
श्रुती आणि दिप्ती दोघी पण तिथून निघून येतात.
पाहुणे मंडळी जेवणात व्यस्त असते. श्रुती सगळ्यांना दिप्ती ची ओळख करून देत असते. हळू हळू ती आणि दिप्ती शिवा च्या ग्रुप जवळ येतात.
श्रुती सगळ्यांची ओळख दिप्ती सोबत करून देते. "दिप्ती, हे सगळे दादा चे मित्र आहेत. अश्विन , निशांत, ओंकार आणि दादा लोकांनो ही माझी मैत्रीण दिप्ती देशमुख"
दिप्ती सगळ्यांना हाय म्हणते. शिवा तिथे येतो, त्याच्याच मागे पिंक कलर चा शॉर्ट फ्रॉक घातलेली एक मुलगी पण येते.
"झाली का ओळख करून ?"- शिवा श्रुती ला म्हणतो तशी श्रुती पुढे म्हणते, " दिप्ती ही नताशा, कैलास काकांची मुलगी,"
दिप्ती च्या कानाजवळ जाऊन म्हणते," खूप मॉर्डन विचारांची आहे आणि आगाऊ सुध्दा "
दिप्ती हाय म्हणत हात पुढे करते तशी नताशा तिला इग्नोर करते.
शिवा परिस्थिती सांभाळत म्हणतो " बर ,सगळ डेकोरेशन ह्यांनी केलं आहे, कस वाटल.?"
त्यावर सगळे दिप्ती ची प्रशंसा करतात.
दिप्ती म्हणते " मी एकटीने नाही केलं सगळ दिक्षित सर आणि श्रुती ने पण मदत केली."
"दिक्षित सर?"- अश्विन आश्चर्याने बघत म्हणतो.
" हो ना, पहिल्यांदा कुण्या मुलीने ह्याला दिक्षित सर म्हटलं"- निशांत अश्विन ला साथ देत म्हणतो.
" नाही तर काय, मुली ह्याला त्यांच्या स्वप्नातील राजकुमार समजतात आणि तुम्ही सर म्हटलं. हो की नाही नताशा?"- ओंकार शिवा सोबत आलेल्या मुली कडे बघून म्हणतो."
" बस ,झालं असेल तुमचं, खूप झाली त्यांची मस्करी करून"- शिवा त्याच्या मित्रांना म्हणतो.
" ती इथे काम करायला आली आहे तर शिवा तिचा बॉस झाला ना, बॉस ला इम्प्लोयी सर च म्हणतील आणि शिवा ची स्वप्न फक्त हाय प्रोफाईल मुलींना परवडतात अश्या बेहणजी टाईप मुलींना नाही.त्यांच्या साठी सर ठीक आहे."- नताशा दिप्ती कडे बघून हसत म्हणते.
श्रुती ला तिचा खूप राग येतो, ती नाताशा ला बोलणार तेवढ्यात दिप्ती तिचा हात धरुन डोळ्यांनीच इशारा करून नको म्हणते.
पण शिवा ला मात्र तीच अस बोलण सहन होत नाही.
" खरं आहे नताशा तुझ. अश्या मुलींना काय कळणार हाय प्रोफाईल, म्हणजे बघ ना पूजेच्या ठिकाणी पण आपल स्टेटस दिसावं म्हणून शॉर्ट ड्रेस घातला पाहिजे. पण ह्या आल्या सलवार सूट घालून. मी भाव देत नसताना पण माझ्या मागे स्वतःचा स्वाभिमान विकून फिरणे म्हणजे हाय प्रोफाईल , पण अश्या स्वाभिमानी मुलींना काय कळणार हे सगळ, ते तर तुझ्या सारख्या हाय प्रोफाईल मुलींनाच जमत. बरोबर बोललो ना मी? आणि हो राहील मला सर म्हणायचं तर त्या कोणी इम्प्लोयी नाही आहे माझ्या, त्या श्रुती च्या फ्रेंड आहे आणि माझ्या पण"- शिवा नताशा ला डीचवत म्हणतो.
शिवा च्या ह्या वाक्यावर दिप्ती त्याला आश्चर्यचकित होऊन बघते.
त्याचे मित्र मात्र नताशा कडे बघून ओठ दाबून हसत असतात. श्रुती हाताची घडी घालून नताशा कडे रागात बघत असते. नताशा ला तिचा असा अपमान सहन होत नाही. ती एक नजर शिवा कडे बघते आणि थोड्या वेळाने दिप्ती कडे रागात बघत " आय विल सी यू नेक्स्ट टाईम.." म्हणून निघून जाते.
"आता बघितल नाही का बरोबर"- श्रुती शिवा ची साथ देत म्हणते.
सगळे तिच्या कडे बघून जोरात हसतात.
श्रुती तर शिवा ला आनंदाने मिठीच मारत म्हणते," थँक्यू माय जान, काय मस्त सुनावलं तू तिला"
"खरचं यार , आज पोपट केला तू तिचा"- ओंकार हसत शिवा ला म्हणतो.
दिप्ती फक्त डोळ्यांनीच त्याला थँक्यू म्हणते. शिवा तिच्या कडे बघून गोड हसतो.
" चला आता जेवण करू, की फक्त हसून पोट भरणार आहात."- शिवा च्या ग्रुप मध्ये सर्वात भुक्कड ओंकार म्हणतो.
तसे सगळे जेवायला जातात. जेवण झाल्यावर एकमेकांशी बोलत बसतात.
हळूहळू सगळे पाहुणे मंडळी निरोप घेऊन निघत असतात.. शिवा चे मित्र पण त्याचाशी बोलून निरोप घेतात. सगळे थकले असल्याने आपापल्या रूम मध्ये निघून जातात.
दिप्ती रूम मध्ये येऊन फ्रेश होते आणि झोपण्यासाठी बेडवर पडते, पण तिला आज झोप येत नाही. बाल्कनी मध्ये जावून थोड फिरावं म्हणून ती रूम बाहेर पडते. तिला बाल्कनी मध्ये आदिश्री आणि मयुरी भेटतात.
" आदू तू झोपली नाही अजून ?"- दिप्ती
" नाही ना ग. बघ ना हिला चंदा मामा बघायचं आहे म्हणे आता, म्हणून मला घेऊन आली इथे,मला खूप झोप येत आहे ग, पण ही स्वतः ही नाही झोपत आहे आणि मला पण नाही झोपू देत आहे. आता हिला कसा दाघवू चंद्र"- मयुरी कंटाळून म्हणते.
" मला पण झोप नाही येत आहे, मी बसते तिला घेऊन इथे, तुम्ही झोपा जाऊन निवांत"- दिप्ती मयुरी चा हात हातात घेत म्हणते.
" तुला त्रास तर नाही होणार ना काही?"- मयुरी
" त्रास कसला त्यात, मला आवडेल आदिश्री सोबत वेळ घालवायला. किती गोड आहे ती"- दिप्ती हसून म्हणते.
" ही आणि गोड, कळेल तुला लवकरच"- मयुरी हसून म्हणते. " चल मग मी जाते, गुड नाईट" अस म्हणून मयुरी आदिश्री चा पापा घेऊन निघून जाते.
दिप्ती आदिश्री ला जवळ घेत तिथल्या सोफ्यावर बसते आणि तिला गोष्ट सांगते. किती तरी वेळ दोघी पण बोलत असतात. आदिश्री दिप्ती ला खूप प्रश्न विचारते. तिची बडबड मात्र दिप्ती शांतपणे ऐकत असते.
"मी तुला माझ्या फ्रेंड्स बद्दल सांगितल, तू तर काहीच नाही सांगितलं तुझ्या फ्रेंड्स बद्दल."- आदिश्री दिप्ती च्या गालावर दोन्ही हात ठेवून विचारते.
" मला नाही फ्रेंड्स, फक्त तुझी श्रुती आत्याच माझी फ्रेंड आहे"- दिप्ती
" तुला एकच फ्रेंड आहे?"- आदिश्री
" नाही दोन आहे, एक तुझी श्रुती आत्या आणि दुसरी तू"- दिप्ती तिचे गाल ओढत म्हणते.
" शिवा काका नाही तुझा फ्रेंड?"- आदिश्री
दिप्ती ला प्रश्न पडतो की हिला काय उत्तर द्यावे. ती शांतपणे म्हणते," नाही, ते नाही माझे फ्रेंड."
आदिश्री तिच्या मांडीवरून खाली उतरते आणि दिप्ती चा हात पकडुन तिला ओढत घेऊन जाते.
"अग आदू, कुठे जात आहोत ते तर सांग"- दिप्ती गोंधळून म्हणते.
आदिश्री काही बोलत नाही फक्त हात दाखवून थांब म्हणते. आणि दिप्ती ला ओढत शिवा च्या रूम पर्यंत आणते.. मग त्याच्या रूम चे दार ठोठावते. एवढ्या रात्री कोण आहे म्हणून शिवा चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव आणून दार उघडतो. समोर दिप्ती ला बघून थोडा शॉक होतो. त्याला आपण स्वप्न पाहत आहोत असं वाटतं..
आदिश्री त्याच्या हाताला ओढते तसा तो भानावर येतो.. दिप्ती ला बघून त्याचा चेहरा आनंदाने खुलतो. पण स्वतःला सावरत तो आदिश्री समोर गुडघ्यावर खाली बसून म्हणतो. "तू झोपली नाही, किती रात्र झाली आहे आणि इथे का आली ?"
आदिश्री दोघांनाही रूम मध्ये घेऊन येते. आणि केविलवाण्या स्वरात म्हणते, " काका बघ ना तुला किती फ्रेंड्स आहेत, मला आणि श्रुती आत्या ला पण खूप फ्रेंड्स आहेत. पण हिला फक्त दोनच. एक मी आणि एक श्रुती आत्या. तू माझा फ्रेंड आहे ना मग माझे फ्रेंड्स तुझे फ्रेंड्स झाले ना?"
शिवा फक्त हसत मान हलवून हो म्हणतो.
"मग तू हीचा पण फ्रेंड आहे ना?"- आदिश्री दिप्ती कडे हात दाखवून म्हणते.
शिवा दिप्ती कडे बघतो, ती आदिश्री कडे गोंधळलेल्या नजरेने बघत असते. तिला अस बघून त्याला मात्र खूप मजा येत असते.
आदिश्री चा हात स्वतःच्या हातात घेऊन तो म्हणतो,
" मला आवडेल त्यांच्याशी मैत्री करायला, पण त्यांना आवडेल का ?"
दिप्ती शिवा कडे आश्चर्याने बघते. आदिश्री दिप्ती जवळ जाते नी तिचा हात पकडून तिला शिवा समोर उभी करते. आणि डोळ्यांनी शिवा ला इशारा करते.
तसा शिवा दिप्ती पुढे हात नेत म्हणतो," फ्रेंड्स.?"
दिप्ती ला कळत नाही काय करावं ते.
आदिश्री तिला म्हणते " तू म्हटलं होत ना की तू फक्त त्याचं मुलांशी मैत्री करते जी त्यांच्या मम्मा च ऐकतात. काका आजीच ऐकतो, गुड बॉय आहे तो, कर ना त्याच्याशी फ्रेंडशिप." आदिश्री लाडिकपने म्हणते.
शिवा ला मात्र दिप्ती ची अशी अवस्था बघून हसू येते.
तो मनात विचार करतो, "एवढे दिवस मी किती प्रयत्न केला मैत्री करायचा तर दूर पळत होत्या पण आज काही ह्यांची सुटका नाही. आदिश्री थँक्यु बच्चा"
"मिळव ना हात"- अदिश्री च्या आवाजाने तो विचारातून बाहेर येतो.
"मला मैत्री निभावता नाही येत, म्हणून तर फक्त श्रुती माझी एकमेव मैत्रीण आहे. आणि माझ्याशी मैत्री करून फक्त त्रास होईल तुम्हाला"- एवढ्या वेळ गप्प असलेली दिप्ती बोलते.
शिवा ला थोड आश्चर्य वाटत तिच्या बोलण्याच.
तो शांतपणे म्हणतो. " पण मी एकदा कुणाशी मैत्री केली की मरेपर्यंत तोडत नाही."
त्यावर दिप्ती काहीच बोलत नाही. शिवा मात्र तसचं त्याचा हात समोर करून असतो. एवढा वेळ त्यांचं ऐकत असलेली आदिश्री पटकन दिप्तीचा हात पकडते आणि शिवा च्या हातात देते. तिच्या कोमल हाताचा स्पर्श होताच शिवा शहारून जातो. त्याच्या मनात आनंद लहरी उसळत असतात. तो आणखी तिचा हात घट्ट पकडला. दिप्ती स्वतःचा हात सोडवून घेण्याचा निष्फळ प्रयत्न करत असते..
तसा शिवा तिला म्हणतो " मी म्हटलं होत तुम्हाला, एकदा कुणाशी मैत्री केली की मरेपर्यंत तोडत नाही.. आणि ही मैत्री तर मेल्यानंतर पण तोडणार नाही."
दिप्ती ला हसायचं नव्हत तरी तिच्या मनाविरुद्ध नकळत चेहऱ्यावर स्मित हास्य पसरते.. तिचा असा हसरा चेहरा पाहून शिवा ला बर वाटत. तो फक्त तिच्या डोळ्यात हरवलेला असतो. आदिश्री त्याच्या हाताला ओढते तसा तो भानावर येतो.
" काका मला झोप येत आहे. आज मी तुझ्या जवळ झोपणार. चल ना झोपायला."
शिवा मान हलवून हो म्हणतो.
" तुम्ही पण झोपा आता, खूप रात्र झाली आहे"- शिवा दिप्ती ला म्हणतो.
दिप्ती डोळ्यांनीच हाताकडे इशारा करते आणि शिवा तिचा हात लगेच सोडतो.
"तू पण झोप ना इथेच, काका मला मस्त मिठीत घेऊन झोपतो, तुला पण मिठीत घेऊन झोपेल तो, हो ना काका?"- आदिश्री दिप्ती कडे बघून मग शिवा ला म्हणते.
शिवा आणि दिप्ती चमकुन एकमेकांकडे बघतात. दिप्ती पटकन गुड नाईट म्हणून निघून जाते.आणि शिवा आदिश्री कडे बघून खळखळून हसतो. बिचाऱ्या आदिश्री ला काही कळत नाही काय झालं ते. तो तिला घेऊन बेड वर जातो आणि तिच्या पाठीवर थोपटून झोपवतो. आदिश्री लवकरच झोपी जाते.
पण शिवाची झोप मात्र उडाली असते. तो आजचा पूर्ण प्रसंग आठवून स्वतःशीच हसत असतो. रांगोळी काढताना दिप्ती च रूप, ढोल वाजवताना तिचा हसरा चेहरा, थोड्या वेळापूर्वी गोंधळलेली, बैचेन दिप्ती , सगळ त्याला आठवत असते. तीच्या आठवणीत त्याला कितीतरी वेळाने झोप लागते.
इकडे मात्र आज झालेल्या प्रसंगामुळे तिचा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर येत असतो. नकळत तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले असतात. ती रूम च्या बाल्कनीत उभी असते.
आकाशातिला चांदण्याकडे बघत ती म्हणते, "आज तुझी खूप आठवण येत आहे शिवा."

...........
क्रमशः