She __ and __ he - 12 books and stories free download online pdf in Marathi

ती__आणि__तो... - 12

भाग__ १२

बघता बघता रणजीत राधाचा साखरपुडयाचा दिवस उजाडला.....सगळ्यांची लगबग चालू होती....मोठ्या हॉलवर सगळ आयोजन केल होत...फुलांची सजावट होती...गाणी वाजत होते....हळूहळू राधाचा सगळा मित्रपरिवार आणि नातेवाईक येऊ लागले....काहीवेळाने रणजीत आणि त्याची फॅमिली आली...राधाच्या घरच्यानी त्यांचे स्वागत केले...!!



साखरपुडयात आलेल्या सगळ्या मूली रणजीतकड़े बघतच बसल्या....कारण रणजीत आज अगदीच हैण्डसम दिसत होता.....आज त्याने न्यू डिजाइनची व्हाइट गोल्डन शेरवानी घातली होती....त्यातून त्याची बॉडी चांगली दिसून येत होती....केस सेट केली होती....हातात सोन्याचे ब्रेस्लेट होते...!!


*****************************



रुता__ जीतू काका....मला राधा काकू कड़े जायच आहे...



रणजीत__ रुतु आता नाही....अग काकू येईल बग....थांब न थोड़....



रुता__ नाही आता....😢



रणजीत__ हो बाबू तू रडू नको थांब....
(आवाज देत)......आ वैदेही.....एक मिनिट ये ना....



वैदेही__ हा रणजीत जीजू काय झाल....?



रणजीत__ अग रुता मागेच लागले....राधाकडे घेऊन जातेस का तिला जरा....



वैदेही__ हो जाते ना.....
(रुताला घेत).......ये बबडू राधा काकुकड़े जाऊ ह...



रुता__ (तिच्याकडे जात)........हा....बाय काका....



रणजीत__ हो बच्चा बाय!!!



रम्या__ बबडू ना राधामुळे खुप खुश असते....हो न आई...खर राधा खुप चांगली आहे....



माधवी__ हो ना.....खर आपला जीत भाग्यवान आहे...जस राहुल आहे तस....☺️



रम्या__ हो....



वैदु रुताला घेऊन मेकअप रूममध्ये जाते.....रुताला पाहुन राधा खुप खुश होते....!!



रुता__ (तिच्याकडे पळत जात).......राधू काकी...



राधा__ (तिला जवळ घेत).....अरे माझा बच्चा....माय लव्ह...😘😘खुप मिस केल तुला...



रुता__ मी पण केल तुला खुप मिश....



राधा__ हो ग राणी माझी....😘


******************************



रणजीत मंडपात बसला...सगळे आता राधाची वाट पाहत होते....काहीवेळाने राधा आली...आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर रोखल्या गेल्या.....तिने आज अबोली रंगाची घागरा चोली घातली होती...त्यावर जाळीदार आणि नाजुक मोती असलेली ओढ़नी पांघरलेली...त्यातून तिची नाजुक कंबर लपछपी करत होती....कमरेला सोनसांखली अजुन आकर्षक वाटत होती....गोरया हातावर काढलेली मेहंदी...त्यावर हिरवा चूड़ा....घुंगरूने भरलेले पैंजन वेगळेच माहोल बनवत होती....कानात खडयांचे झुमके....गळ्यात नाजुक हार....ओठांवर हलकिशी लिपस्टिक....स्माईल तर किल्लर होतीच तिची....आज पुन्हा रणजीत तिच्या सौंदर्यला भुलला...तो तिलाच पाहत बसला...!!


काहीवेळाने तो भानावर आला...आणि मंत्रउच्चार सुरु झाले....मग रणजीत राधाने एकमेकांना अंगठी घातली....तसे सगळे टाळ्या वाजवू लागले....त्यांना शुभेच्छा देऊ लागले....दोघेही तसे थोड़े का असेना मनातून आनंदी झाले....मग राधाचा ग्रूप आला त्यांनी फोटो काढले....मग त्यांचे फोटोज काढले गेले...☺️झाल सगळा कार्यक्रम उरकला....पाहुने मंडळी त्यांच्या घरी गेली....साखरपेकर फॅमिली सुद्धा निरोप घेऊन...त्यांच्या घरी गेली....राधाची फॅमिली ही घरी आली.....


*****************************


【रणजीतच्या घरी......】



रणजीत त्याच्या बालकनीमध्ये उभा होता....थंड गार वारा चालू होता....छान वातावरण झाल होत...म्हणून तो बालकनीमध्ये उभा राहून कॉफी पीत बसला होता....



रणजीत__ (मनात)......का मी सारख रेडिओ कड़े ओढला जातो....म्हणजे सुरुवातीला अस कधी जानवल नाही...आता तिला पाहिले ना की हृदय जोरात धड़धड़त माझ का कुणास ठाऊक....हीच प्रेमाची सुरवात आहे का????



रणजीत तसाच विचार करत असतो....आज त्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला...म्हणजे प्रेमाची सुरवात झाली नाही का....☺️


**************************


आता हळूहळू दिवस जात होते....रणजीत राधाच्या लग्नची तारीख आता २ दिवसावर आली होती....



आज हलदीचा कार्यकम होता....राधाचे सगळे पाहुने जमले होते...नाचगाण चालू होत....रणजीतची उष्टि हळद आली आणि सगळ्यानी राधाला हळद लावली....तीच औक्षण केल....!!



सगळे नाचत होते....त्यात राधाही शामिल झाली....तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मनोहर आणि मालती यांच्या डोळ्यात अश्रु आले....!!



राधा__ आई बाबा....काय झाल....



मनोहर__ अग काही नाही....असच जरा मन भरून आल...



मालती__ हो...



राधा__ (रडत)........मला माहित आहे उद्या लग्न आहे न माझ म्हणून तुम्ही रडत आहात....



मनोहर__ फुलपाखरा अग रडू नकोस...आमच काय ग...रडू तर येणार एकुलती एक आहेस आमची...मी तुला फुलपाखरू बोलतो कारण तू नाजुक,कोमल,निर्मळ अन सुंदर मनाची आहेस...म्हणून....बाळा...आता तिकडे गेलीस की सगळ्यांना असच जप ह्म्म्म



मालती__ हो...तशी माझी राधा हुशार आहेच सगळ नीट करेल...आपल्याला खाली मांन घालु देणार नाही ति...हो न...



राधा__ हो😢😢आणि तुम्ही पण रडू नका....वाटेल तेव्हा मला भेटायला या....नाहीतर मी येत जाइन....



मनोहर__ बर बाई....😢☺️



राधा तिच्या आई बाबाना मीठी मारून खुप रड़ते....हा क्षण असतोच असा...नाजुक..... आई आणि वडील यांनी लाड़ाने वाढवलेल्या लेकीला अस लग्न करून दुसऱ्यांच्या घरी पाठवून देंन....खरच काळजावर दगड ठेवून आई वडील हे करतात....हा क्षण प्रत्येका मुलीच्या आयुष्यात येतो.....!!


**************************


रणजीतच्या घरी सुद्धा मस्त नाचगाण चालू होत....सगळा घर पाहून्यानी भरला होता.....पण रणजीत एका कोपरयात उभा राहून विचारात गुंतलेला....



राहुल__ (मागून येत)......जीतू काय रे कसला विचार करतोयस....? आज तुझी हळद आहे बाहेर सगळे आनंदी आहेत तू नाहीस का????



रणजीत__ नाही दादा तस काही नाही....आनंदी मी आहे पण थोड़ अस बर्डन आलय.....



राहुल__ हम्म्म्म समजू शकतो मी....



सदाशिव...महेश__ (एका सुरात).....आणि आम्ही सुद्धा.....



रणजीत__ अरे बाबा....काका....



महेश__ जीतू तुला वाटनारी भिति साहजिक आहे...तुमची आताची जनरेशनच तशी आहे....खुप विचार करणारी...



सदाशिव__ हो...पण जीत आम्ही आता काय सांगतोय नीट ऐक....आता तुझ लग्न होतय...ती मुलगी सगळ सोडून तुझ्यासोबत इकडे येणारे....तिची जबाबदारी आता तुझ्यावर आहे जीतू....



महेश__ हो...अरे आंपल्या घरातल्या सगळ्या बायका राधाला मस्त संभालतील...पन नवरा म्हणून तुझा स्पोर्ट तिच्या मागे कायम ठेव....तुमचा अरेंज मैरिज आहे...म्हणून मैत्री कर राधाशी...हळूहळू प्रेम ही होइल....



राहुल__ हो जीतू....मूली आपल घर सोडून येतात...दुसऱ्या घरी राहतात तिकड़च राहनिमान...पध्दती काही माहित नसत तरी त्या अजेस्ट करतात...आंपल्या नवरयासाठीच ना...मग तुझी पण जबाबदारी आहे की ति नेहमी आनंदी राहिली पाहिजे....तिला तुझी गरज असेल तेव्हा तू तिच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे....आणि हो थोड़ा वेळ बायको साठी कढायला शिक आता....😀



रणजीत__ हो तुम्ही सगळे बोलताय तस करेन😀



राहुल__ चल आता...डान्स करूया....



रणजीत__ दादा..प्लीज....



राहुल__ ओके...सॉरी बाबा..आम्ही नाचतो..



रणजीत__ ह्म्म्म....



मग जाउन सगळे मस्त डान्स करतात....रणजीत मात्र एका कोपरयात उभा राहून बघत असतो...☺️





क्रमशः


{ खरच,लग्न हा क्षण मुलगा आणि मुलगी साठी किती नाजुक असतो ना...म्हणजे लग्न अरेंज मैरेज असो वा लव्ह...पण त्यावेळी दड़पन दोगाना येत...आपल्याला वाटत मुलांच काय...मुलींना खर तर खुप कराव लागत..हो मान्य आहे पन मुलांना सुद्धा कमी कष्ट नसतात...हा आता सगळ्या मूली आणि मूल सारखे नसतात..पन जे विचारु असतात ते नेहमी यावेळी विचार करतात कारण लग्न म्हणजे जबाबदारी असते... Commitment असते...आयुष्यभराची Commitment....जी निभावता आली पाहिजे प्रेमाने,प्रामाणिकपने,विश्वासाने...हा भाग थोड़ा कमीच लिहिलाय... समजून घ्या😃...}




©प्रतिक्षा__♥️🥀