Tujhach me an majhich tu..28 books and stories free download online pdf in Marathi

तुझाच मी अन माझीच तू...भाग २८

तुझाच मी अन माझीच तू...भाग २८

रायन आणि राजस दोघांना एकमेकांविषयी तशी चीड होतीच आणि दोघांचे संबंध सुधारतील अशी कोणतीही आशा नव्हतीच... राजस ला का कोणास ठाऊक पण रायन बद्दल अजिबात खात्री वाटायची नाही.. हे मे बी भूतकाळात झालेल्या प्रकारामुळे असेल पण आता राजस ला रायन च्या मनात अढी निर्माण झाली होती.. एक प्रकारची खुन्नसच.. त्यामुळे राजस रायन वर लक्ष ठेऊन असायचा... आता राजस ला अंदाज आलाच होता की रायन च्या डोक्यात काहीतरी शिजतंय.. राजस च्या लक्षात आलं रायन जिथून बाहेर आला तिथे कोणालाही जायला परवानगी नसते.. तरी रायन तिथे जाऊन आला. रायन जिथून आला तिथे सगळी कॉंफीडेनशियल माहिती ठेवलेली असते हे राजस जाणून होता पण राजस तिथे कधी गेला नव्हता. त्याची उत्सुकता चाळवली गेली.

"इथे जायची काय गरज पडली रायन ला? इथे तर कोणालाही जाता येत नाही... तरी रायन इथे का गेला?" राजस च्या मनात विचार चमकून गेला.. आणि त्याने सोक्ष मोक्ष लावायचा विचार केला..

तो आत जायला लागला पण त्याला एका माणसाने अडवले..

"कहा?"

"अंदर कुछ काम है.."

"अंदर जाना मना है..." तिथे काम करणारा माणूस जरा वैतागलाच.. तिथे आधी कोणी फिरकायचं नाही आणि आज काहीतरी वेगळंच होतंय ही गोष्ट त्या माणसाला रुचली नव्हती, "जाके अपना काम करो.." तो माणूस खेकसला..

"भैया, जाता हु.. अभी एक बंदा यहा क्या करने आय था कुछ मालूम है?"

"वोह.. उसको किसीकी जानकारी चाहिये थी.."

"तो उस्से अंदर जाने दिया..किसकी जानकारी चाहिये थी?"

'किसकी जानकारी चाहिये थी ये कुछ पता नाही.. और जाओ अभी जाओ यहासे.... किसीको पता चला तो मेरी नोकरी जाएगी...तुम जाओ.. प्लीज!" त्या माणसाने आर्जव केली आणि इथे काही माहिती मिळणार नाही ह्याची खात्री राजस ला झाली...

"ठीक ह.. और चिंता मत करो.. मै किसीको कुछ नही बोलुंगा.." इतक बोलून राजस तिथून बाहेर पडला पण राजस थोडा अस्वस्थ झाला होता. रायन च्या मनात काय चालूये. त्याने कोणाची माहिती काढली ह्याचा राजस ला काहीच पत्ता लागला नव्हता... राजस विचार करत त्याच्या डेस्क पाशी आला.. त्याने त्याचा लॅपटॉप चालू केला.. काम आहे का ते चेक केलं आणि थोड काम करायचं होत..

"च्यायला...काम काम काम! जरा म्हणून निवांत वेळ मिळत नाही.." राजस चं डोक जरा फिरलं होत.. आधीच रायन ने काय केलं आणि आता काय करणार आहे ह्याचा अंदाज राजस ला येत नव्हता त्यात काम पाहून त्याच डोकं फिरणारच होतं.. त्याने आजूबाजूला नजर फिरवली.. रायन त्याच्या डेस्क वर नव्हता.. सो आता काहीच कळणार नव्हत.. मग तो मुकाट्याने काम करायला लागला.. प्रमोशन टाईम जवळ आलेला सो काम टाळून पण त्याला चालणार नव्हत. मनाविरुद्ध पण राजस ने कामात लक्ष वळवल.. तितक्यात त्याच्या मनात विचार चमकून गेला..

"रायन ने आभाची माहिती तर काढली नसेल न? माहिती काढली असेल तर पुढे काय करेल?" आभा च्या मनात विचारचक्र चालू झाले.. एक नाही, २ नाही.. असंख्य विचार त्याच्या मनामध्ये गर्दी करायला लागले आणि ह्या विचारांनी तो भलतच अस्वस्थ झाला.. त्याच्या मनात वाईट विचार यायला लागले.. तो जागेवरून उठला.. परत बसला.. राजस ला काय करावे हे कळतच नव्हते. राजस ने दीर्घ श्वास घेतला.. त्याच्या मनातली विचारांची गर्दी थोडी कमी झाली.. आणि त्याचा विचार शेवटी ह्या मुद्द्यावर थांबला, "माहिती काढली म्हणून काय झालं.. आभा इतकीही काही बावळट आणि लेचीपेची वाटत नाही..आणि आता रायन ची जास्ती काही करण्याची हिम्मत पण होणार नाही.. सो नथिंग टू वरी!! आणि मी का उगाच स्ट्रेस घेतोय..?" राजस ने स्वतःची समजूत काढली.. त्याचा ताण जरा हलका झाला.. आता त्याला एक गोष्ट कळली होती की त्याला काहीच करता येणार नाहीये.. राजस ने ही गोष्ट मान्य केली आणि गपगुमान कामाला लागला..

रायन तर त्याला हवं ते मिळवून खुश झाला होता. तो ऑफिस मधून बाहेर पडला.. गाडीत बसला आणि त्याने त्याचा मोबाईल काढला.. आणि आभा चा नंबर काढला.. त्याने जरा विचार केला.. मेसेज करावा का डायरेक्ट कॉल? थोडा विचार करून त्याने आभा च्या नावा पुढच्या कॉल वर क्लिक केले. रिंग वाजत होती पण आभा फोन उचलत नव्हती.. तो जरा वैतागलाच.. त्याने परत एकदा कॉल केला.. तेव्हा सुद्धा आभा ने फोन उचलला नाही. "मी इतके कष्ट करून आभा चा नंबर मिळवला पण आभा फोन का उचलत नाहीये.." त्याने परत फोन लावला आणि ह्यावेळी फोन एंगेज लागला.. मग रायन ने मोबाईल समोर ठेऊन दिला.. आणि गाणी लावली.. रायन आज आभा ला भेटल्याशिवाय घरी जाणार नव्हता त्यामुळे त्याला कसलीही घाई नव्हती.. तो शांत डोळे मिटून बसून राहिला.. त्याच्या मनाट आता फक्त आभा होती. एखादी गोष्ट आवडली की ती मिळवेपर्यंत त्याला शांत वाटायचं नाही.. ती वस्तू असो किंवा जिवंत माणूस.. रायन ला वाटल की ते झालंच पाहिजे अश्या विचारच्या तो होता.

त्याला खात्री होती की आज त्याची आणि आभा ची भेट ही होणार तर आहेच..रायन मनात विचार करायला लागला.. कोणती कॉफी ऑर्डर करायची आभा साठी? आणि तिच्याशी काय बोलायचं ह्या बद्दल चे त्याचे प्लानिंग चालू झाले.. त्याच्या चेहऱ्यावर मधेच हसू येत होते.. त्याने मोबाईल चेक केला.. पण आभा कडून उलटा फोन काही आला नव्हता.. त्याने आभा ला परत फोन लावला.. रिंग वाजत होती... ट्रिंग ट्रिंग... २ -३ रिंग वाजल्या आणि समोरून आवाज आला..

"कोण आहे...? फोन उचलत नाही म्हणजे बिझी असेल इतक कळत नाही का?" आभा फोन उचलल्या उचलल्या झापायला लागली... आभा चे बोलणे ऐकून रायन ला ला रागच आला.. त्याच्याशी अश्या टोन मध्ये कोणी बोललेल त्याला आवडायचं नाही. तो लगेच चिडायचा पण समोर फोन वर आभा होती. आभा वर त्याला चिडून चालणार नव्हत..

"ओह सॉरी!.."

"ठीके..पण कोण आहे ते तर सांग... आणि काय काम आहे? क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी साठी फोन केला असेल तर मला ह्यातलं काही नकोय.. पुन्हा प्लीज फोन करू नका.." आभा रायन ला उडवायच्या भाषेत बोलली.. आणि ह्यावेळी रायन ला राग आला नाही.. तर रायन ला हसू आले.

"नो नो आभा..." रायन ने आभा चे नाव घेतले आणि आभा एकदम चिडलीच...

"माझं नाव कसं घेतलं?" आभा चिडून बोलली..

"अग आभा चिल... मी रायन!! तू ccd मध्ये भेटू म्हणालीस पण वेळ, कोणत ccd काहीच सांगितल नाहीस. मग भेटणार तर कुठे भेटणार... सो विचार केला, तुला फोन करून विचारू.. सॉरी म्हणजे.. आधी मेसेज करायला हाव होता मी.. माझच चुकल.." रायन इतका बोलला आणि शांत झाला. आणि आभा ला मात्र हसू यायला लागले.. रायन चे हे वागणे पाहून आभा अधिकच इम्प्रेस झाली होती आणि रायन हे नक्की माहिती होते की आभा थोडी शॉक होणार.. रायन चा स्वतःचा फार अभिमान वाटत होता.. पण सध्या त्याला आभा ची प्रतिक्रिया पाहण्यात जास्ती रस होता.

क्रमशः...