Mya Paaylenl gaao - 1 books and stories free download online pdf in Marathi

म्या पायलेलं गाव- भाग 1

*म्या पायलेलं गाव*
अधून मधून सुट्टेच्यान गावागावैले फिऱ्याचा बेत निंगुन ये. कधी बाबासोबत त कधी आबासोबत निंगे. आतालोक त माये वीस पंचवीस गावं फिरून बी झाले अस्तिन. म्हणून मंग कोन्या गावाले जायाचं म्हंतल की माया भोकावर लय ये..पन काय करनार आबा अन बाबा यैच्या पुळे आपली कुटी चालते.. शेवटी इच्चा असो नसो तरी जाच लागे. खेडगाव म्हंतलं की ते मंग पार तिसक किलोमीटर ये. अन जा बी लागे त फटफटीनच, त्यात आबांच्या मानीले होती बिमारी त्यानं आजूकच आरामानं चालवा लागे...

चाल्ले मंग या रस्त्यानं त्या रस्त्यानं, इकून इकुन कलवा घे तिकून कलवा घे करत, आखरी पस्तीसक किलोमीटरच अंतर झेलून झाल्यावर आमी गावाच्या फाट्यावर पोहचलो..या गावात तशे जास्त लोकं रायत नव्हते, काऊन त म्हने धंद्यासाठी अर्धे शहराईकडे पयाले होते. अरे हाव या गावात आमाले एकाच्या घरी पंगत होती. हे रायलच होतं सांग्याचं. पण त्या मानसाचं नाव काई आता माया ध्यान्यात नाई. या गावाले पोचता पोचता आमीनं चार-पाच खेडे मांगे टाकले होते. या गावाच्या सुरुवातलेच एक मोठ्ठालं बोर्ड लावेल होतं! काय त स्वागताचं ..
अरे हाव या गावाचं नाव त सांग्याचच रायलं. मी सांगल नाई अन तुमीन बी इचारलं नाई...सोरी सोरी सांगतो नाव. या गावाचं नाव होतं "गचकखेड" या गावाचं नाव अस काऊन त ते मी तुमाले पुळे सांगतोच.. आता जरा मले दम घेउ द्या....

या गावाचा बाजार इतवारी नेमानं भरे. गावातले भाईरचे, व्यापारी गावात युन ठेले लावत. अन घोर असा की जेव्याच्या परोग्राम बी इतवारीच ठेवलता..मंग काय लोकैची जेव्याले तुफान गर्दी अशीन अस मले वाटून रायलं होत..
त्यात कोन ओयखीचं अन कोन पायखीचं, कशाचं काई माईत पळते ! गावाच्या मेन गेट वर आल्यावर आमले रस्ता काई सुचेच ना. मंग आमीनं एका मानसाले इचारला. त्यानं सांगेल पत्ता आमाले काई सुचलाच नाई..आमी दोगबी हँग झालतो. तो म्हने "हे पा राजेहो मले यैचं घर काई नक्की मालूम नाई. तरी सांगूनच देतो, आईका अटून शिदेच जाजा, मंग उसक पुढे गेलं की तुमाले *धाराकुशे महाराजाचं मंदिर* दिशीन तटी तुमी पाया लागून घेजा. ते झाल्यावर तुमाले एकाच रस्त्याचे तीन फाटे फुटेल दिस्तीन. त्यातला एकच रस्ता यैच्या घरी जाते. अन बाकीच्या रसत्येतला एक रस्त्या सरपंचाच्या घरी जाते.अन एक ढोकनीत जाते. मंदातला रस्त्या तुमी पकळजा... म्हनजे तुमी यैच्या घरी जासान. मंग उसक अजून शिदं गेलं की तुमी एका चौफुल्लीवर पोहचसान.. तटी एक रस्त्या हाय पन त्यानं जाऊ नका.. त्याच चौफुल्लीवर उंबराच्या झाळा खाली काय *रिकामचोट बुडेबाडे* बशेल दिस्तीनंच. तैले विचारून घेजा तुमाले ते दुसरा रस्ता दाखोतीनच त्यानं पुळे निंगजा..मंग एकदा जेवन्या हातानं कलजा अन एकदा डाकोऱ्या हातानं कलजा.. तुमाले यैचं घर डायरेक दिशीन! आज प्रोग्रॅम हाय त मोठा मंडप ठोकेल हाय तटी तुमाले ते दिसूनच जाईन." येवढं आईकून त माया डोकश्यानं काम करनच बंद केलं. तरी काई करून त्याले ठिकानावर आनलं. मंग त्याले मीनं विचारलं."तुमाले नाई का जेव्याचं आमंत्रन." तो म्हने "हाव हाय ना आता येतोच दुपारच्या पायरीनं" मंग त्याले आमीनं रामराम केला, अन आमी त्या रस्त्यानं निंगलो. जो त्यानं सांगला होता.
त्या गावाबद्दल काई सांग्या सारखं असन त म्हनजे, या गावाले चारी साईडनं हिरव्यागार जंगला टाईप झाडाईनं घेरून घेल होतं. जिकडे पायलं तिकडे हिरवे झाडचं दिसत होते. ढोरं ढारं बी लय दिसत होते. अर्धा रस्तातं शेनांनच भरेल होता. आखरी जटी जायचं होतं. झामलत झामलत तटी पोचून गेलो. जाताच लोकैची तुफ्फान गर्दी पाहून मी तं हबच्याकच झालतो. आमालेतं वाटलं आता जा लागते वापस आप्ला नंबर काय लागत नाई. पन आबानं पुढे नेलं, गाडी लावली, मंडपात गेलो, काई दा-बारा जनं ओयकीचे दिसले. तैले भेटून पंगता उठयाची वाट पायात बसलो. आखरी पाच स्सा पंगती उठल्यावर तवा कुटी आमचा नंबर लागला. म्हतल जमलं भो आता! पंगतीत जेवायची कोनचीच कसर सोळली नाई. *येकन येक आयटम दाबू दाबू खाल्ला.* जेवल्यावर मंदिरात अजून एकदा पाया लागून आलो. मंग मंदात कुकुन तं, बाजारात जायाचं आबानं ठरवलं. आता काय आबानं म्हतल्यावर जाच लागीन न भो. *मंग काय हुच द्या म्हतलं आज थंडी..*
गाव लायनच होतं, त बाजारबी लायनाच होता. अर्दा बाजार पाऊन झाला होता. तरी इकुन तिकळे अन तिकून इकळे येर झाऱ्या मारन चालूच होत्या. काऊन त गप्पच तेवळ्या रंगेल होत्या, मी सांगो आबा आपन इकुन युन गेलो. तरी आबा कायचे आईकतात. मंग म्हंतल आता बोल्याचच नाई. जे हुईन ते हुन जाऊद्या.
अन तेवळ्यात मले दिसली खव्व्याची ताजी ताजी जिलब्बी. मंग काय मायाच्यान रायेचना, म्या म्हंतलं आबाले मले पायजेच किलोभर देता का घेऊन..देल्ली बा घेऊन. आज इतके कशेच काय मेरबान झाले त काय माईत. चालू मंग तटीच खानं. *काय लागे राजेहो रे, तुमाले कायच सांगू. आता तुमि असता त दुकानच पुरं खल्लास केलं असत.* मी येकटाच होतो म्हनून वाचलं ते दुकान. खाऊन झाल्यावर उसक पुळे निंगलो त *लायने लायने पोट्टे घोयकाकरून काचंड्या गोया खेउन रायलते.* मले ख्या वाटे पन काय करनार. आपुन घरी थोडीच होतो आपल्याले ख्याले भेटीन त. फिरता फिरता पुरा दिवस निंगुन चालला होता. म्हंतल करा लागते क्काय मुक्काम. पन त्याच काई काम पडलं नाई.
आजचा दिवस कसा गेला तेच समजून नव्हतं रायलं. एकतं पयलेच जीवार आल्त. तरी आलो. मंग जिल्लबी दिसल्यावर माय मन चांगलंच फुलून आल्त. मंग तवा पासून वाटे चांगलं केलं आपन या गावात आलो त. या गावाचा इकास काय बरोबर झालताच नव्हता. चालताना रस्त्यात गड्डे हाय की गड्डेइत रस्ते हायेत, हेच समजेना.. अन हेच कारन होत की ह्या गावचं नाव *गचकखेड* कउन पळलं होत त...
पन काई असो अशी मजा पयल्यांदाच आल्ती.
अजून एकदा चानस भेटला तं मी पयले इन. आता लय टाइम झाल्ता, आखरी आबांनच म्हंतल, चाल बाबू. मंग काय तैच्या मर्जीचा मी रखवालीच. काळली गाडी. बसले आबा. मांगचाइले रामराम करून निंगलो मंग आमी.
येक दीड तासान घरी पोचलो.भल्या रंगांनं मिनं माया आइले अन बाबाले गावातली गोष्ट सांगतली. जेवन केलं अन पलंगावर मस्त उताना झालो..

अस होतं मंग ते *"म्या पायलेलं गाव".* गेलो कसा अन आलो कसा. पन एक गोष्ट हाय खेळयातलं जीवन लयच भारी असते. मले त लय आवळलं. म्हातारपनात खेळयातच रायाचा इआर हाय आपला..

आता तुमी पा तुमाले कुटी रायाचं त..

येतो मंग

राम राम....



(टीप:- सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन असून, कथेचा कुठलाही भाग प्रकाशित करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे अनिवार्य...)

मयुर श्री बेलोकार

9503664664

Insta@shabd_premi