lahan pn dega deva - 9 books and stories free download online pdf in Marathi

लहान पण देगा देवा - 9

भाग ९

प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते आपल्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, उत्तम शिक्षण घेतले पाहिजे, सगळ्यांना नीट जपले पाहिजे, पण एक वेळ निघून गेली कि ते पण विसरतात कि हीच स्वप्न आपल्या आई वडिलांनी देखील पाहिलेली असतात, आणि आपण काय करतो तर सगळं संपून टाकतो छोट्या स्वार्था साठी, आपला संसार त्यांना खूप मोठा वाटतो, पण तोच संसार उभा करून देण्यासाठी आपल्या आई वडिलांनी किती कष्ट केलेले असतात, जो पर्यंत मी ते जसे वागले तसा वागत नाही तो पर्यंत काहीच बदलणार नाही, आणि आज जर मी हे पाऊल नाही उचललं तर माझा भविष्यकाळ देखील असाच असेल, आणि जर मी हे बदलण्याचा प्रयत्न नाही केला तर कदाचित आज ज्या ठिकाणी आई बाबा उभे आहेत तिथे मी उभा असेल.

झोपूया आता उद्या सकाळी उठल्यावर खूप काम आहे पहिलं मला साक्षी ला हे सगळं सांगायचं आहे मला तिच्या मदतीची खूप आवश्यकता आहे.

(दुसऱ्या दिवशी सकाळी)

अथर्व- आजोबा मी पटकन साक्षी कडे जाऊन येतो, मी आलो कि आपण थोड्या वेळ बसू तुम्ही मला इथे असलेल्या मोठमोठ्या कंपनी ची माहिती द्या मग मी तिथे जॉब साठी apply करतो, येतो मी.

(अथर्व निघून जातो)

आजोबा- अगं रमा हा बघ काय बोलून गेला, मला वाटलं सकाळी उठल्यावर विसरला असेल, पण हा तर नोकरी शोधण्याच्या तयारीत आहे. काल जे काही बोलला ते सगळं खरं आहे ग.

रमा- मी तर कालच बोलले होते तुम्हाला , तर तुम्हाला वाटलं त्याच्या लहानपणीच्या सवयी नुसार तो वागला असेल, रात्री हट्ट करायचा आणि सकाळी उठलं कि विसरायचं, पण आता तो मोठा झाला आहे आपण चुकलो त्याच्या बोलण्याला असं टाळायला नव्हतं पाहिजे, आता काय करायचं ?

आजोबा- मला वाटत आपण दादा ला फोन करू, त्याला सांगू त्याचा लेक काय म्हणतो आहे ते.

रमा- अहो थांबा, एकदा परत बोलूया त्याच्याशी मग फोन करा. त्याच्या डोक्यात काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू.

(साक्षी च्या घरी)

अथर्व- साक्षी कुठे आहेस तू, मी आजोबाना सगळं सांगितलं, आता आपल्याला सगळी प्लांनिंग करायला हवी. मला नोकरी पण शोधायची आहे. तुझी खूप मदत लागणार आहे मला.

साक्षी- (दोन मिनिटे शांत त्याच्या कडे पाहत) तू खरंच बोललास ? त्यावर आजी आजोबा काहीच नाही बोलले का रे, कस शक्य आहे कि तू एवढी मोठी गोष्ट सांगितल्यावर ते काही न बोलता तयार झाले, तू गंमत नाही ना करत आहेस ?

अथर्व- नाही ग, उलट आता येताना पण आजोबाना म्हणालो मी आलो कि बसून माझ्या जॉब साठी मला आपल्या आसपास असलेल्या कंपनी ची माहिती द्या !!!!!

साक्षी- एक मिनिट अथर्व, म्हणजे तू फक्त बोलला आहेस, त्यावर त्या दोघांचे काय मत आहे हे तू विचारले नाहीस आणि ते जाणून घ्याचा देखील प्रयत्न केला नाहीस बरोबर ???

अथर्व- अगदी बरोबर, मला जाणून घ्याचंच नव्हतं.

साक्षी- अरे काही काय त्यांचं मत खूप महत्वाचं आहे रे या सगळ्यात .

अथर्व- साक्षी त्यांचं फक्त मत नाही ते दोघे देखील खूप महत्वाचे आहेत मला माझ्या प्रत्येक गोष्टी मध्ये.

पण जर त्यांचे मत मी जाणून घेतले तर ते मला यातील काही देखील करून देणार नाही, यात देखील ते आई बाबाना काय वाटेल याचा विचार करतील, आणि मला ते होऊन द्यायचं नाही ये. यात फक्त महत्वाचं असेल ते म्हणजे फक्त आजी आणि आजोबा आणि त्यानं मिळणार आनंद.

साक्षी- अथर्व तुझ्या भावना मला समजतात, पण जर हे सगळं तुझ्या आधी आजोबानी तुझ्या आई वडिलांना फोन करून सांगितलं तर मग ?

अथर्व- नाही सांगणार ते, मला माहित आहे, ते असं काही करत नाहीत ज्यामुळे त्यांच्या मुलांना थोडा देखील त्रास होईल. एक वेळ ते सर्व त्रास सहन करतील पण ते काही त्यांना सांगणार नाहीत, कमीत कमी तोपर्यंत तरी नाही जोपर्यंत माझ्याशी परत एकदा नीट चर्चा करत नाहीत. त्यामुळे आता चर्चा वाढण्या आधी तू मला येथील कंपनी ची माहित दे, जेव्हा आजोबा सोबत बसेल तेव्हा डायरेक्ट interview ला जायचं आहे असच फायनल करता येईल मला.

साक्षी- जशी तुझी इच्छा !!!!!!