ATRANGIRE EK PREM KATHA - 4 books and stories free download online pdf in Marathi

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 4

वृषभ आणि टॉनी हळुहळु रागातच पुढे येऊ लागले..


"गाईज Whats Happend??" शौर्य मागे जातच विचारू लागला..


"तु आमच्यापासुन एवढी मोठी गोष्ट का लपवलीस??" टॉनी पुढे जात विचारू लागला..


"कोणती गोष्ट?? एक मिनिट तुम्ही नीट काय ते बोलाना यार अस कोड्यात बोलल्यावर मला कस कळेल."


तस वृषभ आणि टॉनी एकमेकांना टाळी मारतच हसु लागले.


वृषभ : "अरे मस्ती करतोय आम्ही काय तु लगेच घाबरतोस.."


शौर्य : तुम्ही लोक अस दरवाजा लावुन रागातच बघायला लागले मग घाबरणारच ना..


टॉनी : "पण सकाळी दोघांचं काय चालु होत रे??"


वृषभ : "हो ना आणि केंटिंगमध्ये सुद्धा??"


राज : "अरे ह्यालाना समी.."


शौर्य पळतच राजच तोंड बंद करतो..


राज तुझा गैरसमज आहे यार अस काही नाही.


राज : "माझा काहीही गैरसमज नाही.. तुला आवडते ती."


(राज शौर्यचा तोंडावरील हात बाजूला काढतच बोलु लागला


वृषभ : "कोण??"


टॉनी : "अरे समीरा असणार.. बरोबर ना राज.."


राज : "क्या पेहचाना बॉस...यु आर ग्रेट."


शौर्य : "एक मिनिट अस काही नाही.."


टॉनी : "नशिब तस काही नाही ते. तस पण She have boyfreind... "


"काय?? खरच.. ??" शौर्य एकदम सिरीयस होत बोलला


वृषभ : "हो..पण तु का एवढं तोंड पाडतोयस. तस काही नाही ना..?"


शौर्य : "मी कश्याला तोंड पाडु.. मी जातो माझ्या रूममध्ये बाय..


शौर्य नाराज होतच तिथुन जाऊ लागला..


टॉनी : "अरे शौर्य मी मगासालच्या सेंटन्समध्येना will लावायला विसरलोच बघ.."


टॉनीच बोलणं वरच्यावर ऐकत "हम्म बाय"..एवढं बोलत शौर्य दरवाजा उघडून बाहेर गेला.


टॉनी, राज आणि वृषभ एकदम सिरीयस होऊन दरवाज्याकडे बघु लागले.


तसा शौर्य पुन्हा दरवाजा उघडुन थोडं गंभीर चेहरा करत पुन्हा आत आला..


"म्हणजे ??" शौर्यने विचारलं..


टॉनी : "म्हणजे she will... have boyfreind.. "


शौर्य : "ओहहह म्हणजे तिचा कोणी बॉयफ्रेंड नाही."


वृषभ : "नाही..पण तु का एवढं विचारतोयस??"


शौर्य : "सहजच.. "


टॉनी : "म्हणजे तुला ती आवडत नाही??"


शौर्य : "नाही.."


वृषभ : "नक्की???"


मी माझ्या रूममध्ये जातो.. बाय..


वृषभच्या प्रश्नाचं उत्तर न देताच शौर्य जाऊ लागला. तस तिघांनी एकमेकांना काही इशारे केले.


वृषभने पाठून त्याला खेचतच बेडवर झोपवलं. एकीकडुन टॉनीने आणि एकीकडुन वृषभने त्याला पकडलं..


शौर्य : "काय झालं??"


वृषभ : "राज जो पर्यंत हा कबूल नाहीना करत ना समीरावर ह्याच प्रेम आहे तो पर्यंत तु गुदगुल्या करतच रहा."


शौर्य : "राज नाही... अरे तुम्ही लोक समजताय तस काही नाही रे. गैरसमज झालाय तुमचा.."


टॉनी : "राज तु हो जा शुरू.."


राज त्याच्या पोटात गुडगुदल्या करू लागला.


"राज प्लिज स्टॉप ना यार.." शौर्य अक्षरशः हसतच त्याला सांगत होता.


पण दोघांनीही घट्ट पकडुन ठेवल्याने शौर्यला राजला गुदगुल्या करण्यापासुन कोणीही थांबवु शकत नव्हत.


वृषभ : "पहिलं आधी खर सांग तुला आवडते ना ती मगच आम्ही थांबु.."


शौर्य : हो आवडते पण प्लिज थांबावाणा यार. प्लिज....


तसे तिघजण थांबली..


शौर्य तसाच बेडवर पळुन अति हसण्याने आलेलं डोळ्यांतील पाणी पुसू लागला आणि जोर जोरात श्वास घेऊ लागला.


वृषभ : "सो मिस्टर शौर्य तुम्हाला कळलंच असेल की आमच्यापासून काहीच लपुन तस रहात नाही."


"कळलं बाबा कळलं.." शौर्य दोन्ही हात जोडून बोलला.


टॉनी : "सरळ सांगितलं असत तर ही वेळच आली नसती ना तुझ्यावर."


राज : "नाही तर काय?? एवढं काय लपवायच त्यात."


शौर्य : "मी लपवणार नव्हतो पण माझं मलाच नाही कळत ती मला नक्की आवडते का?? आय मीन तशी आवडते मला पण तिलासुद्धा मी आवडायला हवा ना. "


टॉनी : "हम्म ते पण आहे..बट डोन्ट वरी आवडतच असशील तिला."


शौर्य : "गॉड नोज.."


"बाय दि वे.. ही कितवी??" वृषभ मस्तीच्या सुरात बोलु लागला.


शौर्य : "कितवी म्हणजे?? प्रेम एकदाच होतरे म्हणजे समीरा बघुन जी फिलींग आहे ती वेगळीच आहे तशी कुणाला बघुन आलीच नाही.."


वृषभ : "खरच???"


शौर्य : "आता खोट का बोलु मी सांग??"


तोच मोठी रिंग वाजली.. लंच ब्रेक झाला. अस बोलत चौघेही राजच्या रूम बाहेर पडले.


तुम्ही व्हा पुढे मी बेग ठेवुन येतो.. शौर्य रुमजवळ जाताच बोलु लागला..


वृषभ : "नक्की येशील ना?? नाही तर काल सारखा झोपशील पुन्हा.."


शौर्य : "अरे काल मी खरच दमलेलो. आदल्या रात्री मी अकरा वाजता इथे आलेलो आणि त्यात ही नवीन जागा रात्रभर जागाच होतो त्यामुळे मी झोपुन गेलो."


वृषभ : "बर.. ये खाली आम्ही आहोत.."


शौर्यसुद्धा बेग ठेवुन थोडं फ्रेश होऊन खाली जातो.


खाली जाऊन तो स्वतःच जेवणाचं ताट घेतो आणि आपल्या मित्रांसोबतच जाऊन जेवायला बसतो.


चौघेही गप्पा मस्ती करत जेवण करतात.


टॉनी : "उद्या नक्की जायचंय ना नाईट आउट करायला..??"


शौर्य : "म्हणजे??"


वृषभ : "अरे आमच लास्ट वीक पासुन नाईट आऊट ला जायचं ठरत होत बट मनवीमुळे पुढे ढकललं गेलं बट हा शनिवार कन्फर्म आहे."


शौर्य : "बट जाणार कुठे??"


टॉनी : "ते आपलं अजुन ठरलं नाही. आज ठरवुया.."


राज : "आपण स्पोर्ट हाऊस मध्ये जाऊयात ते लोक असतील तिथेच आणि आजच म्हणजे आत्ताच ठरवुया. "


चौघही जेवण आटोपुन हॉस्टेलबाहेर पडले. शौर्य पहिल्यांदाच स्पोर्ट हाऊसमध्ये जाणार होता.


आत शिरताच मनवी आणि समीरा केरम खेळत होत्या . मनवीला तिथे बघुन शौर्य आणि राजला थोडं नवल वाटलं.


शौर्य : "तु गेली नाहीस अजुन??"


मनवी : "नाही ना माझं काम आहे थोडं.."


टॉनी : "बर झालं नाही गेलीस.. आपण उद्याच डिस्कस करणार होतो."


वृषभ : "सीमा कुठेय??"


समीरा : "येतेय. ती बघ आलीच."


शेतान का नाम लिया ओर शेतान हाजीर.. राज हसतच बोलला.


सगळे गालातल्या गालात हसु लागले.


"

तु मला काही बोललास का??" सीमा थोडं राग दाखवतच राजला बोलु लागली.


राज : "हो म्हणजे हे लोक आता तू कुठेस तेच विचारत होते ग आणि तितक्यात तु आलीस म्हणुन मी फक्त म्हणालो की Think of the devil and the devil is here"


सीमा : "मग ठिक आहे."


शौर्य : "फक्त तो हे हिंदीत बोलला ग बाकी काही नाही.."


"

गाईज उद्याच्या प्लॅनच काय??? जायचं की नाही.." सीमा पुन्हा भडकेल म्हणुन राजने मुद्दामुन विषय बदलला.


"

आपलं ठरलय तर जाऊयात.." सगळे तैयार होत म्हणाले शिवाय शौर्य..


शौर्य : "मला आधी कळलं पाहिजे आपण कुठे जातोय तरच मी येईल नाही तर नाही."


टॉनी : "डिस्को नाही तर पब मग तिथुन डिनरला जाऊयात मग पुन्हाहॉस्टेल."


शौर्यला हो बोलावं की नाही बोलावं काही कळतच नव्हतं. त्याने शांत रहाणे पसंत केले.


मनवी : "किती वाजता निघुयात??"


वृषभ : "सात वाजता??"


सगळ्यांनी त्यावर संमती दर्शवली आणि उद्याच्या टॉपिकवर चर्चा चालू झाली. शौर्य फक्त त्यांच बोलणं ऐकत होता.


मनवी : "चलो गाईज मी निघते.."


राज : "आम्ही पण जातो हॉस्टेलवर"


सगळे स्पोर्ट हाऊस मधुन बाहेर पडले.


समीरा आणि सीमा दोघीही गर्ल्स हॉस्टेलकडे वळल्या.


मनवीने तिची स्कुटी गेट बाहेर लावलेली. मनवीच्या स्कुटी समोर रोहनसुद्धा होता. लांबुनच तो मनवीकडे बघत होता..


मनवीने स्कुटीला किक मारली आणि तोच तिच्या काही तरी लक्षात आले.. ती मध्येच थांबली.


बेगेतुन डेरीमिल्क काढुन ती शौर्यला आवाज देऊ लागली..


शौर्य : "राहू दे तुला खा.."


मनवी : "ठेवरे. मनवीनेसुद्धा त्याचा हात पुढे करत त्याच्या हातावर डेरीमिल्क ठेवली."


कॉंग्रेचुलेशन आणि थेंक्स पण.


वृषभ आणि टॉनी फक्त बघत होते.


वृषभ : "थेंक्स कश्याबद्दल ग??'

"अरे आम्ही लायब्ररीत गेलेलो तेव्हा मी पडणार होते पण शौर्यने वेळेत माझा तोल सावरला म्हणुन नाही उद्याच आपल नाईट आऊट केन्सल केन्सल झालं असत हे नक्की..", एवढं सांगेपर्यंत मनवीने शौर्यचा हात हातातच धरून ठेवलेला.


"आणि कॉंग्रेचुलेशन फॉर युअर सिलेक्शन"मनवी शौर्यला हात मिळवतच बोलु लागली


"आता सोडना ग हात त्याचा." टॉनीला समोरुन रोहन दिसत होता म्हणुन तो बोलला


"

ओहह सॉरी.." बोलत मनवीने हाथ सोडला.

"उद्या भेटु गाईज..बायsss" अस बोलत ती तिथुन निघाली.


रोहनला आधीच शौर्यवर राग होता आणि त्यात मनवीने शौर्यचा एवढा वेळ हात पकडलेला रोहनला काही तरी वेगळंच वाटु लागलं तो रागातच शौर्यजवळ आला.


"

लांब राहायचं तिच्यापासुन", शौर्यची कॉलर पकडुन त्याला धमकावू लागला.


शौर्य : "कॉलर सोड"


रोहन : "ह्यापुढे तिच्या जास्त मागे पुढे जरी दिसलास तर याद राख"


शौर्य : "रोहन कॉलर सोड."


रोहने रागातच शौर्यला ढकलत त्याची कॉलर सोडली आणि तो तिथुन जाऊ लागला. शौर्य मागे जाऊन पडणार पण वृषभने त्याला सावरलं..

"Are you ok शौर्य??",वृषभ त्याला नीट उभं करतच विचारतो..


"टिपिकल भाऊ असल्यासारखा वागतोय यार हा".. शौर्य हसतच आपली कॉलर नीट करतच बोलतो..


"

ए शौर्य यार गप्प ना.. तु चल आत.." वृषभ आणि टॉनी शौर्यची समजुत काढतच बोलु लागले..


रोहनला आता राग कंट्रोल होत नव्हता.. तो पुन्हा शौर्यजवळ आला..


"

ए..." रोहनने हाताची मूठ करत शौर्यसमोर हात धरला..


"

ए फक्त बोलायलाच येतो का लिहिता पण येतो तुला?? ह्या पुढे कॉलर नाही पकडायची माझी "रोहनला जोरात धक्का देतच बोलला. तस रोहन खाली पडतो..


रोहन कपडे झटकत उभा राहिला..आणि रागातच शौर्यकडे जाऊ लागला. तोच कॉलेजचे प्रिंसिपल सर एका सरांसोबत बाहेर पडले.. प्रिंसिपल सरांना बघुन रोहन जागीच थांबला.


हि संधी साधत वृषभ, राज आणि टॉनी शौर्यला हॉस्टेलमध्ये घेऊन आले.


रोहन : "हा समजतो काय स्वतःला.. ह्याला उद्या बघतोच मी." (इथे रोहनचे मित्र रोहनला शांत करू लागले.)


इथे शौर्यचे मित्र..


वृषभ : "तु वेडा आहेस का?? संपुर्ण कॉलेजला माहिती रोहनला मनवी आवडते. त्यात तु त्याला तिचा भाऊ बोलतोस??"


राज :" ए शौर्य, तु थोडं शांत का नाही बसत? एक एक जोक्स सुचतात का तुला रोहनला बघुन??"


शौर्य : "एक मिनिट, मी तिच्यासोबत फक्त हात मिळवत होतो त्यात त्याला एवढं इस्यु करायची काय गरज होती.?? बाय दि वे, तीच हात मिळवत होती आणि जोक्स वैगेरे नाही करत होतो मी तिथे सिरियसली बोलत होतो तो एखाद्या भावासारखच तो वागत होता.."


वृषभ : "हो पण तु शांत बसला असतास तर काय झालं असत.. तो चांगला मुलगा नाही रे.. तु का नाही समजत."


वृषभ आणि टॉनीची पुन्हा कालची टेप पुन्हा चालु झाली शौर्य फक्त शांत बसुन ऐकत होता.,


तिघेही त्याला समजावुन आपापल्या रूममध्ये जाऊ लागले पण तेवढ्यात गेलेरीतून आरडा ओरडा असल्याचा आवाज ऐकु आला..


तसे चौघेही गेलेरित धावत गेले..


काही मुलं हातात हॉकी स्टिक घेऊन रोहन आणि त्याच्या ग्रुपला धमकावत असल्याचं दिसत होतं. रोहनचे अर्धे मित्र तर त्या मुलांच्या हातातील हॉकी स्टिक बघुन मागच्या मागेच कुठे गायब झाले. जवळपास वीस बावीस जणांचा घोळका होता तो.


राज : "आज ह्या रोहनच काही खर नाही.. भरपूर हवेत होता ना हा आज जमिनीवर उतरेल तो.."


शौर्य : "कोण आहेत ही मुलं??"


राज : "ही S K कॉलेजमधलीच असतील. आपली इंटरकॉलेज टीम सोबत मॅचेस असतात त्यापैकी हे एक कॉलेज.."


शौर्य : "पण आता झालं काय??"


राज : "तु यायच्या जस्ट 1 विक आधी ह्या कॉलेजसोबत प्रॅक्टिस मॅच ठेवलेली. त्यावेळेला ह्या कॉलेजच्या काही मुलांनी आपल्या कॉलेजमधील एक दोन मुलीची छेड काढली त्यावरून थोडं वाद झाले. तेव्हा ही थोडी फार झालेली मारामारी पण सर वैगेरे होते म्हणुन तेवढ्यावरच निभावल. पण आता ही मुलं पूर्ण तैयारी करून आलीत."


शौर्य : "तो एवढं आपल्या कॉलेजच्या मुलींबद्दल चांगले विचार करतोय आणि तुम्ही फक्त इथुन बघत बसतायत. उलट तिथे जाऊन त्याला मदत करायला हवी."


वृषभ : "तुझं काय म्हणणं आम्ही जाऊन खाली मार खावा.? ती लोक बघ किती आहेत आणि हा एकटा रोहन ज्यांना मित्र बोलतो ते ही बघ पळाले त्या मुलांच्या हातातील हॉकी स्टिक बघून आपण तर लांबच राहिलो."


वृषभ पाठी बघुन शौर्यकडे बघु लागला पण त्याच बोलणं ऐकायला शौर्य नव्हता तिथे..


वृषभ : "ए आता हा कुठे गेला???"


इथे कॉलेज गेटजवळ जमा झालेल्या S K कॉलेजच्या घोळक्याने रोहनला चारी बाजुंनी घेरलं.. एवढ्या जणांना आवरण रोहनला कदाचित जमेल अस रोहनला स्वतःलाच वाटत नव्हतं.


रोहनचे बाकीचे मित्र देखील कुठे त्याला दिसत नव्हतं. एकट्याला टाकुन तेसुद्धा पळुन गेले..


ज्यादा हिरो बनने का आदत हे न तुझे आज दिखाते हे तुझे अस बोलत दोघांनी त्याला पकडलं.. एक जण हॉकीस्टिक घेऊन त्याच्यावर वार करणार पण शौर्यने ती हॉकी स्टिक पकडली..


"क्या यार एक शेर को मारने के लिये इतने लोग..This is not fair.." शौर्य मस्तीच्या सुरात बोलतो..


(टॉनी : अरे हा शौर्यच आहेना??? हा का मध्ये पडतोय..??


वृषभ : चला आता परत खाली.


राज : मी काय बोलतो एम्ब्युलन्सला फोन लावु का पोलिसांना ?


शौर्यने तुझ्या डोक्यावर हात फिरवला का?? नाही म्हणजे त्याच्यासारखे तुही PJ मारतोयस.. वृषभ रागातच राजला विचारू लागला.


राज : "अरे पण मी..."


वृषभ : "शहहह...तुला खाली यायचं तर चल नाही तर इथेच रहा."


राज : "येतोय चला.. सिरियसली बोललो तरी मस्ती वाटते.. काय जमाना आहे यार.."


(वृषभ, टॉनी आणि राज पुन्हा खाली यायला निघाले.)


"

ए ज्यादा बोलगा ना तो तेरेको भी एक दो इधरहीच लागके दुगा ! ए चल साईड हट अब ! (एकाने शौर्यला ढकलतच म्हटलं)


शौर्यने मागुन त्याच शर्ट पकडत जोरातच त्याला मागे ओढलं.. तस तो जोरातच खाली पडला.. त्याला अस खाली पडताना बघुन बाकीचे सुद्धा शौर्यला मारायला त्याच्या अंगावर धावत आले. दोघ तर हॉकी स्टिक घेऊन त्याच्या अंगावर धावून जाणार तोच शौर्यने त्यांना आपला पंजा दाखवतच थांबण्याचा इशारा केला आणि खाली पडलेली हॉकी स्टिक उचलत हातानेच परत माझ्याजवळ या असा इशारा केला


पुढे आलेल्या दोघांनाही शौर्यने हॉकी स्टीकने मारत खाली पाडले.


इथे रोहनने देखील त्याला ज्या दोघांनी पकडलेल त्यांना मारायला सुरुवात केली. वृषभ आणि टॉनी शौर्यला अशी मारामारी करताना बघतच बसले.


काही वेळाने पोलिसांची गाडी वाजल्याचा आवाज येऊ लागला. तस सगळे भानावर आले आणि आपापल्या बाईक घेऊन तिथुन पळु लागले. रोहनने शौर्यचा हात पकडत त्याला ओढतच प्ले हाऊसमध्ये लपायला घेऊन गेला.


शौर्य आणि रोहनला एकत्र पळताना बघुन वृषभ आणि टॉनी देखील त्याच्या मागे पळत स्पोर्ट हाऊसमध्ये वळले.. दोघांनाही अस पळताना बघुन राज देखील पळु लागला.


आत मध्ये येताच शौर्य आणि रोहन दोघेही दम काढु लागले.


रोहन : "सॉरी..."


शौर्य : "कश्याबद्दल???"


रोहन : "ते मगाशी मी तुला.."


"

इट्स ओके." शौर्यने हात दाखवतच रोहनला थांबायला सांगीतल..


"

फ्रेंड्स.." रोहनने हात पुढे करत शौर्यकडे बघितलं..


शौर्यने देखील जास्त विचार न करता लगेच त्याला हात मिळवला.


तोच वृषभ आणि टॉनी तिथे आला.. दोघांनाही असं एकमेकांना हात मिळवताना बघुन त्यांना थोडं नवल वाटु लागलं.


आणि तोच पुन्हा मोठ्याने पोलिसांच्या गाडी वाजल्याचा मोठा आवाज प्लेय हाऊस मधूनच येऊ लागला.


रोहन : "ओहह नो आता काही खर नाही आपलं... पोलिसांनी आपल्याला इथे पळताना बघितलंय वाटत.."


शौर्यसुद्धा थोडासा घाबरून गेला.. वृषभ आणि टॉनी देखील पोलिस पकडुन नेतील या भीतीने शौर्यच्या बाजुला जाऊन लपले.


शौर्य : "अरे तुम्ही का आलात इथे?? माझ्यामुळे तुम्हाला पण पोलिस पकडुन नेतील आता"


वृषभ : "बस काय शौर्य तु हेच आम्हाला ओळखलं?? आम्ही ह्याच्या मित्रा सारखे नाहीरे मित्राला अस संकटात टाकुन पळुन जायला."


टॉनी : "एक तर हा तुला इथे घेऊन पळत आला म्हणून आम्ही घाबरलो. आता पुन्हा तुम्ही दोघ मारामारी कराल ह्या विचाराने."


रोहन वृषभ आणि टॉनीकडे बघत राहिला. ते दोघ जे बोलत होते त्यात तथ्यसुद्धा होत. मैत्री म्हणजे काय ह्याचा अर्थ त्याला जणु आज कळला होता.


पण पोलिसांच्या गाडीचा वाजणारा हॉर्न ऐकुन चौघांच्याही पोटात गोळे आलेले. चौघेही डोकं घुडग्यात टाकुन लपुन बसले आणि तोच कोणी तरी धावतच स्पोर्ट हाऊसमध्ये येतंय अस वाटू लागलं आणि पोलिसांच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज देखील वाढु लागला.


आता मात्र चौघांच्या हृदयाची धडधड जणु जास्तच वाढु लागली.


( आता पुढे काय?? त्यासाठी पुढील भागाची प्रतीक्षा करा.. आणि नेहमीप्रमाणे हा भाग कसा वाटला तेही कळवा??)


क्रमशः


©भावना विनेश भुतल