Sangharsh. - 6 books and stories free download online pdf in Marathi

संघर्ष - 6

काही नाही खरं सांगा सरदेसाई तुम्ही काय जादू केली ? कधी औषध न घेणारी हि बाई एकदम बरी कशी झाली?.. जगातलं आश्चर्य आहे हे
आशाताई तुम्ही ठणठणीत बऱ्या आहात आता .. एन्जॉय करा आयुष्य ..

आशाताई घरी आल्यात त्यांना हळू हळू एकदम ठणठणीत वाटायला लागलं ... एक दिवस

शगुन , मी ऑफिस ला जाईल म्हणतेय खूप दिवस झाले प्रेम वर संपूर्ण भार पडलेला आहे
आई असू दे ना करतोय ना तो - शगुन
नाही ग खूप करतोय तो घराच्या सारखा, बघ ना माझ्या तब्येतीत किती केला त्याने माझ -आशाताई

बघ त्याला विचारून .. शगुन ने मला फोन लावला

बोल शगुन , मी फोन उचलत म्हणालो

प्रेम , आईला बोलायचं आहे

बरं .. दे

बोला मॅडम कशी आहे तब्येत आता
मी बारी आहे रे, उद्यापासून ऑफिसला यायचं म्हणतेय - आशाताई
माझ्यासोबत शगुन पण येणार .. आशाताईंच्या लगेच वाक्य पूर्ण केलं

मला आश्चर्य वाटत राहिल .. शगुन कां बरं

नंतर शगुन आली तो दिवस गुरुवार होता .. तिने सर्व बघितलं पण तिच तेवढ लक्ष नव्हतं .. मग आशाताईच म्हणालात

शगुन उद्यापासून तू या कंपनीची मालकीण आहेस हा सर्व कारभार तुलाच सांभाळायचा आहे .. मला नाही वाटत आता माझ्यात काही हिम्मत राहिली आहे .. प्रेमळ सोबत घेऊन हि कंपनी खूप वर न्यायाची आहे तुला सर्व व्यवसाय समजून घे व्यवस्थित ..

शगुन हसली आणि म्हणाली ठीक आहे आई मी समजून घेते ... मला काळजी वाटायला लागली होती कारण आता महिना झाला होता आणि तिला सांभाळायचे नाजूक दिवस होते ते ..

मग मीच म्हणालो मॅडम शगुन मॅडमला असू द्या मी अपडेट करेल रेग्युलरली ..

सायंकाळ झाली होती मी पवई लेक ला बसलो होतो थंड गार वारा सुटला होता.. डिसेम्बर चा महिना होता .. शगुन ने मागून येऊन केंव्हा डोळे झाकले कळलंच नाही मी मात्र तिच्या स्पर्शाने आणि सुगंधाने ओळखल .. आणि म्हणालो बोल डिअर ती थोडी नाराज झाली पण लगेच लडिवाळपणे म्हणाली काय रे तू कसा ओळखतॊस .. मी म्हणालो हवेचा सुगंध बदलतो तुझ्या येण्याने

ती तिची कार घेऊन आली होती .. मी म्हणालो इथे आपल लिविंग रूम आहे बघ किती मस्त आहे ती लगेच म्हणाली आणि किचन?

मी - ते असत तर आपण मस्त कॉफी प्यायलो असतो
शगुन- पिणार का तू
मी - म्हणजे ?
शगुन - मला माहित आहे तुला काय आवडते मी आणलीय कॉफी बनवून .. म्हटलं बोलता बोलता पिऊयात
मी - मॅडमला केंव्हा सांगायचं आपण
शगुन- चल सांगूयात का आता, कारण आता जास्त लपवता नाही येणार
मी - बरं , सांगायलाच हवं , पण देतील ना ग परमिशन
शगुन - नाही तो भाग चलेंगे और क्या मुह्हबत कि है निभानी तो पडेगी ना
मी - नाही आपण नाही पळून जाणार तू एकटी आहेस आईला .. मला मायलेकीला नाही दूर करायच मी पूर्ण प्रयत्न करेल त्यांना समजावयाचा
शगुन - बरं बरं .. चल आता

आम्ही मस्त कॉफी प्यायलो आणि निघणार तेवढ्यात .. मागून धारदार आवाज आला

हे काय चाललंय? - आशाताई

आम्ही दोघं पण थरथरायला लागलो .. मग मी मागे बघतील तर मागे राहुल होता .. मला कळलं काय झालं ते .. मनात म्हटलं तू घाट केलास काय राहुल बघतोच तुला
मी आशाताईला काही बोलणार तेवढ्यात त्यांनी शगुन चा हात पकडून तिथून निघून गेल्या मी एकटाच राहिलो मग

राहुल - बघितलंस प्रेम मी काय करू शकतो आणि तो पण निघून गेला

माझ्या तोंडात फक्त एक शिवी आली पण मी काहीच नाही करू शकलो ..

मी शगूनला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ गेला .. मग मी तिच्या घरी गेलो बेल वाजवली

दार उघडलं आणि आशाताई बाहेर आल्या

तू विश्वासघात केलास माझा, चाल चालता हो इथून मला नाही कळलं तू असं काही करशील म्हणून - आशाताई
मॅडम पण घ्याना माझं प्लिज
बिलकुल नाही तू काही ऐकण्यालायक ठेवलच नाहीस.. नाक कापलस माझं तू - आशाताई
शगुन - आई ऐकून तर घे आमचं
आशाताई - मला काहीच ऐकायचं नाही आहे .. उद्या जाऊन ते सर्व स्वच्छ कर पहिले
शगुन - अगं पण आई
आशाताई - एकदा सांगितलेलं समाजात नाही का ? माझ्या तब्येतीचा हा फायदा घेतलास तुम्ही ?तू मला तोंड दाखवायचा नाहीस प्रेम चालता हो इथून.. लवकर नाही तर पोलिसांच्या ताब्यात देईन

माझ्या डोळ्यातील अश्रू मला सावरू देत नव्हते आणि शगूनच दुःख मला ते आवरू देत नव्हते .. मला सुचेनासं झालं होतं काय कराव ते.. मी मागे वळलो .. घरी गेलो