Abhagi - 4 books and stories free download online pdf in Marathi

अभागी ...भाग ४

सायली ने मधुर कडून घेतलेले सर्व नंबर मॅच करून पाहिले..पणं एक ही नंबर मॅच झाला नाही..तशी ती खूपच वैतागली ..त्यात अनु आणि मधू सारख्या तिला सापडला का नंबर म्हणून विचारत होत्या..

सायली : शिट यारर .. एक ही नंबर मॅच होत नाही.

मधू:सायली बेबि तुमची आयडिया च बकवास होती .. ओ..आता कॉलेज मध्ये काय एक दोन जण आहेत का ?किती जणांचा नंबर मॅच करत बसायचा आपण ..सोड ती आयडिया..

सायली :छान ..ज्याच करावं भलं ते म्हणत माझंच खर..तुझ्याच साठी चाललय ना हे..आणि तू माझ्या आयडिया ला बकवास म्हणू नकोस..

अनु : अग मधू बरोबर बोलतेय ..अस नंबर मॅच करून तो साया काय आपल्याला भेटणार नाही..

सायली : हो ग..एक से भले दो..तुम्ही दोघी ही मलाच दोष द्या..मी जाते बघा तुमचं तुम्ही..
अस बोलून सायली जावू लागते तर अनु व मधू तिची बॅग मागे ओढून तिला मागे खेचतात..आणि सॉरी म्हणतात...

मधू: काय यार सायली इतकी चिडते स लगेच..अग तुझी आयडिया छान च होती पणं आता ती काम केली नाही इतकंच बोललो आम्ही..होय ना अनु..
अनु ही मग होय ..होय बोलते मधू हळूच तिला डोळा मारते..आणि हलकेच हसते..

अनु : सायु बेबी तुझ्या शिवाय आमचा पत्ताच हालत नाही ग..नको ना अशी रागावू ..

सायली : ह..आला ना आता लाईन वर..माझ्या शिवाय तुमचं चालणारच नाही ग..म्हणून ती स्वतः वरच खुश होते..आणि हसते..सायली चा राग गेला पाहून अनु आणि मधू ही खुश होतात आणि तिला दोन्ही बाजूने मिठी मारतात...

मधू : ये पण कस शोधायचं ?

सायली : चिल्ल ..मधू ..बघू काही तर ठरवू ...
एक काम कर ना जेव्हा तो पुन्हा मॅसेज करेल तेव्हा त्यालाच बोल ना ती तुला त्याला भेटायचं आहे ..

मधू: बर ..बघू.

अनु : ये पणं मला वाटतं तो रणवीर च असेल..

मधू : अग तस असत तर तो ना माझ्या मागे नाही तुझ्या मागे लागला असता ना..तूच त्याची नंबर वन चहीती ना ..

अनु : होय पणं कव्हर गर्ल मधू पुढे आमचा कुठे निभाव लागणार ग..

मधू : ये गप्प ग अनु काही पणं काय ? आणि समज मी मुलगा असते ना तर तुलाच प्रपोज केलं असत ..इतकी छान आहेस तू अनु.

सायली : आणि मी मुलगा असते तर मधू तुला मग पळवून च नेल असत..

अनु : ये बसा गप्प कोणी ऐकलं तर ..आपण मुली आहोत का यावर शंका घेतली..
अनु अस बोलल्यावर मग तिघी ही हसू लागतात.. आणि हसतच बागेतून बाहेर पडतात...विराज त्याच्या मित्रान सोबत उभा असतो..त्या तिघींना हसताना पाहून .. विरजच्या मनात एक प्लॅन येतो खास करून ..मधू साठी असतो त्याचा प्लॅन ..तो आपल्या मित्रांना सांगतो..अरे विराज कशाला उगाच ..ते त्याला समजावतात पणं विराज ..म्हणतो .. यार ..मी सर्वांना प्रेमात पडतो पणं मधू काही फसली नाही त्याची ही छोटीशी शिक्षा तिला..आणि आपण अस ही काही मोठा गुन्हा करत नाहीये ..ती आली तेव्हा आपण तिची रॅगिंग केली नाही ती आता करतोय अस समजा..पणं काही प्रोब्लेम झाला तर काही नाही होणार ..मग तो आपल्या मित्रांना त्याचा प्लॅन सांगतो व सर्वांना काम वाटून देतो ..उद्या मधू च काही खर नाही म्हणून सर्व जण हसू लागतात..पणं मधू मात्र या सर्व गोष्टी पासून अनभिज्ञ होती..

काय असेल विराज चा प्लॅन ? मधू फसेल का प्लॅन मध्ये ? पाहू next part मध्ये.......