Abhagi - 10 books and stories free download online pdf in Marathi

अभागी - 10

मधू विचार करत असते आता कोणती कविता बोलायची उद्या..ती ही दुसऱ्या कोणाची नसली पाहिजे... ही कसली अट ?मला तर कवितेचा क ही येत नाही..आई ला येते का पाहू..मधू आई कडे स्वयंपाक घरात गेली.

मधू: आई एक काम कर ना माझं.

आई : आता आणि तुझं कोणत काम राहील आहे ? सांग ..

मधू : काम म्हणजे ..एक कविता सांग ना तुला येत असेल तर..

आई मधूचं बोलणं ऐकून हसू लागली..

आई : कविता आणि मी ?ये बाई स्वयंपाकात ल काही विचार ते सांगते पणं हे काय ? मी काय कवियत्री आहे का ?

मधू : तरीच म्हटलं मला कविता का करता येत नसतील ? रक्तातच नाही ना आमच्या... काश माझी आई कवयत्री असती ..माझ्या साठी एक कविता लिहून दिली असती तिने..

आई : वा म्हणजे तुला कविता हवी म्हणून तुला कवयत्री आई हवी होय ? बर अचानक हे काय कवितेचा खूळ काढलं आहेस ?

मधू: अग कॉलेज मध्ये ,कार्यक्रम आहे ना ..मग उद्या मला कविता बोलायला सांगितलं आहे..

आई : काय हे कॉलेज चे असले कार्यक्रम ..मला तर काही कळतच नाही ..पणं तू सांगायचं ना ..मला नाही येत म्हणून..

मधू : हो ग आई पणं तुला माहिती आहे ना ती सायली आणि अनु किती नौटंकी आहेत ..आपल्या ग्रुपच्या इज्जत का सवाल हैं मधू ..तुझे कविता तो गाणी ही पडेगी..म्हणून मला पुढे केलं त्यांनी.

आई ऐकुन हसू लागली..बर बघ नेट वर सर्च करुन भेटली तर..
मग मधू आपल्या रूम मध्ये निघून जाते. सर्च करुन एक कविता कागदा वर लिहून काढते..आता काय करायचं ? असू दे ..कोणाला कळलं तर कळू दे की ही नेट वरची कविता आहे.. न बोलण्या पेक्षा बोललेली बरी ना..

थोड्या वेळाने साया चा मॅसेज येतो मधू ला..

साया : मधुरा काय टेन्शन मध्ये आहेस का ?

मधू : कसलं टेन्शन ?

साया : उद्या तुझ्या ग्रुप चा कार्यक्रम आहे ना ? आणि तू कविता म्हणायची आहेस ..म्हणून वाटलं मला तू टेन्शन मध्ये असशील.

मधू : हो ते तर आहे ..पणं मी नेट वरून केली डाऊनलोड.

साया : अग पण नेट वरची नाही चालणार अशी अट होती ना ?

मधू : हो पणं आता मी काय करू ? मला येतच नाही तर..

साया : मी हेल्प करू शकतो का ?

मधू : तू काय करणार ? तू कवी आहेस का ?कविता देणार का मला ?

साया :हो देईन..मी कवी वगेरे नाही..पणं जेव्हा तुला पाहिलं होत तेव्हा सुचली होती एक कविता .. लीहली होती वाटलं नव्हत कधी तुला ऐकवू शकेन पणं आता जरी उपयोगी पडली तुझ्या तर चांगलं आहे ना?

मधू : माझ्या वर कविता ?
मधू ऐकुन एकटीच हसू लागली..आता माझ्यावर ही कोणी कविता करू शकत ?खरंच हा साया वेडा दिसतोय..

साया मधू ला ती कविता सेंड करतो..कविता वाचून मधू ला हसू येत आणि ती पटकन आरशा समोर जावून उभी राहते ..
हे नाही मी कुठे इतकी सुंदर आहे ? काही पणं ह..सगळे हसतील माझ्यावर ..ती नेट वरची च कविता बोलू आपण ..

दुसऱ्या दिवशी कार्यक्रमा अगोदर ..सायली आणि अनु मधू ला विचारतात कविता केलीस का म्हणून तर ती सांगते की ..मी नेट वरून डाउनलोड केली आहे पणं plz कोणाला सांगू नका..सायली आणि अनु ही ओके बोलतात.
कार्यक्रम सुरू होतो..मधुर सूत्र संचालन करत असतो..सायली आणि अनु सजावटी मध्ये व्यस्त असतात..बाकीचे ग्रुप मेंबर कोण काय बोलणार हे ठरवत असतात..आता मधू चा नंबर येतो ..ती समोर जाते..सायली आणि अनु व मधुर तिला शुभेच्या देतात..विराज ग्रुप कान टवकारून ऐकू लागतो...
मधू कवितेची पहिली ओळ म्हणते

फिटे अंधाराचे जाळे..

तसे विराज आणि बाकीचे ओरडू लागतात.. चि टी ग...ची टी ग..ही कविता आम्हा सर्वांना माहीत आहे..ही चालणार नाही..विराज मोठ्याने ओर डु लागतो... मधूरा चिटर ..मधुरा खूप रागात त्याला पाहते व ok sorry असं सर्वांना बोलते आणि सर्वांना शांत बसायला सांगते मग ती साया ने तिला सेंड केलेली कविता बोलू लागते..

अप्रतिम शब्द आला ओठातूनी
पाहतच मी तुला पहिल्या क्षणी
आखीव रेखीव बांधा तुझा असा
जसा सोनाराने बनविला
सुंदर दागिना नवा.
रंग सारे तुझ्यात इंद्रधनु चे
चोरली तुझीच थोडी नाजुकता फुलाने
सोनेरी हे केस तुझे की
प्रकाश तो सुर्य किरणांचा
चंद्र ही लाजला पाहूनी रूप तुझे
सांग कोठुनी अवतरलीस या
भूतलावावरती ...

सगळे कविता ऐकुन स्तब्ध होतात..आणि मग जोर जोराने टाळ्या वाजवून मधू मधू..म्हणून ओरडू लागतात..सर्वांना कविता फार आवडते..सायली आणि अनु तर .. तोंडत बोटे घालून बसतात..ही तर बोलली कविता येत नाही मग ही कविता कशी बोलली ती ? मधू ही सर्वांना कविता आवडली म्हणून खुश होते..ती मनातच थँक्यु साया म्हणते आणि हलकीशी हसते..मधुर ही म्हणतो ..अप्रतिम बोललीस कविता मधू..तुझ्या बोल्याण्याने कविता ही सुंदर झाली..मधू थँक्यु बोलून ..सायली आणि अनु कडे निघून जाते.

सायली : काय ग आम्हाला तर बोललीस ना की कविता येत नाही..आणि मग आता जे बोललीस ते काय होत ?

अनु : खरच खूप छान होती कविता.

मधू : पाहिलं प्रॉमिस करा चिडवणार नाही म्हणून

सायली आणि अनु ok म्हणतात.

मधू : साया ची कविता आहे..काल त्याने सेंड केली होती..माझ्या साठी लिहली आहे बोलला ..

सायली : ओ ह वा गाडी इथ पर्यंत पोहचली आहे तर ..आता साया कविता ही करू लागला आहे मधू मॅडम साठी..

अनु : अप्रतिम ,अप्रतिम ..
अनु ही मधू ला चिडव त होती ...मधू दोघी वर ही रागावली ..प्रॉमिस करून ही तुम्ही मला चिडवल म्हणून .

पुढे काय होईल ? पाहू next part मध्ये...