Saath tujhi ya - 3 in Marathi Love Stories by Bunty Ohol books and stories PDF | साथ तुझी या.... - 3

साथ तुझी या.... - 3

साथ तुझी या भाग ३

प्रेम आणि प्रिया एकाच डिश मध्ये जेवतात. प्रिया ने पूर्ण वेळ त्याच हाथ धरून बसली होती. आणि त्याच्या कडे पाहून मनातल्या मनात म्हणत होती कि का लावला एवढा उशीर. का भेटला मला एवढ्या उशिरा? आज दोघांना पण भूक नव्हती. कारण प्रेम ला प्रिया आणि प्रिया ला प्रेम भेटला होता. आज त्यांना काही नको होत आज त्यांना त्यांचा आनंद च खूप झाला होता. त्या दोघांचे मित्र पण जास्त खुश होते कारण नूतन आणि रितेश ला पण माहित होते कि ते त्या दोघे एकमेकांन वर प्रेम करतात.
रात्रीचे आठ वाजून गेले होते प्रिया च्या घरी पण तिला केक कापायचा होता म्हणून घरचे वाट पाहत होते. कारण प्रिया सहा वाजे पर्यंत येत असते पण आली नव्हती. तेव्हा घरचे पण फोन करत होते. पण प्रिया ची ईच्छा होत नव्हती त्याला सोडून जायची. पण नाईलाज होता आज प्रिया खूप खुश होती. प्रिया ने रितेश आणि नूतन ला विचारले काही पाहिजे का तुमच्या दोघांना.....? त्या वर ते नाही बोलतात तेव्हा प्रिया प्रेम ला बोलते चल आपण बिल पे करूया. आणि ते बिल पे करण्या साठी कॅश काउंटर ला येतात. बिल भरतात आणि बोलत बोलत बाहेर येतात. प्रिया ... प्रेम ला बोलते तू कधी माझ्या प्रेमात पडला होतास...? तेव्हा तो म्हणतो जेव्हा तुम्ही नवीन आले होते पुण्यात तेव्हा पासूनच तू मला खूप आवडत होती. तुझ्या सोबत मैत्री करायची होती. पण मला वाटायचं तू खुप खडूस असेल. आणि तू माझ्या बदल काही भलताच विचार करशील. मला नेहमी वाटायचं कि तू माझ्याशी बोलावं पण भीत पण तेव्हडी वाटत होती. आणि मला माहित नव्हतं तू माझ्या पेक्षा मोठी आहे म्हणून आणि तू जॉब पण आहे. मला वाटायचं तू कोणत्या तयारी कॉलेज ला असेल.
तेव्हा प्रिया बोलते मी काय तुला खाणार होते का...? आणि मी एवढी पण खडूस नाही आहे. तेव्हा प्रेम हसतो आणि म्हणतो म्हणजे तू मानतेस कि तू थोडी फार का होईना खडूस आहे. तेव्हा प्रिया हस्ते आणि त्याला हलक्या हाथ ने मारते. आणि ती बोलते कदाचित मी तुझ्या शी वेगळं पण वागले असते. कारण मला नव्हतं आवडत कोनासोबत बोलणं फिरणं राहणं. आणि मी तुझ्या पेक्षा मोठी आहे तरी माझ्या प्रेमात पडला का..? तेव्हा तो म्हणतो प्रेमाला वया ची बंधने नसतात ... ते तर मनातून असते ना..? म्हणून मला त्याच काहीच नाही वाटले. तेव्हा ती म्हणते
मी तुला आता दिसते तशी नव्हते आगोदर खूप बाई सारखं राहत होते मला सजन सावरणं आवडत नव्हतं माझं काम आणि मी एवढं च होत माझ्या साठी आणि जेव्हा पासून लग्नाचे नकार येऊ लागले तर मी सोडून दिले सगळं. म्हणून जे पण स्तळ नंतर यायचे मला पाहण्या साठी त्यांना पण मी आवडत नव्हते. तेव्हा प्रेम म्हणतो. मला तू कशी पण आवडते. तेव्हा ती म्हणते मला माहित आहे म्हणून तर मी तुला हो म्हणाले. आणि विशेष म्हणजे मी पण तुला लाईक करत होते. पण आता पुढे काय.....? आता लग्न तर करशील ना ...?
तेव्हा तो म्हणतो मी तर आता पण तयार आहे. तेवढ्यात मागुण नूतन आणि रितेश येतात. तेव्हा ते विषय कट करतात. नूतन बोलते....... ओ लव्ह बर्ड्स चला आता. उशीर होतोय. तेवढ्यात प्रियाला तिच्या बहिणी चा फोने पण येतो. मग त्या निघतात. नूतन आणि प्रिया एक गाडीवर निघतात आणि रितेश प्रेम सोबत निघतात. पण प्रिया निघताने प्रेम च्या गळ्यात पडते आणि लव्ह यु बोलते. आणि निघतात.
प्रिया च्या घरी तिची बहीण जयश्री ने तिच्या साठी खूप तयारी करून ठेवली होती. तो सगळा आवाज प्रेम ला त्याच्या घरात येत होता.. सर्व कार्यक्रम झाल्या वर प्रिया प्रेम ला मेसेज करते.
प्रिया : हाय झोपल्यास का ..?
प्रेम : नाही बायको
प्रिया: ह्म्म्म बायको...?
प्रेम : काय झाले नको बोलू का ...?
प्रिया : नाही नाही बोल ना.
प्रिया : मी सहज म्हणाले
प्रेम : अच्छा
प्रिया: हो....
प्रेम : मग आज झोपायचं नाही का...?
प्रिया : नाही मला झोपच येत नाही आहे.
प्रिया : तू कधी कंपनी जॉईन करणार आहे...?
प्रेम : त्यांनी पुढल्या महिन्यात सांगितले आहे.
प्रिया: ठीक आहे
प्रेम : बोलतो झोप आता.
प्रिया ठीक आहे नवरो बा पण उद्या तू मला भेटणार आहेस सकाळी ऑफिस ला जायच्या आधी
प्रेम : ठीक आहे मी सकाळी भेटेल
प्रिया : ठीक आहे बाय गुड नाईट आय लाव यु .
प्रेम: लव यु टू बाय

प्रेम आणि प्रिया ची कहाणी आजून बाकी आहे तर विसरू नका चौथा भाग वाचायला तो पर्यंत बाय बाय ......


Rate & Review

Anjali Shinde

Anjali Shinde 10 months ago

pudhcha part lavkar pathva 😊👍

Rajani

Rajani 1 year ago

Arati

Arati 1 year ago