With you or ... - 2 in Marathi Love Stories by Bunty Ohol books and stories PDF | साथ तुझी या... - 2

साथ तुझी या... - 2

साथ तुझी या भाग २
प्रिया ला वाटत होते की प्रेम बोलेण त्याच्या मनातील भावना सांगेन. पण प्रेम ला हि समजत नव्हतं कि हे काय आहे. आता दोघांना हि एकमेकांची सवय झाली होती. प्रिया च्या काम वर तिची एक मैत्रीण होती नूतन आणि नूतन ला हि चांगल्याप्रकारे समजलं होत कि प्रिया प्रेम वर प्रेम करते ते. नूतन नि तिला शेवटी सांगितले कि तू त्याला बोल कि मी तुझ्या वर प्रेम करते. आणि मला माहित आहे तो तुझ्या वर प्रेम करत असेल. पण प्रिया विषय तालात होती. मुद्दामूण विचा पण बदलत होती. पण नूतन तिला रोज सांगू लागली त्या मुले ती तिला म्हणते " हो माझे प्रेम आहे त्याच्या वर"....
पण तो पण माझ्या वर करतो का नाही ते माहित नाही. पण मला भीती वाटते कि त्याला हे आवडलं नाही तर आमच्या मधली मैत्री पण दूर होईल. तेव्हा मी काही बोलत नाही. जो पर्यंत तो बोलत नाही तो पर्यंत मी हि त्याला माझ्या मनातील भवन सांगणार नाही. मी त्याची वाट पाहिलं. तेव्हा नूतन म्हणते मी सांगू का त्याला असे. ती नको म्हणते "मी काय सांगितलं आणि तू काय एकाच झाले ना शेवटी. " पण नूतन ला तिची काळजी होती. तसे ते तिघे पण सोबत असताना नूतन ने खूप वेळा त्याला हिट दिली होती पण त्याला ते समजलं नाही म्हणून प्रिया ला पण असेच वाटत होते कि प्रेम फक्त एक मैत्रीण म्हणून माझ्या कडे पाहतो. आणि जर त्याला असे कळले तर तो मला सोडून जाईल.
पुण्या मध्ये एक कॉफी शॉप वाला प्रेम चा ओळखीचा होत्या आणि ते नेहमी तिथे जात असे, प्रिया सोबत तिची मैत्रीण नूतन असायची आणि प्रेम सोबत त्याचा मित्र रितेश असायचा. एक दिवस प्रेम नूतन ला फोन करतो आणि सांगतो कि उद्या कॉफी शॉप ला ये कामावरून येताना आणि प्रिया ला घेऊन ये. पण सांगू नको मी बोलावलं आहे असे. ती त्याला हो म्हणते आणि प्रिया ला घेऊन निघते. आणि ती प्रेम ला फोन करते. आणि त्याला विचारते कुठे आहेस तू मी तुमच्या कॉलेज च्या कॉफी शॉप वर आले आहे. त्या दिवशी प्रिया खूप खुश होती. कारण तिचा वाढ दिवस होता. पेम ने तिला रात्री च फोन करून आणि त्यांच्या घरा पुढे फटाकडे फोडून तिला सर्प्राइस दिले होते. पण आज प्रेम भेटावं त्याचा सोबत राहावा असे तिला वाटत होते. पण त्याच दिवशी त्याचा कॉलेज मध्ये कॅम्पस इंटरवव्ह होता. प्रेम ने तिचा फोन उचला आणि म्हणाला कि आजून झाला नाही मला टाइम लागेन. पण प्रेम चा दुपारी झाला होता. आणि त्याची निवड पण झाली होती. तर तो प्रिया म्हणतो कि मला वेळ लागेन तूम्ही करा पार्टी. आता प्रिया चा मूड पूर्ण ऑफ होतो. ती नूतन ला बोलते आपण उद्या करू या आज प्रेम नाही आहे. ती बोलती नाही बाबा मला आज पार्टी पाहिजे वाटलं तर उद्या फक्त तुम्ही दोघे या. आणि ती प्रिया ला आत मध्ये घेऊन येते .
त्या दोघी आत येतात आणि नूतन प्रिया ला पुढे करते. वरून फुले पडत असतात. आणि आजू बाजूनी एकदम हलक्या आवाजात एक सुंदर रोमँटिक गाणे चालू असते. प्रिया जशी जशी पुढे येते तसे तिचा अंगावर फुले पडतात आणि तिच्या पाय खाली पण फुले असतात. तिला काही समजतच नाही कि हे माझ्या साठी आहे का दुसऱ्या कोना साठी आहे आणि मी आले आहे तिच्या जागी. मग हळू हळू सर्व लाईट लागते आणि तिला समोर प्रेम दिसतो. आणि तिला एवढा आनंद होतो कि ती पळत येऊन त्याच्या गळ्यात पडते. आणि प्रेम तिला हलक्या आवाजात आय लव्ह यु बोलतो आणि प्रिया बोलते थोडा मोट्या आवाजात बोलना. प्रेम ला माहित नव्हतं कि मी असे म्हंटल्या वर प्रिया च रिअक्शन कसे असेल म्हणून तो हलक्या आवाजात बोलतो. पण प्रिया ला जे ऐकायचं असते तेच प्रेम बोलत असतो म्हणून ती त्याला मोठया आवाजात बोलायला लावते.
प्रेम पुन्हा तिला म्हणतो आय लव्ह यु आणि हे सर्व ऐकतात त्या वेळेस नूतन पण खुश होते. तिथे प्रेम चा मित्र रितेश पण असतो. प्रिया तत्याला लव्ह यु टू बोलते आणि तिच्या डोळ्यात आनंद आस्र्रू येतात. आणि बोलते तुज तर इंटरवव्ह होता ना काय झाले? तेव्हा तो म्हणतो " तू दुपारी झाला आणि माझी निवड पण झाली. आणि तुझ्या च कंपनी मध्ये." प्रिया हे ऐकवून खूपं खुश होते. आणि ते केक कापतात आणि नूतन बोलते तुम्ही दोघांनी पण काप सोबत आणि ती फोटो काढते. मग ते काही ऑर्डर करतात प्रेम आणि प्रिया शेजारी बसतात तेव्हा ती त्याला बोलती तू एवढा का वेळ लावला बोलायला. तो म्हणतो कि मग तू का नाही म्हणाली. माझ्या आधी ती बोलते तुला माहित होते किया मी पण तुला लाईक करते.

पुढील कहाणी पुढली भागा मध्ये.....


Rate & Review

Bunty Ohol

Bunty Ohol 1 year ago

Arati

Arati 1 year ago

Bunty Ohol

Bunty Ohol Matrubharti Verified 1 year ago