Skemer - 2 in Marathi Thriller by Govinda S V Takekar books and stories PDF | स्कॅमर - 2

Featured Books
Share

स्कॅमर - 2


( पहिले ४ भाग लहान आहेत त्या बद्दल सॉरी 🙏🏻🙏🏻 पण भाग ५ मध्ये तुमचे काही जे डाऊट असतील ते पण क्लिअर होतील ..

प्लीज अशीच कमेंट करत रहा कारण एक भाग लिहायला बराच वेळ लागतो आणि तुम्ही कमेंट केली तर तेवढेच समाधान होते (वाईट चांगली कशीही कमेंट चालेल) ..

.. I hope you will understand 😊भाग ३ : नोट

"दार उघडू का नको.. काय करू.. काय करू", दार परत जोरजोरात वाजत होते ....
...
"दार लवकर उघडं रजनीश ,बॉस आले आहेत", बाहेरून आवाज येतो
...
रजनीश आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसत,थरथरत्या हाताने दरवाजाची कडी काढतो
...
रजनीश : "त...त..त..तुम्ही इथे अचानक"
..
"तुला काय वाटलं रे रजण्या ... मला काही कळलं नाही हा..."
...
रजनीश(घाबरत) : " ब...ब..बॉस माझी काही चूक नाही .. मी काही नाही केलं"
. .
"मग मी केला का...हा... बोलना... साला तुला काही आयडिया तरी आहे का ...आता काय होईल ते..."
...
रजनीश:"स...स.... सॉरी ... पण हे सगळ मी...शेलार च्या म्हणण्यावर केलं"
...
"शेलार च्या ? "...
..
रजनीश:"हो... त्याने कोड पण सांगितला होता" ..
..
"मोठा गेम झालाय" .. कूंभा त्याच्या सोबतच्या माणसांना इशारा करत, "चला याला धरून काही उपयोग नाही ... माफ करा याला आणि त्याचं सामान घेऊन या"
..
रजनीश :"धन्यवाद बॉस...मला माफ केल्याबद्दल"
..
कुंभा (स्मिथ हास्य करत) बाहेर निघून जातो.
..
कुंभा ची माणसं रजनीश ला:"चल तुला माफ केलं.." अस बोलून त्याचे नाक,तिथे पडलेल्या उशिने दाबून त्याचा जीव घेऊन टाकतात
...
... .... ... .... .... .... ..... ..... ..... ...
१६ जून २०१९ ,
सकाळचे ८:५० वाजता
..
(random पत्रकार)
"ब्रेकिंग न्यूज - ' रजनीश दातार ' एक साधा चहा विक्रेता, याची आपल्या राहत्या घरी आत्महत्या"

"गळफास घेऊन एक साधा चहा विक्रेत्याने आपला जीव गमावला"
..
"महत्त्वाची न्यूज म्हणजे त्याच्या खोलीत एक suicide note पण सापडली"

"कारण ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन च सरकून जाईल"

"एक सध्या चहा विक्रेत्याच्या बँक अकाऊंट मधून ५०० कोटीची फसवणूक"

"एवढे पैसे एका साध्या दुकानदाराच्या अकाउंट मधे येतात कुठून आणि हे सरकारच्या लक्षात कस येत नाही?"
..
"प्रकरण जितकं सोप दिसत आहे तेव्हढ हे नक्कीच नाही .. याचा खुलासा लवकरच होईल तुम्ही मात्र आमचं चॅनल बघत रहा...."

...
कुंभा (एका कॉल वर) :"मीडिया ला हे सगळं प्रकरण कळलं कस ... आणि त्याच्या खोलीतली ती suicide note कुणी बदलली
...

सर्जा(बॉस चा जवळ चा माणूस):"काय माहित नाही बॉस , आपण तर तुम्ही सांगितलेल्या प्रमाणेच काम केल होता,सगळा सामान पण गायब केल होत तिथून"
..

कुंभा:"हे जर प्रकरण अजून बाहेर आल तर आपल पण .... बर जाऊदे त्या शेलार ला आपल्या बंगल्यावर पाठवून दे...बघतोच त्याला आज"
..
सर्जा: "हो बॉस काम होऊन जाईल"
...
..
.
.(जर नोट वेगळी होती तर ती नेमकी कुणी आणि कशी बदलली ? आणि ५०० कोटी ?? एवढे पैसे कशे आणि का?)

.... .... .. .. . . . . . . . .. . . . . . ..

भाग ४ : न्यूज

(कुंभा आपल्या बंगल्यावर शेलार ची येण्याची वाट बघत बसलेला होता ... )
.. ...
(थोड्यावेळात च शेलार तिथे हजर होतो)
.. .. .. .

शेलार : मला बोलावलं ... काय झालं ?
..
कुंभा : हो (समोरच्या खुर्चीवर वर बसण्यासाठी इशारा करतो)
.
कुंभा : दोनच प्रश्न विचारतो तुला,,का ? आणि कुणाच्या सांगण्यावरून ?
.
शेलार (विचार करत): म्हणजे ? मला काही कळलं नाही
.
कुंभा :(रागात) दातार मला स्वतः म्हणाला होता की त्यानं ते पैसे तुझ्या सांगण्यावरून ट्रान्स्फर केले म्हणून..
.
शेलार(चिडून) : अरे काय वेडा दिसलो का मी तुम्हाला , मला जगायचं आहे अजून , आणि मीच अजून विचारात आहे की मी ती suicide नोट त्या रात्री तुम्ही गेल्यावर फाडून फेकून दिली तरी पण ती पत्रकारांना मिळाली कशी
.
कुंभा (आश्चर्यचकित होऊन) : काय ! म्हणजे तू काहीच सांगितलं नव्हतं त्याला !
.
शेलार : हो, मला तर हे सगळं प्रकरण सकाळी कळलं आणि मी कशाला स्वतःला या प्रकरण मुद्दामहून अडकवून घेऊ ..
.
कुंभा : (डोक्याला हाथ लावत) काही तरी मोठा घोळ आहे, ५०० कोटी कुणाकडे आहेत त्याचा पत्ता अजून लागला नाहीये
.
शेलार : मी पण त्याचा तपास करत आहे ,, पण अजून काही हाती लागलं नाही
.
कुंभा : त्याला जर हे कळलं तर आपल काही खरं नाही ,सगळ्या गोष्टींचा लवकर तपास करा आणि प्रकरण जेवढ्या लवकर बंद करता येईल तेव्हढ्या लवकर बंद करा
..
शेलार (गंभीर चेहरा करत): हम...प्रयत्न चालू आहेत
..
(सर्जा बाहेरून पळत पळत आत येतो )
..
सर्जा : बॉस ... बॉस...
.
कुंभा : काय रे काय झालं असा पळत पळत का आलास ?
.
सर्जा : (दमलेल्या आवाजात ) टीव्ही....न्यूज... न्यूज बघा ..
.
कुंभा : (आपल्या एका माणसाला टीव्ही लावण्याचा इशारा करत)
..
टीव्ही वरील न्यूज :
"आताची सर्वात मोठी न्यूज ,
सूत्रानुसार आज सकाळी मृत अवस्थेत मिळालेला रजनीश दातार हा कुणी साधा चहा विक्रेता नसून एक मोस्ट वॉन्टेड सायबर गुन्हेगार होता .
स्वतः ची ओळख लपवण्यासाठी तो चहा विकत असल्याची माहिती मिळत आहे"
"अनेक वर्षापासून पोलिस त्याच्या मागावर होते"
" महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या suicide नोट मधे कुणाच्याही नावाचं उल्लेख नाहीये पण. आज रात्री ७ वाजून २५ मिनिटाला आमच्या official mail वर ' 005 230/86/22/01 ' हा नंबर आणि त्याच्या खाली फक्त ' रजनीश दातार आणि अजून ५' असा मेसेज आला आहे आता यात अजून ५ कोण आहेत आणि त्यांचं पण हेच हाल होतील का ? आणि उरलेल्या नंबर याचा नेमका काय अर्थ होतो , हे आता शोध घेणं गरजेचं आहे,हा मेल कुठून आला याचा काही सुगावा अजून लागला नाहीये,
प्रकरण जितकं सोप दिसत आहे तितके हे साधे राहिले नाही,,"
.
कुंभा : (रागात) हे ....हे.. काय आहे ,हे बघ शेलार, आता जर हे प्रकरण अजून वाढल तर एक लक्षात ठेव ,या जगात आपल्याला कुणीच वाचविणार नाही .... लवकर काही तरी कर
.
शेलार : (त्रस्त होऊन ) हम..हो मी निघतो आता याचा छडा आता लावावाच लागेल ...
..
(एवढे बोलून शेलार बाहेर निघून जातो आणि कुणालातरी कॉल करत जातो)
शेलार : हॅलो ... कुठे आहेस निरव मी जे सांगत आहे ते नीट ऐक आता जरा सतर्क रहा, काही प्रोब्लेम आला तर मला कॉल करू नको ... तुला माहीत आहे की पुढे कुणाला कॉल करायचा आहे ते आणि हो,, सगळे फाईल्स लवकरात लवकर पुढे पाठवून दे आणि पुरावे नष्ट करून दे आता वेळ कमी आहे..
फोन ठेवतो

(तो साधा नंबर आहे का कुठला कोड आहे ? निरव कोण? आणि दातार अस काय काम करत होता? बऱ्याच गोष्टी पुढील भागात स्पष्ट होतील ..)

- to be continued

... .... .... .. . . .. .... ..... ..... ..... ...
(जर तुम्हाला या गोष्टी मधे इंटरेस्ट असेल तर नक्की कमेंट करून सांगा
कारण तुमची एक कमेंट माझ्या साठी खूप महत्त्वाची आहे😊)

thank you😊