Friendship - also a form - 8 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री - एक रुप असेही - 8

कॅन्टीन मध्ये ग्रुप स्टडीजच ठरवुन ते घरी जातात. या तिघी घरी पोहचतात.अवनी तु आधी अद्वैत दादा विचारून ठेव ग्रुप स्टडी बद्दल. रेवा गाडी पार्क करून अवनी ला म्हणते.अवनीः हो मी आज विचारते दादू ला आज, तो करेल आपली मदत. त्याला आपल्या स्टडी मधिल सब्जेक्ट वेगळे आहेत पण बेसिक हेल्प तो करु शकतो. मग भेटू संध्याकाळी खाली पार्क मध्येच भेटु. नेहा त्या दोघींना म्हनते.
त्या एकमेकींना by 👋 करून जातात.

😋हम्मम काय वास येेेतोय गाजर हलव्याचा, रेवा हॉल मध्ये एन्ट्री करतच म्हणते. आलात का मॅडम तुम्ही या तुमचीच वाट बघत होतो.
रेवा:ये wow दिदी(गायत्री) तु हलवा केलायस ?किती दिवसातून केलास बघुु कसा झालाय?
गायत्री :अगं आत्ताच आलीस ना तु जा पटकन फ्रेेश होऊन ये तुला सोडून खाल्ल्या वर आमच्या घशाखाली घास जाणार आहे का? रेवाची दिदी( गायत्री) तिला म्हणाली.
रेवा:हम्म मी आले फ्रेश हो तोपर्यंत सुरू करू नका. ती पळतच रूूूम मध्ये फ्रेेशव्हायला जाते.
वेडीच आहे ही मुलगी तिची आई तिला पळत जाताना बघुुन म्हणाली.😊

अवनी: नेहा अग चल ना खाली अजून रेवा पण नाही आली.
नेहा:हो आले आले ती शूज घालून पळतच तिच्या कडे गेली.
रेवा:आई मी जरा खाली जाऊन आले, अग थांब ना मी पण येते. रेवा ची दिदी तिला म्हणाली.
रेवा: अरे वा दिदू आज आमच्या सोबत तु पण?
गायत्री: हो अग आत्ताच एक डिझाईन बनवत होते, कंटाळा आलाय थोडा म्हणून, खाली पार्क मध्ये आल्यावर थोडे फ्रेश वाटेल, आणि त्या दोघांची पण भेट झाली नाही माझी इतक्यात.
रेवा:ok चल
अवनी :अग आपण तर आलो हि रेवा कशी आली नाही अजून थांब मी कॉल करते,
नेहा: अग थांब नको करूस कॉल ती बघ आली रेवा.
रेवा: Hii my cuties 🤗❤
नेहा: Hii रेवा
अवनी : Hi रेवा, Hi गायु दिदी
गायत्री : कशा आहात दोघीही, आणि काय ग मी थोडी बिझी काय झाले तुम्ही दोघी मला विसरून गेल्या .🤨😒(ती आर्किटेक्चर ला असते.)
नेहा: तस नाही ग दिदी कॉलेज मुळे टाईम च भेटत नाही.
गायत्री:गप ग नेहा तु तर राहुदे तुला तर फक्त रेवाच लागते आधी तर लहान असताना दिदु दिदु करत मागे फिरायचीस
नेहा : सॉरी ना दिदी ,रेवा यार सांगना ?
रेवा: ऐ माझ्या कडे नको बघुस मी काही करू शकत नाही.
गायत्री: आणि तु ग अवनी तु पण, 🤨
लहानपणी पासुन त्या सोबत वाढल्या होत्या, त्यामुळे रेवा सोबत त्या दोघीही गायत्रीला जवळच्या होत्या.
गायत्री आणि अद्वैत ते दोघेच त्यांच्यात मोठे होते. नेहा चा भाऊ (आर्य) पण लहानच होता. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघी गायत्री ला भेटल्या नव्हत्या म्हणून आज त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. रेवा मस्त पैकी त्या दोघींचा ओरडा एन्जॉय करत होती🤭. तेवढ्यात तिथे अद्वैत आला.
अद्वैत : अवनी तु इथे आहेस ,आई नी सांगितले की तु खाली आहेस म्हणून,
अवनी: काय रे दादू काय काम होते का?
अद्वैत : माझ्या काही इम्पॉर्टंट नोट्स सापडत नाहीयेत,तुझ्या रूममध्ये आल्यात का बघ ना जरा .
अवनी :हो दादू शोधते सापडले की देईन तुला.
अद्वैत: OK चालेल ,मग काय अवनी'ज गॅंग कसा चाललाय स्टडी ?आणि नेहा आर्य चा दहावीचा अभ्यास कसा चालू आहे ?
नेहा :हो दादू मस्त चालू आहे त्याचा अभ्यास.तसा तो तर नुसता पुस्तकी किडा आहे त्याला अभ्यासाशिवाय दुसरं काही सुचतच नाही.😊
अद्वैत : ओके चला बाय अवनी तुझं झालं की ये पटकन,
अवनी: हो,
गायत्री :चला निघते मी पण तुमचे चालूद्यया by 👋
रेवा: ऐ तुम्ही दोघींनी एक गोष्ट नोटीस केली का? हे दादा आणि गायु दिदी एकमेकांशी बोलले नाहीत.🤨😲
अवनी : होना यार आता काय झाले काय माहीत, परत भांडले काय हे ?😒
रेवा:हो ना लहानपणी कसं आपल्या दोघीत भांडणे लागली म्हणून सोडवायला यायचे , आणि स्वतःच भांडत बसायचे
नेहा:परत त्यांना बोलतं करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल आधी सारखे
रेवा: हम्म्म ok चला गाइज भेटू उद्या. By 👋

***********************************************


कथेत बरेच पात्र ॲड होणार आहेत. पण आपली कथा मेन अवनी ,रेवा, नेहा आणि विहान, रोहन यांची आहे. मग कसा वाटला आजचा भाग? आजच्या भागात विहान आणि रोहन नव्हते.कसा वाटला पार्ट ते नक्की कमेंट मधून कळवा.

तो पर्यंत stay tune with me ❤
Vaishnavi 🌸