Butterfly woman - 7 books and stories free download online pdf in Marathi

बटरफ्लाय वूमन - भाग 7 - अंतिम भाग

फुलपाखरांमध्ये सुद्धा शाकाहारी आणि मांसाहारी फुलपाखरे आहेत. भुंग्यामध्ये तर बहुतेक भुंगे हे मांसाहारी आहेत.ते मनुष्याला सुद्धा खाऊन टाकायला मागेपुढे पहात नाहीत. लहान किडे आणि लहान प्राणी सुद्धा त्यांचे भक्ष्य आहेत.अनेक भुंगे हे वनस्पतींची पाने खाऊन सुद्धा जगतात किंवा लहान लहान भुंगे खातात.

कीटकयुद्ध संपल्यानंतर वैंजंतेला असलेला धोका हा खूपच टळला होता. वैंजता आता निर्धास्तपणे या जगात फिरू शकणार होती. फक्त प्रश्न होता तिच्या वंशवृद्धीचा. तो जर लगेच सुटला असता तर बरे झाले असते असे लैलाला आणि विलासला वाटत होते.

वैंजंता खरी फुलपाखरू नसून मानवी इच्छाधारी फुलपाखरू स्त्री होती. तिला कायमचा मानवी जन्म मिळणार होता.ते तसेच व्हावे अशी लैलाची इच्छा होती.
एक बटरफ्लाय वुमन म्हणून तिची ओळख निर्माण होणार होती .समाजात ती एक आश्चर्य म्हणून वावरणारी होती. तिचा जन्मः रिव्हर्स येणार नव्हता. म्हणजेच ती पुन्हा फुलपाखरू बनू शकत नव्हती. यापुढे ती मनुष्यजन्म यातच राहणार होती. मात्र तीचे अपत्य हे फुलपाखरू म्हणून जन्मण्याची शक्यता होती. कदाचित त्या अपत्याला फुलपाखरासारखे खरेखुरे पंख असण्याची शक्यता होती. त्याच्या संकट वेळी ते त्याला बाहेर काढता येणार होते. आणि त्याला ते जवळ नको असतील तेव्हा दुमडून त्याच्या शरीरामध्ये ठेवता येणार होते. त्याचा त्याला जराही त्रास होणार नव्हता.

थोडक्यात तीचे अपत्य सुद्धा इच्छाधारी फुलपाखरू असणारे होते. तसे पाहायला गेले तर, पृथ्वीवरील कोणताही जन्म मग तो प्राणी मात्र यांचा असेल, वृक्षांचा असेल इतर सजीवांचा असेल. अगदी अगदी निर्जीवांचा सुद्धा असेल .तो कधीच माघारी जात नाही त्याला पुढेच जायचं असतं. हाच नैसर्गिक नियम आहे. जन्माचा एक तर मृत्यू होतो. अथवा उदय होतो. कोणत्या जन्माचे जन्मांतर झाले. तर मात्र त्या जन्माला अवतार मिळतो. तो जन्म अवतारात बदलतो. हे साधं सोपं गणित होतं.

परंतु वैजंताला या जन्मात तिच्या साठी योग्य साथीदार मिळाला हवा.आपण जर या जन्मात पुरुष म्हणून जन्मलो असतो तर कदाचित आपण वैजंताशीच लग्न केले असते. असे लैलाने विलास जवळ बोलून दाखवले होते. पण ते घडणारे नव्हते.

तसं पाहायला गेलं तर मानव जन्म हा श्रेष्ठ जन्म आहे. हे जरी मान्य केलं तरी तो जन्म विशिष्ट आहे असं ठरत नाही. कारण त्या जन्माला सुद्धा मरण आहे.एखाद्या
पोल्ट्री फार्म मध्ये अंड्यांच्या मार्फत लाखो कोंबड्या तयार होतात. त्या कापल्या जातात. त्यांचे सेवन केले जाते.. त्यांचा कृत्रिम मृत्यु घडवला जातो. त्यांची अनैसर्गिक हत्या केली जाते. व त्यांचा जीवन जन्म मध्येच संपतो.

त्याच प्रकारे पूर्वीच्या काळी लाखो मानवांचा युद्धप्रसंगी जीव जात होता. साथीमध्ये ते मृत्युमुखी पडत होते किंवा अच्छे छावण्यांमध्ये यामध्ये असंख्य मानव प्राणी मरत होते. परंतु सध्याच्या युगात मानवाला भावनिक नात्यांनी जोडले गेले आहे. आणि जे जे काही आहे ते फक्त मानवासाठी निर्माण केले गेले आहे असं एक चित्र उभे राहिलेले आहे . मनुष्य हा नेहमीच सजीवांच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे. त्याच्या जन्म-मृत्यूची नोंद ठेवली जाते त्याचा इतिहास वाचला जातो आणि प्रत्येक मनुष्याला एक विशिष्ट ओळख आणि नाव असतं.इतकेच म्हणता येईल... स्वतःच्या नावामुळे आणि ओळखीमुळे मनुष्य इतिहासात अमर बनतो. त्याच कारणामुळे अमुक व्यक्ती इतिहासात होऊन गेली असं कोणीही सांगू शकतो. आणि यासाठी नावात काय आहे असं बोलणं हे म्हणजे फोलपणाचे लक्षण आहे.

मानवाला नेहमी वर्तमान काळातच जगता येते. त्याला त्याच्या मनाद्वारे भूतकाळातल्या आठवणी आठवतात. त्याला भविष्यकाळात जाऊन जगता येणार नाही किंवा त्याला त्यामध्ये डोकावून पाहता येणार नाही. तो कल्पना करू शकतो. तो प्रतिभाशक्तीने ते इमॅजीन करू शकतो .परंतु प्रत्यक्षात भविष्यकाळात जाऊन तिथे त्याला त्याचा मागोवा घेता येणार नाही किंवा पुढे घडणाऱ्या गोष्टी त्याला आधी पहाता येणे अशक्य आहे. हेच म्हणता येईल.... किंवा ते तसेच आहे.

मग फुलपाखरू स्त्री किंवा बटरफ्लाय वुमन एक मिथ्य कथा आहे कां...
तर त्याचे उत्तर नाही असेच म्हणता येईल.
म्हणजे काय समजायचं यात..
म्हणजे जशी ज्याची बुद्धी ,जसे ज्याचे विचार करण्याची कुवत तसं ते ते त्याने स्वत:च्या चमत्कारिक शक्तीने आणि अद्भुत इंद्रियांच्या मार्फत आकलन करून घ्यावे.

बटरफ्लाय वूमन मानवाच्या कल्याणासाठी अवतार घेत होती आणि माणसाचे रक्षण करत होती. त्यामुळे ती एक चांगली स्त्री होती. इच्छाधारी फुलपाखरू स्त्री होती. फुलपाखरांच्य अवतारातील स्त्रीने जर मानवी जीवनात चांगले कार्य केले, तर तिला पुन्हा पुन्हा चांगला अवतार घेण्याची संधी मिळते.

समाप्त.