Bhintichya Palyad - 1 books and stories free download online pdf in Marathi

भिंतीच्या पल्याड ( भाग 1 )

रामनगरचे हे गाव तसे म्हंटले तर हे गाव छोटेसेच आहे आणि वस्तीही फारशी कमी प्रमाणातच आहे पण ईथल्या वस्त्या मात्र अर्धा अर्धा किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे तिथे माणसांची वर्दळ फार नसायची त्यामुळे बाहेर कोणी आल तरी कळत नव्हत आणि त्यात गावात दिव्यांची सोय नसल्यामुळे सगळीकडे अंधार असायचा आणि त्यामध्ये सतत भितीच्या वातावरणामध्ये जगायला लागायच त्यात जंगली जनावरांची पण भीती होती रात्री अपरात्री लोकांवर जीवघेणा हल्ला करायचे त्यामुळे गावात काहीस दहशतीचे वातावरण पसरलेल होत ज्या ज्या परिसरात जनावरांचा वावर होता त्या त्या परिसरातील वस्तीतील लोक अजिबात घराबाहेर पडायला मागत नव्हते घाबरून घरातच बसून रहायचे काळोख असल्याने माणस खूपच सावध रहायचे कधी काय होईल कोठून काय येईल ते सांगता येत नव्हते हल्लीच शेजारच्या गावात राहाणारा सखाराम यांच्या बाबतीतही अशीच काय घटना घडली होती त्या दिवशीच्या रात्री रमण बरोबरही असेच काय घडले होते ज्यामुळे रमण खूपच भयभीत झालेला होता अस कधी रमणच्या बाबतीत अशी घटना घडली नव्हती हे पहिल्यांदाच रमण बरोबर घडत होत खरच कुणास काय ठाऊक त्या रात्री रमण फार घाबरलेला अवस्थेत होता रमणला नक्की काय झाल कळायला मार्ग नव्हता घड्याळातही रात्रीचे दोन वाजून गेले होते बाहेर सोसायटाच्या वाऱ्यासह पावसाहानेही कहर केला होता घराच्या दारापाशीच्या खिडक्याही खुप आवाज करत होत्या त्याच्या आवाजाने रमणची भीतीही फार वाढली होती त्याच्या मनात सतत प्रश्नांचा काहूर माजला होता त्यात सर्वत्र काळोख ही फार झालेला होता रस्ते ही शांत शांत होते सगळीकडे शुकशुकाट पसरलेला विजेंचा होणारा कडकडाट आणि कुत्र्यांचा रडण्याचा आवाज स्वयंपाक घरातला टप टप होणार आवाजाने काहीतरी विपरीत होणार याचे संकेत सांगत होते रमण ही काही वेळा करिता शुध्द हरपून बसलेला त्याच्या डोळ्यांमध्ये कसली तरी भीती दिसत होती तो सतत समोर असलेल्या भिंतीकडे एकटक पाहताच होता त्याच्या कानामध्ये कसले ना कसले चित्र विचित्र आवाज येत होते त्यातच रमणलाही फार घामही फुटला होता तो भितीने थरथर कापत होता भिंतीच्या पल्याड कोणीतरी आहे याचा रमणला सतत आभास होत होता कोण असेल भिंतीच्या पल्याड आणि रमण ईतका का घाबरलेला होता अस रमण बरोबर झाल तरी काय काहीही समजत नव्हत रमण सारख्या हुशार माणसा बरोबर हे असे काही तरी होणे स्वप्नातही वाटल नव्हत अत्यंत हुशार चतुर आणि विद्वान असा हा रमण ज्याची लोक तोंड भरून कौतुक करायचे त्याच्या कामाची स्तुती करायचे गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मदतीला धावून जायचा अडल्या नडल्या गरजूवंताणा गोर गरिबांना कसलाही विचार न करता त्यांना जी काय मदत लागायची ती तो करायचा त्यामुळे गावातील लोकांसाठी तो जणू एक देवदूतच झाला होता गावातील लोक त्याला फार मानायचे तो जे जे बोलेल तसे ते गावातील लोक वागायचे गावातील लोकानी कधीही रमण चा शब्द खाली पडू दिला नाही उलट त्याचा शब्दाचा मान नेहमी ठेवत आले असा हा रमण आणि आज तर त्याच रमणची ही अशी अवस्था पहावत न्हवती कधीही कुणाला न घाबरनारा रमण आज मात्र भयभीत झालेला होता हे मात्र खरं घटना अशी घडली या प्रकारे घटना क्रं -: 1 रमणला त्या रात्री खूपच तहान लागली होती म्हणुन तो पाणी पिण्यासाठी उठला त्यावेळी मध्यरात्र झालेली होती घड्याळात रात्रीचे दोन वाजले होते आणि त्यात रमणच्या डोळ्यावर ईतकि झोप होती की डोळे उघडायला ही मागत नव्हते तो कसा बसा बिछानावरून पाणी पाणीसाठी स्वँपाक घराच्या दिशेकडे निघाला आणि मध्येच कुठे तरी धडपडलाच काळोख असल्या कारणामुळे त्याला समोरच काहीच दिसत नव्हत वरून डोळ्यावर असलेली झोप मुळे