भगवान श्रीकृष्ण महान शेतकरी राजा आणि जाणता अभिनेता होता - भाग-२ in Marathi Spiritual Stories by Chandrakant Pawar books and stories Free | भगवान श्रीकृष्ण महान शेतकरी राजा आणि जाणता अभिनेता होता - भाग-२

भगवान श्रीकृष्ण महान शेतकरी राजा आणि जाणता अभिनेता होता - भाग-२

         श्री व्यासमहर्षींनी महाभारत उर्फ जय या ग्रंथामध्ये स्वतःचे आत्मचरित्र सांगितलेले आहे... स्वतःची आत्मकथा लिहिली आहे .त्यामध्ये एकाला एक जोडून.पुन्हा एकाला एक जोडून अशा अनेक कथा त्यांनी लिहिल्या आहेत... त्यांनी  ते अनुभव अनुभवलेले आहेत.

महाभारताचा काळ  पाच हजार वर्षाचा असावा. त्यावेळेच्या शस्त्रक्रिया आणि अस्त्रांचे प्रयोग यामुळे तो काळ  खूपच प्रगत काळ असला पाहिजे .  महाभारताच्या काळामध्ये मेकअप  कला खूपच प्रगत असावी.रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा या कलां खूपच प्रगत होत्या. त्यावेळी मेकअप करून अनेक राक्षस वृत्तीची लोकं स्वतःची रूपे बदलत. मेकअप मुळे स्वतःचे रूप बदलल्यामुळे मेकअप कला जालना रे अदृश्य झाले असा लोकांचा समज होई. त्यामुळे त्या काळामध्ये गुप्त होणे आणि प्रगट होणे या कला होत्या असे म्हटले जाते...
व्यास महर्षीनी पांडवांच्या पराक्रमाने प्रेरीत होऊन ग्रंथ लिहिला. त्यावेळी लेखनिक म्हणून व्यासांनी श्री गणेशाला तो ग्रंथ संकलित करून लिहायला सांगितला...

     व्यासांनी जय ग्रंथ लिहिला तो चोवीस हजार श्लोकांचा  होता. पुढे व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी त्याचा विस्तार केला. त्यांनी एक लाख श्लोकांचा  महाभारत ग्रंथ निर्माण केला. महाभारत ग्रंथामध्ये द्रौपदी लग्नाच्या वेळी कृष्णाचा संदर्भ येतो.. तिथूनच श्रीकृष्णाची सुरवात वाचकाला कळत जाते... महाभारतातला श्रीकृष्ण  मनुष्य आहे. त्याला नंतर देवत्व प्राप्त झाले... त्याच्या पराक्रमाने आणि त्याच्या कृष्णलीलांमुळे...

श्रीकृष्णाची कथा वाचताना वाचकांना त्रिपुरासुर वध,कलियुगाचे वर्णन , खांडववन ज्वलन. परशुरामाची भेट. द्रौपदीला वस्त्रहरणाच्या वेळी श्री कृष्णा मार्फत वस्त्र पुरवणे. अन्नाच्या वेळी दिलेली  द्रौपदीची थाळी, शिशूपालाचा वध , जरासंधाचा वध ,अर्जुनाचे सारथ्य आणि रणांगणावर अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता. यासोबत भगदत्ताचे अस्त्र , कालयवनाचा वध, कालिया मर्दन, कंस मामा आणि पुतना मावशीचा वध अशा अनेक गोष्टी समजतात..

श्रीकृष्ण हा शेतकरी होता. गुराखी होता.त्याचा भाऊ बलराम हा सुद्धा शेतकरी होता. श्री कृष्णाची आई देवकी आणि श्री बलरामाची आई रोहिणी होती. त्यांचे वडील वासुदेव होते.बलरामाचे शस्त्र शेत नांगरण्याचा नांगर होता . श्रीकृष्णाचे अस्त्र सुदर्शन चक्र होते.
कृष्ण कमरेला पितांबर नेसलेला असे. त्याचे उत्तरीय फिकट रंगाचे होते. कृष्णाचा रंग हा निळा होता.
बलरामाची नेसायचे वस्त्र निळे होते आणि बलराम गोरा होता. त्याचे उत्तरीय गडद रंगाचे होते... श्रीकृष्णाने शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दही,दुध, तूप,लोणीचा धंदा वाढवला होता. त्याचा भाऊ बलराम त्याने यमुना नदी जवळ कालवा निर्माण केला होता. बलरामाने नांगर चालवून  यमुना नदी गोकुळ नगरा जवळ खेचली होती. तशा खुणा आजही तिकडे दिसतात.

महाराष्ट्र राज्यातील विदर्भ कन्या रुक्मिणीने जगातलं पहिलं लव्हलेटर म्हणजेच प्रेमपत्र लिहिलं होतं. तीने तिचे प्रेम पत्र श्री कृष्णा कडे पोहोचवले होते. त्यात ती यशस्वी झाली होती. श्रीकृष्णाला पत्र पाठवून रुक्मिणीने श्रीकृष्णाला स्वतःचे हरण करण्यास सांगितले होते. कारण तिचे पहिले प्रेम श्रीकृष्ण होता.

    राधा कृष्णाच्या भक्तीत दंग  होती . ती श्रीकृष्णावर प्रेम करायची. एक भक्त म्हणून . राधा आणि कृष्णाच्या वयात अंतर खूप होतं .राधेच लग्न झालं होतं .तिचा ' 'अनय ' नावाचा पती  होता. कृष्ण लहान होता.  बालपणातला बाळकृष्ण कृष्णलीला दाखवायचा. लीला करायचा. तिच्याशी खेळायचा. राधा कृष्णावर खुप प्रेम करायची. लोकं म्हणायची राधा आणि कृष्णाचे प्रेम प्रकरण आहे. एवढ्या लहान मुलाचे कसे काय प्रेमप्रकरण असेल ना... पण लोकांचे काय जातेय. निंदा करायला.

लोकं काय ऐकत नाहीत. नाव ठेवायला.  कृष्ण मोठा झाला. कुमारवयात आला. त्याला मिशा फुटल्या .तो तरणाबांड दिसू लागला .तरी पण राधेची कृष्णभक्ती कमी झाली नाही. ती त्याला आपला मुलगा समजायची. परंतु जे निर्लज्ज लोकं होते. ते सांगायचे  राधेचं आणि कृष्णाचं प्रेमाचं नात होतं. अशी अनेक वर्षे गेली. त्यामुळे अनय नावाचा राधेचा पती  तो सुद्धा कृष्णावर संशय घ्यायला  लागला. तो राधेचा संशय घ्यायला  लागला. आपला पती आपल्यावर संशय घेतोय म्हटल्यावर राधेचा तर  धीरच खचला . 

अनय  राधेचा पती होता .तो कंसाचा चांगला मित्र होता. म्हणजे कंसाला  मानणारा होता. कंस कृष्णाचा मामा होता.कंस कृष्णाच्या वाईटावर उठला होता . मथुरेत कंसाचे राज्य असल्यामुळे कृष्णाची अधिकच नालस्ती झाली. त्यासोबत राधेची सुद्धा  बदनामी झाली . हळूहळू लोक निंदेमुळे  राधेचं आणि कृष्णाचं नातं बदललं .असे लोकं अफवा उडवत म्हणतात.ते नातं लोकांनी बदलले. परंतु राधेची कृष्णभक्ती अशीच राहिली. लोकांनी राधेला बदनाम केलं. म्हणून कृष्णाच्या वेडापायी राधा झाली बदनाम. असे लोकं म्हणतात . प्रेमामध्ये राधा वेडी झाली अशी तेव्हापासून  उक्ती प्रसिद्ध झाली.

राधे प्रमाणे मीरा सुद्धा लहानपणापासून कृष्णाच्या मूर्तीवर प्रेम करायची. हळूहळू मीरा जवान होत गेली आणि त्यानंतर तिचं लग्न झालं .तरी पण मीरा कृष्णाच्या मूर्तीवर प्रेम करत होती. मीरा कितीतरी लांब लांब राहत होती आणि श्रीकृष्ण शुद्ध तिच्यापासून खूप लांब अंतरावर राहत होता.  कृष्णाची कीर्ती तिच्या पर्यंत आली होती . असं करता करता मीरेचे लग्न झालं तिचा नवरा होता.  तो वारला .त्यानंतर मीरा विधवा झाली.ती विधवा झाल्यामुळे ते खापर मीरा श्रीकृष्णावर प्रेम करते म्हणून लोकांनी मीरेची सुद्धा बदनामी केली आणि मीरा सुद्धा कृष्णासाठी बदनाम झाली. असा गलका झाला.
असा हा प्रेमळ खोडकर कृष्ण सगळ्यांना हवाहवासा वाटणारा होता . सध्याच्या काळात एखाद्या सिनेमांमधल्या हिरोची कीर्ती ऐकून अनेक मुली त्याचा चित्रपट पाहायला जातात. एखाद्या क्रिकेट वीराच्या क्रिकेटसाठी क्रिकेट बघायला जातात .त्याच प्रमाणे कृष्णाची कीर्ती एकूण अनेक स्त्रिया , तरुण मुली,अनेक माणसं श्रीकृष्णाच्या भक्तीच्या प्रेमात पडतात. आता जसे  सचिन तेंडुलकर विराट कोहलीची फॅन मंडळी त्याच्यासाठी वेडेपिसे होतात. तसेच त्या काळात कृष्णाचे होते. पण त्या काळानुसार लोकांनी त्याला नावे ठेवल्याने अनेक लोकं त्यात बदनाम झालीत. कृष्णाच्या भक्तीमध्ये संसार सोडून ते कृष्णभक्तीत रंगले आणि संसाराकडे दुर्लक्ष झाले .त्यांच्या प्रपंचाची वाट लागली .त्यामुळे श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये पुरुष मंडळी सुद्धा बदनाम झाली.परंतु पुरुषांना एवढा  अपमान सहन करावा लागला नाही. मात्र स्त्रियांना त्या काळात खूप अपमान आणि निंदानालस्ती सहन करावी लागली....

तरीही राधा कृष्णावर मनापासून प्रेम करत होतीच. होता होता असं झालं की  राधाला श्रीकृष्ण स्वतःचा पती वाटू लागला होता. श्रीकृष्ण नावाचा महिमा अपरंपार होऊ लागला.  नंतर नंतर जो तो श्रिकृष्णभक्तीत रममाण झाला. प्रत्येक माणूस  कृष्णभक्तीत रंगू लागला. त्यामुळे कृष्णाच्या कीर्ती मुळे राधा आणि कृष्ण यांची मैत्री झाली. त्यामुळे झालं काय  की त्यामुळे लोकं तिला अधिकच बदनाम करायची. परंतु तोपर्यंत श्रीकृष्ण हा दैवत्वास पावला नव्हता.
जर एका पुरुषासोबत अनेक स्त्रिया बोलत असतील तर त्यांच्याबद्दल संशय घेतला जातो. त्या माणसांचे यांच्याशी काहीतरी आहे आणि मग तो माणूस किती चांगला वागला तरी समाजात त्यांच्या बाबत संशय घेतला जातो . त्यामुळे कृष्ण हा कन्हैया आहे. त्याला कन्हैया असे चिडवलं जाते. सध्याच्या युगात एखाद्या  पुरुषाला कन्हैया म्हणून  बदनाम केले जाते. तो स्त्रीलंपट आहे असे कन्हैया या शब्दातून दर्शवले जाते. काळाच्या ओघात शब्दाचा अर्थ बदलतो तो असा आहे. येथे हे उदाहरणादाखल म्हणता येईल. पुरातन काळापासून लोकस्वभाव हा तसाच राहिला आहे .तो बदललेला नाही .तो संशयी आहे .लोकस्वभाव हा स्वार्थी आहे. मग समोर दैवी व्यक्ती असेल ,साधू असेल ,संत असेल किंवा साधी व्यक्ती असेल त्या सर्वांना संशयाने पाहिले जाते. मनुष्य स्वभाव हा असा आहे... निंदानालस्ती किंवा एखाद्याची टर उडवणे हे प्रत्यक्ष देवालाही सुटलेले नाही. समाजामध्ये जे प्रस्थापित असतात ते अशी कामे करतात आणि आपलं प्रस्थ  वाढवायला पाहतात. परंतु श्रिकृष्णा सारखी माणसे त्याच्यावर मात करून आपला नावलौकिक वाढवतात. भगवान ठरतात... श्रीकृष्णाला विविध रूपे घेण्यामध्ये सहजपणे जमत होते. त्यामुळे तो गोपीकांसोबत लीलया लीला करीत होता. त्याला उत्तम अभिनय करता येत होता. त्याच्या बळावर तो जाणता अभिनेता होता.


Rate & Review

uttam parit

uttam parit 5 months ago