जल तू ज्वलंत तू! - 7 in Marathi Novel Episodes by Prabodh Kumar Govil books and stories Free | जल तू ज्वलंत तू! - 7

जल तू ज्वलंत तू! - 7

7

--------------

सना आणि सिल्वा दोघी हसतमुख होत्या. आनंदी स्वभावाच्या होत्या. त्यांची बुद्धी त्यांच्या वयाच्या मानाने जास्त तीव्र होती. पण त्यांना जास्त शिक्षण घेण्यापेक्षा जग बघण्याची इच्छा होती. त्यांना कुठेही जायची संधी मिळाली की, त्या सोडत नव्हत्या. पाणी त्यांनाही आवडत होते. समुद्र, झरे, सरोवर त्यांची आवडती ठिकाणं होती. गेल्या शनिवारी त्यांनी एका पॉप स्टारचा कार्यक्रम पाहिला. तेव्हापासून त्या हे गाणे सतत गुणगुणत होत्या.

कभी पत्थर पे पानी कभी मिट्टी में पानी

कभी आकाश पे पानी कभी धरती पे पानी

दूर धरती के तल में बूँदभर प्यास छिपी है

सभी की नजर बचाकर वहाँ जाता है पानी

(कधी दगडावर पाणी, कधी मातीत पाणी, कधी आकाशावर पाणी, कधी धरतीवर पाणी, लांब धरणीच्या तळाशी थेंबभर तहान लपली आहे. सगळ्यांच्या नजरा चुकवून पाणी तिथे जाते.)

खरंच पाण्याची अस्वस्थता अजब आहे. नौका यावरच तरंगतात. यातच बुडतात. सना मेन्डोलिन वाजवत असे व सिल्वा गाणे गात असे. जगाने स्वत:ला तरुण ठेवण्यासाठी किती युक्त्या शोधून काढल्या. जे लोक या जगातून जातात ते पुन्हा पुन्हा येतात. सिल्वा, रस्बीसारखं सगळं विसरून गात असे.

पेरिना डेलाच्या येण्याच्या तयारीला लागली. बर्‍याच वर्षांनंतर अशी संधी आली होती. डेला आपल्या पतीबरोबर येत होती. फिन्जान सुद्धा दहा वर्षांनी तरुण वाटू लागला होता. सना आणि सिल्वा आपल्या वडिलांना मागच्या वेळी भेटल्या होत्या, तेव्हा लहान होत्या आणि आता... आता त्यांच्या खोलीबाहेर त्यांच्या नावाची नेम प्लेट लागलेली होती, ‘सना रोज’ आणि ‘सिल्वा रोज!’

एखाद्या वडिलांसाठी ही अभिमानाची बाब असते, ते जेव्हा आपल्या मुलांची नेम प्लेट भिंतीवर लावलेली पहातात.

पेरिनाने डेलाचे पत्र पुन्हा पुन्हा वाचले होते. फिन्जानने घराच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दोन खोल्या बांधायला सुरुवात केली होती. सना आणि सिल्वाने नवीन खोल्या सजवल्या. जेव्हा एकाच ठिकाणी तीन पिढ्या एकत्र राहणार असतात तेव्हा स्थिती मजेशीर असते. एकदम नवीन पिढीला आपल्यासाठी फार जागा नको असते. त्यांना वाटते आपल्याला अजून जग बघायचे आहे. एखाद्या सोन्याच्या पिंजर्‍यात बंद व्हायचे नाही.

वर्तमान पिढीला वाटते, प्रत्येक कामासाठी वेगळी जागा असावी. जितकी जागा आपल्या नावावर असेल तितके चांगले. जीवनाच्या शेवटच्या मुक्कामावर असलेली पिढी त्यांचा परीघ कमी होऊ देत नाही. तरुण लोक याला त्यांची हाव म्हणतात. खरं तर ही त्यांना त्याच्या एकटेपणाची वाटणारी भीती असते. ते बोलून दाखवत नाहीत, पण मनात विचार करतात. आमच्याजवळ एकान्त आणू नका. आमच्या पश्चात सगळं तुमचंच आहे.

पण जसे आई-वडील आपल्या मुलांना आपले वापरलेले कपडे घालू देत नाहीत, तसेच नवीन पिढी आपल्या पूर्वजांच्या खोल्या नाईलाज असला तरच वापरते. तरुण पिढीची राहण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांना पूर्वजांचा दृष्टिकोन कसा पसंत पडेल. हा मोठ्यांबद्दल त्यांना असलेला आदर आहे.

डेलाचे येण्याचे दिवस जवळ येत चालले होते. दोन्ही बाजूला उत्साहाचे वातावरण होते. उत्साहाच्या भरात डेला आपल्या मिशनबद्दल माहिती देत होती. इकडे तिचे आई-वडील आणि मुली तिच्या येण्याचे दिवस मोजत होते. फिन्जान आणि पेरिनाचे काम होते डेला आणि तिचा पती, मित्रांसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था ठेवणे. सना आणि सिल्वावर त्यांच्या राहण्याच्या जागेची सजावट करण्याची जबाबदारी होती. डेला दांपत्य दूर देशातून आपल्या मित्रांना घेऊन पहिल्यांदा येत होते.

डेला सध्या ज्या लोकांबरोबर काम करत होती, ते झुंजार आणि कामात निष्णात होते. चायनिज होते. सध्या ते नवीन प्रॉडक्ट्स बनवून त्यासाठी बाजारपेठ मिळवण्यासाठी इतर देशात त्याचे प्रदर्शन करत होते. त्यांची कंपनी झपाट्याने प्रगती करत होती. त्यांची सीमा फक्त आकाश होते! कंपनीची एक महत्त्वाची अट होती. गोपनियता! त्यांचे प्लॅन गुप्त असायचे. कोणताही प्रचार-प्रसार नसायचा. यशस्वी होईपर्यंत ते कोणाला कळू देत नव्हते की, ते काय करत आहेत. त्यांचा सिद्धांत होता की, कलाकारांना ग्रीनरूममध्ये नाही, रंगमंचावरच पाहिले पाहिजे.

म्हणूनच सना व सिल्वालाही माहीत नव्हते की, त्यांचे आईवडील इथे कशासाठी आलेले आहेत. त्यांना त्याचे फारसे महत्त्वही नव्हते. ते इथे येत आहेत, याचाच त्यांना आनंद होता.

फिन्जान आणि पेरिनाच्या बाबतीतही तसेच होते. त्यांची लेक-जावई येत आहेत, हे त्यांच्यासाठी एखाद्या सणासारखे होते. बस्स एवढेच! त्याच्या अलिकडे-पलिकडे, वर-खाली काही नाही.

भारतीय घरात जेव्हा खीर बनवली जाते तेव्हा गृहिणीचे लक्ष इकडे असते की, त्यात सगळा सुका मेवा घातला की नाही? हे कोणाच्या लक्षात राहते की सण कोणता आहे. कृष्णजन्म की रामनवमी, की शंकराचा जन्म. भारतीयच का जगातल्या सगळ्या घरात काही ना काही निमित्ताने पदार्थात साखर विरघळतच असते. ख्रिसमसमध्ये फिका केक कोणी खात नाही. हलवा कशाचा का असेना, रव्याचा, गाजराचा, मूग डाळीचा, बटाट्याचा गोडवा असलाच पाहिजे. मग पाहुण्यांना डायबेटीस असला तरी पदार्थ पाहुण्यांच्या सेवेसाठी नसतात. यजमानाच्या उत्साहाचे ते प्रदर्शन असते.

बफलो शहर पाहुण्यांचे गंतव्य होते. त्यांना लांबची ठिकाणे दाखवण्याचा, फिरायला घेऊन जाण्याचा कार्यक्रम आखला जाऊ लागला. यापूर्वी डेला जेव्हा जेव्हा आली होती तेव्हा घरच्या लोकांबरोबर काही दिवस राहणे एवढाच तिचा उद्देश असायचा. ती थोड्या दिवसांसाठी येत असे. ती आपल्या पतीबरोबर कधी आली नव्हती. यावेळी ती बरेच दिवस राहणार होती. मित्रांबरोबर येणार होती. त्यामुळे हिंडण्याफिरण्याचा कार्यक्रम होणार होता. दोन्ही मुलींना वेळ देता येणार होता. फक्त आता त्या क्षणाची वाट पाहायची होती, जेव्हा त्यांचे विमान अमेरिकेच्या धरतीवर उतरेल.

***

न्यूयॉर्कच्या विमानतळावर डेला वुडन आणि त्यांचे तीन मित्र जेव्हा उतरले, तेव्हा सना आणि सिल्वा फुलबाज्यासारख्या तडतडत होत्या. त्या हंगामातील सगळ्यात सुंदर फुलांचे पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. दोन्ही मुलींनी त्या देखण्या पुरुषाकडे टक लावून पाहिले जो त्यांचा पिता होता. आईच्या उपस्थितीला जणू त्यांनी ओंजळ भरून पिऊन घेतले. थोड्या वेळाने सिल्वा त्या शानदार कारच्या स्टिअरिंगवर होती. कार सगळ्यांना घेऊन बफलोकडे चालली होती. साठ वर्षांचा, हो, सत्तावन्न वर्षांचा चूम आणि एकवीस वर्षांचा युवान सगळे गाडीच्या खिडकीतून बाहेरचे दृष्य पाहत होते. डेला आणि सना एकमेकींच्या कानाशी लागून सारखे कुजबुजत होत्या. त्यांच्याजवळ वेळ थोडा होता, गोष्टी जास्त!

वुडन विचार करत होता, ज्या मुलीला तेा मऊ मांजराच्या पिल्लासारखा सोडून गेला होता, ती आज वेगाने गाडी चालवत आहे. बफलोकडे घेऊन जात आहे.

पुढचे काही क्षण पाहुण्यांनी फोटोग्राफीत घालवले.

पेरिना आणि फिन्जानने पाहुण्यांचे स्वागत ज्या उत्साहाने केले, तसे स्वागत चीनला अमेरिकेकडून किंवा अमेरिकेला चीनकडून स्वप्नातही मिळाले नव्हते. लाजाळू युवानचा प्रवास सना व सिल्वासारख्या मैत्रिणींबरोबर आठवणीत राहिल असा झाला.

बफलो शहर दोन भागात विभागलेले होते. एका बाजूला स्थानिक लोक होते. दुसर्‍या बाजूला जगाच्या कानाकोपर्‍यातून येणारे प्रवासी होते. तिथे नायगारा फॉल्स पाहणार्‍यांची गर्दी असायची. लोकांनी आपल्या आपल्या देशाच्या लोकांना जेवण्याखाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

मिस्टर हो ने सांगितले, ते शांघाईजवळ एका लहान शहरात बनवलेल्या स्टेडियममध्ये मुलांना खेळाचे प्रशिक्षण देऊन स्पर्धेसाठी तयार करत होते. ते त्या स्टेडियमचे मालक होते. लहान बाळाला धष्टपुष्ट तरुण खेळाडू बनवणे त्यांची हौस होती. तसाच व्यवसायही होता. आईवडील आपल्या मुलांना त्यांच्याकडे सोपवून त्यांच्या सोनेरी भविष्याबद्दल निश्चिंत होत असत. ते मुलांचे शरीर पोलादी बनवण्यात कोणतीही कमतरता ठेवत नसत. ते खेळाला हौसेपासून मोहिमेत बदलत होते. आपले कौशल्य आणि धैर्याची किंमत वसूल करत होते.

मिस्टर चूम खेळाचे आंतरराष्ट्रीय फायनान्सर होते.

सना आणि सिल्वाला हे ऐकून मजा वाटली की युवान इंटरनॅशनल स्तराचा पोहणारा आहे.

या पाहुण्यांची कंपनी मुलांना भरती करून कोणताही प्रचार न करता गुप्त ठिकाणी प्रशिक्षण देत होती. मुलं जेव्हा एखादी मोठी उपलब्धी मिळवत, तेव्हा त्यांना पुढे आणले जात होते.

सगळं कुटुंब पाहुण्यांशी मिळून मिसळून गेलं होतं. दिवस पळत नाही उडत होते!

काही दिवसांतच डेला आणि तिच्या मित्रांनी बफलोचा कानाकोपरा पाहिला. शहराच्या अनेक ठिकाणची फोटोग्राफी केली. फिन्जान आणि पेरिनाने एके दिवशी त्यांना आपल्या हनीमून ट्रिपला जाताना आश्रमाची यात्रा केल्याबद्दल सांगितले. अनेक वर्षांपूर्वी ज्वालामुखीत नष्ट झालेला आश्रम आणि त्यानंतर योगायोगाने मिळालेली डायरी याबद्दल तिने यापूर्वी सांगितले होते.

एकेदिवशी संध्याकाळी जेवण झाल्यावर ते सगळे झर्‍याच्या काठावर असलेल्या बागेत बसले होते. तेव्हा चर्चा सुरू झाली की, मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचे या जगात येऊन आत्म्याच्या रूपाने भटकणे सत्य आहे की कल्पना? या प्रश्नावर फिन्जान गप्प बसला. त्याला आश्चर्य वाटले की, त्याच्या पाहुण्यांकडे असे अनुभव आहेत की, एखाद्या मृत व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या रूपात अनुभवले.

चुमने सांगितले, त्याच्या अडचणीच्या वेळी अनेकवेळा अशा आत्म्यांनी त्याची मदत केली आहे. त्याचे म्हणणे होेते की, हे आत्मे चांगल्या वृत्तीचेच असतात. ते लोकांना मदत करतात. ते बहुधा मोठे आणि महान लोक असतात. जे या जगातून गेल्यावरही या जगात प्रवेश करण्याची शक्ती ठेवतात. एखाद्या असहाय्य पीडित व्यक्तीला मृत्यूनंतर या जगात फिरताना त्याने पाहिले नव्हते.

युवान म्हणाला, पोहण्याच्या कठीण प्रसंगी अनेक वेळा पारलौकीक शक्तींनी मदत केल्याचे मला जाणवले. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटले.

सना आणि सिल्वा या गप्पा ऐकत होत्या. त्यांच्याजवळ सांगण्यासारखे काही नव्हते. या सगळ्या गप्पा चालल्या असताना वुडन लॉनवर गाढ झोपला होता. हे पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले.

युवानने एक मजेशीर प्रसंग सांगितला. तो तेव्हा चौदा वर्षांचा होता. तेव्हा एका जंगली कालव्यात पोहायला गेला होता. पोहताना तो शेवाळाने भरलेल्या झाडीत अडकला. बराच वेळ ओरडत होता पण त्याच्या मदतीला कोणी धावून आले नाही. तेवढ्यात गढूळ पाण्यातून  एका मोठ्या माशाला त्याने आपल्याकडे येताना पाहिले. त्याचे दात टोकदार होते. त्याच्या अंगावर काटे होते. माशाला आपल्याकडे येताना पाहून युवान घाबरला. पण मासा आपल्या अंगावरच्या काट्यांनी झाडं बाजूला करत युवानसाठी रस्ता बनवत होता. युवानला खरंचटलेसुद्धा नव्हते. तो मासा निघून गेला. नंतर त्याच्या मित्रांना कळलं तेव्हा ते म्हणाले, “तो मासा झाडं खाणारा असावा.” पण युवानला त्या मरणासन्न स्थितीत तो मासा देवदूत दिसत होता. त्या माशाचा डोळा आजही त्याला आठवतो.

***

रात्रीचे जेवण, कॉफी, गप्पागोष्टी झाल्यावर पाहुणे झोपायला गेले. फिन्जान आणि पेरिना आपल्या खोलीत आले. दोघेही अस्वस्थ होते. दोघांच्या अस्वस्थतेचे कारण वेगवेगळे होते.

गेले काही दिवस फिन्जान आपल्या पाहुण्यांबद्दल आश्वस्त नव्हता. सुरुवातीला त्यांना काही वाटले नाही. कारण ते लोक वुडन आणि डेलाबरोबर आलेले होते. त्यांच्या कंपनीचे लोक आहेत. पण हळूहळू फिन्जानला त्यांच्याबद्दल संशय येऊ लागला. त्याला त्यांच्या बोलण्यात गर्व जाणवत होता. त्याला वाटत होते की हे लोक त्याला नुकसान पोहोचवतील. ते आपल्या बोलण्याने फिन्जानला लहान आणि उपेक्षित करत होते आणि फिन्जानची मुलगी त्यांना साथ देत होती. डेलाला त्यांच्याबद्दल आपलेपणा वाटत होता. हे फिन्जानला आवडत नव्हते. वुडन तटस्थ स्वभावाचा आत्मकेंद्रित व्यक्ती होता. डेला चिनी मित्रांच्या योजनांमध्ये उत्साहाने सहभागी होत आहे, याचा त्याला काही फरक पडत नव्हता. बोलण्यात ती त्यांची बाजू घेत होती.

सुरुवातीला युवानमध्ये तो सना किंवा सिल्वाचा जीवनसाथी बघत होता. भविष्यात काय होणार आहे, हे कुणाला माहीत नसते. फिन्जानला हेही माहीत होते की, डेला युवानला पसंत करते.

तिकडे पेरिना आपल्या विचारात होती. तिला सतत खटकत होते की, आत्मा नेहमी स्त्रियांचाच का भटकतो? तिने कधी ऐकले नव्हते की, कोणी पुरुष किंवा मुलगा मृत्यू पावल्यावर भटकत आहे. मुलींचे आत्मा अतृप्त असत. तृप्ती कोण देतं? त्याचे काय मानदंड आहेत? तो कोणाला पूर्ण जीवन देतो, कोणाला अर्धवट? हे जर एखाद्या पुस्तकात लिहिलेले असते तर तिने ते रात्रभर जागून वाचले असते. पण सध्या अशा प्रकारचे पुस्तक नव्हते. पेरिना उद्या सकाळी नाष्ट्याला काय बनवावे याचा विचार करू लागली. तिने फिन्जानला सांगितले की, डेलालाच नाही तर पाहुण्यांनासुद्धा त्यांच्या नवीन खोल्या आकर्षक आणि आरामशीर वाटल्या. त्यासाठी ते फिन्जानची स्तुती करत असतात. सना आणि सिल्वालासुद्धा पाहुण्यांनी प्रभावित केले आहे. त्या त्यांच्या देशात फिरायला जायला उत्सुक आहेत. अशावेळी फिन्जानला वाटते, त्याने पाहुण्यांबद्दल जो विचार केला आहे, तो चुकीचा तर नाही ना?

दुसर्‍या दिवशी बागेत चहा घेताना मिस्टर हो ने फिन्जानला आपल्याबरोबर चायनाला येण्याचे निमंत्रण दिले. तेव्हा फिन्जान अभिभूत झाला. ही औपचारिकता वेळेआधी अभिव्यक्त झाली, हे फिन्जानच्या लक्षात आले होते आणि हो च्याही!

***

फिन्जानने ऐकले की मिस्टर हो आणि चुम काही दिवस ग्रोव सिटीजवळ त्या आश्रमाचे अवशेष पाहायला जाणार आहेत, जो काही वर्षांपूर्वी नष्ट झाला होता. त्याला आश्चर्य वाटले होते. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दोन्ही चिनी पाहुण्यांना आश्रमाबद्दल कागदोपत्री माहिती होती. युवानला तर सना आणि सिल्वाच्या कंपनीत जगाचा विसर पडला होता. सहलीची खरी मजा ते लोक घेत होते.

पाहुणे काही दिवस बाहेर राहिले.

पाहुणे परत आले तेव्हा वातावरण बदलले होते. पेरिना व डेलाच्या लक्षात आले होते की, फिन्जानला पाहुणे नकोसे झाले आहेत. ते एकमेकांशी बोलणे टाळत आहेत. डेला असा कार्यक्रम आयोजित करत असे की फिन्जानला वेगळे राहण्याची संधी मिळेल. घरच्या लोकांच्या लक्षात आले होते की, मिस्टर हो आणि फिन्जानमध्ये बोलता बोलता तणाव वाढत जात होता.

एके दिवशी डेलाने धमाका केला.

तिने सांगितले की, मिस्टर हो च्या देशातून एक गट इथे आला आहे. ते लवकरच विशेष नावेने अमेरिकेतील जगप्रसिद्ध जलप्रपात नायगारा फॉल्स पार करतील. या बातमीने घरात सगळे उत्साही झाले, पण फिन्जानवर जणू वीज कोसळली. त्याच्या मनात भूकंप झाला. तो उदास झाला.

तो वेड्यासारखा वागू लागला. पेरिना फिन्जानची मनोदशा समजत होती. पण तिला हे माहीत नव्हते की, फिन्जानच्या मनात आपल्या अयशस्वी मोहिमेबद्दल इतकी हताशा अजूनही आहे. इतकी वर्षे गेल्यावरही तो आपले स्वप्न विसरू शकला नाही. डेलाला फिन्जानच्या मानसिक स्थितीची कल्पना नव्हती. तिला स्वप्नातही वाटले नव्हते की तिचे वडील आपल्या अभिलाषेवर एकाधिकार समजून बसले आहेत. दोन पिढ्या गेल्यानंतरही त्यांना त्यांचे स्वप्न इतर कोणीतरी पूर्ण करत आहे याचे वाईट वाटत आहे. ती आपल्या पाहुण्यांच्या मोहिमेबद्दल वेगवेगळ्या प्रकारे सांगून त्यांचे मन शांत करण्याचा प्रयत्न करत होती. तिला वाटत होते, तिचे वडील तरुणपणी खेळाडू आणि सैनिक होते, ते या साहसी मोहिमेबद्दल ऐकून खूष होतील. त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांची मदत करतील. तिच्या वडिलांना त्यांची ही मोहीम का आवडत नाही हे तिला कळत नव्हते. ती विचार करत होती. आपल्या वडिलांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करत होती. “डॅडी, हा काय पोरकटपणा आहे?” आपल्या वडिलांना लहान मुलासारखे रागवत डेलाने खोलीत प्रवेश केला. फिन्जान हाताला पट्टी बांधून नर्सिंग होमच्या अंथरुणावर पडलेला होता. पेरिना जवळ उभी होती. डेलाला तिच्यातर्फे कळले होते की सकाळी वादविवाद झाला तेव्हा नाराज होऊन फिन्जानने ब्लेडने आपल्या हाताला जखम करून घेतली. खूप रक्त गेले होते. सगळे लोक बाहेर गेलेले होते. म्हणून पेरिना त्याला इथे घेऊन आली होती.

थोड्याच वेळात सना, सिल्वा आणि युवान धावून आले. सगळ्यांना आश्चर्य वाटत होते, हे अपघाताने झाले की... आणि असं काय घडलं की फिन्जान आणि पेरिनामध्ये भांडण झालं. यापूर्वी कधी असे झाले होते का? डेलाने मुलींना विचारले. त्या मुलीसुद्धा या घटनेने आश्चर्यचकीत झाल्या होत्या.

थोड्या वेळाने तिन्ही मुलं निघून गेली, तेव्हा पेरिनाने डेलाला सांगितले की, फिन्जान त्या लोकांच्या नायगारा फॉल्स पार करण्याच्या मोहिमेने नाराज आहे. तो हे सहन करू शकत नाही. तो असंही म्हणाला की, या लोकांनी ही मोहीम थांबवली नाही तर तो घर सोडून निघून जाईल. ते चिनी पाहुण्यांना ताबडतोब परत पाठवू इच्छितात.

डेलासाठी हे अचानक बॉम्ब टाकल्यासारखे होते. तिने काय ठरवले होते आणि काय झाले! ती ओक्साबोक्शी रडू लागली.

फिन्जान भिंतीकडे तोंड करून पडून राहिला. डेला पेरिनाला म्हणाला, “तिला कळायला लागल्यापासून डॅडींना आपले स्वप्न पूर्ण करू शकलो नाही म्हणून हताश निराश पाहिले. ती जिथे राहिली तिथे तिला सतत जाणीव होती की डॅडी आपल्या अपयशामुळे जीवनात सुखी होऊ शकले नाहीत. तिने अनेक रात्री जागून काढल्या. विचार केला की वडिलांना कशी मदत करता येईल, त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करता येईल. लोक म्हणतात की, जर आपल्या मुलांनी आपली अर्धवट राहिलेली स्वप्नं पूर्ण केली तर आई-वडिलांना त्यांचा अभिमान वाटतो. पण इथे सगळं उलट झालं. ती पुन्हा रडू लागली.

आवाज ऐकून एक नर्स आत आली. तिने डेलाला सावरले. पेरिना पण रडत होती. नर्स बाहेर गेल्यावर डेला पुन्हा बोलू लागली, “मला जेव्हा कळले की मी ज्यांच्याबरोबर काम करते ते लोक माझ्या वडिलांची मोहीम पूर्ण करण्यात मला मदत करू शकतात, तेव्हा मी या कंपनीत काम करू लागले. वुडनला ते पसंत नव्हते, पण मी त्याला मान्य करायला लावले. मनात नसताना तो आमची साथ द्यायला तयार झाला. सगळी तयारी मी गुपचूप केली होती. मला वाटले होते योग्य वेळी ही माहिती देऊन मी डॅडींना खूश करीन. पण मला हे माहीत नव्हते की मुलीला एवढा सुद्धा हक्क नसतो?” डेलाचे अश्रू थांबत नव्हते.

***

घरातले वातावरण गढूळ झाले. डेलाला कळेना की पाहुण्यांना काय सांगावे? त्यांना कसे थांबवावे? ज्या कामासाठी ती स्वत: इतके दिवस त्यांच्या मागे लागली होती. ते काम आपल्या जीवनाचे मिशन असल्याचे सांगत होती, आता ती कशी मागे येईल? पाहुणे काय म्हणतील?

फिन्जानने आपले विचार कसेही सांगितले असले तरी तो अनुभवी प्रौढ होता. त्याला काळजी होती की त्याच्यामुळे डेलाला तिच्या मित्रांसमोर खाली पहावे लागू नये. जरा समजूतदारपणे तिला यातून बाहेर काढले पाहिजे.

एके रात्री सगळे झोपल्यावर फिन्जानने डेलाला जवळ बोलावले. तिला समजावले की, “तो ही मोहीम ईर्षेने थांबवत नाही. उलट त्याने या मोहिमेचा खूप विचार केला आहे. ही मोहीम त्याच्या देशासाठी गौरवपूर्ण आहे. पण इतर देशातले लोक इथे येऊन आमच्या मदतीने, आमचे पाहुणे बनून तो कारनामा करतील, जो गेली कित्येक वर्षे आमच्या देशाच्या लोकांचे स्वप्न होते, तर हे बरोबर नाही.”

“पण डॅडी, हा एखाद्या देशाच्या यशाचा प्रश्न नाही. हा निसर्गावर मानवाने मात करण्याचा प्रयत्न आहे. आणि माणूस कुठे जन्माला आला, कुठे लहानाचा मोठा झाला, हे महत्त्वाचे नाही. तुम्हीच सांगत होता की, माझी आजी भारतात जन्माला आली. अरबमध्ये आली मग सोमालियात लग्न करून अमेरिकेत राहिली. अशा स्थितीत तिच्या कोणत्याही उपलब्धीमुळे कोणता देश गौरवान्वित होईल? सगळ्या देशाचे सगळे लोक एकसारख्या मानसिकतेचे नसतात. एका देशाच्या एका माणसाच्या कामाने त्याच देशातील दुसर्‍या माणसाला खाली मान घालावी लागते किंवा गर्वाने ताठ होते. माणुसकी फक्त महत्त्वपूर्ण आहे.”

मुलं किती लवकर मोठी होतात! समजूतदार सुद्धा! फिन्जान विचार करत होता. पण त्याचे मन हे स्वीकारायला तयार नव्हते की चीनहून आलेल्या लोकांनी ही मोहीम पूर्ण करावी. त्याला वाटत होते की, डेला जरी त्या लोकांबरोबर असली तरी यशाचे श्रेय चिनी लोकांनाच मिळेल. कारण डेला तिथे नोकरी करत होती, आणि तेथून याच मोहिमेसाठी त्यांच्याबरोबर आली आहे.

फिन्जान व डेलामध्ये रात्री बराच वेळ विवाद-चर्चा चालली. डेला आपल्या म्हणण्यावर ठाम होती. फिन्जानसुद्धा आपला हट्टीपणा सोडायला तयार नव्हता.

कधी कधी आपण एखाद्या पक्ष्याला चुचकारण्यासाठी त्याच्या पंखावरून हात फिरवतो व तो उलट आपल्याला चोच मारतो. अगदी तसेच दुसर्‍या दिवशी सकाळी फिन्जानला चावा बसला. पेरिनाने घोषणा केली की तीसुद्धा या साहसी मोहिमेवर जाईल.

घरात इतकी धुसफूस चाललेली असताना पाहुण्यांच्या लक्षात येणार नाही, असं होणार नाही. मिस्टर हो, चुम आणि युवानला आपल्या यजमााचे काहीतरी बिघडले आहे हे लक्षात आले होते.

त्यांची कुजबूज ऐकून डेला आणि पेरिना त्यांच्या खोलीत गेल्या, तेव्हा ते एखाद्या हॉटेलमध्ये शिफ्ट होण्याबद्दल बोलत होते. पेरिनाने वातावरण मोकळे करण्यासाठी, त्या लोकांना आपलेपणाने निश्चिंत राहण्यासाठी सांगितले. तसेच त्यांचा मूड चांगला करण्यासाठी दुसर्‍या दिवशी पिकनिकला जाण्याचा कार्यक्रम ठरवला. पाहुण्यांच्या मनातील शंका मिटली.

असे ठरले की, सगळे दुसर्‍या दिवशी हडसन नदीवर पिकनिकला जातील. एका शीपने नदीत लांब प्रवास करायचा या कल्पनेने सगळे आनंदित झाले. वेगाने वाहणार्‍या नदीच्या उलट्या प्रवाहात लांबपर्यंत जाणे आव्हानात्मक होते. त्याची तयारी सुरू झाली.

सकाळी सगळ्यात आश्चर्यकारक घटना ही घडली की, फिन्जानने सना आणि सिल्वाला त्यांच्याबरोबर जाण्याची परवानगी दिली नाही. त्यांना कळेना की, या बंदीचा का अर्थ आहे? फिन्जानला चला असे कोणी म्हणाले नव्हते. कारण पेरिना व डेलाच्या लक्षात आले होते की, फिन्जानला आता पाहुण्यांची सोबत नको आहे. पाहुण्यांनाही त्याच्यामुळे मोकळेपणा वाटणार नाही.

डेलाने तिचे मिशन सुरू ठेवण्याची घोषणा करून जी आग लावली होती, पेरिनाने त्यांच्याबरोबर जाण्याचा निश्चय करून आगीत तेल ओतले होते. फिन्जान स्वत:ला वेगळा आणि उपेक्षित समजत होता. पण त्याचा बदला तो सना व सिल्वाला थांबवून घेईल, असे कोणाला वाटले नव्हते. त्याच्या या निर्णयाने युवानचा चेहरा उतरला होता. पण तो असेही म्हणू शकत नव्हता की, सना आणि सिल्वा येणार नसतील तर तो सुद्धा येणार नाही.

डेलाने फिन्जानकडे दुर्लक्ष करून सना व सिल्वाला येण्याचा आदेश दिला. तिला खात्री होती की, फिन्जान आपला राग विसरून मुलींना जाण्याची परवानगी देईल. मुली त्यांच्या बाबतीत इतरांनी निर्णय घेतल्याने स्वत:चा अपमान समजत होत्या. पण फिन्जानचा राग पाहून त्या काही निर्णय घेऊ शकत नव्हत्या. पाहुण्यांसमोर काही तमाशा होऊ नये असेही त्यांना वाटत होते. ही चिंता डेलाला नसावी. सना आणि सिल्वा गेल्या नाहीत.

***

नदीकाठी बरेच लोक जमले होते. शहरापासून लांब असलेला तो भाग लोकांच्या कोलाहलाने गजबजला होता. पोलिसांच्या गाड्यांनी नदीकाठ घेरला होता. कोणाला नदीजवळ जाऊ दिले जात नव्हते. आतापर्यंत एकही प्रेत मिळाले नव्हते, पण पाणबुडे प्रयत्न करत होते.

पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाताना त्या लहान जहाजाचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. पोलीस अधिकार्‍यासाठी हे प्रकरण गुंतागुंतीचे झाले होते. माणसाच्या चुकीशिवाय असा अपघात होणे शक्य नव्हते. काही लोकांचे म्हणणे होते की, शीपमध्ये नौका मोहिमेचे लोक असावेत. कारण शीपची गती, त्यात बसलेल्या लोकांचे धाडसी कारनामे, सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. शीपमध्ये साधारणपणे अर्धा डझन लोक असावेत. त्यात काही महिलाही होत्या.

जवळ जवळ अडीच तास प्रयत्न केल्यावर पाणबुड्यांनी वेगवान प्रवाहातून पहिले प्रेत शेाधून काढले. ते एका प्रौढ चिनी व्यक्तीचे दिसत होते. त्यामुळे आता बाकीची प्रेतं सापडण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्या शवामुळे त्या गटाच्या लोकांची ओळख पटवणे सुलभ झाले होते.

बफलोमध्ये जेथून ते शीप घेतले होते, तेथून कळले की, हे तेच दुर्दैवी लोक होते, जे फिन्जानच्या घरी त्याचे पाहुणे म्हणून रहात होते. त्या तिन्ही चायनिज पाहुण्यांबरोबर डेला आणि पेरिनाचे जीवन स्वाहा झाले होते.

ही बातमी घरी पोहोचली तेव्हा हंगामा झाला. सना आणि सिल्वा रडत असूनही हे विसरल्या नव्हत्या की, त्यांनी हट्ट केला, तरी फिन्जानने त्यांना जाण्याची परवानगी दिली नव्हती. त्याच्यातर्फे भेट म्हणून मिळालेले जीवन घेऊन त्या फिन्जानबरोबर घटनास्थळी पोहोचल्या होत्या.

दुसर्‍या दिवशी सकाळी पांढर्‍या पोशाखात शांतपणे चर्चमध्ये उभ्या असलेल्या सना आणि सिल्वा एकच दृश्य आठवत होत्या. त्या नदीकाठी पोहोचल्या, तेव्हा फिन्जान पोलिसांच्या नजरेत येणार नाही अशी काळजी घेत होता. जेथून शीप घेतले होते, तेथील कर्मचार्‍यांनी शंका व्यक्त केली होती की, ही स्वाभाविक दुर्घटना नाही. पण असे कोण नव्हते जो पांढर्‍याला काळं आणि काळ्याला पांढरे होण्यापासून थांबवू शकेल. एक मशिन बिघडलेले समजून जलसमाधी देऊन सोडले होते. काही व्यक्तींना त्यांचे नशीब म्हणून वाहत्या पाण्यात सोडून दिले होते. वेगाने वाहणारे पाणी न जाणो कुठवर गेले होते. जे काही राहिले होते, तोच संसार होता!

***

Rate & Review

Swati Jagtap

Swati Jagtap 3 months ago

Prabodh Kumar Govil