Sang na re mana - 12 books and stories free download online pdf in Marathi

सांग ना रे मना (भाग 12)

संयु रडू लागली. अरे इतकच बोलला ना तो त्यात काय मग नंतर ऐकून घेईल ग तो मे बी त्याचा मूड नसेल.

लगेच काय वेगळा अर्थ लावतेस . नाही पल्लू त्याच्या बोलणयाचा रोख समजत होता ग. ओके आता शान्त हो तू आपण ठरवू काय करायचे ते. मग दोघी घरी आल्या. संयु ला खूप वाईट वाटत होते मितेश ने ऐकून तरी घ्यायला हवे होते असे तिला वाटत होते. हा असा कसा रायटर आहे भावना शुन्य! समोरच्या च्या फिलिंग्ज शी याला काही देणं घेणं नाहीच.पण तरीही मी सांगणार आहे जे माझ्या मनात आहे. अस संयु ने ठरवले.मितेश अरे मॉल मध्ये तू आणि संयु इतके गप्प का बसला होता. काही बोलली का ती तुला? निनाद ने विचारले . काही नाही . तू काहीतरी लपवतो आहेस मित्या मी तुला आज ओळखत नाही समजले. मितेश ने एक सिगारेट काढली आणि ओढू लागला. संयु ने सांगितले का की तुला लाईक करते म्हणून. निनाद म्हणजे तुला माहीत होते ती हे बोलणार? अजिबात नाही मी फक्त तर्क लावला. हेच बोलली ना ती. नोप ती बोलणार होती पण मी बोलू नाही दिले. वा मितेश काय इमेज झाली असेल तुझी तिच्या मनात. निनाद आय डोन्ट केयर लोक माझ्या बद्दल काय आणि कोणता समज करून घेतात. मी आहे असा आहे मी कोणा साठी बदलणार नाही. मी कुठे तुला चेंज हो म्हणतोय. फक्त तीच ऐकून तरी घ्यायचे. त्याने काय झाले असते. हम्मम मितेश यु आर जस्ट इमपॉसीबल! मित्या तुला ही संयु आवडते पण तू ते अकॅसेपट करत नाहीस. स्वहताच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पड अरे आयुष्य एकदाच मिळत ते एन्जॉय कर. निनाद प्लिज नको हा विषय. मितेश म्हणाला. या वर निनाद गप्प बसला. मितेश ने म्युझिक सुरू केले त्याच फेव्हरेट गाणं लावले तुला पाहता आजही ,हासते या मनी चांदणेबहरुन प्रीत ये अशीगाली पडे खळी जशीसाथ तुझी मला हवी जीवनीओंजळीतूनी भरूनी जो आणतो, सुख नवे,पाऊस तो पहिला,ओळखीतल्या वाटती बरसत्या सरी नव्या,स्पर्श तुझा होता,जरा जरा लाजरे,तुझ्या सवे साजरे,ॠतूंचे खरे सोहळे,सावली तुझी भासते मी जिथे तू तिथे,बंध हे जन्मांचे,पापणीवरी गुंफते माळते रात ही,रंग हे स्वप्नांचेहळू हळू जोडमनाने मनाशी दुवे,बहरून प्रीत ये अशी,गाली पडे खळी जशी,साथ तुझी मला हवी जीवनी… गाणं ऐकत त्याने दुसरी सिगारेट काढली . निनाद ने त्याच्या कडे पाहिले पण मितेश डोळे बंद करून मान खुर्चीवर मागे टाकून बसला होता. संयु ने मितेश ला व्हाट्स अँप वर मेसेज करायचा ठरवले होते त्या दिवशी हॉटेलमध्ये त्याने त्याचा नंबर तिला दिला होता.हॅलो मितेश सर मी संयुक्ता. असा मेसेज संयु ने त्याला केला. त्या नोटिफिकेशन ने त्याने डोळे उघडले सिगरेट विझवून डस्ट बिन मध्ये टाकली. व्हाट्स अँप ओपन केले. संयु चा मेसेज त्याने पाहिला. सर मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटून हे सांगायचे होते पण तुम्ही नाही ऐकून घेतले पण तरीही मला सांगायचे आहे की तुम्ही मला खूप खूप आवडता . माझं तुमच्यावर प्रेम आहे सर. मी तुमच्या शिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाच नाही करू शकत. तुमचा रिप्लाय काही ही असो पण मी तुमच्यावरच प्रेम करत राहणार आहे.

या माझ्या फिलिंग्ज मी आता सहन नाही करू शकत आहे म्हणून बोलले. मितेश सर आय रियली लव यु. तुमचे ब्राऊनिश डोळे मला खूप आवडतात. त्या डोळ्यात मी माझं जग बघते. तुम्हाला पहिल्यांदा बघितले तेव्हा तुमचे डोळेच मला फार आवडले. आता त्या डोळ्यात मी स्वहताला हरवून बसले आहे. तुमचा होकार असो व नकार बट आय लव यु एव्हर अँड फॉरएव्हर. असा मेसेज संयु ने सेंड केला. मितेश ने तो वाचला . त्याचे डोळे कोणालाही प्रेमात पाडतील असेच होते. समोरच्याच्या मनाचा ठाव घेणारे गहिरे,अथांग! आरु ही वेडीच होती त्याच्या डोळ्यांची. सर तुम्ही आहात ना मग बोला. मला तुमचे उत्तर हवे आहे. संयु ने परत मेसेज केला. मितेश क्षणभर विचारात पडला त्याला समजत नवहते की तिला काय उत्तर द्यावे. त्याला ही संयु आवडत होती पण मन त्याला प्रेम म्हणायला तयार नवहते. तिला काही तरी उत्तर देणे त्याला भाग होते म्हणून तो म्हणाला, मिस संयुक्ता या विषयावर मला आता बोलायचे नाही. आय रिस्पेक्ट यु अँड युवर फिलिंग्ज. ओके बाय. अस बोलून तो ऑफ लाईन गेला. संयु ने त्याचा मेसेज वाचला तिच्या डोळ्यातुन अश्रू वाहत होते. आय लव यु मितेश आय मिस यु अस म्हणत ती रडत होती. मितेश च्या डोक्यातुन काही केल्या संयु चे बोलणे जात नवहते. एक मन म्हणत होते की संयु खरच छान मुलगी आहे निष्पाप आहे तिच्या सारख तीच प्रेम ही निरागस आहे पण ग आरु चे काय? माझं प्रेम माझं आयुष्य फक्त आरु आहे तिला कुठे सोडू मी? नाही माझ्या आरु ला माझी गरज आहे मी माझा विचार करून स्वार्थी नाही बनू शकत. मितेश ने दोन्ही हातात आपले डोके घट्ट पकडले. मितेश आर यु ओके त्याला खांद्यावर हलवत निनाद विचारत होता. नॉट ओके निनाद मी काय करू ? आय अल्सो लव संयु बट... मितेश अरे मग ही तर चांगली गोष्ट आहे ना. पण आरु ला काय सांगू? तिला आता माझी गरज आहे निनाद. मितेश अरे आरु आता बरी होईल की नाही गॉड नोज. पण तू का थांबुन राहतोस? आणि तू आनंदात आहेस सुखी आहेस हे बघून आरुला ही आनंदच होईल रे. पण मला बघायला तरी अँटलिस्ट तिने डोळे उघडले पाहिजेत ना? एक्झाटली मी तेच म्हणत आहे मितेश आरु आता बरी होणार नाही ते फॉरेन चे डॉक्टर ही हेच बोलले ना. नाही निनाद माझी आरु बरी होईल नक्की काहीतरी चमत्कार होईल. तस झालं तर चांगलेच आहे ना मित्या. पण आताचा विचार कर. तू स्वहताला बंदिस्त करून ठेवले आहेस त्यातून बाहेर पड तुला ही एका जोडीदाराची गरज आहे. तुला ही प्रेम करण्याचा आणि प्रेम मिळवण्याचा हक्क आहे. एकदम काही निर्णय घेऊ नकोस शान्तपणे विचार कर मग संयु ला सांग. मी बोललो तिला . काय बोललास तू? मग त्याने निनाद ला आता संयु चा आलेला मेसेज दाखवला. मितेश तिला किती वाईट वाटले असेल रे. तू तिच्या जागी असतास तर विचार कर ना जरा. तुला पण ती आवडते हे तुझ्या नजरेत दिसत. निनाद आता मी कोणताच विचार करण्याच्या मूड मध्ये नाही आहे. ओके टेक युवर टाईम. मग निनाद त्याच काम करायला निघून गेला. संयु मी बोलले होते तुला तो खूप मोठा रायटर आहे तो तुझे प्रेम अकॅसेपट नाही करणार.रायटर असला तरी माणूसच आहे ना पल्लू तो. संयु तुझं प्रेम आहे म्हणून त्याचं ही तुज्यावर प्रेम असेलच असे कसे गृहीत धरतेस तू? त्याला असेल ही कोणी गर्लफ्रेंड. इतका हँडसम फेमस रायटर आहे.

.क्रमश.© ® sangieta devkar 2017


Share

NEW REALESED