Sang na re mana - 14 books and stories free download online pdf in Marathi

सांग ना रे मना (भाग 14)

सर तुमहि ठीक आहात ना? तिने न राहुन विचारले. हु आय एम ओके. संयु टेकडी वर येणार आता ख़ुप छान वातावरण असते तिथे मितेश म्हणाला. सर तुम्हाला बरे वाटनार असेल तर नक्की जावू . मग मितेश तिला घेवून टेकडी वर आला. बरेच लोक वॉकिंग ला तिथे आले होते. काही कपल्स जागो जागी बसले होते. एक रिकामी जागा बघून मितेश तिथे बसला. आजुबाजूला कोणी नव्हते. संयू ही त्याच्या बाजूला बसली. टेकडी वरुन दुरवर पूर्ण पुणे दर्शन होत होते. संध्याकाळची गडद केशरी सावली आख्या पुण्याला आपल्या कवेत घेत होती. सूर्याचा केशरी गोळा हळूहळू ढगा आड लपत चालला होता. पक्षी आप आपल्या घरटया कड़े निघाले होते. टेकडीवर मात्र नीरव शांतता होती. संयू मी आणि आरु कायम इथे यायचो आरुला ख़ुप आवडते ही जागा. तुला माहित आहे का तिने मला पहिल्यादा भेटायला इथच बोलवले. आज ही तो दिवस मला आठवतो. आरु माझ्या अगोदर इथे येऊन बसली होती. मस्त येल्लो कलरचा कुर्ता आणि ब्लु जीन्स घातली होती. केस क्लिप लावून मोकळे सोडले होते. ख़ुप सुंदर दिसत होती. त्यात तिच्या गालावर पडनारी ती गोड खळी आणि तीचे मिलियन डॉलर स्माइल आय रियली लव दयाट! आम्ही दोघ हातात हात घेवून गप्पा मारत बसलो होतो. मी तिच्या केसांची क्लिप काढली सर काय करता ? आरु आता सर नको म्हणू नाहीतर मी जाइन येथून मीतेश रागात बोलला. ओके पन एकदम अस मीतेश कस म्हणू ? आता बोललीस तसच. बोल मीतेश आय लव यू . आरु लाजतच म्हणाली मीतेश आय लव यू आणि तिने हाताने आपला चेहरा झाकला. तसे मितेश ने तिचे हात बाजूला केले म्हणाला आय लव यू आरु आणि हे तुझे मुलायम केस असेच मोकळे सोडत जा छान दिसतेस तू. त्याच्या गहिऱ्या डोळ्यात बघत आरु भान हरपत चालली होती. मीतू खुप सुंदर आहेत तुझे डोळे अथांग समुद्रा सारखे समोरच्याच्या मनाचा ठाव घेणारे यात माझी मला विसरून जायचे आहे. तुझ्यात माझ आस्तित्व विरुन जाईल माझी मीच राहणार नाही अस वाटत आहे मला. आरु काय बोलली तू मला मीतू सो स्वीट असच कायम बोल. मितेश चा आवाज घोगरा झाला होता. आरु त्याच्या इतक्या जवळ होती की त्याला सव्हता वर कंट्रोल नाही ठेवता आला त्याने अलगद तिच्या नाजुक ओठांवर आपले ओठ ठेवले. त्याचा तो पुरुषी सहवास ऊष्ण श्वास आरु ला ही बेभान करायला पुरेसा होता. कीती तरी वेळ दोघे एकमेकां किस करत होते. मग बराच वेळ दोघे बोलत बसले मीतेश चे स्वप्न होते बेस्ट सेलर ऑथर बनन्याचे त्या बद्दल ख़ुप भरभरून तो बोलत होता. आरु ही मन लावून ऐक़त होती. त्याच्या हात हातात घेत आरु म्हणाली मीतू तू नक्की एक दिवस तुझ स्वप्न पूर्ण करशील आणि मी कायम तुझ्या सोबत आहे. आरु तू हवी आहेस माझ्या सोबत कायम माझ्या प्रत्येक यशात विजयात मला तू हवी आहेस. माझ लिखान तुझ्या असन्याने बहरनार आहे,फुलनार आहे यू आर माय लकी चार्म स्वीटहार्ट! तू कधीही मला सोडून जायचे नाहीस. प्रॉमिस मि मितेश म्हणाला.

. हो पेढ़या मी तुला सोडून कुठेही जानार नाही. ये व्हाट यू से ? पेढ़या ? मीन्स व्हाट? तशी आरोही गालातल्या गालात हसत म्हणाली येस यू आर माय स्वीट पेढ़ा माय डेयरी मिल्क,अँड मैडु आल्सो. अरे मी रायटर असून ही मला हे वर्ड माहीत च नाहीत. हो का मिस्टर रायटर मीत. म्हणत तिने त्याचे नाक ओढले. मग दोन्ही हातात तिचा चेहरा धरत मितेश बोलला आज पासून तू मला याच नावाने बोलवायचे . आणि मी ही माझे नाव मीत असेच टाकत जाईन. पण मला सांग आरु हे वर्ड कसे सूचले तुला? त्याच कसे आहे ना की तुम्हा रायटर लोकांनाच सगळ काही सूचत हा तुमचा गैरसमज आहे आणि हे अस स्वीट बोलायला प्रेमात पडावे लागते आणि आपला माणुस ही तसाच गोड हवा नाही का पेढ़या? ओह्ह अस आहे तर . हो असच. ऐक ना मीतू एक छान कविता ऐकव. आप की फरमाइश जरूर पूरी होगी जानेमन . ऐक आरु धीस इज ओन्ली फ़ॉर यू ...... हसणं तुझं निखळ ,वाहणाऱ्या पाण्या सारख.

पौर्णिमेच्या त्या अवखळ शीतल चंद्रा सारख.
फुलांची उधळण,इंद्रधनू ची जणू बरसात,
प्रितीची अवीट गोडी ,त्या तुझ्या गोड हास्यात.
मनाला वेड लावणार,माझं भान हरपणार,
तुझं हासू कायम माझ्या चेहऱ्यावर फुलणार.
तू जाता जाता हासू मात्र तुझं मागे मागेच रेंगाळनार.
मनापासून आलेले तुझं हसणं,किती सहज,शाश्वत.
दुःखा वर माझ्या हळुच फुंकर घालनार.
जगण्याचं मला बळ देणार,मी तुझाच आहे वेडे,
अस नेहमी अश्वसत करणार.
किती सुंदर आपलंसं करणार.
हासू तुझे कायम हृदयात करेन मी जतन.
कोणाला कशाचे, मला तुझ्या हसण्याचे व्यसन.
कधी राहू नको तू उदास निराश हसत रहा नेहमी.
आयुष्यात माझ्या मग नसेल काहीच कमी. ..ख़ुप सुन्दर मितु खरच छानच लिहितो तू. असच लिहीत रहा मग बघ एक दिवस तू नक्की बेस्ट सेलर ऑथर बनणार. तू सोबत आहेस ना आरु मग माझे स्वप्न नक्की पूर्ण होणार. आता ही हे सगळं आठवून मितेश चे डोळे भरून आले.सर प्लिज संयु बोलली. सॉरी संयु आरुच्या खूप आठवणी आहेत ग कसा विसरू मी सांग आणि आरु ला विसरून मी तुझं प्रेम कस स्वीकारू ? सर माझी काही ही जबरदस्ती नाही . तुम्ही माझे प्रेम स्वीकारा अथवा नका स्वीकारा मला वाईट नाही वाटणार पण मी तुमची वाट आयुष्यभर बघत राहीन. बिकौज आय रियली लव यु सर. मितेश ने तिचा हात आपल्या हातात घेतला म्हणाला,संयु खरच वेडी आहेस तू आणि खूप निरागस पण म्हणून तू मला आवडतेस पण माझं प्रेम नाही तुज्यावर. पण मला एक सांग. काय सर बोला. मला जेव्हा जेव्हा तुझी गरज भासेल म्हणजे अँज अ फ्रेंड मन मोकळे करायला किंवा माझ्या सोबत वेळ घालवायला तर तू करशील माझी सोबत? पण याचा अर्थ मी स्वार्थी आहे असा नको घेऊ प्लिज. सर मी कायम तुमच्या सोबतच आहे तुम्हाला जेव्हा माझी गरज वाटेल तेव्हा हक्काने मला आवाज द्या.
क्रमश