Sang na re mana - 22 books and stories free download online pdf in Marathi

सांग ना रे मना (भाग 22)

निनाद चा चेहराच खुलून गेला होता त्यामुळे काही तरी स्पेशल झाले आहे हे मितेश ने ओळखले होते. संध्याकाळी संयु तयारी ला लागली मितेश ला भेटण्याची ओढ ही होतीच. बरेच कपडे तिने ट्राय केले मग शेवटी एक मरून कलरचा वन पीस तिने घातला. थोडा मेकअप केला. केस क्लिप लावून मोकळे सोडले. मॅचिंग कानातले आणि एक ब्रेसलेट वॉच हातात घातले. डार्क मरून कलरची लिपस्टिक लावली. खूप सुंदर दिसत होती ती. आवरून ती पल्लू कडे आली आणि तिला बघून ती ही आश्चर्यचकित झाली. पल्लू ही मस्त तयार झाली होती. लॉंग गाऊन टॉप तिने घातला होता छान दिसत होती. काय मग पल्लू डार्लिंग कोणा साठी इतका तामझाम कुछ तो बात है. काही नाही संयु डार्लिंग मी तयार व्हायचे नाही का? छान दिसायचा ठेका तूच घेतला आहेस का फक्त. ओहह निनाद पण आहे नाही का पार्टी ला संयु तिला चिडवत म्हणाली. तशी पल्लू ब्लश करू लागली. चला मॅडम आता निघुया राहिलेलं लाजन निनाद साठी राहू दे. संयु तू तर मार खाणार आता म्हणत पल्लू तिच्या वर हात उगरल्याच नाटक करू लागली. बर नको लाजू हा निनाद साठी तर नकोच नको. मग दोघी हॉटेल ला आल्या. मितेश निनाद आणि सुजय अगोदरच आले होते. मितेश ने क्रीम कलर चा टी शर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती. तसा कोणता ही ड्रेस त्याला छानच दिसत असे कारण त्याची पर्सनॅलिटी जबरदस्त होती. संयु आणि मितेश एकमेकांना बघतच राहिले. मितेश तिच्या वरून आपली नजर हटवतच नवहता संयु ला कसेतरी होऊ लागले. हाय निनाद सुजय संयु बोलली. तसे त्या दोघांनी हाय केले मितेश मात्र हसत तिच्या कडे बघत होता. पल्लू आणि निनाद ची नजरानजर चालू होती. संयु छान दिसतेस मितेश म्हणाला. थँक्स मितेश. तर सुजय आणि निनाद पल्लवी तू पण ऐक मितेश बोलू लागला. मी आणि संयु लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहोत . सध्या आम्ही एकमेकांना डेट करत आहोत अँड यु ऑल नो दयाट. ओहह दयाटस ग्रेट सुजय म्हणाला. हो त्यासाठीच आज मी तुम्हा सर्वांना डिनर ला इन्व्हाइट केले. हॅलो मला पण एक गोष्ट सांगायची आहे निनाद बोलला. काय मितेश ने विचारले. मी आजच पल्लू ला प्रपोज केले आहे . ते तर मला दुपारीच समजलं होत निनाद मितेश म्हणाला. कसे काय मी कुठे काय बोललो तुला. तू विसरतो आहेस निनाद मी रायटर आहे आणि रायटर समोरच्या चेहऱ्यावरची रेष आणि रेष वाचू शकतो. काय यार सगळी मजाच गेली सरप्राईज ची. निनाद तसे पण आम्हाला थोडी आयडिया होतीच सुजय बोलला. पल्लू इकडे लाजून लाजून पाणी होत होती. बर आता ऑर्डर देऊया का मितेश ने विचारले. मग सगळ्याना आवडेल ते जेवण ऑर्डर केले. मितेश संयु कडे बघत होता नजरेने बोलत होता. पल्लू तर निनाद कडे बघतच नवहती . सगळे गप्पा मारत जेवण करत होते.

सुजय ला एक कॉल आला. हो लगेच निघतो तो पर्यंत तुम्ही लक्ष द्या. अरे एक इमर्जन्सी आहे मला हॉस्पिटल ला जावे लागेल. सुजय बोलला. आता तो पडला डॉक्टर तेव्हा त्याला अडवन मुश्कील. तो त्या सर्वांचा निरोप घेऊन निघाला. हे चौघे जेवत होते. इकडे सुजय हॉस्पिटलमध्ये आला. काय झालं नर्स त्याने विचारले. सर आरोही मॅडम नी थोडी हालचाल केली आता. ओहह गॉड खर बोलता तुम्ही ? हो सर एक दोन मिनिटं त्यांच्या हाताची हालचाल होत होती. सुजय ने आरोही ला चेक केले तिचे हार्टबिटस हळूहळू त्याला जाणवत होते. तिला थोडी फार शुद्ध आली होती. ती कोमातून बाहेर येण्याचे हे लक्षण होते. सुजय ने आपल्या सिनियर डॉक्टरांशी बोलून आरोही ला तसे मेडीसिन आणि इंजेक्शन दिले हा देवाचा चमत्कारच म्हणावा लागेल. पण आता मी मितेश ला हे कसं सांगू? संयु सोबत किती खुश आहे तो. त्याने हे ऐकून संयु शी ब्रेकअप केले तर? एक तर खूप प्रयासाने मितेश त्याच्या दुःखातुन बाहेर आला होता आणि संयु च्या मनाच काय? ती कशी रिऍक्ट होईल? मितेश ला वाटलं तिची गरज आहे सो त्याने तिला जवळ केले आणि आता आरोही ची ही न्यूज समजल्या वर तो पुन्हा आरोही कडे येणार. आणि संयु ला स्वहता पासून दूर करणार. यात बिचाऱ्या संयु ची काय चूक? कस आणि कोणत्या तोंडाने मितेश ला सांगू मी. ही गोष्ट त्याच्या पासून लपवून पण नाही ठेवू शकणार ? सुजय एकटाच विचार करत बसला होता. काय करावे त्याला काही सुचत नवहते. मितेश संयु सोबत आता आनंदात आहे कसं सांगू त्याला. सुजयला काहीच समजेना. इकडे हॉटेलमध्ये त्यांचं जेवण झाले . मग मितेश संयु ला आणि निनाद पल्लू ला सोडायला निघाले. तेवढाच वेळ दोघांना एकमेकां सोबत घालवता येईल म्हणून. मितेश आणि संयु कार मध्ये बसले. थोडे अंतर गेल्यावर मितेश ने कार साइड ला थांबवली. मितेश काय झाले. का थांबलो आपण. तुला घरी जायची घाई आहे का संयु? नाही तसे काही नाही. तू आज इतकी छान दिसतेस मग मी स्वहतावर कसा कंट्रोल ठेवू सांग तिचा हात हातात घेत मितेश बोलला. तो तिच्या जवळ सरकला तशी संयु चे श्वास जोरात फुलत होते. त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेली केसाची बट तिच्या काना मागे नेली. आणि तिला काही समजायच्या आत हळूच तिच्या कानाला बाईट केले. संयु एकदम शहारून गेली. गालावर लाली आली. मितेश आपले बोट तिच्या कपाळावरून फिरवत खाली खाली येत राहिला तिच्या ओठांवर त्याने आपले बोट ठेवले तसे तिचे ओठ विलग झाले हा स्पर्श हा उष्ण श्वास त्याचा तिला हवा हवासा वाटू लागला. खूप जवळ होता मितेश तिच्या, त्याचे उष्ण श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. तिचे ओठ थरथरत होते त्याने तिच्या ओठांचा ताबा घेतला पॅशिनेटली तो तिला किस करत राहिला. तो आपल्या पासून दूर जाऊ नये म्हणून संयु ने त्याच्या कमरेला मिठी घातली होती. हे सुख तील हवेहवेसे वाटत होते. मितेश ने तिचे ओठ सोडले तसे संयु त्याला माने वर गळया वर किस करू लागली. मितेश ने ही तिच्या माने वर किस केले. पुन्हा एकदा दोघांचे ओठ एकमेकांत अडकले. एक दीर्घ चुंबन घेऊन मितेश तिच्या पासून बाजूला झाला. संयु मी कुठे ही जात नाही तुला सोडून आय लव यु स्वीटहार्ट. नक्की नाही ना जाणार मला सोडून मितेश संयु त्याच्या कुशीत शिरून बोलत होती. नाही राणी आता तुज्या शिवाय माझं दूसर कोणी आहे का? मी कायम तुझाच असेन आय प्रॉमिस.मी तुमच्या शिवाय नाही जगू शकणार मितेश . हो संयु आय नो . मी कायम आहे तुझ्या सोबत.चल लेट होईल जाऊया आपण . मग संयु त्याच्या पासून बाजूला झाली.

क्रमश. stay connected .©® sangieta devkar 2017