Sang na re mana - 24 books and stories free download online pdf in Marathi

सांग ना रे मना (भाग 24)

तुला काय सांगायचे ते तू ठरव मित्या मी काही संयु शी बोलणार नाही. निनाद मी ही येईन मी बोलेन तिच्याशी. मग निनाद ऑफिसमध्ये आला. मितेश घरी आला होता संयु चा विचार मनातून जात नवहता . काय करू मी ?संयु ला काय सांगू? ती मला समजून घेईल का? विचारांची नुसती गर्दी झाली त्याच्या डोक्यात. त्याला आता हे सहन होईना अति विचार केला की त्याच डोकं दुखत असे आता ही त्याच डोकं खूप दुखू लागले त्याने सिगारेट पेटवली आणि परत विचारात हरवला. संयु की आरु दोघी मधये त्याच्या मनाच युद्ध सुरू होते. डोकं जाम धरून तो बसला होता. काही तरी कामा निमित्त त्याची आई त्याच्या रूम मध्ये आली त्याला अस बघून त्यांनी विचारले मितु काय झालं डोकं दुखत आहे का? हो आई माझे मेडिसीन पण संपले आहे. थांब मी सुजय ला सांगते म्हणत आई सुजय ला कॉल करायला गेली. मितेश बेड वर झोपला होता. डोकं प्रचंड दुखत होते अति विचार त्याला त्रासदायक होते. 10 मिनिटात सुजय घरी आला. मितेश ला चेक करत बोलला मित्या तुला माहीत आहे अतिविचार तुला घातक आहे मग का स्वहताला त्रास करून घेतोस? सुजय मला समजत नाही मी काय करू? आरु ला माझी आता गरज आहे आणि संयु माझ्या प्रेमावर विश्वास ठेवून आहे. मित्या आता ही वेळ नाही काही विचार करण्याची तू आधी शान्त हो. बघू आपण ठरवू . सुजय ने त्याला झोपेचे इंजेक्शन दिले कारण त्याला झोपेची नितांत गरज होती. त्याचा मेंदू विचार करून थकला होता. मीतेश संध्याकाळी उठला. चार तास तो झोपला होता आणि सुजय निनाद ला मीतेश बद्दल बोलला होता म्हणून निनाद आता त्याला भेटायला घरी आला होता. निनाद मीतेश च्या रूम मध्ये आला. मीतेश नुकताच उठला होता जस्ट फोन चेक करत होता. मित्या कसे वाटते आता. अरे निनाद मी आता तुलाच कॉल करणार होतो. मित्या आर यू ओके. हो बरे वाटते मला आता. मित्या आय एम सॉरी मी सकाळी ख़ुप जास्त बोललो तुला म्हणुन तुला त्रास झाला ना? नाही रे निनाद तुज्या मुळे काही नाही झाल जे झाले ते माझ्या मुळे आणि आता मीच ते सॉल्व करेन चल संयू ला भेटायला जावू. तू नक़्क़ी ठीक आहेस ना मित्या तरच बाहेर जावू आपण. हो रे एम फाइन चल म्हणत मीतेश आवरायला गेला.एका हॉटेल मध्ये निनाद ने संयू ला बोलवले होते. मीतेश चा मलूल चेहरा बघुन संयू म्हणाली,मीतेश तुला बर वाटत नाही का? कीती लो दिसत आहेस तू? मला निदान सांगायचे तरी मला ख़ुप काळजी वाटत होती. काही नाही संयू नेहमीची माझी डोके दुखी. तू सांग मी ठीक आहे. निनाद बोलला मित्या आधी खावून घे मग बोल. ओक म्हणत मीतेश ने त्यालाच ऑर्डर द्यायला सांगितली. खावून झाल्यावर मीतेश म्हणाला, संयू एक आनंदाची बातमी आहे. हो का तुला काही अवॉर्ड वैगेरे मिळाले का मीतेश? नाही संयू आरोही शुद्धिवर आली आहे. काय आणि कसे? संयू ने आश्चर्याने विचारले. हो संयू दोन दिवस झाले आता आरु वेंटिलेटर वर आहे.

पुढे काय होणार काही ही माहित नाही सुजय त्याची ट्रीटमेंट करत आहे. खरतर हे ऐकून संयू मनातून ख़ुप दुखी झाली होती आता कुठे तिला तीच प्रेम मिळाल होत आणि अचानक हे अस घडले अगदी अनअपेक्षित! तरी चेहऱ्यावर काही ही न दाखवता ती म्हणाली ओह्ह खरच ग्रेट न्यूज आहे ही हा देवाचा चमत्कारच म्हणावा लागेल. हो संयू मला ही तसेच वाटते. निनाद फ़क्त त्यांचे बोलने ऐकत होता जर मीतेश आउट ऑफ कंट्रोल झाला तर त्याला सावरायला कोणीतरी हवे म्हणुन तो आला होता. मीतेश आरु लवकर पूर्णपणे बरी व्हावी असच मला वाटते शेवटी तुझ प्रेम आरुच तर आहे ना मीतेश? बट संयू व्हाट अबाउट यू? मीतेश ने विचारले. माझी काळजी नको करू मीतेश आता तुझी जास्त गरज आरोही ला आहे. तिच्या प्रेमा पुढे माझ प्रेम काहीच नाही . कदाचित देवाला सुद्धा हेच हवे आहे म्हणुन तर आरु शुद्धिवर आली ना? संयू तुझे आभार कसे मानु ? मला महितच होते की तू मला समजून घेणार. थैंक यू संयू . मीतेश मी तुझी बेस्ट फ्रेंड म्हणुन कायम तुझ्या सोबत असेन डोन्ट वरि. हे सगळ बोलताना संयू च्या मनाला किती यातना होत होत्या हे फ़क्त तिलाच माहित होते. आता तिथे अजुन जास्त वेळ थांबलो तर सव्हता वर कंट्रोल नाही ठेवता येणार डोळे कोणत्याही क्षणी वाहू लागतील अस संयू ला वाटू लागले म्हणुन तीच बोलली निघुया का आपण? ओके चल मीतेश म्हणाला. संयू पटकन आपली स्कूटी घेवून निघाली. निनाद च्या कार मधुन मीतेश आला होता. बघ निनाद मी बोललो ना की संयू मला समजून घेईल. हो ख़ुप मोठ मन आहे तीच मित्या. तिचा शान्त चेहरा तू बघितलास पण त्या मागच्या वेदना तू रायटर असून ही तुला नाही समजल्या ,न रडता ही तिच्या डोळ्यातले अश्रु तुला नाही दिसले कारण तुझ्या नजरे समोर आता फ़क्त आरु आहे. निनाद तुला काय म्हणायचे आहे मी संयू शी मुद्दाम अस वागलो का? अरे परिस्थितिच तशी आहे मी काय करू सांग. मला संयू च मन समजत आणि तीची काळजी ही वाटते पण आता आरु ला माझी जास्त गरज नाही का निनाद? ओके मीतेश जास्त विचार नको करू सगळ ठीक होईल. मग निनाद मीतेशला घरी सोडून निघुन गेला. संयु घरी आली आणि तिच्या रूम मध्ये गेली आता तिचा संयम संपला होता . तीला रडु आवरत नव्हते ती हूंदक्या वर हुंदके देत रडत राहिली . मीतेश पासून दूर जाण म्हणजे तिच्या शरीरातुन कोणी तरी प्राण काढून घेण्या सारखे होते कारण ख़ुप जीव लावला होता तिने मीतेश ला. तीची प्रेम कहानी सुरु होण्या पूर्वीच संपली . मीतेश तिचा नाही झाला म्हणून काय झाले पण तो जिथे असेल तिथे सुखात असावा एवढीच तीची इच्छा होती. आरु त्याच पहिल प्रेम होत तिच्या पेक्षा आरोही चा जास्त अधिकार मीतेश वर होता. आता आरु ला जास्त गरज मीतेश ची होती. मग संयु ने मीतेश पासून कायमचे दूर जाण्याचा निर्णय घेतला

.क्रमश.