Snehi - 2 in Marathi Love Stories by KRUTIKA FALAK books and stories PDF | स्नेही - 2

स्नेही - 2

प्रियाच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच आई बाबा रूम मधे येतातआई:- काय झालं ग ओरडायला. बरी आहेस न तू.
बाबा :- काय झालं बाळा.
प्रिया कधी आई बाबा कडे कधी लॅपटॉप कडे डोळे वटारत बघत असते.
प्रिया:- रिझल्ट लागला

आई:- मग काय दिवे लावले बाई
(आई हसतच बोलते कारण प्रिया हुशार मुलगी. कायम पहिली येणारी प्रिया जरी मस्तीखोर, प्रत्येकाची खेचत असणारी असली तरी वेळेवर कायम सर्वांना पहिली येऊन धक्का देत असे)

प्रिया :- (डोळ्यात पाणी आणत) आई😣 89% पडले मला ग. मला 90% च्या पुढे हवे होते ना 😞
आई :- अग बाई 😁 खुप चांगले आहेत की ग.
बाबा:- अभिनंदन प्रियु. रडतेस का ! अभिमानाची गोष्ट आणि तू रडतेय वेडी.
ध्रुव:- बरे पडले तशे. माझात राहून होतेय तू ही हुशार 😁
आई :- रेवा तुझा काय रिझल्ट लागला.
रेवा:- 85%
आई:- वाह! अभिनंदन बाळा.
बाबा:- अभिनंदन रेवा
ध्रुव:- अभिनंदन ताई. चला आता पार्टी हवीय मला.
आई:- रेवा रात्रीच जेवण करूनच जा आता
रेवा:- नाही मावशी सकाळ ची आलेय ना.
डोअर बेल वाजते ध्रुव दार उघडतो तर समोर प्रशांत उभा असतो
(प्रशांत हा प्रियाच्या सोसायटी मधे राहत असतो.प्रिया पेक्षा एक वर्ष सीनिअर असतो.)
ध्रुव:- (थोड आश्चर्यात बोलत) ये प्रशांत दादा.
प्रशांत:- (घरात येत) प्रिया कुठे आहे रे.
ध्रुव:- तिचा रूम मधे आहे. थांब बोलवतो.
ध्रुव त्याला बसण्याच सांगून प्रियाला बोलवायला जातो.
ध्रुव :- (प्रियाच्या रूमच्या डोअर ला टेकून हाताची घडी घालत बोलतो) ऐ प्रिया. तुझा तो अकडू फ्रेंड आलाय. बसलाय बाहेर हॉल मधे.
प्रिया:- ( हाताने कोण असा इशारा करत) कोण.
ध्रुव:- प्रशांत.रेवाचे डोळे चमकतात तिचा चेहऱ्यावर हसू येत ती प्रियाच बोलण तोडतच बोलते.
रेवा:- काय प्रशांत आलाय. 😳
रेवा लगेच उठून हॉल मधे जाते.
प्रिया:- (विचित्र हसून आई बाबांन कडे बघत बोलते) मी ही आलेच प्रशांत का आला हे बघून
प्रिया उठून हॉल मधे जाते.
रेवा:- हाय प्रशांत. तू इथ कसा 😍 ( रेवा खूप खुश होत बोलत असते)

रेवा ला प्रशांत आधी पासून आवडत होता. प्रशांत प्रिया कडे कायम येत असे आणि रेवा ही कॉलेजला जायला प्रिया कडे यायची तर तशी तिची मैत्री प्रशांत सोबत झाली पण तो कायम तिच्याशी उद्धट बोलत असे.

प्रशांत:- (वायातागलेले आवाजात) का नाही येऊ शकत.😒 प्रियाला भेटायला आलोय.
प्रिया येताना दिसून प्रशांत तिच्याकडे हसत बोलत तिला हाय बोलतो.

प्रिया:-( नकली हसत) हा बोल का आलास म्हणजे बर झालं आलास.😬

आई बाबा ही हॉल मधे येतात.

प्रशांत:- ( गोड आवाजात) प्रिया आज तुझा रिझल्ट होता ना. पास तर झालीस ना.😁

प्रिया:- हो झाली ना. तुझ्यासारखी एक वर्ष फेल होण्याची सवय नाही. 89% भेटले😒
रेवा:- (उत्साहित होऊन) हो आणि मला 😍

प्रशांत:- ( रेवा कडे दुर्लक्ष करत) मी तुझे नाही विचारलेत. प्रिया माझा नाही का रिझल्ट विचारणार तू!
(प्रशांत प्रिया कडे चमकून बघत बोलतो)

प्रिया:- (रागात) मला नाही विचारायचा 😒

आई :- अग काय बोलते प्रिया.

बाबा:- तू पास झालाच अशील न म्हणून ती अस बोलले. हो ना प्रिया ? (सर्व सावरत बोलतात)
प्रिया:- (नाराजीत) हो. 😒

ध्रुव:- ओय प्रिया. श्याम ला किती भेटले ग.

श्याम हा प्रियाच्या सोसायटी मधे राहत असतो. श्याम खूप चांगला स्वभावाचा आणि स्वाभिमानी मुलगा असतो.त्याची आणि प्रियाची मैत्री खूप चांगली असते हे प्रशांत ला अजिबात आवडत नव्हत.
प्रशांत:- (मुद्दाम खिल्ली उडवण्याच्या स्वरात) हंनन् तो शिकत तरी होता का?😁

श्याम:- ( घरात येत) हो. शिकत ही होतो आणि पास ही झालोय.
प्रशांत :- तरी कितवा आलास. शेवटून!
श्याम:- दुसरा पण पुढून. तुझ्या मागून असतो तर पास नसतो झालो.😂
ध्रुव, प्रिया, श्याम जोरात हसत असतात😂. रेवा मात्र गप्प असते तिला वाईट वाटत असत. आपला अपमान होतोय बघून प्रशांत रागात निघून जातो.
श्याम:- ( हसू आवरत) अरे प्रशांत थांब गंमत करतोय रे.
प्रशांत निघून गेल्यावर सर्व परत जोरात हसतात. सर्वांचा हसण्याचा आवाज घरभर पसरत होतं. एकी कडे ती खळखळून हसत होती तर दुसरीकडे त्याच शहरात तो कोणाच्या आठवणीन झुरत होतं.
(क्रमशः :- कथेच्या नायकाला बघुया पुढील भागात.)

Share