Night Games - Episode 7 books and stories free download online pdf in Marathi

रात्र खेळीते खेळ - भाग 7



राज यंत्रवत चालत चालत पुढे जात होता आणि अचानकच त्याला समोर दिसणारे ते डोळे दिसेनासे झाले. तसा लगेचच तो भानावर आला व जस तो भानावर आला तस त्याच्या मनात भितीने संचार केला कारण तो एका मोठ्या गुहेत पोहोचला होता त्याच त्यालाच कळेना की आपण नेमक कोठे आलोय आणि आपण इथे आलो तरी कस. तो त्या गुहेला निरखून पाहू लागला त्याला अस वाटल कि कोठे ना कोठे इथून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच असेल पण तो जसजस गुहा निरखून पाहू लागला तस तस मनातून ढासळूच लागला. कारण तो ज्या गुहेत होता त्याला कोणतीच वाट नव्हती ती गुहा पूर्णपणे भिंतींनीच ग्रासलेली होती. पण त्याच्या मनात एकच प्रश्न येत होता जर गुहेला काही वाटच नाही तर आपण इथे आलोच कस. तेवढ्यात त्याच्या कानात एका स्त्रीच्या हसण्याचा आवाज घुमला. तस तो दचकून आजूबाजूला पाहू लागला. तेव्हा त्याला एक नववारी साडी नेसलेली नाकात नथ पायात पैंजण आणि गळ्यात दागिन्यांची शृंखला असलेली पारंपारिक पद्धतीचा पेहराव केलेली एक स्त्री दिसली. ती चालत चालत त्याच्याच दिशेने येत होती. क्षणभर तर तो चक्रावूनच गेला. या गुहेत एक स्त्री कशी काय राहात असेल या विचाराने. तोवर ती स्त्री त्याच्याजवळ आली व त्याला म्हणू लागली शेवटी आलासच ना इथे.. तुला माहिती आहे का मी आधीपासून तुझी प्रतिक्षा करत आहे. कधी एकदा तु इथे येणार आणि मला तुझ्यासोबत खेळ खेळता येणार..
राज तर भांबावूनच गेला कारण त्याला कळेनाच कि ती स्त्री अशी का बोलत आहे तो तर विचारातच हरवला.....
अरे हि स्त्री कोण आहे. ही आपल्याला अशी का म्हणत आहे कि तुझी वाट पाहत होते आपण तर या स्त्रीला कधीच पाहिलही नाही आणि या आधी इथे कधी आलो पण नाही मग तरीही ती आपल्याला शेवटी आलासच ना अस का म्हणत आहे.
तोवर त्याची विचारांची तंद्री तोडत ती स्त्री म्हणू लागली. ये काय विचार करत बसलास. आता नको विचार करत बसू नाहीतर आणखीनच फसशील... आता खेळ सुरू करण्याची वेळ झाली. राजला तर कायच समजेना म्हणून तो तिला त्या गोष्टींबद्दल काही विचारणार तोवरच अचानक सगळीकडे अंधारच अंधार पसरला त्याला ती गुहाच काय पण ती स्त्री सुद्धा दिसेना.. पण तीचा आवाज मात्र घुमू लागला पण यावेळीचा आवाज खूपच विचित्र होता ती म्हणू लागली झाला आता खेळ सुरू झाला... तुला बाहेर कधीच न पडू देण्याचा... आणि शेवटी कायमच संपवण्याचा हा हा हा हा..........
राज तर मनातून खचत चालला होता तरीही त्याने सारा धीर एकवटला व आता जे होईल त्याला धैर्याने सामोरे जायच अस ठरवल.......
राज तसाच हात पुढे करत करत समोरच्या भिंतींचा मागोवा घेवू लागला. पण त्याला आजूबाजूला भिंती असल्याच जाणवेनाच एकतर अंधार दिसत होता त्यात हाताला काहीच लागेना. तोवर अचानकच वाऱ्याचा जोर जास्तच वाढू लागला आणि त्याचे पाय आपोआपच जमिनीवरून वर वर जावू लागले. तो तसाच वाऱ्याच्या जोराने इकडे तिकडे हवेतच विहरू लागला त्याच त्याच्या शरीरावरच नियंत्रणच जणू कमी झाल.. आणि अचानकच शरीर परत जड झाल आता त्याला जास्त गारवा जाणवू लागला व त्याचे श्वास जड झाले जणू काय आजूबाजूला पाणीच भरल आहे त्याच्या तोंडात पाणी जावू लागले पण त्याला ओकारी आल्यासारख होवू लागल व दुर्गंधही जाणवू लागला. मध्येच क्षणभर थोडा उजेड दिसला मग मात्र त्याची बोबडीच वळली कारण त्याच्या आजूबाजूला रक्ताची नदी होती. त्यातलच पाणी त्याच्या नाका तोंडात जावू लागल होत. पण तरीही तो जीव वाचवण्यासाठी तरंगायला हात पाय हालवण्याचा प्रयत्न करू लागला. तोवरच तेथील एका वृक्षाने त्याच्या पायाभोवती वेटोळे घालायला सुरुवात केली.... तो जोर तर लावू लागला पण काही केल्या त्याला पाय हलवता येईना.. जणू काय त्याच्या पायांनी त्याची साथच सोडून दिली......

कावेरी हळूहळू शुद्धीवर येवू लागली. तर तिच्या डोक्यात जोरात कळ मारू लागली. ती आजूबाजूला पाहू लागली पण तिला काहीच दिसेना ती ला काही वेळापूर्वीचा तो सर्वच्या सर्व प्रसंग डोळ्यासमोर दिसला व ती पुन्हा एकदा मनातून हालूनच गेली. पण तरीही पुन्हा आपल्या मित्रांच्या आठवणीने तसच ते अडचणीत आहेत या जाणीवेनेच स्वतः ला सावरू लागली. व हळूहळू उठण्याचा प्रयत्न करू लागली. पण तीच्या डोक्याला प्रचंड मार लागल्याला त्यामुळे वर उठता उठता वेदनेने पुन्हा खाली बसायची. पण ती ने कसाबसा धीर एकवटला व सावधगिरीने आजूबाजूचा अंदाज घेत पुढे पुढे जावू लागली. ती थोड पुढे गेली तोवर तिला कोणाचातरी विव्हळण्याचा आवाज येवू लागला. ती हळूहळू त्या आवाजाचा वेध घेत पुढे पुढे जावू लागली. व काही क्षणातच जिथून आवाज येत होता तिथे पोहोचली. ती समोर तशीच बघू लागली पण स्पष्टपणे काहीच दिसत नव्हत. कारण तिथे अंधार ठासून भरलेला फक्त अस्पष्टसा प्रकाश दिसत होता. तीला त्या अस्पष्टश्या प्रकाशाच पण थोड आश्चर्य वाटू लागल कारण बराच वेळ झाला तिला प्रकाशच दिसला नव्हता जणू काय अंधारानेच राज्य करायला सुरुवात केली होती पण आता थोडा का असेना प्रकाश दिसत होता. ती त्या अस्पष्ट दिसणाऱ्या प्रकाशातून समोर पाहू लागली तर तीला तिथे एक त्यांच्याच वयाचा मुलगा पाठमोरा दिसला पाठीमागून त्याचा शर्ट ती ने पाहिला आणि तीच्या डोळ्यात अचानकच पाणी तरळू लागल. कारण ती च्या समोर अधिराज बसला होता. पण तो अधिराजच आहे का याची थोडी शंका पण तिला येवू लागली कारण आधी पण अनुश्रीच्या रूपात तिला ती बाई दिसलेली. ती ने तसच थोडस घाबरत घाबरत आवाज दिला. अधी ये अधी..... पण समोरून काही प्रतिसादच येईना तरीही जर हा आपला अधीच असेल तर कारण आवाज त्याचाच भासत होता म्हणून ती पुढे पुढे जावू लागली तोवर अधी मागे वळला त्याला पाहताच तीला असंख्य वेदना होवू लागल्या तो रडत रडत तीच्याकडे बघू लागला. त्याच्या हातावर जख्माच जख्मा होत्या. एक पाय तुटलेला. डोळे पांढरे झालेले अशा अवस्थेत तो तीच्यासमोर रडत थांबलेला. तीला तर काय करायच तेच समजेना पण तरीही ती त्याला विचारू लागली. ये अधी हे काय आहे काय झाल तुला...ती ने अस विचारल्यावर मात्र तो जोरात हसत हसत सांगू लागला त्यान त्यान मारल मला त्याला आपला बदला घ्यायचा आहे आता आता तुमची वेळ आहे तो तुम्हाला पण नाही सोडणार आणि विचित्र आवाजात हसू लागला..... आणि परत परत तो तुम्हाला पण सोडणार नाही अस म्हणत म्हणतच गायब झाला..... कावेरी तर रडूच कोसळल ती स्वतः शीच म्हणाली नाही नाही नाही आमच्या अधीला काहीच नाही होवू शकत आणि आता ज्याला बघितल तो अधी असूच शकत नाही कारण त्यासोबत जरी काही वाईट झाल तरी तो आमच्याबद्दल अस नाही बोलणार.... कारण कारण त्याचा आमच्यावर त्याच्यापेक्षा पण जास्त जीव होता.... आणि परत तीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले......
तोवर वरून पुन्हा एक आवाज घुमू लागला. अरे काय हे एवढा एवढा विश्वास आपल्या मित्रावर चांगल आहे शेवटपर्यंत काय तुमचा विश्वास हरणार नाही वाटत पण काही का असेना तुम्ही आता भेटूच नाही शकणार मित्र मित्र करत असच कायमच जीवाला मुकणार. मी सोडणार नाही तुम्हाला तुम्ही माझे काम अर्ध्यात बंद पाडलेला आता बघा एकमेकांच्या भेटीसाठी किती तडफडवतो आणि असच खेळवून खेळवून तुम्हाला कायमच संपवतो हा हा हा हा........ अचानकच कावेरीला पण काय झाल काय माहिती ती न घाबरता बोलू लागली. नाही नाही नाही मी माझ्या मित्रांना काही होवू देणार नाही काही ही करून आम्ही एकमेकांना भेटणारच शेवटच का असेना आम्ही एकमेकांना भेटूनच आमचे प्राण त्यागणार........ आणि परत तो विचित्र आवाज घुमू लागला अरे अरे ही ही ही इथे आमचीच सत्ता चालते. इथून आम्ही कोणालाच बाहेर नाही जावू देत. गेल्यावेळी गेलता कसतरी पण यावेळी आम्ही त्याचा बदला घेणार आमची शक्ती वाढली आहे नाही जावू देणार आणि तुम्हाला भेटू पण नाही देणार..... आणि अचानक कावेरीला अशक्तपणा जाणवू लागला जणू काय कोणीतरी तिच्यातली शक्तीच खेचून घेत आहे. पण तरीही ती आपल्यात जेवढी क्षमता शिल्लक आहे तेवढ्या क्षमतेने पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागली. व अचानकच खालची जमीन हादरू लागली व कावेरीचा तोल जावू लागला.
आता तर कावेरी पूर्णपणे खचून जावू लागली.