Night Games - Part 3 books and stories free download online pdf in Marathi

रात्र खेळीते खेळ - भाग 3

रात्र खेळीते खेळ भाग 3

सगळेजण थोड्या गप्पा मारून तिथेच बाजूच्या खोलीत झोपायला जाऊ लागले. जाता जाता ते आजोबांच घर पाहू लागले. त्या आजोबांच्या घराची रचना थोडी वेगळ्या पद्धतीची होती. बाहेरून अगदी पडक घर वाटायच. पण आत आल्यावर वेगळीच अनुभूती यायची. बाहेरून पडक आणि खूपच छोट्स वाटणार ते घर आतून मात्र खूपच भव्य होत. अस वाटायच कि खूपच मोठ्या जागेत ते घर वसल आहे. छताच्या खालची रचना अतुलनीय होती त्यावर हिऱ्यांचा वापर करून केलेले नक्षीकाम होते. व त्या खाली एक फॅन फिरत होता ज्याच झुंबर खूप विशिष्ट पद्धतीने चित्रित केल गेलल त्यावर काही नंबर्स कोरल्यागत दिसत होते व त्यासोबतच काही अक्षर पण लिहिली गेली होती. अनुश्री सगळ्यांना फॅन दाखवत म्हणाली वरती बघा ते कसले तरी नंबर्स आणि अक्षर लिहिल्यात. सगळेच वरती बघू लागलेत तोवर मागून अचानक येत आजोबा ओरडल्यागत म्हणाले कि अरे तिकडं काय बघतासा तो आवाज ऐकून क्षणभर सगळेच दचकले तस आजोबा बाजू सावरत म्हणाले अरे घाबरलसा का त्याच काय आहे माझ्या बाबांना कमी ऐकू यायच म्हणून कधी कधी मी मोठ्याने बोलायचो आज पण सवयीने तसच बोलून गेलो पण तुम्ही घाबरू नगसा. आणि त्या नक्षीबद्दल सांगायच झाल तर ते मला लहानपणी कोडी सोडवायला आवडायची म्हणून माझ्या बाबांनी तयार करून घेतलेल.
पण आजोबा तुम्ही तर झोपायला गेलेलात ना.
त्या खोलीकडे बोट दाखवून. कावेरी म्हणाली.
अग हा ते मी चुकीची खोली दाखवली म्हणून परत आलो त्या खोलीत नका जाऊ तिथे नको असलेल सामान हाय आमच तुम्ही त्या तिकडच्या खोलीत जावा. पण आजोबा अस म्हणत राज मागे वळला पण ते लांब गेलेले दिसले तो आश्चर्याने बाकिच्यांना म्हणाला आजोबा किती धीट आहेत ना बाकिचे पण म्हणाले हो ना आता इथेच होते तोवर तिथे गेले सुद्धा. हा ते आहे पण किती खाष्ट आहेत ते.कावेरी म्हणाली.. ये कावू गप्प ग मोठ्यांबद्दल अस बोलतात का अनुश्री म्हणाली...
तर काय ग अनू मगाशी किती ओरडून बोलले ते कावेरी म्हणाली..
अग असू दे ग आपल्याला सांभाळणारे आबा पण आपल काही चूकल तर ओरडतातच ना. अनुश्री म्हणाली...
अग पण ते चूक नसताना कधीतरी अस बोललेत काय आपल्याला. कावेरी म्हणाली.....
ये गप्प बसा तुम्ही दोघी काय चाललंय तुमच आपल्याला थोडीच कायमच राहायच आहे आजची रात्रच तर काढायची आहे उद्या परत आपल्याला अधिराजला शोधायला जायच आहे. वीर म्हणाला.......
अरे हो रे कोठे गेला असेल रे आपला अधी खूप आठवण येतेय रे मला ते ची. राज म्हणाला....
अरे अस नका धीर सोडू आपण उद्या शोधू त्याला आता चला लवकर म्हणजे सकाळी लवकर उठून त्याला शोधता येईल. वीर म्हणाला.....
तस बाकिचे खोलीकडे जावू लागले.
वरच्या बाजूने तर घर आकर्षक आणि सुंदर अस होत पण त्या घराच्या भिंती मात्र विचित्रच होत्या. त्या घराच्या प्रत्येक भिंतीवर विशिष्ट अशी कलाटणी केलेली होती. ते पाहून हुबेहूब चित्र डोळ्यासमोर यायची. त्यातील एका चित्रात पाच लहान सात वर्षाची पोर दाखवलेली जी खोडकर असल्यासारखी वाटायची. ती एका खोलीत बसली आहेत व आपसात चर्चा करत आहेत अस ते चित्र होत. दुसऱ्या चित्रात एक स्त्री दाखवलेली जी च्या मागे एक माणूस चाकू घेऊन उभा होता आणि तिच्यापुढे आणखी एक स्त्री होती जीने तिला पकडल होत. ते पाहून सगळ्यांना भितीच वाटायला लागली. पण नुसती चित्रच आहेत अस म्हणून परत ते सगळे पुढे जावू लागले. त्याच्या पुढे पण एक चित्र होत ज्यात काही माणस हातात बंदुका घेऊन एके ठिकाणी थांबलेली दिसत होती. त्यानंतरच्या एका चित्रात एक स्त्री रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली दिसत होती. त्याच्या पुढच्या चित्रात नुसताच लाल रंग दिसत होता. आणि त्याच्या पुढे फारच भयावह चित्र होत त्यात एक माणूस दाखवलेला होता जो रक्ताने बरबटला होता. ज्याच्या डोळ्यात पाहिल्यावर अस वाटायच कि तो निखारे फेकत आहे. आणि हातात चाकू घेऊन आपल्यावर वार करायला धावत आहे. पुढील चित्रात ती पोर धावत्याली दाखवलेली. ती भिंतीवरची चित्र बघत बघत ती चौघजण त्यांना ज्या खोलीत आजोबांनी राहायला सांगितलेल त्या खोलीत गेले. .............
ते ज्या खोलीत गेले ती खोली पण खूपच आकर्षक होती. त्यांच्यासाठीचा जो बेड होता त्याच्या मागे मोराचे छान असे चित्र रेखाटले होते. त्याचे मोरपंख तर सोन्यानेच बनवले आहेत तसे चमकत होते. बेडचे जे चार पाय होते त्याला मध्ये मध्ये हिरे जोडले होते आणि बाजूने चांदी दिसत होती. त्याच्या समोर एक टेबल होत ज्यावर एक मोठा असा टि. व्ही होता जो खूप पूर्वीच्या काळातला वाटत होता पण तरीही अगदी नव्यासारखा दिसत होता जणू काय आताच खरेदी केला आहे असा. खाली आकर्षक असे मॅट घातले होते ज्यावर सुंदर फुलांच्या डिझाईन्स होत्या. तसच त्या खोलीतल्या भिंतीवर चित्रकार जशी निसर्गातल्या प्रत्येक झाडाझुडुपांचे हुबेहूब चित्र काढतो तशी चित्र काढली होती त्यांना ते सगळ पाहून खूपच आश्चर्य वाटू लागल होत. त्यांनी या आधी इतक भारी घरांची डिझाईन्स पाहिली नव्हती त्यांना हेच कळत नव्हते कि सोन्या चांदीच्या आभासासाठी बनवलय कि खरच इथे सोन्या चांदीचा वापर केला गेला आहे. त्यांना त्या भिंतीवरची चित्र बघून खरच आपण कोणत्यातरी निसर्गमय ठिकाणी आहोत अस वाटत होत. ते पाहून अनुश्री म्हणली थॅंक गॉड की त्या बाहेरच्या खोलीसारख्या भिंती नाहीत नाहीतर झोपच यायची नाही.
हो ग अनू बरोबर आहे नाहीतर तुझ घाबरून पाणी पाणी झाल असत ग. कावेरी म्हणाली.....
ये कावू तुला काय त्या राजसारखी घाबरट वाटली का काय मी.. अनुश्री म्हणाली......
ये अस काय चिडवालसा तस तर तुम्ही सगळेच लय घाबरट हाईसा म्हणून तर लगेच त्या माणसाला बघून पळालसा ... राज म्हणाला...
ये बास बास तू तर अस बोलतोयस जस कि तु घाबरलाच नाहीस म्हणून तर शर्ट तसाच टाकून पळत आलास .. वीर अस म्हणाला तस सगळेच हसू लागले.
अरे पण हा आपली सगळ्यांचीच किती वाईट हालत झालेली बर झाल या आजोबांच घर दिसल नाहीतर काय खर नव्हत... वीर म्हणाला.....
हो ते आहे पण आपण अधीला एकटच सोडून आलो रे काय माहित तो कसा असेल अरे तो माणूस त्याच्या पण माग लागला नसेल ना.... त्यान त्याला काय केल तर नसेल ना ... अनुश्री म्हणाली..
ये नाही ग अनू माझ मन सांगतय तो नक्की ठिक असेल आणि नको ते विचार नको करू. माहित आहे ना आपण जस विचार करतो . तस होत बऱ्याचदा. कावेरी म्हणाली......
हो अग चूकल परत नाही बोलत अस.... अनुश्री म्हणाली...
अरे झोपूया आता उद्या अधीपर्यंत लवकर पोहोचायला पाहिजे.वीर म्हणाला . तस सगळे लागलीच अंथरूण घालून झोपू लागली...
इकडे आजोबा मात्र वेगळ्याच तयारीत होते.