Rakt Pishachchh - 2 books and stories free download online pdf in Marathi

रक्त पिशाच्छ - भाग 2

॥ रक्त पिशाच्छ ॥ 18+ भाग 2....

फक्त 18+ प्रौंढांकरीता..

शृंगारीक , थरारक, हिंसक.

लेखक:जयेश झोमटे (जेय)

ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहे, अशी नोंद दर भागांत येत राहिल.

 

भाग 2

अंधार पडताच राहाझगड गावातले रहिवासी आप-आपल्या मुला-बायकोंन समवेत आप-आप्ल्या घरांची दार खिडक्या लावून घरात मरणाच्या भीतीने दडुन बसलेले.गावातल्या प्रत्येक मातीच्या बंद घराबाहेर, दरवाज्या बाजुला भिंतीवर एक तांबड्या रंगाचा कंदील पाहारा देत जळत होता. आठवड्याभरा अगोदरच गावात काही अफवा पसरल्या होत्या.की रहाझगडच्या वेशीवर काहीबाही विचीत्र -आकार दिसत आहेत. विप्रित प्रकार घडत आहेत.परंतु गावक-यांनी ह्या काहीबाही थोड्याफार अफवात्मक गोष्टींवर जास्त काही लक्ष दिल नव्हत. मानवाला जो पर्यंत पायाला ठेच लागत नाही, तो पर्यंत तो वर पाहूनच चालणार. तसंच काहीस ह्या राहाझगड वासियांसमवेत घडल होत.दोन दिवसांन अगोदर किश्या-शिरप्या, नामक राहाझगड गावच्या वेशीवर सुरक्षेसाठी तैनात असलेले पैलवानासारख्या तगड्या शरीरायष्टीचे दोन पाहरेकरी , त्या आकारास वेस ओलांडून पाहण्यासाठी गेले असता अचानक गायब जे झाले होते.दुस-या दिवशीबाकीच्या सैनिकांनी त्या दोघांचाही अथक परिश्रमाने शोध घेतला असता.त्या दोघांचीही प्रेत राहाझगडच्या जंगलातल्या नदीत नग्न अवस्थेत सापडली.परंतु कोड्यात टाकणारी गोष्ट अशी की त्या पैलवाना सारख्या गड्यांची शरीर

अक्षरक्ष रक्त मांस लुचुन टाकल्या सारखी हाल्की-फुल्की दिसुन येत होती.त्या दोघांच्याही मानेवर दोन लहान-लहान होल होते. जणु मानेतल्या रक्तनटीकेत दात घुसवुन पुर्णत शरीरातुन रक्त चूसल असाव

त्या दोघांचीही बलाढ्य शरीरयष्टी असलेली नग्न प्रेत पाण्याने भरुन फुगून नदीत तरंगत होती.आणि शेवटची लज्जास्तव गोष्ट अशी ,की त्या दोघांचेही गुप्त अंग उपटून काढलें होते. दोघांच्या बिभत्स , क्रुर , हिंसक पद्धतीने झालेल्या खुनाची वार्ता त्या दिवशी राहाझगड गावात भयहैवानाने वा-यासारखी पसरली, लहान-लहान पोर, बायका , प्रौढ-तरुण हा-हा म्हंणता पुर्णत गाव नदीपाशी जमला होता.काय ते फुगलेल पांढरफट्ट त्वचा पडलेल आणि मांशानी ओरबडून खाललेल दोघांच फुगलेल प्रेत.जो तो पाहून खालच्या पायांपासुन ते मेंदूपर्यंत सरसरुन अंगावर काटा येऊन हादरत होता.बायका तर आपल्या लहान-लहान पोरांना कवेत घेऊन ते इचीत्र भ्याडमय दृश्यपाहुन त्या जागेतुन लगली काढता पाय घेत होत्या.एकक्षण ही कोणाला ते बिभत्स दृश्य पाहवत नव्हत.गावातली काही मांणसांची कुजबुज सुद्धा सुरु होती,: येवढ्या पैलवान फुगलेल्या धारधार शरीरयष्टीवाले हे दोघे गडी पाच -पाच जणांना ऐकणा-यां मधले नव्हते. मग ह्याचा अर्थ भला कोण माणूस तर ह्यांना मारु शकणार नाही.आणि समजा माणुस असलाच तर तो हे असं भयानक मौत कशासाठी देईल त्या मानवाला ही जराशी तरी दया भावना असेलच ना.मग भले असा असुरी आनंद फक्त एकच जण घेऊ शकतो आणि तो आहे- सैतान. वेशीबाहेर दिसणा-या विचित्र आकारांच्या घटना पाहता , ह्या सर्व हत्येची जोड त्या विचित्र आकृत्यांवर गेली.आणी त्याच दिवसापासुन गावात असाकाही थरथराट भीतियुक्त वातावरण पसरला. की गावातली लोक सांज होताचक्षणी घराबाहेर न पडता, भिंतीवर कंदील लटकवुन आप-आपल्या घरात बसु लागली.भिंतीवर कंदील लटकवल्याने कोणतीही वाईट शक्ति आसपास भटकत नाही, असं गावक-यांच म्हंणन होत.राहाझगडवासी जेवण खावन करुन लवकर झोपु लागली. सांज होताच गाव कस स्मशानशांततेत तबदील होऊ लागला.सांज होताच गाव विलक्षण शांततेत बुडुन जाऊ लागला.

==================

राझगड महालात :

राजा दारासिंह आपल्या आरामाखोलीत पलंगावर डोळे मिटुन ,मागच्या फळीवर पाठ टेकवून पाय सरळ ठेवून पलंगावर बसले होते. त्या चौकोनी आकाराच्या पंचवीस फुट आरामखोलीत तीन-चार कंदिल जळत होते.

त्या कंदिलांचा तांबडा प्रकाश खोलीतल्या भिंतींवर, महाराजांच्या चिंतेची छटा असलेल्या चेह-यावर ही पडत होता.त्या तांबड्या रंगाच्या प्रकाशात भिंतींवर लावलेल्या पेंटिंग्स जिवंत आहेत की काय अस भास होत-होत.जणु त्या पेंटींग्स मध्ये असलेले ते निर्जीव कल्पनेने साकारलेले आकार क्रुरता पत्कारुन त्या चित्रातुन बाहेर येतील आणि समोर असलेल्या मानवाच्या रक्तनटीकेत दात घुसवुन रक्त चुसकतील.महाराजांचे डोळे बंद होते. डोक्यात त्याच-त्याच चिंतेच्या म्हणा किंवा भीतीने म्हणा.कल्पनेने भयदृश्य डोळ्यांसमोर साकार होत-होते.महाराजांनी सुद्धा त्या किश्या-शिरप्या नामक सैनिकांची

क्रूरतेने हत्या केलेली ती फुगलेली, माशांनी ओरबडून लचके तोडलेली नग्न प्रेत पाहिली होती.आणि तेच दृष्य महाराजांच्या डोळ्यांसमोर एका विशिष्ट प्रकारच्या कल्पनेच्या भयतारीकतेने झळकत होत.खोलीतली स्मशांन शांतता त्या कल्पनेना अजुनच चेव चढवत होती, महाराजांना त्या शांततेने आपल्या कल्पना शक्तिला.विचित्रपणे साकारण्याचा वेळ मिळत होता, जो की नको मिळायला होता, ती विलक्षण शांतता मोडायला हवी होती , अन्यथा परिणाम जिवावर बेतणार होता.

की तोच तेवढ्यात दारावार कोणाची तरी थाप पडली, आणि एक पुरषार्थ आवाज आला.

" महाराज..!" त्या विलक्षण शांततेला त्या आवाजाने अक्षरक्ष मोडून काढल.महाराजांच्या डोळ्यांसमोर दिसणारे ते विचीत्र दृश्य मेंनबत्ती विझताच धुर हवेत विरल जाव तसे विरल गेल.महाराजांनी त्या आवाजासरशी खाडकन डोळे उघडले व समोर पाहिल.दरवाज्या बाहेर कोणितरी उभ होत.जे आत येण्याच्या परवानगी साठी बाहेर थांबल होत.महाराजांनी ते ओळखुण लागलीच आवाज दिला.

" या ! आत या!" महाराजांच्या आवाजासरशी एक पुरूष आत आला व खाली मान घालूनच म्हणाला.

" महाराज , महाराणीं नी!" तो सेवक पुढे काही बोलणार की तोच महाराजांनी आपला एक हात हवेत धरला, व म्हणाले.

" येतो आम्ही!या तुम्ही.!" महाराजांच्या बोलण्यावर तो सेवक " जी" म्हंणतच निघुन गेला.महाराजांना महाराणी ताराबाइंनी पुन्हा अन्न ग्रहण करण्यासाठी बोलावल होतं हे महाराजांनी बरोबर ओळखल.महाराज हळूच आपल्या पलंगावरुन उठले,उघड्या झापेच्या दरवाज्या जवळ आले.समोर असलेल्या टेबलावरचा मुकुट डोक्यावर चढवुन व हाती तलवार घेऊन दरवाजातुन बाहेर पडले.

=======================

राहाझगड गावाच्या वेशीपासुन ठिक तीस मिनीटांच्या अंतरावर जंगल होत आणि जंगलाच्या डाव्या बाजुलाच राहाझगडची नदी होती.जी की पावसाळ्यात राहाझगडचा रस्ता चिखळात रुपांतरीत होताच राहाझगड मध्ये घेऊन येण्याच एकमेव साधन होत. तसं म्हंणायला नदी जंगलातुनच वाहत होती ज्याने नदीच्या दोन्ही तर्फे हिरवीगार मोठ-मोठी झाडे होती.त्याकारणाने नदी नेहमी अंधारात बुडालेली असायची , ज्याने त्या नदीच पाणि रहाझगड गावक-यांच्या मध्ये काळ जल ह्या नावाने प्रसिद्ध होत. नदीच दुसर टोक ओलांडताच ठिक पंधरा मिनीटांवर जंगलात , झाडाझुडपांच्या बाजुलाच एक भलीमोट्ठी भगदाड

पडलेली गुहा दिसुन येत होती. गुहेच्या आत प्रवेश करण्यासाठी असलेला तो भलामोठ्ठा भगदाड रुपी दरवाजा काळ अंधारात बुडाला होता.आतल जरासही काहीही दिसुन येत नव्हत.त्या गुहेत प्रवेश करताच अंगाला गारठा झोंबत होता.आणि हळू-हळु पावल चालत जाताच तीस चाळीस पावलांवर मातीच्या भिंतींवर लटकवलेल्या मशालींच्या उजेडात खाली अंधा-या गुढमय तळघरात घेऊन जाणा-या दगडांपासुन बनलेल्या पाय-या दिसुन येत होत्या. त्या वीस-पंचवीस

दगडांच्या पाय-या चालुन झाल्यावर खाली एक दगडांपासुन साकारलेल भलमोठ्ठ तळघर दिसुन येत होत. त्या तळघरात चौही दिशेने दगडांच्या भिंतींवर , दगडाच्या खांबांवर खुप सा-या तांबड्या रंगाच्या मशाली जळत होत्या. परंतु त्या जळणा-या मशालींच्या उजेडात ही तो अंधार काजळी फासल्या सारखा जाडच होता.जणु तो अंधार नैसगिर्क नव्हताच.आणि त्या मशालींच्या उजेडात जे काही दृश्य दिसत होत.जसे की जाळ्यात सावजाच्या शिकारीसाठी टपुन बसलेले कोळी, विषारी साप , विँचु सर्वांच दर्शन घडत होत.तळघरात अशीकाही विलक्षण शांतता पसरलेली की त्या सापांचा फिसकारण्याचा आवाज चौहीदिशेंना गुंजत होता.मंद गतीने पांढरट धुक वाहत होत. जणु साक्षात शवागारच असावा.त्या चौकोनी दगडांपासुन बनलेल्या तळघरात ठिक मधोमध खाली धुक्याच्या वलयांत एक लाकडाची चौकोनी आकाराची कबर एका चौकोनी दगडावर ठेवलेली दिसुन येत होती.त्या लाकडाच्या कबरेवर एक विचित्र-चित्र रेखाटल होत. एका वटवाघळूच चित्र,परंतु त्या वटवाघळुच्या शरीराच रंग काळ नसुन लाल रक्तासारख लाल होत जणु रक्ताने अभिषेक घातला असावा.आणि त्या लाल रक्तपिपासु वटवाघळुच्या डोळ्यांतल्या दोन खोंबण्या निट लक्ष देऊन पाहताच पिवळ्याजर्द रंगाने चमकत होत्या.त्या अभद्र वटवाघळुचा जबडा असाकाही वासला होता, की त्याचे ते सुळ्यासारखे धार-धार दात बाहेर आल्या सारखे भासत होते. जर त्या कबरीवरच चित्रच इतक भयान , हदयाच ठोक चुकवणार आहे ! तर आत काय असेल?काय असेल आत? विचार करुणच अंगावर सर्रकन शहारा येतोय,!

========================

आकाशात पसरलेल्या काळ्या ढगांच्यात, दोन ढगांच घर्षन होऊन जात

धडाड-धम विशिष्ट प्रकारच्या आवाजाने एक कानठळ्या बसवणारी

लक्ख प्रकाशमय विज चमकली. त्या विजेच्या लख्ख प्रकाशाने काहीक्षण खाली पसरलेला अंधार दुर सारला गेला. आणि पुन्हा जस तो प्रकाश नाहिसा झाला, तसे पुन्हा कालोखाची चादर अंधाराने आपल्या अंगावर ओढून घेतली. रातकिड्यांची किरकिर वाजत होती. कालोख्या-अंधारात पिवळेजर्द प्रकाश फेकणारे काजवे टीम-टीमत पावसाची चाहूल लाऊन जात होते.छम-छम आवाज करत जंगलातल्या झाडांच्या मधुन वाट काढत ती घोडागाडी राहाझगडच्या दिशेने निघाली होती.घोडागाडी चालवणारा तो चालक आपल्या हातात असलेली छडी घोड्यांच्या अंगावर मारत होता.ज्याने ते दोन घोडे मोठ्याने खिंखाळत धुक्यातुन वाट काढत त्या अंधारातुन वेगाने पळत होते.त्या चालकाच्या

दोन्ही बाजुला असलेल्या कंदिलांचा तांबडा प्रकाश त्याच्या भेदरलेल्या चेह-यावर पडलेला, परंतु भेदरण्यासारख असं कारण होत तरी काय?

जंगलातल्या काळ्या निल्या पडलेल्या झाडांच्या आकृतीकडे तिरकस नजरेने पाहत , तो चालक वेगाने घोडागाडी पळवत होता.तसा तो छम,छम आवाजही वेगाने ऐकू येत होता.घोडागाडी मागे असलेल्या डब्या आत ते दोघे नवविवाहित इंग्रज जोडपे बसलेले.

तर या मित्रांनो ह्या इंग्रज घराण्याच्या नवविवाहीत जोडप्यांची ओळख करुन घेऊयात.ती ट्रिमिंग विंटेज क्लासिक ब्लॅक ड्रेस घातलेली तरुन सुंदर स्त्री म्हंणजेच रिना.आणि त्या स्त्रीच्या बाजुला असलेल्या तरुण पुरूषाच नाव म्हंणजेच जैक.जैक हा एका इंग्रज अधिका-याचा एकुलता एक मुलगा होता.जैकच रिनासमवेत प्रेमप्रकरण होत.

आणि रिना दिसायला अगदी स्वर्गातल्या अप्सरेलाही लाजवेल अशी होती.तिच सौंदर्य जणु हि-याच्या लकाकीपेक्षाही जास्त होत.

अक्षरक्ष स्वर्गातली अप्सराही फिकी पडेल.रिनाचे वडील ही इंग्रज सरकारच्या हाताखाली काम करत होते, ज्याने दोघांच लग्न अगदी थाटामाटात कसलंही आढेवेढे न घेता लावून दिल गेल होत.

जैक आणि रिनाच्या लग्नाच खास निमंत्रण राहाझगडचे राजे दारासिंह ह्यांना सुद्धा देण्यात आल होत.परंतु ते त्या लग्नात सहभागी होऊ श्कले नाही, ज्याकारणाने जैकचे वडील महाराजांवर थोडेसे रागावले होते.

म्हणुनच महाराजांनी आपल्या चुकीला सुधारण्याकरीता व मैत्री कायम टिकून राहावी ह्या खातीर जैक आणि त्याची पत्नी रिनाला महालात

जेवनाच आमंत्रण पाठवलेल.जे की रिना व जैकने खुशी-खुशी स्विकारल होत.आणि आता ह्याक्षणी ते दोघेही घोडागाडी मार्फत राहाझगडच्या दिशेने निघाले होते.जैक व रिनाच नव-नव लग्न झाल्याने मनात

प्रेमाच्या , वासनेला , उत्तेजित भावनेला ब्ंधन उरल नव्हत. प्रेमात खर पाहता वासना नसेल, शारीरीक सुख नसेल तर ते प्रेम कधी जास्त काळ टिकत नाही.दोन शरीरांच मिळन एकमेकांस होताच प्रेम बहरुन निघत , ते वाढत,वाढतच जात.जैक केव्हापासुन एकटक रिनाकडे चोरुन -चोरुन पाहत होता.रिनाने हे ओळखल होत.त्याच्या मनातली चलबिचल तीने ओळखली होती , आणि त्याच्या ह्या वेडेपणावर ती गालातच हसत होती. तिचे ते लाल लिपस्टिक लावलेले रसरशीत ओठ

गालात हसताना

जैकच्या ह्दयाच पाणी-पाणी होत-होत.

" जैक! तु माझ्याकडे असं चोरुन-चोरुन का पाहत आहेस?"

रिनाने इंग्रजीत हे वाक्य उच्चारल होत , परंतु आपण मराठीतच पाहुयात

चालेल ना? रिनाच्या ह्या वाक्यावर जैक जरा गोंधळुनच उच्चारला.

" मी! नाहीतर !.. बर ते सोड !" जैक ने लागलीच विषय बदलल व पुढे म्हणाला.

" रिना! आज तु खुप छान दिसतेयस!" जैकने रिनाची प्रेमाने प्रशंसा केली.स्त्रीयाना आपल्या आवडत्या जोडीदाराकडून आपली प्रशंसा ऐकुन घेण्यास खुप आवडत , ह्या पाच सहा वाक्याच्या प्रशंसेनेही प्रेमाची कडा मजबुत होते.तुम्ही ही तुमच्या जोडीदाराची अशीच प्रशंसा करा, आणी पाहा काय घडत ते.जैकच्या मुखातुन आपली प्रशंसा ऐकुन रिनाला खुप आनंद झाला. व ती लागलीच आपल्या सीटवरुन उठुन

जैकच्या सीटवर बसली.आणि त्याच्या प्रेमळ मिठीत शिरावली.त्याच्या खांद्यावर डोक ठेवल व पुढे म्हणाली.

" असंच प्रेम कायम करशील ना!" हा एक प्रश्ण नव्हता, प्रेमळ भावना होती जी रिनाने व्यक्त केली होती.जैकच्या खांद्यावरुन डोक काढून हेत तीने आता त्याच्या डोळ्यांत पाहिल.जणु प्रेम भावनेच्या उत्तराची अपेक्षा ती करत असावी.

" रिना! माझ प्रेम तुझ्यासाठी कधीच कमी होणार नाही! अक्षरक्ष मरणा नंतर नाही!" रिना एकटक जैकच्या डोळ्यांत पाहत होती.तसा जैक पुढे म्हणाला.

" रिना असं म्हंणतात! की मानवाला सात जन्म असतात.आणि जो जोडीदार आपल्या पुढील जोडीदारा वर खर प्रेम करतो, ज्या प्रेमात

संशयाला जागा नसते, प्रेमाची गाठ अतुट असते! त्या जोडप्यांना पुढील सात जन्म एकच जोडीदार मिळतो.आणि मला माझ्या सात जन्मात फक्त तुच हवीयेस." जैक म्हणाला. आणि त्याच हे वाक्य ज्यासशी पुर्ण झाल त्याचक्षणी रिनाचे रसरशीत ओठ जैकच्या ओठांवर टेकले. दोघांच्या ओठांचा स्पर्श एकमेकांनाहोताच , जैक-रिनाच शरीर कामुकतेने शहारल गेल.मनात उत्तेजित भावना प्रकट झाल्या. दोघांच्याही ओठांच रसपान करता-करता त्या दोघांच्याही नाकपुड्यांतुन निघणारे गरम श्वास वेगाने बाहेर पडु लागले.छातीची धड-धड दोघांनाही जाणवु लागली.डोळ्यांत प्रणयाची नशा ती चमक येऊ लागली.दोघांचेही ओठ-एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते, कामग्नी अक्षरक्ष धग-धगत्या लाव्ह्यासारखी पेटून उठली होती. दोघांचेही एकमेकांना

चिकटलेली शरीर गरम झाली होती.आणि त्या प्रणयाच्या आगीने त्या

घोड़ागाडीच्या काचांवर सफेद र्ंगाच्या वाफा दिसुन येत होत्या.

जैकने -रिनाच्या ओठांवरुन आपले ओठ विळग केले, नी.चमकणा-या डोळ्यांनी, फुललेल्या श्वासांनी एकटक तिच्या डोळ्यांत पाहू लागला.

त्याने आपले दोन्ही हात वाढवुन हळूच दोन्ही हातांनी तिच डोक पकडल व आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवुन (टॉप ऑफ़ द हैड किस) एक

चुंबन दिल.तसे रिनाने आपले दोन्ही डोळे काहीक्षण बंद केले. मग जैकने हळूच आपले ओठ कपाळावरुन काढून घेत,तेच ओठ पुन्हा ओठांवर टेकवले आणि रिनाच खालच ओठ आपल्या दातांनी हलकेच

ओढत( सिंगल लिप किस केल) मग पुन्हा जैकने ओठ विळग केले व गळ्यावजवळ आणले आणि हळूच ते ओठ तिच्या गळ्यावर टेकवले.(नेक किसने )रिनाच्या पुर्णत शरीरात कामाग्नी भडकुन निघाला.

तिने लागलीच जोरात एक कडकडीत मिठी जैकला मारली.

तिच्या बाहुपाशात त्याला ओढुन घेतल.तिच्या कामाग्नीने उत्तेजीतपणे पेटून निघालेल्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा सुंगंध जैकला येऊन जात डोक अक्षरक्ष बधीर करत होता. जैकने हलकेच रिनाच्या मिठीतुन स्वत:ला सोडवल , आणी तिच्या ट्रिमिंग विंटेज क्लासिक ब्लॅक ड्रेसची

काळ्या पट्टीवर दात ठेऊन खाली-खाली आणु लागला. रिनाने तर डोळेच मिटुन घेतले होत, ती फक्त तो रोम्यांटिक क्षण सुखाने अनुभवत होती.

======================

राहाझगडच्या काळ जळ नदीतुन एक गोल आकाराची बोट हळूवारपणे पुढे-पुढे येत होती. बोटमध्ये ठेवलेल्या तांबड्या रंगाच्या कंदीलाने त्या बोटमध्ये वयाने पंचेचाळीसच्या आसपास असलेला वयगु नामक पुरुष बसलेला दिसुन येत होता.वयगु म्हंणजेच राहाझगडचा एक कुंभार रहिवासी.तो रोज आपल्या बोटीने घरी बनवलेले मातीचे मडके दुस-या गावांत विकायला घेऊन जायचा.आजही तो असाच मडके विकायला घेऊन गेला होता, आणी आज सर्व मडके विकले गेले होते, आणी सर्व मडके विकले गेल्याने पैसे जास्त मिळालेले.परंतु त्याकारणाने वेळ खुपच झाल होता. वयगु आपल्या हाताने एका जाड-जुड

मध्यम विशिष्ट प्रकारच्या आकाराने बनलेल्या लाकडाने बोटला दिशा दाखवत पुढे-पुढे नेत होता.वर आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी अफाट थैमान घातल होत.जणु ते ढग फाटतील आणि जोरदार पाऊस सुरु होईल.आणि तसंच झाल.एक टिपुकसा थेंब वर आकाशातुन वेगाने खाली आला.आणि थेट वयगुच्या चेह-यावर बसला.वयगुने तो थेंब

हातावाटे पुसून हलकेच वर पाहिल.नी.तेवढ्यात रप-रप करत पाण्याचा मारा सुरु झाला. टप-टप आवाज करत पाण्यात रॉकेटच्या मिसाईल सारखे पाण्याचे थेंब नदीत पडू लागले.ज्याकारणाने त्या गोल बोटीत

पाणि शिरुन ती बुडण्याची व जवळ असलेले पैसेही पाण्यात बुडून जाण्याची भीती वयगुला वाटु लागली.आजुबाजूला नजर फिरवत तो कुठे-काही आडोश्याची जागा दिसते का ते पाहु लागला.आणि त्याच्या शोधक नजरेस दुर झाडाझुडपांमधुन एक पेटलेली मशाल दिसली.

त्या मशालीला पाहुनच रामुने बोट तिकडे वळवली.वर आकाशातुन वेगाने मिसाईल सारखे पाण्यात थेंब आदळत होते.जोराच्या लख्ख प्रकाश फेकणा-या विजा चमकत होत्या.वयगु बोटमधुन खाली उतरला व बोट हातावाटे ओढुन एका झाडाजवळ ठेवली.आणि त्या मशालीचा उजेड ज्या दिशेला दिसला होता त्या दिशेने निघाला.पाच-सहा मिनीट चालुन शेवटी वयगु तिथे पोहचला.तसे त्याला आपल्या नजरेसमोर एक भगदाड पडलेली गुहा दिसली. गुहेत मशाल जळत आहे ह्याचा अर्थ आत कोणी हिंसक प्राणीतर् मुळीच राहत नसेल.वयगुच्या मनात विचार आला.आणि मागचा पुढचा विचारही न करता तो थेट त्या गुहेत शिरला.

आणि त्याचक्षणी आकाशातुन एक गुलाबी रंगाची विज वाकडे-तिकडे आकार घेत थेट त्या गुहेपासुन चाळीस मीटर अंतरावर कोसळली.कड-कड आवाज करत लख्ख प्रकाशझोत दिसला जात एक झाड क्षणार्धात जमीनदोस्त झाल.आणि अचानक घडलेल्या ह्या घटनेने वयगुच तोल जाऊन तो खाली पडला, खाली पडताच त्याच कपाळ एका दगडावर आपटल , नी क्षणार्धात कपाळातुन एक छोठीशी रक्ताची चिळकांडी उडाली. ज्या रक्ताचा वास हवेमार्फत त्या पाय-यांवरुन , मग मशालींच्या उजेडातुन थेट त्या कबरीजवळ पोहचला, तसे त्या कबरीआतुन नाकपुड्यांवाटे एक मोठा श्वास घेतल्या सारखा आवाज बाहेर आला.!

" हा,स्स्स्स्स्स!स्स्स्स्स्स अहाहा...!"

 

क्रमश: