Rakt Pishachchh - 8 books and stories free download online pdf in Marathi

रक्त पिशाच्छ - भाग 8

रक्त पिशाच्छ ऽ॥ 18+ भाग 8

 

फक्त 18+ प्रौंढांकरीता..

शृंगारीक , थरारक, हिंसक.

लेखक:जयेश झोमटे (जेय)

ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहे

 

भाग 8.

 

सूर्य अस्ताला जाताच , ह्या पृथ्वीतळावर गुढ अंधाराच साम्राज्य पसरल.

माझ अंधाराला गुढ म्हणायच मुख्य हेतु हेच आहे ! कारण ह्या अंधारातल्या काळ्या गर्तेत फक्त काळोख दिसुन येत असल.तरीही ह्या अंधारात त्या शिवायही काहीतरी असतं.ज्याप्रकारे प्रकाशात एक मानवाची मिती असुन त्याच अस्तित्त्व जाणवत ,त्याचप्रकारे ह्या अंधारात सुद्धा एक अकल्पित,अक्ल्प्निय जगाचा प्रवास सुरु होतो.

ज्याचा मार्ग म्हंणजेच मृत्यु. त्या जगात प्रवेश करण्यासाठी असलेला एकमेव द्वार.माणुस मरतो त्याची अंतयात्रा काढतात त्याला स्मशानात नेऊन जालतात.चार खांबावर लाकड मांडुन प्रेत त्यावर ठेऊन जालतात.मग पुढे काय ? आगीत ते प्रेत जलत , त्याच नाश होत.

मग पुढे काय ? मेलेल्या मृत माणसाचा आत्मा तेरा दिवस त्या घरात भटकत राहतो,मग ठीक तेराव्या दिवसा नंतर त्याला गती मिळते.त्या मृतकाच्या आत्म्या समोर तो द्वार उघडतो आणि तो द्वार म्हंणजेच

त्या दुस-या मितीत घेऊन जाणार द्वार असतो. ह्या कालोख्या जगात

मानवाचे असंख्य करोडो अमानविय वाईट शत्रु राहत असतात ज्यांना नाही रुप- स्वरुप व भावना, प्रेम, दया,माया असते. हे सर्व अमानविय शत्रु त्या द्वारापाशी चौवीस तास उभे असतात, कारण ते द्वार उघडताच त्यांना बाहेर पडायच असत. ह्या मानवासारख ऐशो आरामात जगायच असतं , मौज मज्जा , वासना,शमवायची असते, कारण त्या आत्म्यांना त्या जगात काही नियमांमुळे ह्या सर्व हौस पुर्ण करता येत नाहीत.

राहाझडचा सूर्य मावळताच गावावर अंधाराची काळी भेसुर छाया पसरलेली.राहाझगड गावात म्हणायला दोनशे तीनशेची लोकवस्ती होती.त्याकाळी लोक जेवन-खावन करुन सातच्या आत झोपी सुद्धा जायची.तसंही गावात घडणा-या विचित्र घटनांमुळे लोकांच्या मनात अशी काही भीती पसरलेली की सातच्या नंतर कोणि मणुष्याने जरी दार ठोठावल तरी ते उघडत नसत. वर आकाशात चमकणा-या चंद्राच्या खाली पडणा-या उजेडात ,गावातल्या घरांपासुन ठिक पाचशे-सहाशे मीटर अंतरावर एक मोकळ्या जागेत -एक मातीच कौलारु छप्पर असलेल घर दिसत होत. जेमतेम दहाफुट मोठ घर.त्या घराच्या आजुबाजुला कोणतही घर नव्हत, हा तस म्हणाला घरापासुन मागे शंभर पावल चालत गेलो तर राहाझडच जंगल लागायच, आणी रात्रीच्या अंधारात त्या जंगलातली झाड काळी निळी पडली होती. त्या घराला असलेल्या दोन झापांच्या दरवाज्यातुन कंदिलाचा तांबडा प्रकाश बाहेर येत होता.आणी त्या प्रकाशासरशी त्या घरातुन काही कुजबुजण्याचे , बोलण्याचे म्हणा, आवाज येत होते.

" युवराज ! असे किती दिवस आपण चोरुन-चोरुनच भेटायचं? " त्या घरात एक कंदिल जळत होता.कंदिलाच्या तांबड्या प्रकाशात त्या घरात दोन आकृत्या अंथरुणात पहुडलेल्या दिसुन येत होत्या.जणु आताच प्रणय सुख झाल असाव.

" थोडेच दिवस बस्स मग मी लवकरच माझ्या आईसाहेबांसमवेत , आपल्या लग्नाच विषय काढणार आहे." युवराज सुरजसिंह यांचा आवाज.त्या घरात एक कंदील जळत होता.त्या कंदीलाच्या प्रकाशात एक स्त्री अंथरुणात युवराजांच्या छातीवर डोक ठेऊन झोपली होती, तिच्या अंगावर फक्त एक सफेद रंगाची चादर होती बस्स. कपाळाच्या मधोमध टिकला लावतात तेथे एक गोळ हिरव गोंदवण होत.चेहरा गौरवर्ण आणि गुलाबी ओठांवर दोन लहानसे तीळ आहेत डोळ्यांत काजळ घातलेल आहे. मित्रांनो ह्या सुंदर किशोरीच नाव आहे मेघावती.ती राहाझगड गावातल्या स्मशानात प्रेत गाडणा-या आंबो नामक इसमाची एकुलती एक मुलगी आहे. तीच आणि राहाझडचे युवराज दोघांच आठराव्या वयापासुनच एकमेकांवर खुप प्रेम आहे. दोघांच्याही प्रेमाला एकुण सात वर्ष पुर्ण झाली आहेत आणि जस-जस वय वाढ़त गेल, तसे दोघांच्याही प्रेमाच नातही आधिकच घट्ट होत गेल. प्रेम झाल म्हंणजे वासना शारीरीक सुख तर येणारच नाही का? अशातच ते दोघे खुपच पुढे निघुन गेले होते, इतके की मेघावती एकमहिन्याची गरोदर होती.आणि हे फक्त त्या दोघांच ठावुक होत.युवराजांच वंश मेघाच्या पोटात वाढत होत. पन इकडे मेघाला आपल लग्न नक्की युवराजांसोबत होईल का ह्याची काळजीरुपी कित्येक प्रश्ण मनाला लागून राहिलेली.का तर आपले वडील काय काम करतात, गावातली मेलेल्या मांणसांची प्रेत गाडतात. आणि अश्या मांणसाची मुलगी भले माझ्या सारख्या महाराज-महाराणी सुन म्हणुन तरी घेतील का ? तसंही लग्ना अगोदरच आपन गरोदर आहोत हे कळल्यावर त्यांना आमच्याविषयी काय वाटेल? समाज काय म्हंणेल ,? आणि ह्या सर्वांत ते दोघे आमच्या लग्नाला परवानगी तरी देतील का? डोक्यात कित्येक तरी प्रश्ण येत होते मनावर उदासीनतेची मलभ पसरवत होते.

" मेघा...!...मेघा !" युवराज सुरजसिंह मेघाला आवाज देत म्हणाले.परंतु त्या विचारांच्या गर्तेत ती इतकी हरवलेली, की युवराज तिला आवाज देत आहेत हे सुद्धा कळंत नव्हत.शेवटी युवराजांनी तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवून हलवल तेव्हा कुठे जाऊन त्या विचार चक्रांना काच फुटावी तसे तड्या गेल्या , आणी ती भानावर आली.

" आं काय!" मेघावती न समजुन म्हणाली. परंतु सात वर्षाच्या प्रेमात भले युवराजांना तिच स्वभाव माहीत नसेल अस कसं होईल.सांगा ना? जेव्हा आपण आपल्या आवडणा-या समोरच्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम करतो, तेव्हा त्या प्रेमासहित नकळत समोरच्या माणसाचे गुण आपल्याला समजू लागतात -परंतु त्यासाठी लागत ते खर प्रेम.युवराजांनी मेघाकडे पाहता तिच्या डोळ्यांत चेह-यावर काळजी-ऊदासीनतेची छटा दिसली.

" काय झाल मेघा कसल विचार करतीयेस?" युवराज मेघाच्या खांद्यावर हात ठेवलेल्या अवस्थेत तिला विचारु लागले.त्यांच्या ह्या वाक्यावर तिची मान हळुच खाली झुकली, नी नकळत डोळ्यांतुन अश्रु निघाले.युवराजांनी हळुच हात वाढवुन तिच डोक पकडून वर केल.तिच्या डोळ्यांतले अश्रु त्यांच्या नजरेतुन सुटले नाहीत.

" मेघा!" युवराजांनी तिचा हात आपल्या हाती घेतला काहीवेळ तिच्या पाणावळेल्या डोळ्यांत पाहिल व पुढे बोलु लागले.

" अंग वेडे आज सात वर्ष झाली आपल्या प्रेमाला, आणी त्या सात वर्षात मी तुला ओळखणार नाही? तुझ्या स्वभावाला जाणु शकणार नाही? सांग ना?" युवराज आपल्या प्रश्णांच्या उत्तरांची अपेक्षा ठेवुन

मेघाकडे एकटक पाहत होते परंतु ती एकटक खाली मान घालून अश्रु गाळत होती.

" मेघा मला माहीतीये की तुझ्या मनात कसली चिंता चालु आहे. परंतु तु काळजी करु नकोस!" युवराजांनी पुन्हा मेघाची मान वर केली तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाले.

" एकवेळ बाबासाहेबांच आपल्या लग्नाबदल काय विचार असेल ते मला ठावुक नाही.परंतु आईसाहेब आणि माझी लाडकी बहिण रुपवती, ह्या दोघींचा मात्र आपल्या लग्नासाठी न्क्कीच होकार असेल."

युवराजांच्या ह्या वाक्यावर मेघाच निराशेने खाली गेलेला चेहरा प्रसन्नतेने फुलून वर आला.

" खरच!" मेघावती आनंदाने म्हणाल्या.तिच्या ह्या वाक्यावर युवराजांनी सुद्धा हसतच होकारार्थी मान डोळावली.तसे मेघाने लागलीच युवराजांना मीठी मारली.व काहीवेळाने त्या प्रेमळ मीठीच रुपांतर पुन्हा प्रणयात सुरु झाल.

□□□□□□□□□□□

राझगड महालात महाराजांची खोली.

" कायऽऽऽऽऽ?" म:ताराबाई मोठ्याने म्हणाल्या.त्यांच्या चेह-यावर

भयपद्य भाव पसरलेले जणु कानांनी काहीतरी अभद्र भयानक माहीती ऐकली असावी. ज्याच्या परिणामाने त्या हादरल्या असाव्यात आणि मोठ्याने मुखातुन आवाज बाहेर पडला असावा.

" म..म..म्हंणजे, आपल्या कडे येणा-या जोडप्यावर हल्ला झाला! आ..आ..आणि तो हल्ला एका वाईट शक्तिने केला.!"

म:ताराबाई महाराज दारासिंह यांच्या चेह-याकडे पाहत म्हणाल्या. त्यांच्या ह्या वाक्यावर महाराजांनी गंभीर मुद्रेने मुखातुन एक वाक्य ही न काढता फक्त होकारार्थी मान हळवली.

" अरे देवा ! म्हंणजे ही पाश्वी , क्लिष्ट , अभद्र शक्ति आपल्या वेशीवर भटकत आहे तीच तर नाही ना?"

" होय महाराणी आम्हाला त्या अरण्यकांन मधल्या एका योग पुरुषानेच हे सत्य सांगितलं की हे त्याच सैतानाच काम आहे.

महाराज हळुच पलंगावरुन उठले, व पाचसहा पावल चालुन खिडकीजवळ आले , खिडकीच्या चौकटीवर दोन्ही हात ठेवुन त्यांनी एक कटाक्ष खिडकीबाहेर टाकला. चंद्राच्या निळ्या प्रकाशात राहाझगड गावच्या रहिवाशांची मातीपासुन बनलेली घर चंद्राच्या निळसर प्रकाशात काजळी फासल्यासारखी दिसत होती.प्रत्येक घराबाहेर एक मशाल पेटलेली जणु शेकडोने चित्ता जळत असाव्यात.

" मग महाराज त्या वाईट शक्तिला कस रोखल जाईल ह्याबदल तुम्ही त्या योग पुरुषाना काही विचारलंत का?" म:ताराबाई महाराजांच्या पाठमो-या आकृतीकडे पाहत म्हणाल्या.

" महाराणी! महाराजांनी खिडकीशेजारीच उभ राहून गिरकी घेतली व पुढे म्हणले." आपल्या प्रजेच्या रक्षणाकरीता मी त्यांना विचारल !"

" मग काय म्हणाले ते योग पुरुष? आपली मदत करणार आहेत का?"

म:ताराबाई उत्सुक होत म्हणाल्या.परंतु पुढच्याक्षणाला त्यांच्या चेह-यावर पसरलेली उत्सुकता गळून खाली पडली, कारण महाराजांनी

नकारार्थी मान जी हलवली.

" का..! परंतु अस का म्हणाले ते?"

म:ताराबाई जरा आश्चर्यचकित होत म्हंणाल्या.

" महाराणी त्या योग पुरुषांच अस म्हंणन आहे ! की ही वाईट शक्ति दुस-याच कोण्या प्रांतातुन इथे आली किंवा आणली गेली आहे.

ती वाईट शक्ति, तो सैतान बलाढ्य असुरी शक्तिचा ठेवा असल्यासारखा ताकदवर आहे.आणि त्या सैतानाची प्रजात काय आहे ? त्या सैतानाला कस रोखता येईल ? हे समजत नसल्या ते योग पुरुष आपल्याला मदत करणार नाहीत.!"

" परंतु महाराज! आपण तर सामान्य मणुष्य आहोत.भले आपल्याला त्या वाईट शक्तिची प्रजात कशी ओळखता येईन." म:ताराबाई जरा बुचकळ्यात पडल्या सारख्या म्हणाल्या.

" नाही महाराणी त्याची आवश्यकता नाही.ह्या पृथ्वीतळावर ह्या अशा अभद्र , पाश्वी शक्तिंशी लढा देण्याकरीता भगवंताने काही एकच योग पुरष जन्माला घातला नाही. कारण माझ्या ओळखीचे एक समर्थ आहेत ,ज्यांच रुप साक्षात महादेवाच रुप म्हणुन ओळखल जात.ज्यांच्याकडे ह्या सृष्टीवरच्या अखंड देवांच्या शक्तिचा त्रिकाल भंडार आहे, पंचमहाभुतांच्या शक्तिचा ठेवा ही कमी पडेल अशी शक्ति आहे.ज्यांना आपल्या शक्तिचा गर्व नाही " महाराजांचा एक नी एक वाक्या म:ताराबाईंच्या निराशजनक चेह-यावर एक प्रसन्नतेची उभारी उमटवु लागलेला त्या श्बदांनी खोलीतले कंदील तांबड्या रंगाने अफाटमय प्रकाशफेकत उजळू लागलेले. खोलीतला अंधार फटकारु लागलेले.

" काय, नाव आहे त्या गुरुजींच!" म:ताराबाई प्रफुल्लित चेह-याने म्हणाल्या.

"समर्थ भट्टाचार्य !" महाराज जोशाने एका आत्मविदारक विश्वासाने म्हणाले.

□□□□□□□□□□□□□□

एक वळवळना-या पांढरट अळ्यांची बरणी भुरी चेटकीणीने आपल्या राखाडी धार-धार नख असलेल्या हातात घेतलेली.नी एक लहान मुलगा चौकलेट पाहुन जस हवरटसारखा पाहावा तसे ती त्या बरणीकडे पाहत बसलेली, की तोच पुढच्याक्षणाला झाकण उघडून तीने हात बुडवुन एकदाच दहा -बारा अळ्या मुठीत घेतल्या आणि अशाकाही तोंडात कोंबळ्या की किडलेल्या दातांतुन सुद्धा मचाव-मचाव खाताना त्या समोरच्याला दिसाव्यात.

" ए भुरे ! झाल का तुझ ?" ड्रेक्युला द्रोहकाल तिच्या तोंडाकडे न पाहताच म्हणाला. जणु त्या सैतानालाही तिची किळस आली असावी की काय.

" हो-हो झालं-झालं !" भुरी चेटकीण म्हणाली.आणि तिच्या ह्या वाक्यासरशी, तीने समोर असलेल्या चौकोनी टेबलावर ठेवलेल्या गोल स्फटीकाला स्पर्श केला.हाताचा स्पर्श होताच तो स्फटीक पांढ-या शुभ्र रंगाने चमकुन उठाला , त्या गोल स्फटिकातुन पांढरा प्रकाश बाहेर येऊ लागला त्या प्रकाशाने त्या दोघांचही तोंड चमकुन उठल.

" यें स्फ्ंट्यांऊ.., सांग....मले....सांग.. ! मेनकाला कस जिवंत करता येऊल!" भुरीचे वाढलेल्या नखांचे हात त्या स्फटिकापासून थोड लांब राहत विशिष्ट पद्धतीने फिरत होते.तिचा तो किन्नरी आवाज त्या खोलीत घुमत जरा घोगरा खोल खर्जात रुपांतरीत झाल्यासारखा वाटत होता.

" रक्त रक्त रक्त..! प्रणय स्त्री तृप्ती रक्त, आहुती देहम! " रक्त रक्त रक्त..! प्रणय स्त्री तृप्ती रक्त, आहुती देहम! " त्या स्फटिका आतुन पुन्हा-पुन्हा एकच आवाज निघुन वातावरणात गुंजत होता. भुरीने आपला राखाडी रंगाचा त्यावर धार-धार नख असलेला हात पुढे वाढवला, समोर एक छोठीशी गोल वाटी होती, त्या वाटीत जाड झालेल लाल भडक रक्त दिसुन येत त्या भुरीने ती वाटी आपल्या हातात घेतली.आणी ती वाटी हळुच आपल्या टोकदार नाका जवळ घेऊन जात एक जोरदार नाकपुड्या फुगवुन त्या वाटीतल्या लाल रक्ताचा वास घेत जिभल्या चाटल्या. पुढच्याक्षणाला तीने ती वाटी त्या स्फटिकावर रिकामी केली.

रक्ताचा स्पर्श त्या स्फटिकाला होताच पुढे जे काही घडल ते विलक्षण होत.काहीवेळा अगोदर ज्या स्फटिकाच्या काचेतुन पांढरट प्रकाश बाहेर

येत होता. त्याच काचेवर ज्यासरशी ते रिनाच रक्त पडल त्यासरशी त्या पांढरट काचेला त्या रक्ताने मिठी मारायला सुरुवात केली.त्या संपुर्ण गोल स्फटिकावर रक्त पसरु लागल काहीसेकंदातच तो पांढरट

प्रकाशफेकणारा स्फटीक लाल रक्तात परावर्तित झाला. जणु त्यावर रक्ताची काजळी पसरली असावी. आताह्याक्षणी त्या दोघांचाही चेहरा पांढरट प्रकाशा ऐवजी लाल रंगाने उजळून निघालेला.

" हे चेटकीणे तु मला ह्या रक्ताच्या नैवेद्याची आहुती देऊन आज पुन्हा तृप्त केलस..मी तुझ्या ह्या नैवेद्यावर अपार प्रसन्न झालो आहे..बोल-बोल काय हवंत तुला.! भविष्य जाणुन घ्यायचंय? की ह्या अखंड ब्रम्हांडातली न उलगडलेली रहस्य! की त्रिकाळ शक्तिचा ठेवा असलेल्या महाशक्तिशाली विद्या " भुरी स्फटिकाच्या गुंजणार-या आवाजात मशगूळ झालेली.ह्या स्फटिकात न जाणे कित्येक रहस्यांच्या गुढाचे रहस्य दडलेले ,वेगवेगळ्या विद्यांची माहीती ह्या स्फटीकात ठोसून-ठोसून भरली होती, ज्या विद्या अवगतुन ही भुरी ह्या जगातली सर्वश्रेष्ठ जादूटोणा करणारी चेटकीण बनु शकत होती.परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो:-> प्रत्येक गोष्टीची काही सीमारेखा(लिमिट) असते.ती त्या सीमारेखेच्या(लिमिटच्या) आतमध्ये राहिल इतकीच वापरावी अन्यथा

जास्त वापर केल्याने वाईट परिणाम होतातच.भुरीला ठावुक होत, ह्या स्फटिका आत एक अखंड शक्तिंचा ठेवा असलेला असुर लपला आहे.जो दरवेळेस आपल्या सुटकेसाठी समोरच्याला अशे खूप सारे आमिष दाखवतो. तुम्ही जसे जसे ती विद्या ते शक्ती त्याच्या सांगण्यानुसार मिळवत जाता तसे तो स्व्त:च्या तुमच्या नकळत आपली सुटका करुन घेण्याच ठरवितो.परंतु भुरी काही कच्चा मसुदा नव्हती, ती एक पक्क्ड अशी हुशार चेटकीण होती, ती अशीच त्याच्या भुलथापांना बळी पडनार नव्हती.

" ए स्फंट्यांऊ! तु मले येडा समजु राहिलू काय बे, हिहि हिहि,फिफिफीफ, मी तुझे हे भुलथापांना बळी परुची न्हाईं,हिहिहिही! "

भुरी आपल्या विचित्र म्हाता-या किन्नरी आवाजात हसत म्हणाली.तो सैतान ड्रेक्युला एकटक त्या स्फटिकात पाहत होता, त्याच्या विलक्षण अमानविय लाल डोळ्यांत त्या असुराची चमकनारी पांढरट आकृती

दिसुन येत होती.ड्रेक्युला ला जर हव असत तर त्याने आताह्याक्षणीच त्या असुराला खेचून बाहेर काढल असतं, ड्रेक्युला ला हे ठावुक होत-की हा आपल्या काही कामाच नाही -आणि तसंही हा विश्वास घातकी असुर आहे.

" चल, सांग मले ! एका पिशाच्च राजाचे प्त्नीच मृत्यु झालं! तर तिले जिवित कसं करायचं?" भुरी म्हाता-या किन्नरी आवाजात म्हणाली.तसे तिच्या ह्या वाक्यावर त्या स्फटिकातुन एक आवाज आला.

" ए मूर्ख चेटकीणे, तुला अक्कल कशी नाही ग! तुझ्या पाठिमागे ती पुस्तक सोडुन हा प्रश्न मला विचारते आहे.जा आणि त्या पुस्तकांच्या कपाटात एक अ-मृत्यु नामक पुस्तक आहे त्यात शोध."

" ए! स्फंट्यांऊ , मूर्ख कोणाला बोलु राहीला बे तु, थांब तुले दाखवते

हरामखोर!" कुबडी भुरी स्फटिकाच्या बोलण्यावर भयंकर तापली ,नी वाकत-वाकत स्फटिकाला धडा शिकवायला त्याच्या दिशाने निघाली की तोच एक पाय अडकून तीचा तोल गेला आणि खाडकन ती त्याकाचेच्या स्फटिकावर आदळली.काच म्हणायला जाड-जुड होती म्हणुन फुटली नाही परंतु भुरीच्या डोक्यावर मात्र मोठा टेंकुल उमटला.जमिनीवर खाली पडलेली भुरी कशी बशी तो टेंकुल चोळत विव्हळतच जागेवर उभी राहीली व बोलू लागली.

" ए, हरामखीर ! मा×××त ! तुले सोलनांर नाय मी ! "

भुरी एका लहान मुलासारखी किन्नरी आवाजात कपाळावर उमटलेला टेंकुल चोलत म्हणाली. पुन्हा रागातच त्याच्याकडे पाहत त्याला माराला निघाली की तोच एक गर्जना युक्त आवाज आला.

" ए असुर :! तुझ काम झाल निघ आता न्हाई तर तुझ वंश कायमच माझ्या शरीरात सामावुन जाईल.!" सैतान ड्रेक्युला गरजला, रागाने त्याच्य जबड्यातले खालुन आणी वरुण अशे एकूण मिळुन चार सुळ्यासारखे दात बाहेर आले , डोळ्यांतळ्या दोन खोंबण्या लाव्ह्यासारख्या चमकुन उठल्या.द्रोहकालने हळुच आपला एक राखाडी त्वचेच्या रंगाचा धार-धार काळी निळी असलेला हात पुढे केला-त्यासरशी त्या हातातुन एक लाल रंगाची रेष बाहेर निघाली आणि थेट त्या स्फटिकावर आदळली.क्षणार्धात एक मोठा कानठळ्या बसवणारा आवाज त्या अंधा-या खोलीत घुमला, त्या स्फटिकातुन तीव्रवेगाने विव्हळण्याच्या, दया-याचनेची भिकमागण्याचे स्वर बाहेर पडू लागले, त्या आवाजांनी पुर्णत वातावरण दणाणुन निघाल. आणि त्या स्फटिकावर चढलेली ती लाल काजळी त्या निळ्या प्रकाशाने खेचून घेतली. पुन्हा एकदा तो स्फटिक पुर्ववत पांढरा झाला.

" ए भुरे चल काढ तो पुस्तक! माझ्याकडे जास्त वेळ शिल्लक नाहीये!"

ड्रेक्युलाने अस म्हंणतच आपला हात मागे घेतला,तसे त्या हातातुन निघणारी लाल प्रकाशमय रेष सुद्धा नाहीसी झाली.लंगड-लंगडत भुरी त्या कपाटाजवळ गेली.चौकोनी आकाराचा लाकडापासुन बनवलेला चारफुटी कपाट होता,त्यात खुपसारी पुस्तक होती.मानवाच्या तर्कापल्याडाने भरलेल्यारहस्यमय माहीतीची पुस्तक.भुरीने लागलीच पुस्तक शोधायला सुरुवात केली.जाड-जुड चौकलेटी रंगाने माखलेली जुनी पुरानी पुस्तक दिसुन येत होती.एक-एक करत भुरी पुस्तक हाताने नाव वाचत पुढे-पुढे ढकलत जात होती की तोच काहीवेळाने खालच्या कप्प्यात तो पुस्तक सापडला.

" सापडला !" भुरीने आपल्या दोन्ही हातांनी तो चौकलेटी रंगाचा पुस्तक छातीशी घट्ट पकडुन टेबलाजवळ आणला आणि हळुच टेबलावर ठेवला.पुस्तक जाड असल्याने टेबलावर ठेवताना टेबलाचा थोडासा आवाज झाला.जणु तुटणार की काय! परंतु तुटल नाही. पुस्तक टेबलावर ठेवताच त्याच रुप दिसल.काळ्या रंगाची जाड-जुड कव्हर होती, आणी त्या कव्हरवर मोठ्या अक्षरांनी लाल रंगात नाव लिहिल होत

अ-मृत्यु-आणी नावाखाली एक आगीने जळणारी कवटी होती.

पुस्तक सापडल हे पाहुन ड्र्रेक्युलाच्या चेह-यावर असुरी हास्य पसरल.

भुरीने हात वाढवुन त्या पुस्तकाचा प्रथम पान उघडला, पहिल्याच पानावर एक सैतानाच चित्र होत. घुबडाच डोक, दोन मोठे लाल भडक भेदक डोळे, जणु पाहणा-याला संमोहीत करतील- डोक्यावर दोन धार-धार शिंग, मुखातून बाहेर आलेले चार धार धार सुळ्यासारखे दात ज्यांवर काल रक्त लागल होत.त्या सैतानाच्या आकृतीच डोक एका अपशकुनी घुबडासारख असल तरी सुद्धा शरीर मात्र मानवाच होता परंतु ते ही जरा विचित्रच , त्या शरीरावरची स्तनाग्रे स्त्रीसारखी होती.दोन्ही हात अशा प्रकारे जोडले होते की जणु त्याचा त्रिकोण तैयार झालेला.त्या सैतानाच्या दोन पायांवर खुपसारे केस उगवलेले एका अस्वला सारखे समजा. तर हे झाल त्या सैतानाच्या आकृतीच वर्णन

□□□□□□□□□□□□

" मग महाराज आपल्याला लवकरात -लवकरत्यांची भेट घ्यायला हवी."

म:ताराबाई म्हणाल्या.

"नाही महाराणी , भेट घडन शक्य नाही कारण समर्थ भट्टाचार्य हे भगवान शिवाचे खुपच मोठे भक्त प्रल्हाद आहेत.म्हणुच ते कोण्या वस्तीगृहात किंवा आश्रमात राहत नाहीत."

" काय? मग कोठे राहतात ते!" म:ताराबाई जरा नवलाने उच्चारल्या.

त्यांच्या ह्या वाक्यावर महाराजांनी हसत उत्तर दिल.

" हिमालयात! त्रिकाल गुहेत.!"

 

क्रमश:..