Rakt Pishachchh - 11 books and stories free download online pdf in Marathi

रक्त पिशाच्छ - भाग 11

भाग 11 =

होळीची जत्रा दिवस 1

शिमगा स्पेशल....शिमग्याची सोंग.������..

आज होळी निमीत्त राहाजगड गावात भरलेल्या जत्रेला उधान आल होतं. भर उन्हात दुपारच्यावेळेस सुद्धा जिकडे-पाहाव तिकडे दुकान आणि त्या दुकानांसमोर ऊभी राहिलेली माणस-बायका दिसुन येत शेकडोने गर्दी जमा झालेली.हवशे, गवशे, नवशे ,सुद्धा जमले गेलेले.मित्रांनो ही तीन नाव म्हंणजे साधी नाव नाहीत तर त्या मागे काही अर्थ सुद्धा आहे -जो की माझ्या शाळेत असताना आमच्या मराठीच्या सरांनी सांगितला होता.तोच पुढील प्रमाणे- प्रथम हवशे म्हंणजे जत्रेत हौस म्हणुन येणारा, स्व्त:ची हौस पूरी करणारा.दुसरा गवशे म्हंणजेच जत्रेत नेहमी काहीना-काही सतत गवसत असणारा, काहीना काही शोधत असणारा. आणि शेवटचा म्हंणजे नवशे नवस केलेला, ज्याच नवस असेल तो.तर ही झाली त्या नावांची थोडक्यात माहीती. आता आपण पुढे पाहुयात.राहाझगडच्या जत्रेतल्या दुकानांची रेलचेल संपली की पुढे पंधरा मिनीटांच्या अंतरावर गावातल एकमेव श्रीकृष्णाच देऊळ लागायचं. देऊळा ची बांधणी पाषाणाची असुन जुन्या काळातली होती. गावातल्यांच्या म्हंणण्यानुसार ते मंदिर साक्षात श्रीकृष्णाने स्व्त: आपल्या चमत्कारीक शक्तिने साकारलेल. त्या मंदिरात त्याची दोन फुट काळ्या पाषाणाची मूर्ती होती.ती मूर्ती साक्षात श्रीकृष्णाच खर अवतार होत अस गावातले जुने जाणकार म्हंणायचे. त्यांच्या बोलण्यात तथ्ये ही होत कारण देऊळाच एक भाग नी..भागकाळ्या पाषाणा पासुन बनलेला आणि देऊळ जरी काळ्या पाषाणापासुन बनल असल तरी दिवसा आणि रात्री चांदीसारख, दैवीने शक्तिने चकाकत असायचं.तो काळा पाषाण रात्री चांदीसारखा चकाकत असायचा ज्याने देऊळात रात्री अंधार होत नसायचा. जणु अंधाराला त्या जागेत प्रवेश अटळ होत. तर मित्रांनो ! असं ऐकण्या पेक्षा का नाही की आपण त्या मंदिरालाच भेट देऊयात? कस वाटेल? ठिक आहे ना? चला तर!

□□□□□□□□□□□□□□□□□□

राझगड हवेलीतुन एक चार चाकी घोडागाडी वेगाने बाहेर पडली. तबडक, तबडक विशिष्ट प्रकारच्या पावलांच्या आवाजाने पांढरे शुभ्र घोडे धावत होते आणि त्यांच्या जमिनीवर वेगाने पडणा-या प्रत्येक पावलांसरशी ती तांबडी माती वर हवेत उडु लागलेली.घोडागाडीच्या पुढे एक चालक बसलेला आणि मागे युवराज्ञी रुपवती, म.रा:ताराबाई बसल्या होत्या.जेमतेम पंधरा मिनीटे घोडागाडी धाऊन एका जागेवर थांबली.म्हंणजेच चालकाने थांबवली , त्याच लक्ष एकटक पुढेच होत जणु त्याच नेहमीचंच काम असाव, कारण गाडी थांबताच मागुन महाराणी आणि रुपवती उतरल्या. आजुबाजुचा परिसर तसं म्हणायला रेगिस्तानच, रन-रनत्या उन्हात ती माती सोन्यासारखी चमकुन उठलेली आणि एक देऊल व दहा -बारा झाडांशिवाय,तिथे काहीही नव्हत, जी झाड होती ती सुद्धा बिना पानांची सुकलेली चेटकीणीच्या धार-धार पंज्यांसारखी भासत होती.महाराणी आणि युवराज्ञी दोघींपासुन जेमतेम पंधरा पावलांवर एक काळ्या रंगाच पाषाणापासुन बनवलेल मंदिर दिसुन येत होत.

" चला आईसाहेब! श्री च दर्शन करुन घेऊयात !"

यु.ज्ञी:रुपवतींनी एकवेळ महाराणी मग पुढे देऊळाकडे पाहिल

व म्हणाल्या.त्यांच्या ह्या वाक्यावर महाराणींनी फक्त हसुनच होकारार्थी मान हळवली व आपली पाऊले पुढे वाढवली.मित्रांनो यु.ज्ञी: रुपवतींबदल एक गोष्ट सांगायच मी विसरलोच! की यु.ज्ञी: रुपवती श्रीकृष्णाच्या परम भक्त होत्या. लहानपणापासुनच त्यांना श्रीच वेड होत. इतक की आठवडाभरात त्यांच्या चार- पाच फे-या ह्या देऊळात कायमच्या ठरलेल्या असायच्या.आणि आजही ठरलेल्या प्रमाणे त्या दर्शना साठी इथे आल्या होत्या. दोघीही सरळचालत देऊळापाशी पोहचल्या.देऊळात जाण्यासाठी पाषाणापासुन बनलेल्याच काळ्या पाय-या होत्या.पुढे खाली काळी जमिन होती.आणी वर पाषाणाच छप्पर, आणी त्यांना खाली आधार म्हणुन पाषाणापासुन बनलेले गोल-काळे खांब.देऊळाच्या पाय-या चढुन यू:ज्ञी: रुपवती आणि महाराणी आत आल्या. समोर दोन काळ्या पाषाणापासुन बनलेल्या सात फुट ऊंचीच्या भिंती होत्या, त्या दोन भिंतीमधुन दोन माणस जातील येवढी जागा होती. आणि पुढे जाणारा रस्ता लहानसा अंधारा बोगदाच समजा.कारण आत अंधार होता काहीही दिसत नव्हत. त्या दोघींनीही तिकडे पाहतच आप-आपली पाऊले त्या अंधा-या मार्गाच्या दिशेने वाढवली. आणि ज्यासरशी त्या अंधा-या जागेत यु.ज्ञी रुपवतीच्या दोन्ही पावलांचा स्पर्श झाला, त्याचक्षणी पुढे जे काही घडल ते मानवी कल्पनेपल्याड -विलक्षण होतं.

यु.ज्ञी: रुपवतींच पाऊल त्या अंधा-या जागेत पडताच , त्या दोन्ही पाषाणाच्या भिंती मंद चंदेरी प्रकाशाने चमकल्या गेल्या झप-झप करत दिवे पेटावे तसे ती चाळीस पावलांची पाषाणाच्या भिंतीची वाट मंद गतीच्या चंदेरी प्रकाशाने चमकुन उठली. आणी पुढे चाळीस पावलांवर त्या दोघींनाही श्रीकृष्णाची सहा फुट पाषाणापासुन बनलेली ऊभी मूर्ती दिसली.जणु साक्षात श्रीकृष्णच तिथे उभा होता - आपुल्या लाडक्या भक्तांची भेट घ्यायला , त्यांच्या दुखांच निरुसरण करायला.

ती लख-लखती माळा रुपी पाषाणाची भिंत पार करुन दोघी मायलेकी श्रीकृष्णाच्या मूर्तीजवळ पोहचल्या. बासुरी वाजवणा-या अवस्थेत असलेल्या त्या मूर्तीला पाहुन. दोघींनीही मनोभावे हात जोडले. मूर्तीच्या पायांजवळ एक पाषाणाने बनलेला काळ्या रंगाचा गोल दिवा दिसुन येत होता.राहाझगड गावातली माणस अशी म्हंणायची की हा दिवा तेळाने पेटत नसुन, पाण्याने पेटायचा.का तर कोण्या गरीब मांणसाच्या घरातल तेलही संपु नये हे श्रीकृष्णाला वाटायचं आणि हेच त्या मागच कारण होत. त्या दिव्यात एक कापसाची वात त्यात पाणि टाकलेल होतं, आणी काय चमत्कार घडत होत त्या पाण्यातच ती वात प्रखर तेजाने जळत होती.पाया पडुन झाल्यावर दोघीही माघारी वळल्या,मागे वळताच त्या दोघींच्याही नजरेस एक म्हातारा माणुस दिसला. रंगाने काला , शरीरयष्टीने सडपातळ-त्याच्या अंगावर एक फुल बाह्यांचा मळलेला पांढरट सदरा, आणी खाली एक मळलेल धोतर होत.डोक्यावर जरी टक्कल असली तरी महिन्याभराची पांढरट दाढी चेह-यावर उगवली होती. त्याच्या ह्या अशा अवतारावरुन तो न्क्कीच कोणी भिकारी असावा असं दिसुन येत होत.

भिंतीचा आधार घेत तो पुढे-पुढे येत होता, जणु शरीराने अशक्त असावा काही खाल्लपिल्ल नसाव, ज्याने अंगात त्राण उरले नव्हते तसंही वय झाल्याने पाठ थोडी वाकली होती.

म.रा: ताराबाई आणि यु.ज्ञी:रुपवती एकटक त्याच्या कडेच पाहत होत्या. आजच्या कलियुगात देवाच्या मंदिरात भिका-याला प्रवेश नाही.का तर त्याच्या अंगावरचे कपडे , शरीर, त्वचा घाण असते.अहो पण मला सांगा देव कधी भेदभाव करतो का ? "की अरे बाबा तुझे कपडे चांगले नाहीत, तु अंघोळ करुन आला नाहीयेस माझ्या जवळ येऊ नकोस."देव असं भेदभाव करतो का? नाही ना ? मग?.सामान्य नागरीक ट्रेनने दोन दिवसाचा थकावटीचा प्रवास करुन कोण्या लांबच्या देवाच्या दर्शना गेला तरी त्याला पाच सेक्ंद सुद्धा तिथे थांबुन देत

नाहीत , चला -चला पुढे चला अस म्हंणतात. अहो पाया तरी पडू द्या की बिचा-यांना किती लांबून आले आहेत ते! नाही का? परंतु आपल कोण ऐकणार आपण ठरलो सामान्य माणुस! आजच्या काळात देवळात

देवासमोर तीस-तीस चाळीस मिनीट फक्त एकच महापुरुष उभा राहू शकतो, आणी तो म्हंणजे वी-आई-पी नाही का? आताच्या जगात पैसा झालाय मोठा, माणुस झालाय छोठा. आज पैसे आहेत तर काय नाही करु शकत. भिंतीचा आधार घेत एक -एक पाउल कष्टाने उचलत शेवटी तो माणुस देवाच्या मूर्तीजवळ पोहचलाच होता की अचानक त्याचा तोळ गेला, पुढच्याक्षणाला जमिनीवर त्याच कपाळमोक्ष होणार की तेवढ्यात यु.ज्ञी: रुपवतीने प्रसंगसावधानता बाळगून त्यांचे दोन्ही खांदे पकडले , त्यांना आधार देत उभ केल.

" धन्यवाद पोरे! देव तुझ भल करल! " आपले थर-थरले काले मळलेले हात तो म्हातारा माणुस यु.ज्ञी:रुपवतींच्या दिशेने जोडणार होता, की तोच यु.ज्ञी:रुपवतीने त्यांचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले.ते घाणेरडे हात आहेत, एका भिका-याचे हात आहेत, हे सर्व न पाहता तिने ते हात धरले कारण मनात सदगुणाचा ठेवा होता, चांगले विचार , सुबुद्धी होती.

नाहीतर कोणी बडा नेता आज गरीबाचे हात-हातात घेतल्यावर दहावेळा धुवत असेल, हे जरी दिसत नसलं तरी कटू आहे-एक अक्ल्प्निय कटु सत्य आहे.

" शी...शी.. हात सोड माझ! म्या भिकारी हाय पोरी! म्या गरीब हाई.."

एक खोल गेलेला अशक्त आवाज त्या म्हाता-याच्या तोंडून निघाला.व तो रुपवतीच्या हातुन आपले हात सोडवायचा प्रयत्न करु लागला.

" नाही बाबा ! अस का बोलत आहांत बर तुम्ही अहो ह्या पृथ्वीतलावर कोणिही मणुष्य कधीच गरीब नाही, प्रत्येकजण श्रीमंत आहे!.." रुपवतीने त्या म्हाता-याचे हात सोडण्या ऐवजी घट्ट पकडले व काहीक्षण त्याच्या डोळ्यांत पाहत थांबत..पुढे बोलु लागली.

" बाबा, प्रत्येकजण आप-आपल्या मनातल्या भावने नुसार श्रीमंत असतो.कारण मनाची श्रीमंत हीच खरी श्रीमंती असते.पैसा , दागिना , चांगले, कपडे, हे फक्त एक दिखावा आहे.जे कितपर्यंत टिकेल सांगता येत नाही, परंतु मनाची श्रीमंत ही अपरंपार असते! तीला अंत नसुन ती शेवटपर्यंत टिकते जिवंतपणीही आणि मृत्युनंतरही-परंतु धन, संपत्ती, ही काही मर्यादित काळावधीसाठीच असते कारण ती फक्त जिवंतपणीच टिकते." यु.ज्ञी: रुपवती म्हणाल्या. त्यांचे हे मोलाचे विचार ऐकुन त्या मा

म्हाता-याचे डोळे भरुन आले-आपला थरथरता एक हात उंचावून त्याने हळुच युवराज्ञींच्या डोक्यावर ठेवला व म्हणाला.

" वा..पोरी तुझ इचार लेय चांगले आहेत बघ! काय नाव हाई तुझ. "

" बाबा माझ नाव रुपवती! " रुपवतीने अस म्हंणतच मागे वळुन पाहिल , मागे म.रा: ताराबाई उभ्या होत्या, त्यांच्याकडे हात करुण त्या पुढे म्हणाल्या." आणि ह्या आमच्या आईसाहेब ताराबाई!" रुपवतीच्या ह्या वाक्यावर काहीक्षण तो म्हातारा माणुस खाली पाहत राहिला जणु काहीतरी विचार करत असावा -आणि थोड्यावेळाने त्याने वर पाहिल व तो पुढे म्हणाला.

" म्हंजी तुम्ही राजघराण्यातल्या तर नाई! " त्या म्हाता-या माणसाने आपल्या मनातली शंका मांडली, जी की तंतोतंत खरी होती.आणी त्याच्या ह्या वाक्यावर त्या दोन्ही मायलेकींनी एकमेकींच्या चेह-याकडे पाहिल, व मंद स्मित करत हसल्या..

" हो बाबा !" रुपवती म्हणाली.राजघराण्यातली आपली स्व्त:ची ओळख सांगताना तिच्या उच्चारलेल्या स्वरात गर्विष्टपणा नव्हता.शब्दांची पकड निसटून न देता ती बोलत होती.

" युवराज्ञी...युवराज्ञी..! युवराज्ञी.. " दोन तीन स्त्रीया ज्यावेळेस एकाच व्यक्तीला उत्सुकतेने आवाज देतील तसा आवाज आला. आवाज ऐकुन रुपवती आणि महाराणी दोघींनीही समोर पाहिल.चार-पाच रुपवतीच्या वयाएवढ्या मुली देऊळात आल्या होत्या. त्या मुली नक्कीच रुपवतीच्या मैत्रिन असाव्यात.

" युवराज्ञी रुपवती ! आम्ही केव्हापासुन शोधतोय तुम्हाला अहो जत्रेत येताय ना! " तिथे जमलेल्या त्या चार पाच मुलींमधलीच एक मुलगी म्हणाली. तिच्या अंगावर एक गुलाबी रंगाची आणि त्यावर फुलांची डिझाइन असलेली साडी होती.चेहरा गौरवर्ण -नाक थोडस धार धार - डोळे टपोरे होते.आणि ओठांवर लाल लिपस्टिक लावलेली- गळ्यात एक-दोन सोन्याचे दागीने होते. आणि काळ्या केसांची वेणी बनवुन मागे सोडली होती. मित्रांनो ही मुलगी म्हंणजेच राहाजगड मधल्या रामभाऊ नामक सावकाराची एकुलती एक मुलगी शलाका होती. सावकाराच्या परिवारात तो धरुन एकुण चार सदस्य होते.खुद सावकार, बायको ढमाबाई मुलगी शलाका आणि मुलगा लंकेश. ह्या सर्व पात्रांची ओळख , स्वभाव आपण पुढे पाहुन घेऊ. शलाका ही सावकाराची लेक असुन श्रीमंत घरातील होती, आणी बाकीच्या उर्वरित मुली गरीब घरातल्या होत्या-म्हणुनच की काय त्या थोड्या गप्पच होत्या, शलाकाच काय ते बोलत होती आणि त्या सर्व हस-या चेह-यांनी युवराज्ञीकडे पाहत होत्या.

" जत्रेला येणार नाही असं कधी होईल का!"शलाकाच्या वाक्यावर युवराज्ञी हस-या चेह-याने म्हणाल्या.व आपल्या आईसाहेबांकडे पाहिल.

" चला आईसाहेब निघुयात!" रुपवती अस म्हंणतच आपल्या आईसाहेब व मैत्रिणींसहीत निघुन गेल्या..रुपवती आईसाहेब धरुन सर्वजणी देऊळातल्या दरवाज्यातुन निघुन जाताच इकडे इतकावेळ तो पाठीत वाकलेला म्हातारा चक्क एका तरुण माणसा सारखा सरळ होऊन उभा राहिला. आणि काहिवेळा अगोदर त्याच्या चेह-यावर पसरलेले ते अशक्ततपणाचे भाव आता कुठच्या कुठे पळून गेले, आणी त्या चेह-यावर एक विशिष्ट प्रकारच तेज पसरल, ओठांवर एक मंद स्मित हास्य आल.

"पुन्हा भेट होईलच! " काहीवेळा अगोदर ज्या म्हाता-याच्या मुखातून निघालेला आवाज अशक्त, खोल गेलेला ऐकु आला होता.तोच आवाज आता ह्याक्षणी दमदार, आणी धारधारतेने नढलेला विलक्षण होता-जो की त्या देऊळातल्या भिंतीवर आद्ळून गुंजत होता.

नक्की हा म्हातारा होता तरी कोण? मनुष्य? की देव?पाहुयात.....पुढे!

□□□□□□□□□□□□□□□□□□

आज दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीसुद्धा राहाजगड मध्ये होळी पेटवली जाणार होती.राहाजगडची होळी ही महाराज दारासिंह यांच्या राझगड महालापासुन ठिक शंभर मीटर अंतरावर ऊभी केली जायची. दरवर्षी राहाजगड गावची होळी ही रात्री बारा वाजता महाराजांच्या हातांनी पेटवली जायची, ह्या वर्षी गावात घडणा-या विचित्र घटनांना पाहता सर्वकाही बदलल गेलेल,जस की जत्रेच्या नियमांसहीत सगळच्या सगळ बदलल होत. परंतु पुरातन आणि काही नैसर्गिक नियमांमुळे होळी मात्र रात्री बारालाच पेटणार होती. आज सकाळीच गावक-यांनी राझगड महालापासुन शंभर मीटर अंतरावर ज्या जागेत होळी रचली जाणारी होती-ती जगा सकाळीच केर काढुन चांगली स्वच्छ करुन घेतलेली.आणि काही मांणस होळी रचण्यासाठी गोव-या -वाळलेल्या झाडाच्या फांद्या, सर्व काही जमा करण्यात व्यस्त झालेले ह्याच कामात गावातली काही तरुण वयातली मुल सुद्धा सामील होती- ऋषीकेश उर्फ रुश्या- भुषण उर्फ भुश्या, चिंतामणी उर्फ चिंत्या, आणी नागराज उर्फ नाग्या.चौघांचीही मैत्री अगदी जिवाभावाची, वेळ आली तर जिव देन्यासारखीही आण घेण्यासारखीही. चौघांचही वय वीस होत.चौघांचेही बाप राहाजगडच्या सैन्यात असल्याने पैसा घरात थोडासा खेळता होता- त्यातच चौघेही प्रत्येकाच्या घरात एकुलते एक- काय करीष्मा म्हणायचा. की ज्याने पैसे मागीतले की हातावर पडणार म्हंजे पडणारच. त्याकाळी शाळा नसल्याने पोर दिवसभर गाव चपाटायची एन कमी वयातच नशा करायची, आणी तेच गुण ह्या चौघांच्याही अंगी जोपासले गेलेले.आपली पोर बाहेर राहून नशा करतात- हे त्यांच्या आईवडीलांना ठावुक सुद्धा नव्हत. हे असंच होत असतं-! काही पालकांना आपली मुल बाहेर राहुन काय उद्योगधंदे करतात तेच माहीती नसत, आणी जेव्हा माहीत होत ते दुष्कृत्य कळत तेव्हा वेळ फार पुढे निघुन गेलेली असते. रुश्या, भुश्या, चिंत्या,नाग्या सर्वजण एका कच्चा रस्त्यांवरुन पुढे पुढे चालले होते.त्या चौघांच्याही डाव्या-उजव्याबाजुला सुर्याच्या प्रकाशाने ऊजळून निघालेली खालची तांबडी माती व मागे राहाजगडची घर दिसत होती.ह्यचा अर्थ ते गावाबाहेर चालले होते.

" च्यायला! फाटी गावली पाहिजे लेकांनो ?" चिंतामणी उर्फ चिंत्या शरीरयष्टीने पोकळ बांबू सारखा पोकळ , जास्त हवा सुटल्याने उडून जाण्यासारखा, कोणी रागात एक बुक्की हाणली तर लागलीच राम राम होईल की काय अस वाटणारा परंतु बोलताना नेहमी आघाडीवर राहणारा , असा हा चिंत्या आपल्या मित्रांकडे पाहत म्हणाला.

" हो ना ! फाटी भेटाला पाहिजे लेकांनो , पैश्यांची बात हाय.!"

भुषण उर्फ भुश्या, शरीरयष्टीने अगदी पिलदार-जणु पैलवानच असावा

, आणी का नाही असणार त्याचे वडिल सैन्यात असल्याने , काजु, बदाम, दुध पिऊन -रोजच पैलवाना सारखी कसरत करायचे - कसरत करता वेळेस त्याचे वडील भुषणला सुद्धा आपल्या बरोबर घेत असत.

त्यांच म्हंणन अस होत. की भुषण ने सुद्धा आपल्या प्रमाणे राहजगड सैन्यात सामिल व्हाव-परंतु भुषण आपल्या पित्याची इच्छा पुर्ण करणार होता का? हे देवालाच ठावुक! चिंत्याच्या वाक्याला दुजोरा देत भुश्या म्हणाला.मित्रांनो भुषणच्या वाक्यात पैशांचा उल्लेख करण्यामागे एक कारण होत.राहाजगड मध्ये होळीपेटवण्यासाठी ही चारजण जी फाटी घेऊन जायची, त्या फाट्यांचे ह्य चौघांनाही पैसे मिळायचे.आणि त्या पैस्यांमधुन हे चौघे -जंगलात एका अज्ञात स्थळी दारु, गांजा घेऊन जात पुर्णत रात्रभर नशेत बुडून जायचे-मग नशा उतरली की सकाळी घरी परत यायचे.ह्यांचा हाच दिनक्रम गेल्या तीन वर्षापासुन सुरु होता.आणि त्यांच्या घरातल्यांना ह्याची कल्पना सुद्धा नव्हती.

" ए भावांनो! " नागराज उर्फ नाग्या जरा पटकन मोठ्याने म्हणाला.

नाग्या एका पायाने अपंग होता म्हंणजेच एक पाय छोठा-आणि दुसरा मोठा अस समजुयात आपण. नाग्याचा आवाज लहानपणापासुन घोगरा आणि गुंजणारा भारदस्त होता जो की आता ह्याक्षणी नेहमीप्रमाने सर्वांना ऐकु गेला होता.आवाजासरशी सर्वजन आपआपल्या जागेवर थांबले ,सर्वांनी एक कटाक्ष नाग्यावर टाकला.

तो डाव्याबाजुला पाहत होता.सर्वांनी त्या दिशेला पाहिल, त्यासरशी सर्वांच्या डोळ्यांसमोर एक चौकोनी काळ्या रंगाचा पत्र्याचा फ़ळा दिसला आणि त्या फळ्यावर मोठ्या अक्षरांत चुन्याने एक नाव लिहिल होत-राहाजगड मसान. राहाजगडच्या मसनाला चौहीबाजुंनी नऊ फुटांच कंपाउंड घातलेल आणि मधोमध असलेल्या दोन झापांच्या गेटसमोर तो फ़ळा होता.

" अय नाग्या , काय बघतुस तिकड आतमंधी तुझ्या बाने काय सोना लपून ठेवलेय का त..?" ऋषीकेश उर्फ रुश्या - शरीरयष्टीने एका पातल झाडासारखा मोठा-आणि हाडकुला....त्याची आई अशी म्हणायची की कितीही खाल्ल तरी मांस काही शरीराला लागत नव्हत ! परंतु ऊंची मात्र वाढतच चालली होती.आणि ते खरही होत.

"अबे ए उंचकुट्या सोनाच लपून ठेवलेंन आत!" नाग्या रुश्याच्या वाक्यावर रागावुनच म्हणाला.

" काय..?" नाग्याच्या वाक्यावर न समजुन रुश्या म्हणाला.बाकी सर्वजन फक्त पाहायची भुमिका करत होते, कोणिही मध्ये बोलत नव्हत.

"हे बघा भावांनो" नाग्याने एकवेळ सर्वांकडे पाहील व गंभीर आवाजात पुढे म्हणाला." ले टेम झालाय , आता आपण जंगलात गेलो! तर फाटी आनिस्तोपर्यंत संध्याकाळ व्हिल, आण संध्याकाळी आपल्या राहाजगडच्या जंगलात काय बी इचीत्र भटकत म्हंण!"

" हा मंग काय?" भुषण पटकन म्हणाला. नाग्याने त्याच्याकडे पाहिल व एक डोळा मारत म्हणाला.

" ह्या मसनात शेकडोन लाकड हाईत!" नाग्याने एक कटाक्ष घोळका करुन उभ्या राहिलेल्या आपल्या सर्व मित्रांवर टाकला सर्व जन डोळे मोठे करुन कान टवकारुन त्याच्याकडे पाहत होते - तसा तोपुढे म्हणाला.

" जर का आपण, ह्या मसनातली लाकड घेऊन गेलो तर! "

" अर ए काय पन काय बोलतुस लेका ! काय येडा झालाय का,

मसनातली लाकड आण ते बी देवाधर्माच्या कामास्नी -आर पाप लागल पाप!" पैलवान भुश्या आपली बाजु मांडत म्हणाला.एकाअर्थी त्याचा नकारच होता, आणी त्याच्या बोलण्यातही तथ्य नव्हत का? देवाधर्माच्या कामासाठी शुभ गोष्टी लागतात त्या अशुभतेने भले चांगल्या देवांची पुजा कशी होईल नाही का? अशुभतेने फक्त एकाच दैवताची पुजा केली जाते आणि तो म्हंणजे सैतान.

" खर हाई भुश्या आपन होळीला ही लाकड न्हाई घेऊ शकत! "

रुश्याने सुद्धा आपल्या मित्राची बाजू घेतली.

" व्हई ना नाग्या होळीआईसाठी ही लाकड न्हाई घेऊ शकत आपण. आण तसबी जास्त येळ झाली न्हाई , लगीच जाऊन येऊ की जंगलातुन." चिंत्या सुद्धा म्हणाला.आता ह्या तिघांच नाही म्हंणन आहे तर आपल्या एकट्याच काय चालणार भल..म्हणुनच त्याला ही बळजबरीने त्यांच्या बरोबर जावच लागल. स्मशानाच्या गेटजवळुन चौघेही पुढे निघुन गेले. की तेवढ्यावेळेतच स्मशाना आतल दृश्य दिसल. स्मशानात मंद प्रवाहाने पांढरट धुक वाहत होत.(ते धुक होत की धुर माहीती नाही. )त्या धुक्यात एक अंधूकशी आकृती दिसत होती.आणी मित्रांनो ती आकृती होती आंबोची. तो आपल्या हातात कुदल घेऊन -ती वर हवेत उचलुन पुन्हा वेगाने खाली आणत जमिनितुन

माती बाहेर काढत होता आणि त्या निर्मनुष्य जागेत त्या कुदळच जमिनिवर घाव बसताच एका विशिष्ट प्रकारचा खच-खच आवाज बाहेर पडून पुर्णत मसनात भेसुरपणे घुमत होता.राहाजगडच्या लोकांच्या म्हंणन्या नुसार ज्या-ज्यावेळेस आंबो मसनात खड्डा खणायचे त्या -त्यावेळेस गावात एक माणुस वारला जायचा..! पन त्या खड्डयात आज कोण गाडला जाणार होता?..

□□□□□□□□□□□□□□

घड्याळातला मिनिट काटा वेगाने पुढे सरकत होता. आकाशातले पांढरे

ढग पुढे-पुढे वाहत दुर निघुन चालले. सूर्यदेव ही आपल्या परतीच्या वाटेला लागले होते वर आकाशातुन खाली-खाली येत हिरव्यागार डोंगरामाथ्याखाली येऊन थांबले होते-जणु शेवटच्या काहीक्षणासाठी एक नजर ह्या भुतळावर टाकुन पाहत होते.की आपण गेल्यावर ह्या बिचा-या मणुष्यांच काय होईल? दुपार उलटून गेली होती आणि संध्याकाळ व्हायला आली होती.तसे राहाजडच्या जत्रेत झुंडा-झुंडांनी सैनिक घुसत होते -कारण काहीवेळातच संध्याकाळ होणार होती आणि नियमांनुसार जत्रेतली दुकान बंद करायची होती.

" आईला , आर कीती ही गर्दी म्हणायची." एक सैनिक आपल्या बाकीच्या जोडीदारांकडे तोंडाचा आवासुनच पाहत म्हणाला. राहाजगडच्या जत्रेत शेकडोने गर्दी जमा झाली होती. बायका -त्यांची लहान पोर, मुल मुली जिकडे पाहाव तिकडे मांणसच मांणस.प्रत्येक दुकानासमोर दहा..दहा वीस.. वीस जणांची गर्दी जमली होती.बायकांचा दुकानदाराला पैसे कमी करण्यासाठी ओरडण्याचा आवाज तर कुठे आपल्या आईच्या पदराला खेळण घेऊन दिल नाही म्हणून शेंबुड पुसत गळा फाडून रडणा-या मुलांचा आवाज घुमत होता..तर कुठे गोल-गोल भिंगणा-या पाळण्यात बसणारी मुल हसत होती.

" आर ए बाबांनो काय बघु राहिलेत..तुम्ही करा सुरुवात !" कोंडू बाबा म्हणाला. कोंडू बाबा म्हंणजे राहाजगडच्या सैन्यातले एक जुनाट झालेले सैनिक.त्यांच वय जेमतेन साठ-सत्तरच्या आसपास होत, परंतु पाहणा-याला ते पंन्नाशीचे वाटायचे. राहाजगडच्या सैन्यात ते सर्वात जुने असल्याने सर्व सैनिकांच्या मनात त्यांच्या विषयी आदर होता-महाराजांनी तर त्यांच वय पाहता त्यांना सैन्यातुन निवृत्त होण्यासाठी सुद्धा सांगितल होत, परंतु महाराजांनी सांगुन सुद्धा त्यांनी निवृत्ती स्विकारली नव्हती.त्यांच म्हंणन अस होत " की निवृत्ती नंतरघरी बसुन आरामात खायच प्यायच , झोपायच आणि आरामात मरण्यापेक्षा

एकवेळ युद्धात मेलेल मी पत्कारेन." त्यांचा हाच जोश पाहून महाराजांना पुढे काय बोलाव हे कळायचंच नाही.परंतु त्यांच वय पाहुन महाराजांनी त्यांना एक पदवी दिली होती.की तुम्ही राहाजगडच्या सैन्याला दिशा द्या, नव्या सैनिकांना लढाईचे धडे द्या-त्यांना तलवार चालवन, भालफेकन शिकवा.आणी हीच पदवी त्यांनी खुशी-खुशी स्विकारली होती.

" आर पर कोंडू बा ! अजुन तर सूर्य बी अस्ताला गेलु नाय हा, आण नियमांच्यात तर संध्याकाळ व्हऊन गेल्यावर जत्रा बंद कराया सांगितली हाई?" दिन्या म्हणाला!....दिन्या हा नवीनच सैन्यात भरती झाला होता मित्रांनो कधी कधी त्याच्या तोंडून असे वाक्य बाहेर पडायचे की पुढच्या मांणसाला हा ठार वेडा वाटायचा आणि त्याच एक नमुनाच पाहुयात.

" दिन्या..लेका! मला ना कधी कधी असा प्रस्न पडतु! की तु माझ्या मित्राचाच पोर हाईस का? " कोंडू बा म्हणाले आणि बाकीचे सैनिक खो खो करत हसु लागले. दिन्याचे वडिल सुद्धा एकेकाळी राहाजगडच्या सैन्यात होते..कोंडूबा आणि दिन्याच्या वडिलांचा दोघांचही स्वभाव -गुण एकंदरीत मिळता जुळता होता.परंतु दिन्याच्या वडिलांच्यातले गुण मात्र त्याच्यात उतरले नव्हते म्हणुनच कोंडूबा असे म्हणालेले.

" अव काय कोंडू बा! अस कशापाई बोलताव तुम्ही, जे वाचल ते सांगितल की मी!" दिन्या जरा तोंड पाडुन म्हणाला.त्याच्या ह्या वाक्यावर कोंडूबा ने हळुच त्याच्या खांद्यावर हात ठेवल व म्हणाले.

" अर लेका.. असं तोंड कशापाई पाडतुस..! अर पस्त्तीस वर्षापासन सैन्यात हाई मी , अर अशा कित्येक जत्रा पाहिल्या आहेत मी !"

" म्हंजी काय म्हणायचय तुम्हाला?" दिन्या न समजुन म्हणाला. बाकीचे सैनिक सुद्धा एकटक कोंडूबा कडेच पाहत बसलेले , जणु त्यांनाही समजल नसाव.

" सांगतु-सांगतु ऐक." कोंडूबा काहीक्षण थांबले, हातात तंबाखु, चुना मिश्रित करुन चोलली, आणी हाताच्या दोन बोटांनी पकडून ती तोंडात टाकली व पुढे म्हणाले.

" अर -तु म्हंतुस की नियमात संध्याकाळ झाल्याव जत्रा बंद करायची हाई अस लिहीलंय बराबर!" दिन्यासहीत सर्वांनी होकारार्थी मान हलवली-कोंडूबा पुढे सांगु लागले.

" आता त्यो सूर्य बघ-डोंगरावर अर्धाच दिसतुया ह्याचा अर्थ काहीयेळातच संध्याकाळ व्हिल." कोंडूबाच्या वाक्यावर सर्वांनी दुर त्या डोंगरमाथ्यावर पाहिल सुर्याचा भडक भगवा वरचा अर्धासा भाग दिसत होता.

"हाई का नाही-" सर्वांनी हो हो करत मान डोलावली कोंडूबा पुढे बोलु लागले.

" आता तुम्ही तिकड बघा-ती बाई त्या दुकानदारास्नी पैशी कमी कर म्हणुन मगाचपासन गळा फ़ाडून वरडतीया-आण तीचा पोर खेळन घेऊन दिल न्हाई म्हणून शेंबूड काढून लडतया-आता पुढ काय व्हिल माहीतीये." कोंडूबा म्हणाले सर्वांनी पुन्हा काय म्हणून मान हळवली.

" आता त्यो दुकानदार पैक कमी करल -" सेम हुबे हुब तसंच झाल दुकानदाराने पैसे कमी केले कोंडूबा पुढे बोलू लागले.

" आता ती बाई -हातात पैशे घेऊन मोजल , आण हातात पैशे जास्त असतील तर तिच्या पोर कड बगल, आण त्याच्या शेंबुड फुटलेल्या थोबडा कड बगुन-त्यास्नी खेळन घेऊन द्यायला जाईल आण तिथ जाऊन बी अर्धा -अर्धातास भांडत बसल." कोंडूबा म्हणाले आणि सर्वच्या सर्व जसेच्या तस घडू लागल प्रत्येकाच तोंड आश्चर्याचा धक्का बसुन मोठ झाल.

" आण आता लास्ट सांगतुया ऐका-" कोंडूबा उच्चारला आणि सर्वांनी आप-आपले कान टवकारले" जर का तुम्ही आताच्या आता ही जत्रा बंद कराया घेतली न्हाई तर ही हवशी-गवशी-नवशी मांणस तुमचा घेऊन जिव घेऊन सोडतील , तुम्हा सगळ्यांसनी रात्रभर बी ही जत्रा बंद करता येणार न्हाई! आण महाराज तुम्हा सगळ्यांना कामावरण काढून टाकतील "

" ए न्हाई, न्हाई..न्हाई...." सर्व सैनिकांच्या तोंडावाटे एकच आवाज निघाला. तसा कोंडूबा गालात हसला व म्हणाला.

" मंग घ्या की जत्रा बंद कराला-? ए गज्या वाजीव तो तूतारा , आण घुसा समदी आत, आण जरा कोण बाईमाणुस सोडून ऐकत नसल तर ड़ायरेक्ट मुसकाटात हाणा..! जावा.....????" कोंडूबाच्या मुखातुन शेवटच वाक्य बाहेर पडल आणि सर्जिकल स्ट्राईक करावी तसे भाले घेऊन तुकड्या तुकड्यांनी सैनिक जत्रेत घुसू लागले-बाजुलाच गज्या तुतारी वाजवू लागला जिचा आवाज पुर्णत राहाजगड मध्ये घुमला.

प्रथम तर सैनिक प्रेमाने समजावत होते कोणी ऐकत होतं तर कोणी नग हुज्जत घालत होत-मग शेवटी सैनिक त्याला हाणत सरळ करत होते.

शेवटी त्यांच्याच जिवाचा आटापिटा तर चालु होता.नाही का?

□□□□□□□□□□□□□□□□

राझगड महालात आपल्या खिडकीत उभ राहून महाराज, राहाजगडच्या जत्रेतल्या मांणसाकडे पाहत होते. नजर जरी त्या जत्रेतल्या मांणसाकडे असली तरी मनात विचार मात्र स्वामी भट्टाचार्य कधी येतील हाच चालु होता.

□□□□□□□□□□□□□□□□

राहाजगडच्या जंगलातल्या कालजल नदीतुन एक होडी पुढे पुढे येत होती. त्या होडीत एकुण तीन जण बसली होती. त्यांच्या अंगावर असलेल्या विशिष्ट प्रकारच्या झाडांपासुन घातलेल्या वस्त्रांवरुन ते नक्कीच आदिवासी आहेत अस वाटत होत.

"रघु बाबा अस तातडीन राहाजगडला जायच कारण हाई काय? समद

ठिक हाई नव्ह.!" बोट हाकलणारा एक आदिवासी म्हणाला.

"व्हई की रघु बाबा! अन केव्हापासन बघतुया मी की तुम्ही लेय गहान विचारात बुडालेव.!" रघु बाबा बोटीवर असलेल्या एका फळीवर बसले होते.आणी त्यांच्या समोर तो बोट हाकलणारा होता-आणि बाजुलाच तीसरा आदिवासी बसला होता-तोच आता उच्चारला होता.

" संकट येणार हाई पोरांनो! जाम मोठ संकट येणार हाई..! रात्र वै-याची होणार हाई..! आकाशात उगवणारा चांदण बी वैरीक सोडणार हाई..!" बोलताना रघू भटांचा पांढरा फट्ट पडलेला चेहरा आणि ते डोळे क्षणा-क्षणाला डावीकडूब उजवीकडे फिरत होते."

"आपल्याला लवकरात लवकर राहाजगडला पोहचाया पाहिजे.!"

रघुबाबा अस म्हंणतच पुन्हा आपल्या विचारात बुडून गेले.त्या दोघांनाही रघुबाबांच्या गुढ बोलण्याचा अर्थकाही लागल नाही परंतु पुढे जे काही घडनार आहे ते प्रकरण मात्र काहीतरी भयंकर आहे हे कळून चुकल होत.

 

क्रमश:..

 

पुढील भाग वाचायला विसरु नका..! राहाजगडची जत्रा..

 

उलटल..दिस..झाली सांज..! पडलय..धुक.....

.....

आता पुढ काय ?..��� होणार..