Rakt Pishachchh - 23 books and stories free download online pdf in Marathi

रक्त पिशाच्छ - भाग 23

॥.रक्त पिशाच्छ ॥18+ भाग 23

 

आकाश व त्या आकाशातले ढग सर्वकाही लाल रंगाचे दिसुन येत आहेत. जणु त्या आकाशात, ढगांच्यात रक्तनी रक्त ठोसूण ठोसूण भरल आहे.तो गोलाकार चंद्रही रक्तासारखा लाल भडक दिसत आहे आणि त्या गोलाकारा चंद्रा बाजुलाच........................

एका उंचकड्यावरती तो भव्य -दिव्य महाल दिसत आहे. मोठ-मोठाल्या काळसर दगडी चुन्यांच्या बांधकामाने उभारलेला महाल.

महालाच्या पुढच्या भिंतींवर असंख्य काचेच्या खिडक्या आहेत. त्या खिडक्यांमधुन मेंनबत्त्यांचा पेटलेला प्रकाश दिसत आहे.महालाच्या ठिक मधोमध एक बाराफुट उंचीचा दोन झापांचा चौकलेटी रंगाचा लाकडी दरवाजा आहे. दरवाज्याच्या दोन्ही डावी-उजवीकडे दोन मशाली घेऊन उभे असलेले काले कपडे घातलेले सैतानाचे समर्थक आहेत.त्या काळ्या कपड्याला लागुनच , एक टोपी त्या सैतानी समर्थकांच्या डोक्यावर घातलेली आहे ज्याने त्यांच तोंड नाक सोडून चेहरा दिसत नाही आहे.एका सैतानी समर्थका बाजुलाच एक काचेची खिडकी आहे,ज्या काचेच्या खिडकीतुन आतल दृश्य दिसत आहे जे की पुढीलप्रमाणे.

महालाच्या प्रथम हॉलमध्ये दोन भागांत विभागलेला मोठा जिना आहे,जिन्याच्या पाय-यांवर लाल सतरंजी आहे.जिन्याच्या पुढे हॉलमध्ये खाली फरशीवर सुद्धा तशीच लाल सतरंजी अंथरलेली आहे व त्या सतरंजीवर तेच ते काळेकपडे घातलेले समर्थक उभे आहेत.परंतु एक किंवा दोन नाही, तब्बल पुर्णत हॉलभरुन उभे आहेत. प्रत्येकाच्या हातात एक-मशाल जळत आहे. त्या जळणा-या मशालींच्या धगधगणा-या आगीच्या आवाजाशिवाय त्या हॉलमध्ये शवागारात असलेला सन्नाटा पसरलेला आहे. ते काळेकपडे घातलेले समर्थक जिथे उभे आहेत त्या सर्वांन पुढे रामुसावकार आणी एका चौकोनी टेबलावर मृत शलाकाच प्रेत ठेवलेल आहे...त्या प्रेतापुढेच थोडवर एकुण तीन शाही सिंहासन आहेत.एक मऊशार लाल वटवाघळूच्या वासलेल्या तोंडाच्या आकृतीचा तो सिंहासन सोडुन बाकीचे दोन सिंहासन जरासे मागे आहेत. रामूसावकार एकटक आपल्या लेकीच्या डोळे मिटुन विश्रांत घेतलेल्या प्रेताकडे पाहत होता.इकडे जिन्याच्या लाल सतरंजीवर एक पांढरट काळ्या बुटाचा पाय पडला,मग दुसराही तसाच पुढे पडला आणि मग एकापाठोपाठ ती व्यक्ती (पुरुष-स्त्री) जिना उतरु लागली. रामुने हलकेच मान हलवून जिन्याच्या दिशेने पाहिल.एक गौरवर्ण शरीर असलेली.त्या शरीरावर एक काळ ड्रेसघातलेली ,काळ्या केसांची,पानीदार प्रणय लकाकीने चमकुन उठलेल्या डोळ्यांची, काळ्या केसांची स्त्री,माफ करा परंतु तिच्या सौंदर्यापुढे स्त्री हा शब्द अगदी तिचा अपमान केल्या सारखा आहे! म्हणुनच मी तिला तरुणी म्हंणन केव्हाही पसंद करेल.

तर ती तरुणी म्हंणजेच रिना लाल सतरंजी असलेल्या पाय-यांवरुन चालत आली , तिने एक कटाक्ष सर्वांवर टाकला...तिच्या लालसर ओठांवर सर्वांकडे पाहताना एक छद्मी कुत्सिक हास्य होत जे हास्यही तिच्या सौंदर्यामुळे समोरच्याला घायाळ करण्यास कमी पडु देणार नव्हत. हॉलमध्ये समर्थकांच्या हातात असलेल्या मशाली कोण्या अद्यात शक्तिमार्फत फूंकर मारावी तश्या विझल्या गेल्या.(फ्स्स)

पुर्णत हॉलमध्ये अंधार पसरला परंतु सेकंदापुरताच ,कारण जिन्यावरुन एक हलणारा प्रकाश पुढे-पुढे येताना सर्वांना दिसु लागला...त्या प्रकाशात पुढच दृश्य दिसल. एक वी आकाराचा पांढरट अमानविय तेज असलेला चेहरा, क्लिन शेव असलेले गाल,लहान-लहान डोळे.,आणि त्यांवर पातळसर भुवया, डोक्यावरचे केस मागे चोपुन बसवलेले स्पेशल हेयरस्टाईल अगदी शोभेल अशी,कोणत्याही तरुणीला आपल्या जाळ्यात ओढुन घेईल.(प्रणयास आमंत्रण देइल) लालसर ओठ. खाली अंगात एक सफेद सदरा न, गळ्याभोवती ताठ कधीही न झुकणारी लाल कॉलर आणि वर एक काळसर कोट,खाली त्याचप्रकारची एक काळी पेंट,पायांत दोन चक-चकीत बुट. असा हा द्रोहकाल खुद्द अंधकारराजक ,ज्याला कालोखाचा सम्राट म्हंणल जात तो पुन्हा हजर झाला होता. जिन्याची एक-एक पायरी उतरत द्रोहकाल खाली-खाली येत होता.त्याच्या प्रत्येक पावलासरशी हॉलमध्ये ठेवलेल्या स्टँडवरच्या मोठ्या अशा लाल रंगाच्या मेंबत्त्या उजळून निघत होत्या-पेटत होत्या.

द्रोहकालने शेवटची पायरी उतरली तो पर्यंत पुर्णत हॉल लाल रंगाच्या मेंबत्त्यानी भरुन निघालेला.द्रोहकाल त्या तीन सिंहासनां (खुर्च्यां)पैकी, मधोमध असलेल्या सिंहासनासमोर आला.चार मांणस बसतील इतका मोठा सिंहासन होता तो-त्या सिंहासनाला एका लाल रंगाच्या वटवाघळुच्या जबड्यातुन चार धा-धार सुळ्यासारखे दात बाहेर आलेली..आकृती रेखाटलेली होती. द्रोहकाल त्या सिंहासनासमोर आला , त्याने एक मंदस्मितहास्य करत रिनाकडे पाहील! तिनेही त्या हास्याला दुजोरा देत एक कातिल हास्य दिल.द्रोहकाल हलकेच त्या सिंहासनावर बसला मग त्याने आपला एक पांढराफट्ट हात रिनाच्या दिशेने वाढवला.तिनेही त्या हातावर हलकेच आपला हात टेकवला व द्रोहकालच्या बाजुला बसली.

" अंधकारराजक,काळसम्राट , यांना त्यांच्या लाडक्या समर्थकाचा प्रणाम!" रामुसावकार खाली मान घालुन आपला राक्षसी गोंदवण दाखवत मोठ्याने म्हणाला.कारण त्याचा आवाज त्या समंद महालात घुमला.

"आम्ही ओळकतो तुला रामु! तुझ्या पुर्वजांची सैताना विषयी असलेली श्रद्धा ही आम्ही पाहीली आहे! आणि आम्हाला त्या भटूरड्या कडुन तुच वाचवलस हे ही आम्हाला कळाल आहे ! " द्रोहकाल मोठ्या थाटात सिंहासनावर बसुन घोग-या आवाजात उच्चारला,काय तो रुबाब काय ते हास्य.

" तुझ्या सारखे हस्तक ,आपल्या कालोखी देवतांची अगदी श्रद्धेने मदत उपासना करतात -वेळ आल्यास आपल जिव देण्यासही मागे पुढे पाहत नाहीत! आणि असेच हस्तक आम्हाला प्रिय आहेत! तुझ्या कामगिरीवर आम्ही प्रसन्न झालो आहोत. म्हणुनच माग काय हव आहे तुला? पैसा,ऐश्वर्य,की अमानवीय शक्ति!"

" मालक तुमच्या कृपेने संमद भेटल हाई मला !"

रामु सावकाराच्या ह्या वाक्यावर द्रोहकालने आपली एक भुवई जराशी उंचावली व म्हणाला." मग! काय हवय तुला?"

" मालक ही माझी एकुलती एक पोर हाई , शलाका !"द्रोहकालने येवढवेळ समोर शलाकाच प्रेत ठेवलेल्या त्या टेबलाकडे पाहिलच नव्हत.

रामु सावकाराच्या वाक्यासरशी मात्र त्याच लक्ष तिच्या निर्जीव देहावरुन खालून वरपर्यंत फिरल.

" मालक !" रामुचा आवाज आला,द्रोहकालची तंद्री भंग पावली.

कारण तिच सौंदर्य त्याच्या डोळ्यांत वसल गेलेल.

" ही तुझी मुलगी मेली कशी ?" द्रोहकालच सर्व लक्ष शलाकाच्या निर्जीव देहावरुन अद्यापही फिरत होत-डोळ्यांत वासना झळकत होती.

" मालक " अस म्हंणतच सावकाराने द्रोहकालला काळ घडलेली सर्व हकीकत जशीच्या तशी सांगितली. मग थोड्यावेळाने तो म्हणाला.

" मालक तुम्ही माझ्या पोरीस्नी नव आयुष्य द्या ! माझ्या लेकीस जिवंत करा." रामुच्या ह्या विनवणीवर द्रोहकाल काहीक्षण गप्पच राहिला,जणु त्याच्या डोक्यात काही कारस्थान शिजत असाव.तसा तो काहीवेळाने आपल्या सिंहासनावरुन उठला व म्हणाला.

" तुझ्या मुलीला जिवंत करेल मी ! परंतु माझ्या काही अटी आहेत !"

" मला कसली बी अट मान्य हाई मालक !तुम्ही फक्सत माझ्या लेकीला जिवंत करा बस्स. सांगा तुम्ही तुमच्या काय अटी आहेत." रामुसावकार पटकन म्हणाला.

" सर्वप्रथम ,तुझ्या लेकीच्या शरीरात सत्याचे गुण होते..परंतु तिला मिळणा-या ह्या दुस-या जन्मामुळे तिच्या अंगी वाईट गुण असतील.

दुसरी अट :ती तुझी लेकच असेल! पन वाईट-क्रुरपणा तिच्यात ठोसूण ठोसूण भरलेला असेल.आणि तिसरा शेवटची आंतिम अट- तुझ्या मुलीचा विवाह माझ्याशी होईल ! " द्रोहकालच्या आंतिम अटेवर काहीक्षण रामुसावकार अगदी पुतळ्यासारखा स्तब्ध झाला काहीक्षण त्याला काय बोलु आणि काय नाही काही सुचेनास असं झालं. परंतु काहीवेळाने त्याचा मौन तुटला -ज्या उत्तराची अपेक्षा नव्हती तेच झाल.

" मला तुमच्या सर्व अटी मान्य हाईत मालक! उलट माझ्या लेकीशी तुमचा विवाह होईल..ही माझ्यासाठी लेय आनंदाची गोष्ट हाई !पन !"

रामु सावकाराच्या पन ह्या वाक्यावर द्रोहकालची पुन्हा एक भुवई उंचावली गेली.रिनाच्याही चेह-यावर प्रश्नार्थक भाव पसरले.

"मालक मला माझ्या पुर्वजांकडून अस कळालेय ! की राझगड महालात

एक गुप्त द्वार आहे ! त्या गुप्त द्वारा पल्याड एक खोली आहे त्या खोलीत एक बाटली आहे! त्या बाटलीत म्हंणे कोण्या समर्थांनी येहूधी नामक राक्षसाला कैद करुन ठेवलय ! आणि तीच बाटली मला शोधून काढायचीये ! तर तुमची त्यात काही मदत झाली तर !"

रामुसावकार दोन्ही हात चोळत अगदी खजिलपने हसला.

" अवश्य ! " द्रोहकालच्या चेह-यावर एक कुत्सिक हास्य उमटल.

त्याने हातात असलेला तो नाणा,शलाकाच्या कपाळावर ठेवला. कोण्या

गरम तव्यावर पाण्याचे शिंतोडे उडावे फ्स्स आवाज व्हाव,तसा त्या नाण्याचा आवाज झाला.शलाकाच्या कपाळावर ठेवलेला तो नाणा अगदी तांबडा होऊन धुर निघेस्तोपर्यंत तापत राहीला/तापु लागला..

शलाकाच्या शरीराची तडफड होऊ लागली हात-पाय सर्वकाही जलद वेगाने झाडले जाऊ लागले. रामुसावकार -रिना दोघेही तो विलक्षण नजारा पाहत बसलेले.रामुच्या चेह-यावर जरासे भीतीचे भाव होते तर रिनाच्या खूनशीपणे हसण्याचे.हॉलमध्ये पेटलेल्या मेंनबत्त्या न जाणे का परंतु बिना हवेच्या झोतांसरशी फडफडु लागल्या-महाला बाहेर लाल रंगाच्या आकाशात कावळे महालाभोवती काव-काव करत घिरट्या घालू लागले.शलाकाच्या कपाळावर ठेवलेला तो नाणा मातीत खेचावा तसा तिच्या कपाळात खेचला गेला , क्षणार्धात तिच्या समंद शरीराची हालचाल थांबली.रामु एकटक आपल्या लेकीकडे पाहु लागला..की खाडकन तिने आपले दोन्ही डोळे उघडले.

××××××××××

राहाजगडच्या जंगलात धुक्यामध्ये एक बैलगाडी थांबलेली.आणि त्या बैलगाडी मागे एक आठफुट काळभोर शरीराच्या दैत्याची आकृती आपल्या दोन काटकुल्या पावलांवर ऊभी राहुन त्या बैलगाडीत डोकावून पाहत होती. त्या हिरव्या नजरेत हवरटपणा उतरलेली. त्या दैत्याच शरीर अवाढव्य होत. हाताच्या नखा काळपट असुन-त्यातून कालद्रव बाहेर पडत होत- काळ्या हिडिस चौकोनी चेह-यावर दोन हिरवी बेडकाच्या डोळ्यांसारखी बुभळ होती...तोंडात

एका ट्रेक्टर मागे असलेल्या फावड्यासारखे टोस्कूलधारक पिवळे दात होते.

" बाई,बाई,बाई काय ध्यान हाई ये! " सविता साडीचा पदर तोंडाला लावुन म्हणाली.

" सवे! हे तर खरच हाई म्हंणायच!"

" म्हंजी तुम्हाला ठाव होत की काय ? की जंगलात हे असल काय-बाई

विद्रूप हिंडतय !" सविताने दिनकर कडे पाहिल.

तुम्हाला आठवतंय गाडीत ज्याक्षणी दिनकरने सविताला गप्प राहून तो आवाज ऐकण्यास सांगितला होता..त्याचवेळेस बैलगाडीला असलेल्या एका छिद्रातून दिनकरने ह्या ध्यानाला पाहील होतं आणि अगदी क्षिताफीने हालचाल करुन...ते दोघे बैलगाडीतुन खाली उतरलेले..धुक्याचा फायदा घेऊन..गुढघ्यांवर चालत

एका झाडापाशी येऊन तिथे लपून बसलेले.काहीक्षण का असेना परंतु दोघेही धोक्यापासुन लांब होते. रातकीड्यांची किरकिर वाजत होती..हे दोघे ज्या झाडाखाली लपले होते त्या झाडाच्या एका फांदीवर एक तपकीरी पिसांची -नकट्या नाकाची ,वटारलेल्या लाल डोळ्यांची घुबड उलटी मान फ़िरवुन त्या दोघांच्याही मागे जरा दुर अंधारात अगदी वेधक नजरेने पाहत होती.-जणु त्या अंधारात काहीतरी दडून बसल होत.

" व्हइ मला महिती व्हत! आपल्या गावातले एक दोन शिपाई बोलत व्हते ! का राहाजगड मधी सैतान घुसलाय-रात्र व्हतच बाहेर येउन मांणसांचा फडश्या पाडतुया!पण मला वाटल की हे संमद खोट असल!" दिनकर पुढे काही बोलणार की तोच मागुन एक घोगरा भसाडा आवाज आला" पन हे सगळ खर हाई हिहिहीहिहिही!"आवाज ,हस्यासरशी दिनकर सविता दोघांनी थेट वळून मागे पाहील! दोघांनाही काहीवेळ त्यांच्या नजरेस मागे काळाकुट्ट अंधार दिसला..परंतु पुढच्याचक्षणाला त्या अंधारात दोन काजव्यासारख्या रंगाच्या डोळ्यांची जोडी चमकली.त्या अंधारातुन एक भयंकर भसाडा आवाज बाहेर पडला." "बघा "नी त्या आवाजा सहीत एक भयान हिडीस, तामसी, आकार , पुर्णत लुकड शरीर काळ्या रंगाच त्यावर सफेद पट्टे -डोक्यावर टक्कल पडलेल - तोंडातले दात अगदी सुळ्यासारखे धार-धार , डोळ्यांच्या खोंबण्या पिवळ्या रंगाने चमकत असुन त्यात ह्या दोघांचे विस्फारलेल्या चेह-याचे प्रतिबिंब दिसत होते..आणि ते तोंडात असलेले दात त्या दोघांच्याही नरडीचा घोट घेण्यासाठी अगदी वेगाने त्या दोघांच्याही अंगावर काळझडपे सारख झेपावल.शेवटला उरली ती फक्त त्या भयान रक्तरंजित शैतानाच्या बळीची किंकाळी

" आआआआआआऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽsssss "

 

××××××××××

 

महाराज आपल्या खोलीत उघड्या खिडकीसमोर उभे होते. वरच शरीर उघड खाली दोन झापांच धोतर घातलेल.आकाशात

गोल आकाराचा चंद्र चमकत बसलेला,त्याचा प्रकाश खाली राहाजगड गावावर पडला होता. त्या प्रकाशात आजूबाजूची झाड

विषफासल्यासारखी काळी-निळी पडलेली ! पन घरांबाहेर जळत असलेल्या मशालींमुळे तो श्रापीत प्रकाश जणु दुर हिबाळला जात त्या झोपड्यांभोवती चिकटत नव्हता. ती रात्रीची थंड हवा अंगावर येऊन काहीक्षण एक सुखद अनुभव देऊन जात होती.की तेवढ्यातच त्या थंड हवेच्या झुळकेमार्फत जंगलातुन आलेला एक भयान आर्तकिंकाळी युक्त आवाज महाराजांच्या कानांवर पडला.तो आवाज ऐकून महाराजांच्या

उघड्या शरीरावर सर्रकन शहारा आला ! ती थंड हवा काहीक्षण एका पिसाटासारखी नाकातोंडातुन शरीरात घुसली...मग छातीच्या दिशेने जाऊन हलकेच त्यात एक कळ उमटून आली.महाराजांनी खाडकन खिडकीच्या दोन्ही झापा आपल्या मागे ओढल्या..एक हात छातीवर ठेवून, ते फुललेल्या श्वासांना छातीत जाणवु लागलेल्या भीतीजनक

वेदनेला सांभाळु लागले.

" काय झाल तुम्हाला?! ठिक आहात का तुम्ही !?"

महाराणी हळकेच महाराजांच्या दिशेने चालत आल्या.त्यांच्या कपाळावर हलकेच हात ठेवला. कपाळ जरास गरम झाल होत.

" अहो ! तुम्हाला बर वाटत नाही आहे का ! ताप आल्यासारख कपाळ गरम आहे का!"

" ठिक आहोत आम्ही ! "

" बर! मग खिडकी का बंद केलीत? थांबा हा मी उघडते!"

'" नाही!" महाराज जरा पटकन स्वर उंचावत ओरडलेच.

" नका उघडू ती खिडकी! रात्रीच्या अंधारात न जाणे कसले आवाज येतील! काही सांगता येत नाही !" महाराजांनी महाराणींच्या डोळ्यांत

डोळे घालुन पाहिल, त्या डोळ्यांत काहीक्षण भीती दिसली..

 

भीती ऽऽऽऽऽऽ

 

क्रमश: