Rakt Pishachchh - 29 books and stories free download online pdf in Marathi

रक्त पिशाच्छ - भाग 29

॥रक्त पिशाच्छ ॥18+ भाग 29

 

नव्या समर्थांचे आगमन !

 

आकाशात चौही दिशेना काळे ढग माजले जात.! दोन ढगांचा घर्षन

होताच! दगडावर दगड आपटून ठिँणग्या उडाव्या तश्या, विजा कडाडत होत्या. त्या विजांचा गुलाबी प्रकाश ह्या धरतीवर पडत होता सर्वकाही उजळून टाकत होता.

रामू सावकाराचा दुमजली वाडा कालोखात बुडाला गेलेला, अचानक एक विज कडाडली, त्या विजेच्या गुलाबी प्रकाशाने वाड्याची कौल-भिंती, खिडक्या दरवाजे सर्वकाही उजळुन निघाल.मग जशी विजेची लकाकी संपली , पुन्हा अंधार झाला..त्या खिडक्या, दार पुन्हा अंधाराच्या गर्भात बुडाले.

रामु सावकाराच्या वाड्याच दोन झापांच गेट मोडल गेलेल.त्या मोडलेल्या गेटमधुन पुढे जाताच , डाव्या बाजुला झोपाला दिसत होता..त्यावर रामुसावकार खाली मान घालुन बसलेला...व झोपाळा पुढे मागे होत झुलत होता.तर झुलणा-या झोपाळ्याबाजुला यार्वशी हाताची घडी घालुन उभे राहिलेले.त्या दोघांच्या बाजुलाच दहा-बारा पावलांवर विहीर होती. आणि विहीरीच्या गोल कठड्याबाजुला खाली संत्याच प्रेत पडल होत.जिवंतपणी लुकड्या संत्याच्या शरीरात मांस नव्हत! परंतु आता मरताना पाणि जाऊन शरीरफुग्यासारख फुगलेल ! प्रेत (मयत) जास्त उशिर पाण्यात राहील्याने हातापायाची त्वचा पांढरट म्हाता-यासारखी झालेली.संत्याच्या प्रेताचे जिव नसलेले ते काळे लहान डोळे सताड उघड्या डोळ्यांनी एकटक आपल्या पुढे केस मोकळे सोडून बसलेल्या ढमाबाईंकडे पाहत होत.आजुबाजुला रातकिड्यांची किरकिर संथपणे वाजत होती, दूर कोठेतरी राहजगडच्या गल्लीबोळांमधे लपून कुत्रे मनसोक्तपणे रडत बसलेले, त्यांचा आवाज हवेमार्फत वाड्यापर्यंत पोहचत होता.कोणि रात्री मराव आणि कुत्र्याची विव्हळ, रडण्याचे ते भयान मनात धडकी भरवणारे आवाज विलक्षण भीतीदायक ! कालभोर आकाशात ढगांच्या घर्षणाने पुन्हा एकदा विज

कडाडली! त्या विजेचा गुलाबी प्रकाश ढमाबाईंच्या केस मोकळे सोडलेल्या चेह-यावर पडला.मेलेल्या संत्याच्या तोंडाचा आ वासला होता कपाळावर चिंकीने मारलेल्या त्या दगडाच्या वाराने कपाल फुटल गेलेल, त्यातुन कित्येकतरी रक्त बाहेर पडल जात पुर्णत विहीरीतल पाणि रक्तासारख लाल रंगाच झालेल. रप, रप करत पावसाचे थेंब अगदी वेगाने वरुन हवेतुन खाली येत जमिनिवर आदळू लागले.

धुआंधार पावसाळा सुरुवात झाली. यार्वशी, झोपाळ्यावर बसलेला रामु सावकार, ढमाबाई सर्वजन भिजले गेले. ढमाबाईंच्या डोक्यावर पडणारे टप, टप करत पडणारे पावसाचे थेंब पुर्णत चेहरा भिजवु लागले ,

ज्याने डोळ्यांत भरलेल काजळ डोळ्यांखाली लागुन विशिष्ट प्रकारे काळी वर्तुळे तैयार झाली, कपाळावर लावलेला गोल टिकला, केव्हाचा पुसून गेलेला. संत्याच्या उघड्या तोंडात पावसाचे थेंब शिरुन पोटात जात होते, फुगलेल पोट अजुनच हवा भरावी तस फुगत चालेल.

" आई !" लंक्याने ढमाबाईंच्या चेह-या जवळ आपला एक हात धरला. त्या हातात वस्तारा होता धार-धार ब्लेड लावलेला वस्तारा.तो वस्तारा ढमाबाईंनी आपल्या हाती घेतला. लंक्या हळुच मागे जाऊन उभा राहिला. ढमाबाईंनी एकवेळ त्या वस्ता-याकडे पाहील. मग संत्याकडे. वस्तरा ढमाबाईंनी दुस-या हातावर ठेवला..

मग तो हात मृत संत्याच्या चेह-यावर धरुन मुठ गच्चकन अवळली..

वस्ता-याला लावलेली ब्लेड मांस चीरुन आत गेली..हातातुन पाणि रक्त मिश्रित होऊन संत्याच्या सताड डोळ्यांत पडू लागल, आकाशात कडकन एक ह्दयात धडकी भरवणारी विज कडाडली.संत्याचा निस्तेज चेहरा पुर्णत लाल रंगाने भिजू लागला.काहीवेळाने ढमाबाईंनी ती मुठ खोल्ली! दुस-या हातात असलेला वस्तारा, हळूच कपाळावर असलेल्या प्रथम सुरुवातीच्या केसांवर ठेवुन हलकेच मागे नेला, तसा पाऊसाच्या पाण्याने भिजलेल्या ओळ्या केसांना छाटत तो वस्तारा ढमाबाईंचे मोठे केस कापू लागला.यार्वशी, लंक्या उघड्या डोळ्यांनी तर कधी घशाखाली आवंढा गिळ्त हे दृष्य पाहत होते-ढमाबाईंचा वस्तारा असलेला हात वेगाने मागे पुढे होत-होता..त्या त्या क्षणाला आकाशात एकापाठोपाठ विजा कडाडत होत्या..आणी त्या विजांच्या प्रकाशात ढमाबाईंची काळी सावली वाड्याच्या भिंतीवर अगदी ह्दयाचा ठोका चुकवेल अशी क्षणा-क्षणाला भयानपने दिसत होती.अगदी चेटकीणी सारखी.वस्ता-याला असलेल्या ब्लेडला अशीकाही धार होती-की काहीवेळातच ढमाबाईंच्या डोक्यावरचे केस खाली जमिनीवर पडले जात..पुर्णत टक्कल झाल गेल. ढमाबाईंच्या डोक्यावर एक काळ्या रंगाचा फणा वासलेल्या नागाचा, आणि पुर्णत गोल डोक्यावर त्याची शेपटी गुंडाळुन बसलेला काळा टेटू होता. पुर्णत डोक त्या टेटूने भरल होत. ढमाबाईंनी वस्ता-याने कापलेला तो हात, हलकेच तोंडाजवळ आणला! तर्जनी ओठांवर ठेऊन ती खाली वर फिरवत..भयाण आवाजात ओरडू लागल्या.

" अब,अब,अब,अब!" वरुन निसर्ग उघड्या डोळ्यांनी पहात होता.

अक्षरक्ष त्याचाही थरकाप उडाला होता जणु हे असल भयाण विकृती कृत्य पाहुन विजा कडाडत होत्या, एकापाठोपाठ !

×××××××××

एकंदरीत मध्यरात्र उलटली होती, सकाळच उन्ह चौहीदिशेना पृथ्वीवर पसरल गेलेल.परंतु कालच्या पावसाच्या खुना जशाच्या तश्या दिसत होत्या.

राझगड महालाबाहेर बागेत चिंकीच प्रेत गाडुन ! त्या जागेवर तिची समाधी बांधली गेलेली! समाधीसमोर रुपवती -तिच्या मागे महाराज,बाजुला रघुबाबा, युवराज सुरजसेन उभे होते.महाराणी सुद्धा उभ्या होत्या. काहीवेळाने सर्वजन महालात आले!

" रुपवती! " एक वडिल आपल्या लेकीवर रागावु तरी किती शकतो?

सांगा ना ? आहे का उत्तर ? नाही ना ? ठीके ! रुपवतींवर नाराज झालेल्या महाराजांचा राग केव्हाचा थंडावला गेलेला. त्यांनी पुढे होऊन

हळकेच रुपवतीचे खांदे पकडले.

" बाळा! जे झाल ते झाल ! इश्वरा पुढे कोणाचही चालत नसत! "

" नाही बाबाश्री!" युवराज्ञी पटकन म्हणाल्या. तिच्या डोळ्यांत क्रोधिंत भाव उफाळून आले.

" त्या मुलीच मृत्यु झाल हे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीच आहे!

आणि सत्य हे असत्याला भेदूण टाकणार आहे! " युवराज्ञींचा स्वर उंचावला, मुखातुन श्बदांची रचना वा-यासारखी बाहेर पडू लागली.

" आपण इतकी वर्ष ज्या मांणसाला आपल समजत होतो! तो आपला नव्हताच! चेह-यावर चांगूलपणाच मुखवटा लावून फिरणारा सैतानाचा हसत्क आणि आपल्या भावनेशी खेळ-खेळणारा दलाल होता तो ! आणि आपल्या ह्या राहाजगड मध्ये त्या सैतानासमवेत राहुन त्याने कित्येकतरी निष्पाप लोकांचे बळी दिले आहेत! आणि त्या निष्पाप मातेचा, तिच्या वडिलांचा -तिचा स्वता:चा ही त्या कप्टी मांणसाने जिव घेतला आहे !"

" कोण? कोण आहे तो?" महाराज म्हंणाले. की तोच उत्तर त्यांच्या मागुन आल.

" यार्वशी प्रधान ! आणि सैतानाचा हस्तक रामु सावकार !"

एक विलक्षण आवाज! दमदार,भेदक पुढील मानवाला धीर देईल असा आवाज ! आवाज येताच हॉलमध्ये असलेल्या रुपवती, महाराज-महाराणी युवराज,रघुबाबा सर्वानी एक-एक करत मागे वळुन पाहिल.महालातल्या तुटलेल्या दरवाज्यातुन डोंगरमाथ्यावरुन बाहेर आलेला सूर्य दिसत होता. आणी त्याच सुर्याच्या प्रकाशीत किरणांन मधोमध एक आकृती ऊभी होती.अंगात एक फुल बाह्यांचा फिकट भगव्या रंगाचा सदरा होता-गळ्यात एक काला दोरा त्यात तुलसीच पान विशिष्ट पद्धतीने ओवळेल होत.पायांत एक कोल्हापूरी स्टाईल चप्पल ! आणि दोन्ही हातांत मोठ-मोठ्या रुद्राक्षांचे पाच-पाच मिळून दोन कडे घातले होते. जे साधारण मुळीच नव्हते लक्षात असूद्या वाचकांनो.

सुर्याचा प्रकाश असा काही विशिष्ट प्रकारे दारातुन आत आला होता की त्या आकृतीचे वस्त्र दिसत असले तरी चेहरा दिसत नव्हता.

हळुच त्या आकृतीने आपला कोल्हापुरी चप्पल असलेला एक पाय महालाच्या प्रथम फरशीवर ठेवला आणि महालात प्रवेश केला.

u आकाराचा सुर्याच्या प्रकाश किरणांन प्रमाने तेजप्रभावीत पणे चमकणारा चेहरा,पाणिदार -गंगाजळा प्रमाणे शुध्द असे दोन डोळे..

डोक्यावरचे केस उजव्या दिशेला भांग पाडुन चोपुन बसवलेले...

ओठ जरासे गुलाबी असुन त्यांवर एक मंद स्मित विठूरायासारख हास्य होते. संकट समयी सुद्धा शत्रुला डिवचण्यासाठी केल जाणार हसु.नाक अगदी टोकदार-नजर पाणीदार असली तरी धारधार होती.

हात,पाय शरीरयष्टी कोणत्याही मुलीला प्रेमात पाडेल अशी होती.

वय जेमतेम पंचवीस सव्वीस असाव. तो युवक हळकेच चालत युवराज्ञींसमोर आला.

" मुली बरोबर म्हंटल ना मी ! " मंत्रमुग्ध करणारा, सुरील आवाज ! यूवराज्ञींनी फक्त होकारार्थी मान हलवत एकटक त्या युवकाकडे पाहील.

रघुबाबा हळुच पुढे चालत आले! त्यांनी एकवेळ धीरगंभीर कटाक्षासहीत त्या युवकाच्या चेह-याकडे पाहील...व पुढ़च्याचक्षणाला रघुबाबांच्या चेह-यावर एक हसु उमटल , त्यांनी हळूच वाकून त्या युवकाचे स्पर्श करण्यासाठी हात पुढे नेला ! की तेवढ्यात त्या युवकाने

रघुबाबांचे खांदे पकडले , त्यांना उभ केल.

" हे काय करत आहात आपण!उलट तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात आणि समर्थांची शिकवणच अशी आहे!" समर्थ हे नाव ऐकुन महाराज-महाराणी दोघांनीही चमकुन एकमेकांकडे पाहील" की आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसांचा आदर करावा!" त्या युवकाने हळुच रघुबाबांचे चरण स्पर्श केले.

" मला इथे बोलावणारे! युवराज सुरजसेन कुठे आहेत ?" त्या युवकाच्या ह्या वाक्यावर सुरजसेन हळूच त्या युवकासमोर आले.

" मीच तो!" यूवराज पाया पडण्यासाठी वाकले ! परंतु त्यांनाही त्या युवकाने अडवल! " नाही ! मुळीच नाही! अरे वयाने आपन दोघे सारखेच आहोत मग कशासाठि पाया पडतोस !" त्या युवकाने युवराजांना मीठीच मारली.

" महाराज -महाराणी! तुम्हा सर्वांच्या मनात खुप सारे प्रश्ण असतील ! मी कोण आहे ? समर्थांच्या नावाच उच्चार का केल आहे ? यु.रा:रुपवती काय म्हंणत आहेत ? यार्वशी प्रधान आणि तुमच्या गावातल्या रामु सावकाराच नाव मी का घेतल त्या सर्वांची उत्तर आणि रहस्य! मुळापासून उखडले जाणार आहे! चला बागेत बसुन बोलुयात !"

राझगड महालातल्या बागेत चिंकीच्या समाधीला तो युवक एकटक पाहत होता! त्याने हळूच गुढघे वाकवुन त्या समाधीवरुन हात फिरवला..!

" बाळ, मुक्ती पत्कारुण घे! पुन्नरजीवन प्राप्त करुन घे ! ह्या सृष्टीवर आता उगीचंच ! का भटकत राहायच ! जे आपल नाहीच आहे त्यावर हक्क जोपासन चुकीच आहे !" शेवटच्या वाक्याला त्या युवकाच्या समाधीवर ठेवलेल्या हाताला ती समाधी गरम असल्यासारखा चटका बसला.

" बर बाई रहा तु इथेच! पन लक्षात ठेव ! कोणालाही तुझ्यामुले कसलाही

त्रास व्हायला नको !" तो युवक मंद स्मित हास्य करत म्हणाला.समादीला मागे सोडून चाळीस-पन्नास पावले चालून! महाराज -महाराणी चहा नाश्त्यासाठी बसत असलेल्या रोजच्या टेबलापाशी आला..तिथे सर्वजन आधीच उपस्थित होते. टेबलावर कपबश्यांत चहा आणि गोल काचेच्या थालीत बिस्किट होती.बाजुच्याच एका खुर्चीवर तो युवक बसला.

" मी चहा घेऊ ! " तो युवक म्हणाला.जरास विचित्रच वाटल महाराजांना..परंतुतस दाखवल नाही.

" हो घ्या न ? " महाराणी उसने आसत हसत म्हंणाल्या. अद्याप त्यांना त्या युवकाची ओळख ठावुकच नव्हती ना! त्यांनी एक कप त्या युवकाला दिला -चहा घेतल्या नंतर त्या युवकाने कप पुन्हा टेबलावर ठेवला व एक कटाक्ष सर्वांवर टाकला.टेबलाभोवती एकुण चार खुर्च्या होत्या.खुर्च्यांवर महाराज-महाराणी रघुबाबा हातात काठी घेऊन बसलेले आणि त्यांच्या बाजुला तो युवक बसलेला -तर युवराज , आणि रुपवती उभे राहिलेले.

" तर महाराज " काहीवेळ थांबुन तो युवक पुढे म्हणाला."माझ नाव क्रूणाल समर्थ ! मी समर्थ भट्टाचार्य यांचा शिष्य आहे!"

समर्थ हे नाव ऐकून महाराजांना बर वाटल ! एक सुप्त सुखदायक भावना ह्या सर्व वाईट परिस्तितीतून सुटले जाण्याची मनात आली.

आणि तो युवक पुढे बोलू लागला.

" महाराज आता जास्त आढेवेढे न प्रथम रहस्य मी तुम्हा सर्वांना सांगत आहे !

अस म्हंणतच क्रूणाल समर्थांनी यार्वशी प्रधानांचा इतकी वर्ष चांगूलपणाच मुखवटा लावुन फिरत असल्याचा- सैतानाचा समर्थक रामु सावकाराचे दृश-अघोरी कृत्य सर्वांची खरी ओळख-त्यांचा हेतू परस्पर सविस्तरपणे सर्वांसमोर मांडला..ते प्रत्येक वाक्य ऐकुन क्षणा-क्षणाला

महाराजांच्या मनाला विलक्षण धक्के बसत होते.राग, निराशा, दुख -धोका ह्या सर्व भावनांचा उद्रेक वर उफाळून येत होता.

" परंतु का? हे सर्व का केल त्यांनी ?" महाराणींनी मध्येच आपल मत मांडल.त्या वाक्यावर क्रूणाल हलकेच हसले.

" महाराज-महाराणी !मानवाच्या मनात असलेली लालसा , वासना..त्याची विकृती बुध्दी, आणि त्या बुद्धीत येणारे अक्लीष्ट विचार

हे सर्वच त्याला कारणीभुत आहेत! ह्या अशा मानवाला मानव ही व्याख्या द्यान , सुद्धा मूर्खपणाच ठरेल ! खर तर यार्वशी -रामु सावकार

राक्षस , सैतानी देवाचे पुजक आहेत ! एकप्रकरे कट्टर समर्थकच म्हंणुयात आपण! आंणि इतकी वर्ष यार्वशी हे महालात एका खाजगी गुप्तहेरा प्रमाणे वागत राहीले असावेत म्हंणजेच ! त्यांच्या ह्या वागण्यावरुन मला फक्त एकच संशय येत आहे ! ह्या सर्वांमागे काहीतरी ठोस कारण असायला हव! त्या सर्वांच काहीतरी वाईट ऊद्देश्य असायला हव ! "

" हो ! मला वाटत!" महाराजांनी थरथत्या ओठांनी- भयाची एक छटा डोळ्यांत साठवुन घेत क्रूणाल समर्थांकडे पाहीप व हळू आवाजात पुढच वाक्य उच्चारल." त्यांना येहूधी हवा असेल !"

महाराजांच्या वाक्यावर सर्वांनी आश्चर्यकारक नजरेने त्यांच्याकडे पाहील.

" महाराज हा तोच का? ज्याला साडेचारशे वर्षां अगोदर समर्थांच्या एका वंषजने बाटलीत बंद केल होत !" रघुबाबा आश्चर्यकारक नजरेने महाराजांकडे पाहत म्हणाले." परंतु! महाराज येहूधी हा तुमच्याच महालात आहे हे मला ठावूक नव्हत! "

" माफ करा बाबा ! परंतु समर्थांनी हे गुपित त्याचवेळेस आमच्या वंशाशिवाऊ कोणालाही कळता कामा नये अस सांगितल होत.

म्हंणुनच कित्येक वर्षांपासुन हे रहस्य ते रहस्यच राहिले आहे ! परंतु आज न जाणे का

मला ते सांगावस वाटल ! समर्थांच व्यक्तीमहत्व माझ्या डोळ्यांसमोर आल जात मी तो नियम तोडला असाव अस मला वाटत आहे ! परंतु माझे समर्थ नक्कीच समजुन घेतील ! " महाराजांनी मोठ्या

आदबीने अपले दोन्ही हात क्रूणाल समर्थांपुढे जोडले.

" फक्त एकदा ! फक्त एकदा समर्थांना इथे बोलवा , माझ्या प्रजेवर खुप मोठ संकट आल आहे हो! दिवस जाताच , जशी रात्र चढते ! माझ राहाजगड सुनसान पडल जात -मोठ्या आनंदाने जगणारी माझी प्रजा आता एका कैद्यासारख आयुष्य जगत आहेत! माझ्या ह्या डोळ्यांसमोर माझ्या मुलाच्या वयाची पोर जळून मेली हो , परंतु मी.हं,हं,हं ,ह्ं" महाराजांच्या डोळ्यांतुन प्रथमच अश्रु गळाले स्वर अक्षरक्ष खालावला गेला." त्या मातेंचा तो आक्रोशी स्वर आपल्या मुलाला वाचवण्यासाठी केलेली असीम धडपड ह्या उभ्या डोळ्यांनी मिब पाहीली हो ! परंतु मी राजा असुन काहीही करु शकलो नाही! ती बिचारी मुल ज्यांनी आपल आयुष्यही जगल नव्हत पाहिल नव्हत ती मुल अशी कोवळ्या वयात मेली! काय मिळाल त्या हरामखोर सैतानाला अस करुन? कोणत पश्वि आनंद मिळाल." महाराजांच्या डोळ्यांतुन आसवांच्या धारा वाहत होत्या.

महाराणींनी हलकेच आपला हात त्यांच्या खांद्यावर ठेवला.

"आहो सांभाळा स्व्त:ला!"

" मी विनंती करतो तुम्हाला ! फक्त एकदा समर्थांना इथे येण्यास सांगा हो!" महाराजांनी आपले दोन्ही हात जोडले होते.त्या हातांवर क्रूणाल समर्थांनी हलकेच आपल्या दोन्ही हातांनी स्पर्श केला.

"महाराज ! मला हे सांगण्यास खुप वाईट वाटत आहे! की समर्थ भट्टाचार्य ह्यांनी गेल्या महिन्यातच समाधी घेतली आहे!"

" काय !" महाराजांना हे ऐकुन मोठा धक्काच बसला."

" होय महाराज, समर्थांनी जिवंतपणीच समाधी घेतली! जाता-जाता त्यांनी मला हा वारसा सोपवला! आंणि मला तुमच्या राहाजगडमधे घडणा-या विचित्र अमानविय घटनांबदल सांगुन! तुम्हाला मदत करण्यास सुद्धा सांगितल! "

" मग इतक्या दिवस तुम्ही होतात कुठे ? जर तुम्ही आधीच आला असतात तर नक्कीच इतक्या माणसांचा जिवतरी गेला नसता !"

यु:.रा: रुपवती बोलल्या.समर्थांनी क्रूणाल यांनी स्मित हास्य करत

तिच्याकडे पाहील व म्हणाले.

" वेळ! "

" वेळ?" न समजुन रुपवती म्हणाल्या.

" होय वेळ! प्रत्येक घटनेची वेळ असते! म्हंणतान वेळे अगोदर ना कोणाला काही मिळाल आहे ! नाही मिळेल ! तसंच आम्हालाही लागु आहे! मी सुद्धा वेळेची वाट पाहत होतो! आणि ती वेळ आली ती काळ

ज्यावेळेस रघुबाबांचा ध्यानास्थ असतांना आम्हाला निरोप आला.

तसे आम्ही लागलीच इकडे आलो! कारण...!"

हा शेवटच शब्द उच्चारताच समर्थांच्या चेह-यावर गंभीर भाव पसरले..

कपाळावर जराश्या आठ्या उभ्या राहील्या.

" कारण..? समर्थ!" महाराजांनी त्यांना समर्थ म्हणुन हाक मारली..

आपल्या प्रश्णाच्या उत्तराची वाट पाहू लागले.

" कारण!" समर्थांनी एक मोठा श्वास घेतला , व तो सोडत म्ह्नाले.

" युद्धाची वेळ जवळ आली आहे!"

 

क्रमश :

 

चाप्टर 1# वेळ आलीये समाप्तीची.

 

तैयार आहात का? युद्धासाठी.