Dracula - 32 in Marathi Horror Stories by jayesh zomate books and stories PDF | ड्रेक्युला - भाग 32 - अंत सुरु चाप्टर - 1

ड्रेक्युला - भाग 32 - अंत सुरु चाप्टर - 1

. ...
झोमटे क्रीएशन ⭐⭐⭐⭐⭐ स्टार स्टोरीज प्रस्तुत.

चाप्टर # 1मराठीतली पाहिली वाहिली भयकादंबरी..
ड्रेक्युला

॥ ड्रेक्युला ॥ ...

भाग 32
धमाकेदार...महाएपिसोड...
प्रथम पर्वाचा अंतसुरु...

..........रणसंग्राग युद्धाचा- .. यालगार ..की सालाजार..

मित्रांनो युद्ध म्हंणजे काय असत हो ? माहीती आहे का तुम्हाला? एकदुस-या समवेत लढा द्यायचा , समोरच्या शत्रुला हारवायचा येवढच युद्ध असत का हो ? मुळीच नाही! पाहायला गेलो तर युद्ध हे कित्येक दशकांपासुन सुरु आहेत, काळांपासुन सुरु आहेत!
शिवाजी महाराजांच्या काळात
(आमचे आदरणीय छ्त्रपती शिवाजी महाराज .)
इतिहासात मुघलांना ह्या संमंद धरतीवर आपल मुघल साम्राज्य प्रस्थापीत करायच होत. ह्या भुतळावर मुघल धर्मा व्यतिरिक्त अन्य धर्मांची त्यांना चिड, घृणा वाटायची, ते ज्या -ज्या गावांवर हल्ला करायचे त्या-त्या गावातल्यां लोकांवर अन्याय करायचे-तिथल्या स्त्रीयांवर अमानुष अत्याचार करायचे ! त्यांना सर्व मानवजातीला आपल्या सारख मुघल बनवायच होत.परंतु नियतीला हे मान्य नव्हत! मुळीच नव्हत.
उदरात माउली… रयतेस साउली…
गडकोट राउळी… शिवशंकर हा
मुक्तीची मंत्रणा… युक्तीची यंत्रणा…
खल दुष्टदुर्जना… प्रलयंकर हा
धगधगता लाव्हा मराठ्यांचा छवा ! मोडेल पन वाकणार नाही !
युद्ध्दांत नेहमी दोन बाजु असतात.वाईट- चांगला ! सत्य-असत्य .
मुघलांची बाजु वाईट प्रवृत्तीची आणि असत्याची होती.
तर छत्रपती शिवाजी महाराजांची बाजु चांगली,मदतकरु,सत्याची होती.
आपल आस्तित्व जपायच होत,स्वत:च हक्क प्रस्तापित करायच होत.
मुघलांनी जर ह्या भुतळावर आपला दम बसवला, ह्या धरतीवर राज्य करायला सुरुवात केली! तर बाकीच्या गोर-गरीबांवर हिंसक अन्याय! स्त्रीयांवर अत्याचार होतच राहील! आणी हे सर्वकाही महाराजांना मुळीच मान्य नव्हत ! महाराजांच्या मते प्रत्येकाला स्व्त:चा जगण्याचा आधिकार आहे! कोणीही दुसरा त्यावर हक्क प्रस्थापित करु शकत नाही! महाराजांनी ह्या निच ,राक्षसी प्रवृत्तीच्या मुघलां विरुद्ध
आपल्या विश्वासू सैनिकांन सहित लढा दिला. महाराजांनी मुघलांची
अशी काही पळता भुई थोडी केली, की महाराजांच्या नुसत्या नावाने
शत्रु थरथरायला लागायच!
" सिवा ! सिवा ! आगया ..हे अल्लाह ! अब तो तांडव मचायेगा वह!"
महाराजांच आगमन होताच ! मुघल राज्यांच्या भीतीने मुखातुन निघणारा हा वाक्य आहे ! मी मोठ्या गर्वाने सांगेल की इतिहासात श्रीमंतयोगी छ्त्रपती महाराजांना साक्षात तांडव करणा-या महादेवाचा अवतार मानला गेला आहे ! आणी ते सत्य आहे. जर आज भारतातला
प्रत्येक माणुस मोठ्या गर्वाने मान वर करुन जगु शकतो तर ते फक्त महाराजां मुळे!
राहाजगडच्या प्रजेवर आलेल संकट हे युद्धानेच मिटणार होत. सैतानी
क्रूर-विचार असलेल्या बुद्धीकरुंकडे, दया,माया,प्रेम ही भावना आस्तित्वात नव्हती. जर त्या सर्वांनी राहाजगडवर हल्ला केला..
तर मृत्युचा तांडव माजणार होता. मानवाची कत्तल होऊन रक्त,मांस चिखलाचा सडा चौही दिशेना घाण असहनीय वास पसरवत-पसरणार होता.आणि हे सर्व महाराजांना,रघुबाबांना थांबवायच होत.
मध्यरात्रीचे दोन वाजले गेलेले .बाहेर वर आकाशात काजळी फासल्यासारखा अंधार पसरला गेलेला,जणु च्ंद्राने सत्याची साथ सोडली होती. राहाजगड गावावर काले मेघ दाटुन आलेले.
एन मध्यरात्री गाढ झोपण्याची वेळ असताना! राहाजगडच्या प्रजेतली लोक घराची दार खिडक्या खोलुन अंगणात उभे राहीलेले.
आणी त्या सर्व प्रजेच्या घरांपुढुन एक सैनिकांची प्रभात फेरी निघावी तशी मोठी रांग मशालींच्या उजेडात पुढे चाललेली दिसत होती. प्रत्येक सैनिकाच्या शरीरावर काळ्या रंगाच चिळखत डोक्यावरही तशीच वार रोखणारी गोल टोपी घातलेली दिसत होती.कुणाच्या हाती मोठे भाले,तलवार,धनुष्य -पाठीवर बाण.तर मागुन एकापाठोपाठ मोठ-मोठ्या काळ्या रंगाच्या तोफा पुढे ढकलत नेताना दिसत होत्या.
आणी मागच्या सैनिकांकडे मोठ-मोठे पेटारे होते..ज्यात दारु गोळ्याचा साठा होता. राहाजगडची प्रजा बाई-माणस त्या पुढील सैनिकांकडे भेदरलेल्या अवस्थेने पाहत बसलेले..तर आप-आपल्या आई बापाच्या पाठीमागे लपुन बसलेली लहाण पोर,त्यांच्या भीतीने गंजलेल्या चेह-याकडे पाहुन सुन्न झाली होती. जणु त्यांनाही माहीत झाल होत, की काहीतरी भयाण अघटीत-विध्वंस घडणार आहे ! सैनिकांच्या पावळांचा, तोफांच्या चाकांचा मध्यरात्रीच्या त्या सुनसान वातावरणात मनात धडकी भरवणारा मृत्युधुन आवाज होत-होता. जो ऐकुन घरा-घरातल्या साडीने बांधलेल्या पाळण्यात झोपलेल तहाण बाळ , गळा फाडुन रडत होत.
त्याची माई अश्रु गाळत त्या तहान्या बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत होती परंतु ते रडन काही थांबतच नव्हत.

राहाजगड महालात युवराजांच्या खोलीत आरशासमोर ते स्व्त:हा उभे होते. डोक्यावर एक सोनेरी मुकूट- शरीरावर सोनेरी चिळखत चढवलेला ज्यावर सुर्याचा चिन्ह होत.हाताच्या दोन्ही बलदंड बाहूंवर ही वार रोखण्यासाठी काही सोनेरी चिळ्खतरुपी कडे घातलेले.
युवराज एकटक आरश्यात पाहत राहीलेले की मागुन मेघा आली.
" युवराज ! तुम्ही जायलाच हव का ?" मेघा काळजीपोटी उच्चारली.ह्या वाक्यावर युवराजांनी हळूच एक गिरकी घेतली. ओठांवर एक मंद स्मितहास्य आणत ते म्हणाले.
" मेघा , आज हाच प्रश्ण आपल्या सैनिकांच्या कुटूंबियांनीही त्यांना विचारला असेलच ना? त्यांची ही पत्नी आहे! माता आहे,मुल बाळ आहेत." युवराजांच्या वाक्यावर मेघाने चुकल्यासारखी खाली मान घातली. युवराजांनी हळूच आपला हात वाढवुन तिच डोक थोडवर केल.
"आमची काळजी करु नकोस! आम्ही परत येऊ !"
" नक्की!" मेघाचा स्वर जरासा खालावला ...ती रडणारच होती.
" आपल्या होणा-या बाळाची शप्पथ ! मी नक्कीच परत येईण!"
युवराजांनी बाजुला पलंगावर असलेली आपली तलवार उचल्ली.. तडक बाहेर पडले! मेघा एकटक त्यांच्या पाठमो-या आकृतीकडे पाहत बसली .
काहीवेळांनी वेशीवर .
राहाजगडच्या वेशीवर सैनिकांची युद्धाची तैयारी जोरात सुरु होती.
पाचशे सैनिक तोफ , हात तलवार,धनुष्यबाणांसहित उभे राहिलेले.
तर बाकीचे काही सैनिक इकडून तिक्डे फे-या मारत होते त्यांना काहीतरी काम सांगितल असाव!
बाजूलाच
युवराज-रघुबाबा दोघे कवचासमोर उभे पुढील दृष्य पाहत बसलेले..
विरूद्धी शत्रुची सेना जंगलातल्या झाडांच्या सावलीतल्या अंधारात स्तबध ऊभी होती आणी त्या सर्वांपुढे! ते तीन जण उभे होते.
पांढ-या चितेच्या राखेने माखवलेल्या शरीराचा रामु सावकार, बाजुला टक्कल पडलेल्या ढमाबाई-अंगावर एक हिरवीसाडी..आणी तिच्या बाजुला विश्वासघाती यार्वशी.
" बाबा ! तुम्ही लावलेला हा कवच किती काळापर्यंत टिकाव धरु शकेल . कारण तो पर्यंत आपली सेना युद्धासाठी जागेवर तैयार राहील.
" नाय युवराज ! ते काय सांगता येत नाय बघा ! कारण त्यांच्याकड मायाविनी हाई! आण तिच्यास्नी लेय इद्या ठावुक हाईत ! ह्यो कवच ती कस बी करुन तोडल!" रघुबाबा म्हंणाले. त्या दोघांच बोलण सुरु होत..की तेवढ्यात बाबांची नजर कवचा पुढे गेली.कोणीतरी बाहेरुन त्यांच्या दिशेने येत होत. तीन जण होती ती.
त्यातल्या एकाला युवराजांनी ओळखल जेव्हा तो अगदी समोरासनोर येऊण ठेपला.
"यार्वशी! .. निच ,कप्टी महाधुर्ता ! तुझ्याकडन हीच अपेक्षा होती मला ! कारण तुझ वागण मला पहिल्यापासुनच संशयित वाटायच." युवराज दात ओठ खात खुनशीपणे त्याच्याकडे पाहत म्हणाले.
परंतु जराशीही शरम,लाज,न बाळगता यार्वशी दात दाखवत निर्लज्जपणा दाखवत (खिखिखिखिखिखीखी) हसत सुटला.
" खिखिखी! मग सांगायच होत ना महाराजांना! ठेवला का त्याने तुझावर विश्वास खिखिखी! कसा गंड़वला ना इतकी वर्ष खिखिखी!..आता आला नाही वाटत .आमची सेना बघुन महालात लपून बसला का! खिखिखी!"
" एय चांडाळा गप्प बैस !" मध्येच रघुबाबा गरजले.
" काय हवय तुम्हाला! कशापाई हे संमद चालवल हाई !"
रघुबाबांच्या ह्या वाक्यावर यार्वशी पुन्हा दात विचकत हसला .
" थांबा , यार्वशी !" रामु सावकार आपल्या घोग-या भसाड्या आवाजात मध्येच म्हणाला. तसा यार्वशी हसायचा थांबला परंतु ओठांवरच ते कुत्सिक हास्य मात्र गेल नाही.
" आम्हाला राझगड महालात कैद केलेला येहूधी हवाय आणि!"
" आणि!" संशयितनजरेने रामु सावकाराकडे पाहत युवराज पटकन म्हणाले.त्यांच्या ह्या वाक्यावर रामुने गंभीर नजरेने युवराजांकडे पाहत आपला एक हात त्या कवचाच्या दिशेने वाढवला..हाताच्या पंज्याच्या तर्जनीला दोन सेकंदांसाठी त्या कवचावर टेकवल , त्या कवचावर
त्या तर्जनीचा स्पर्श होताच तांबड्या रंगाच्या ठिँणग्या उडाल्या..व रामु पुढे म्हणाला.
" आमचे मालक, ज्यांना अंधारराजक ,कालोखाचा सम्राट ,पिशाच्चराज म्हंटल जात ! ज्यांनी ह्या राहाजगड मध्ये मृत्युचा
थैमान पसरवलाय त्यांना !" रामु सावकार काहिक्षण थांबुन पुढे म्हणाला
" राहाजगडची यु:ज्ञी रुपवती हवीये! "
" ए ऽऽऽऽऽऽ" युवराजांचा स्वर उंचावला! आपल्या बाहिणीबद्दल बोललेल त्यांना खपल नाही संताप अनावर झाला.
" तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बाहिणी विषयी बोलण्याची! जो कोणि तुझा मालक असेल,त्याला माझ्या समोर आण! जिवंत गाडेल ह्या
राहजगडच्या सीमेवर त्याला.!" युवराजांच्या वाक्यावर रामु अगदी थंड नजरेने-ओठांवर कुत्सिक हास्य घेऊन एकटक त्यांकडेच पाहत राहिलेला.
" तुम्ही असं नाही ऐकणार! तुम्हाला सैतानाचा नंगानाच दाखवाला लागलच !"
" अर मंग दाखव की ! म्या बी बघतु कस नाचताव ते !"
रघुबाबा एक भुवई उंचावत ठसक्यात म्हणाले.
" अर मंग उघड की हा कवच ! येऊदे कि आत आम्हाला!"
" का र! तु काय दोन बापाचा हाईस का ? तुझ्यात दम नाय का ! तोडून ये की आत !"
रघुबाबा खुन्नस देत बोलले.
" आलोच बघ रे म्हाता-या ! आणी आल्यावर पैयले तुझा कसा काटा काढतो ना बघच तु " रामु सुद्धा चांगलाच संतापला होता.
" चला रे !" ते तिघेही यार्वशी,रामु ,ढमाबाई आल्या पावले निघुन गेले.
" बाबा ! रुपवतीला काहीही करुन राहजगड मधुन बाहेर काढायला हव ! माझ्या बाहिणीला मी कधीही त्या सैतानाच्या हाती लागु देणार नाही! "
" युवराज , धीर धरा तुम्ही ! अस काय बी होणार न्हाई बघा! म्या हाईना !" रघुबाबांनी युवराजांना धीर दिला. की तेवढ्यात दोघांच्या दिशेने..
XXXXXXXXXXX

समर्थांनी हलकेच आपले दोन्ही डोळे उघडले. समोर एक अक्ल्प्निय देखावा होता, होय अक्ल्प्नियच! वर आकाश गुलाबी ढगांनी भरुन निघाल होत..खाली चारही दिशेंना जमीन नसुन...
शुद्ध अस पाणी होत.जिकडे नजर जाईल तिथपर्यंत अथांग अस संथपणे एकाच जागेवर थांबलेल पाणि दिसुन येत होत..आणी समर्थ उघड्या पायांनी त्याच पाण्यावर उभे होते .परंतु खाली असलेल्या पाण्याचा स्पर्श त्यांना जाणवत नव्हता. अद्भूत चमत्कार! चारही दिशेना समर्थ आणी त्यांच्या पुढ्यात असलेल्या एका मानवी आकृती ह्या दोन आस्थित्वां व्यतिरिक्त तिथे पाण्याशिवाय काहीही नव्हत ,
" अप्पा! तुम्ही ?" क्रूणाल समर्थांच्या पुढ्यात समर्थ भट्टाचार्य उभे होते.
ज्यांनी समर्थांचा वारसा क्रूणाल ह्यांच्या हाती देण्या अगोदर कईक वर्ष सांभाळला होता ..पुढे चालवत ठेवला होता.
समर्थांच्या पुर्णत शरीरावर भगवे वस्त्र होते. गळ्यात वस्त्रांबाहेर काही रुद्राक्ष माळा घातलेल्या, गोल ,थोडस उभट तेजोमय चेहरा , आणि कपाळावर एक लाल टिळा! डोक्यावर टक्कल होत, आणि हेच त्यांच वर्णन होत. भट्टाचार्यांना लहान-थोर सर्वजन अप्पा म्हंणायचे! क्रूणाल ही त्यातलाच होता.परंतु क्रूणाल समर्थ भट्टाचार्यांचा लाडका होता. क्रूणालच्या अंगी असलेले चांगले गुण त्यास कारणीभुत होते. सत्य,असत्याची जाण, प्रेमळ स्वभावाने प्रत्येकाशी वागण-बोलण,मदतकरुला मदत करण! गरीबांवर कोण्या सामान्य मानवावर राग-लोभ-कोणाचाही तिरस्कार न करण! कोण्या पर स्त्रीकडे वाईट नजरेने न पाहण- ह्या सर्व चांगल्या गुणांचा क्रूणालमध्ये लहाणपनापासुनच अप्पांनी मोठे होईस्तोपर्यंत फरक जाणला होता..आणि समर्थांना त्याचा हाच स्वभाव आवडला जात त्यांनी आपला ह्या समर्थ वारश्याचा पुढील वारस म्हंणुन क्रूणालची निवड केली होती.
" अप्पा ..! "क्रूणाल समर्थ ! अप्पांचा (समर्थ भट्टाचार्यांचा) मोठ्या आनंदाने - डोळ्यांतुन आनंद अश्रु गाळत आशिर्वाद घेण्यासाठी खाली वाकले परंतु..अप्पांनी समर्थांचे खांदे पकडले!
" परक्या प्रमाणे चरण स्पर्श करतोस! "अप्पांनी मंद स्मितहास्य करत समर्थांकडे पाहिल व दोघांनी एकमेकांना मिठी मारली.
अप्पांच्या चेह-यावर आनंद झळकत होता, तर समर्थांच्या डोळ्यांतुन अश्रु गळत होते.
XXXXXXXXXXX
" बाबा ! रुपवतीला काहीही करुन राहजगड मधुन बाहेर काढायला हव ! माझ्या बाहिणीला मी कधीही त्या सैतानाच्या हाती लागु देणार नाही! "
" युवराज , धीर धरा तुम्ही ! अस काय बी होणार न्हाई बघा! म्या हाईना !" रघुबाबांनी युवराजांच्या खांद्यांवर हात ठेवत त्यांना धीर दिला. की तेवढ्यात त्या दोघांच्या दिशेने, दोघेही असावधान असतांना एक आगीचा मोठा गोळा वेगाने चालून आला . युवराजांनी प्रसंगसावधानता दाखवून वेळीच बाबांना थोडदूर ढकल्ल , व एक मोठा आवाज होत तो आग्निगोळा कवचावर आदळला. त्या आवाजाची तीव्रता इतकी जबरदस्त होती.की त्या युवराजांच्या कानांत विशिष्ट प्रकारचा आवाज (गुंनऽऽऽ) आला जात कानांच्या नसा काही सेकंदांसाठी बधीर झाल्या ,पडदे आतल्या आत ओढले गेले.डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखी झाली. एक दोन क्षण ते पापण्या उघडझाप करत जमिनीकडेच पाहत राहीले.रघुबाबा हलकेच युवराजां जवळ चालत आले.त्यांनी युवराजांना आधार देत कवचापासुन थोडदुर नेहायला सुरवात केली. युवराजांच्या काळजीपोटी कोंडूबा एकदोन सैनिकही त्यांच्या जवळ धावुन आले. युवराजांना तुम्ही ठिक आहात का हे विचारु लागले परंतु युवराजांना आवाज येतच नव्हता.फक्त मंद गतीने सर्वांची शरीराची होणारी हालचाल दिसत होती. युवराजांना रघुबाबांनी हळकेच
बाजुला समोर एक तंबु दिसत होता-त्या तंबूत आणल. तंबूत समोर एक लाकडी बाक-आजुबाजुला तलवारी भाले,दारु गोळ्याच्या पेट्या ठेवलेल्या दिसत होत्या.
" युवराज ठिक आहात का तुम्ही?" रघुबाबांच्या बोलण्याचा आवाज अगदी टिव्हीचा आवाज रिमोटने एक पासुन दहा पर्यंत वाढवावा तसा ऐकू येऊ लागला.थोड हळकेच प्रथम आवाज , नंतर शब्दांची रचना, आणि मग ते शब्द समजले! आजूबाजुचाही गोंगाट ऐकु येऊ लागला..
त्यातच एकापाठोपाठ..काहीक्षणापूर्वी ज्या आवाजाने युवराजांची जी परिस्थी झाली तोच आवाज आता पाठोपाठ ऐकु येत होत्ता...ह्याचा अर्थ
शत्रुने वार करायला सुरुवात केली होती.
" बाहेर युद्ध सुरु असताना ! मला इथे का घेऊन आलात तुम्ही !"
युवराज रघुबाबांकडे पाहत उठले.डोळ्यासमोर अद्यापही अंधारी येत होती.
" अव पन तुम्हास्नी " रघुबाबा पुढे काही बोलणार तोच मध्ये युवराज म्हणाले.
" मला..! मला काहीही झालेल नाहीये! एकदम सुखरुप आहे मी ,चला !" युवराज अस म्हंणतच रघुबाबा , सैनिकाना मागे सोडत तंबूतुन बाहेर आले.त्यांच्या मागोमाग बाबा ते सैनिक सुद्धा बाहेर आले . युवराजांनी तो गोळा ज्या दिशेने आलेला त्यांनी लागलीच त्या दिशेला
पाहिल.कवचाबाहेरुन शत्रुअसलेल्या दिशेने आगीचे तांबड्या रंगाचे आग्निगोळे अगदी एका अक्राळ विक्राल राक्षसा सारखे हसत वेगाने
येत होते ,कवचावर आदळत होते. जमिनीत रोवलेल्या त्या दोनफुटी काठ्या आता पुन्हा एकदा तांबड्या निखा-यांसहित उजळून निघाल्या होत्या. रामु,यार्वशी,ढमाबाई,ह्या सर्वांना दुरुन पाहता त्या काठ्या दिवाळीत कठड्यावर टिवळ्या लावल्याप्रमाणे दिसत होत्या. त्या तांबड्या रंगाने पेटलेल्या काठ्यांमधुन एक पातळसा पारदर्शक तांबड्या रंगाचा पडदा रुपी कवच निघाला जाऊन आकाशापर्यंत पोहचलेला होता.ज्याच्या उजेडाने सर्वकाही दिवस असल्याप्रमाणे तर नाही , परंतु
स्पष्ट मात्र दिसत होता.
" हे अग्निगोळे फार भयंकर आहेत नाही ! ह्या गोळ्यांनी कवच तूटणार तर नाही ना बाबा !" कोंडूबा म्हणाले.त्यांच्या ह्या वाक्यावर बाबा जरासे हसलेच .
" अर कोंडू! बाजारात फटाक्यांच फुसक माल बी भेटत रे तेच हाई हे ! ह्यान माझ्या कवचावर साध खरुज भी फुटणार नाय बघ! आण ह्यांचा मालक बी माझ्यासमोर असंच फुसक निघणार हाई" रघुबाबांच्या ह्या वाक्यावर कोंडूबासहित बाकीचे सैनिक खोखो करत हसले,चौही दिशेना जोरदार हशा पिकला.

XXXXXXXXXXXX
एक सफेद रंगाच्या भिंतींची खोली दिसत आहे..आणी त्या खोलीत हवेत चार काठ्या चांदेरी रंग सोडत तरंगत असुन त्या काठ्यांमधोमध एक चौकोनी आकाराचा जादूई पांढ़रट पडदा दिसत होता. त्या पांढरट पडद्यावर राहाजगडच युद्ध दिसत होत.
"अर कोंडू! बाजारात फटाक्यांच फुसक माल बी भेटत रे तेच हाई हे ! ह्यान माझ्या कवचावर साध खरुज भी फुटणार नाय बघ! आण ह्यांचा मालक बी माझ्यासमोर असंच फुसक निघणार हाई"
मग रघुबाबा ,कोंडूबा- राहाजगडचे सैनिक हसताना दिसत होते.
त्या विशाल पडद्यासमोर थोड दुर एक खुर्ची दिसत होति आणि त्या खुर्चीबाजुला दोन दुधाळ त्वचेच्या अप्सरा उभ्या होत्या.रिना आणि शलाकां..! त्या दोघींमध्ये खुर्चीवर बसलेला अंगात एक काळा कोट,आत एक पांढरट सदरा,गळ्यात ताठ लाल -काळ्या रंगाची कॉलर, कॉलर ला जोडुन असलेला लाल कापड खुर्चीवरुन मागे जमिनीला टच झालेला..खाली काळी पेंट व पायांत दोन चकचकीत बुट! v आकाराचा पांढरट तेजोमय चेहरा, आणी वाढलेले केस मागे डोक्यावर चोपुन बसवलेले.तो द्रोहकाल होता.
" हा म्हातारा जरा जास्तच बोलतोय नाथ ! " रिनाने द्रोहकालकडे पाहिल.त्याच्या चेह-यावर क्रोधाची एक रेषा सुद्धा नव्हती,उलट लाल ओठांवर एक कुत्सिक हास्य होत!
" नाथ ! तुम्ही काही बोलत का नाही आहात ?" ह्यावेळेस शलाका म्हणाली. तिच्या ह्या वाक्यावर द्रोहकाल पुढे पाहतच उच्चारला.
" अजुन खर युद्ध सुरु झालंय कुठे ! ही तर बस्स सुरुवात आहे !"
द्रोहकाल काहीक्षण थांबला व पुढे म्हणाला.
" मायाविनी !" काहीच झाल नाही" मायाविनी !" " द्रोहकालच्या दुस-या हाकेसरशी त्या खोलीतल्या सफेद भिंतीवर खालून वर पर्यंत लाल रंग पसरु लागला. पुर्णत खोली लाल रंगात बदलुन गेली. एक हलकासा आवाज येऊ लागला.(का ,का,का,का) कावळ्याच्या ओरडण्याचा. तो आवाज आता वाढला कर्णकर्कश होऊ लागला आणी त्या खोलीत बाहेर पडणा-या दारातून एक मोठा पाचफुट काळ्या रंगाचा , लाल डोळ्याचा कावळा पंख(झपाझपा) फडफडवत आत आला ! आणि पडद्यावर बसला.त्या कावळ्याचा
स्पर्श पडद्याला होताच त्या पडद्यावरुन खाली लाल रंग सांडू लागल ..तो पांढरट पडदा लाल रंगात बदलला.
" जी हुकूम द्रोहकाल !" कावळ्याच रुप घेऊन आलेली मायाविनी किन्नरी आवाजात कावळ्याच्या रुपातच म्हणाली.
" रामुची शक्ति ! कमी पडतीये ! कारण तो म्हातारा भलताच ताकदवर आहे! त्याच्या शक्तिने लावलेला तो कवच हे भेदू शकणार नाहीत!
म्हंणुनच तु तिथे जा! " द्रोहकालने हुकुम सोडला.
" जशी आपली आज्ञा ,द्रोहकाल !" त्या कावळ्याची चोच हल्ली त्यातून किन्नरी स्वर बाहेर पडला.
" आणि एक लक्षात ठेव , तांडव माचव सर्व दिशेना ! मृत्युचा तांडव !"
द्रोहकालच्या लालसर ओठांवर पुन्हा ते कुत्सिक हास्य आल.
तसा तो पाचफुटी कावळा (का,का,का )पंख -पंख फडफड करत,(का,का,का,)ओरडत खोलीतुन बाहेर निघुन गेला.
XXXXXXXXXXXX
काहीवेळाने समर्थांनी अप्पांना मारलेली मिठी सोडली.
" अप्पा तुमची खुप आठवण येतो हो!" समर्थांचा आवाज भावनेच्या कचाट्या खाली सापडला जात गहिवरला गेला! घशातुन स्वरासहीत खर-खर बाहेर पडू लागली.
" आधी अश्रु पुस पाहू ! आणी आवाज कणखर असू दे! " अप्पांनी हळूच लहान मुलासारखे समर्थांचे डोळे पुसले.
" बाळ क्रूणाल! भावनेच्या बोज्याखाली जाऊ नकोस.तु आता लहान
नाहीस !" अप्पांच्या वाक्यावर समर्थांनी फक्त होकारार्थी मान हलवली .
" माफ करा अप्पा! " समर्थांनी डोळे पुसले.
" पन अप्पा! तुम्ही इथे कसे आलात !"
समर्थांनी विचारल.
" तुला वाचवण्यासाठी!"
" कायऽऽऽ" समर्थांचा शेवटचा स्वर जरासा उंचावला .
" परंतु आम्ही "
" शांत हो!" अप्पांनी मध्येच समर्थांना आडवल.
" क्रूणाल! आम्हाला ठावुक आहे की तु अद्याप नवीन आहेस! जर तुझ्यावर काही संकट आलच तर तु आपल्या शक्तिंनी त्यांना रोखशील.परंतु प्रत्येक वेळीस जादूई शक्तिच कामी येइल अस नसत! कधी-कधी आपन काय करत आहोत-त्या करण्याने आपल्या कृतीने पुढे काय घडेल कय नाही ह्याचा सुद्धा तपास करायचा असतों! अम्हाला ठावुक आहे , की तु इथे मायाविनीला कैद करण्याचा उपाय शोधण्यासाठी आला आहेस! जे की येहूधीला ठावूक आहे !बरोबर ना ?"
समर्थांनी आप्पांच्या वाक्यावर आश्चर्यकारकपणे होकारार्थी मान हलवली.
XXXXXXXXXXXX
" सावकार आपल्या गोळ्यांचा त्या कवचावर काहीच अपेक्षित अस परिणाम होत नाहीये ! पहा ना ती सर्वजण हसतायेत आपल्याला ! "
रामु सावकार आपले दोन्ही हात एका फुटबॉल हाती धरुन ठेवावा तसे
करत होता आणि मग हळुच डोळे बंद करुन काही विशिष्ट प्रकारचे मंत्र म्हंणत होता-ज्या मंत्राने रामुच्या हाती एक आग्नि गोळा तैयार होत-होता.
" खर आहे तुमच यार्वशी ! हा म्हातारा भलताच ताकदवर दिसतोय !
ह्या साधारणश्या गोळ्यांनी फक्त माणूस मरल, पन हा कवच तुटणार नाय!"
" मंग आता ! काय करायच्ं? " ढमाबाई म्हणाल्या. तिच्या ह्या वाक्यावर रामुने हळकेच
" शुश्श्श! कसलातरी आवाज येतोय बघ !" रामु सावकाराने आपले दोन्ही डोळे छोठे केले..कान हळूच टवकारले .

इकडे राहाजगड वेशीवर.
"बाबा ! त्यांच वार थांबल बघा ! घाबरल वाटत सैतान !" एक सैनिक पुढे कवचाच्या दिशेने आनंदीत होत पाहत म्हणाला. कारण मगाचपासन येणारे आगीचे गोळे थांबले गेलेले. हे पाहुन बाजूचे सैनिक जल्लोष करु लागले.परंतु रघुबाबा मात्र एकटक त्या कवचापल्याड पाहत होते.
" शुश्श्श्श! गप्प रहा र संमदी!" रघुबाबांनाही कसलातरी हलकासा मंद असा आवाज येत होता-धोक्याची घंटी टण-टण करत वाजत होती .
" संमदी तैयार रहा ! धोका टळला न्हाईऽऽऽऽ, " रघुबांबांचा स्वर उंचावत" आलाय .." म्हंणत खालावला.
हेलिकॉप्टरच्या मशीनगण मधुन जशा हजारो गोळ्या तांबड्या रंगाच्या निखा-यांसहित ठिंणग्या उडवत टाळांचा ठण,ठण आवाज होत शत्रुच्या ठाव ठिकाण्यावर पडाव्या... तशाच सेमहुबेहूब राहाजगडच्या जंगलावरुन काळ्या रंगाचे लाखो कावळे( काव,काव,काव) मेघगर्जना करत -पूर्णत आकाश भरुन, नांद घुमवत , फडफड पंख फडवत वेगाने उडत आले , आणि धाड,धाड चिता आग्नित आपल देह जशी अर्पण करत पेट घेते, तश्या त्या कावल्यांनी एकापाठोपाठ आपल देह त्या कवचावर झोकून दिल, लाईटच्या दोन तारांचा संपर्क होताच जश्या ठिंणग्या उडाव्या तस त्या कावळ्यांच्या शरीराचा स्पर्श कव्चाला होताच त्यांच संमंद शरीर गरम निखा-यांसहीत, नाक तोंडातुन वाफ सोडत ताड-ताड, झटके देत पेट घेऊ लागला! वर आकाशात काळा धुर आणि खाली केस,मांस होरपळणारा, भयान ओकारी आणणारा दुर्गंध पसरला जाऊ लागला. पुढील दृश्य पाहुन ज्याच्या त्याच्या अंगाचा थरकाप होत-होता. सरसरुन काटा उभा राहत होता..मुळाच्या देठापासुन! पोटात ढवळून येत होत.कुजकट वासाने काही सैनिकांन पोटात मळ-मळत उलट्या होऊ लागल्या.
" बाबा ! काय आहे हे ?" युवराजांनी बाबांकडे पाहिल.परंतु ते इतकेच म्हणाले.
" ती आली युवराज ! ती आली!" रघुबाबांच्या चेहराही जरासा घाबरल्यागत झाला .
" कोण! आली बाबा ! "
" मायाविनी!"रघुबाबांच्या तोंडातुन जस हा वाक्य निघाला! त्याच-त्याक्षणी कवचावर आकाशात दोन ढगांच जोरदार मिळन झाल..आणि त्या दोन ढगांच्या घर्शणाने ..एक वाकडी तिकडी निळी वीज नखरेल लावण्यवतीसारखी ,चमचमणा-या नागीप्रमाणे वाकडे-तिक्डे वळण घेत खाली येऊन थेट त्या कवचावर डसली..
मग त्या कवचावरुन एका पाळीसारखी चिकटून सळसल वेगाने धावत खाली येऊन थेट त्या जमिनीत रोवलेल्या काठ्यांच्यात घुसली..
रस्त्यावरचे दिवे जसे एकापाठोपाठ फुटावे! तश्या त्या निखा-यांनी पेटलेल्या काठ्या खालून वरपर्यंत जाल काढत जागेवर चिंधड्या उडवत फुटल्या. राहाजगडचा रक्षणकरता , ज्याने इतकावेळ चौहीदिशेने राहाजडला आपल्या रक्षण मिठीत घेतल होत...तो आता अंत पावला होता .रघुबाबांचा कवच अंत पावला होता.आता कोण वाळी असणार होता प्रजेच्या रक्षणकरत्यांचा चौहीदिशेनी अंधारातुन कोठूनही हल्ला होऊ शकत होता.मृत्यु अंधारातुन कसा जबडावासुन घास घेईल काही सांगता येत नव्हत.

XXXXXXXXXXXXX

" क्रूणाल,!येहूधी कोणि साधारण राक्षस नाही! मायाविनीचा चेला आहे ..तो !

ह्या धरतीवर मायाविनी नंतर कोणी असीम शक्ति असलेला जादूगार असेल ,

तर तो येहूधी आहे ! आणी त्याची व


तुझी भेट होण नियतीला मान्य नाही! "
" परंतु अस का?"" काही प्रश्णांची उत्तर ,न मिळालेलीच बरी असतात क्रूणाल ! त्यातलाच हा आहे !"


" मग अप्पा ! मी राहाजगडला कसा वाचवु!


जर मला मायाविनीला रोखण्याच उपायच ठावुक नसेल"समर्थांच्या ह्या वाक्यावर अप्पा एकटक त्यांच्याकडेच पाहत होते.
त्यांच्या मनात न जाणे काय सुरु असेल-हे ओळखण असंभव होत.
समर्थ एकटक अप्पांकडे पाहत बसलेले त्यांना खात्री होती की अप्पा काहीतरी बोलतील !

XXXXXXXXXXXXXX
कवचाखाली असलेल्या काठ्या,त्यांना बांधलेला लाल-पिवळा दोरा सर्वकाही राखेत रुपांतरीत झाल होत. त्या राखेपासुन पन्नासमीटर अंतरावर युवराज एका मोठ्या धारधार शिंग असलेल्या गाडीत उभे होते-खांद्याला धनुष्य बाण अडकवलेल तर खाली हातात तलवार होती. गाडीचा चालक म्हंणुन संत्या बसला गेलेला. गाडी बाजुला खाली जमीनीवर रघुबाबा हातात एक काठी घेऊन होते , आणि युवराज रघुबाबा दोघांमागे सातशे सैनिकांची फौज ऊभी होती. त्यातले काहीतरी बिथरले , घाबरले होते..भय त्यांच्या चेह-यावर दिसत होत.

विरुध्द शत्रुच्या सेनेपुढे यार्वशी,पांढ-या फट्ट राख फासलेल्या शरीराचा रामु तर त्याच्या बाजुला, टकल्या ढमाबाई उभ्या होत्या. वर आकाशातुन
एक पाचफुट कावळा हळूच त्या तिघांपुढे पंख फडफडवत खाली जमिनिवर आला. पाचफुट जाडसर काळ्या केसांचा, एक लालसर टपो-या डोळ्याचा आणि धारधार नख असलेल्या पायाचा हा कावळा पाहुन राहाजडच्या सैनिकांनी घशातुन आवंढा गिळला.
" बाबा अंधारात युद्ध करण आपल्याला जमणार नाही! प्रकाश लागेलच! तुम्ही काही करु शकता का " युवराज बाबांजवळ येत म्हणाले .
" व्हिइ! खर हाई तुमच युवराज ! एकवेळ ही सैतानाची सेना अंधारात पाहू शकते ..पन आपले सैनिक अंधारात पाहू शकणार नाहीत! " बाबांनी अस म्हंणतच ! हातात असलेली ती काठी तो हात छातीच्या दिशेने आणत डोळे बंद केले व तोंडातुन मंत्र म्हंणु लागले.
" उजळव ,वळजउ! शकाआ, आकांश " रघुबाबांनी अस म्हंणतच खाडकन डोळे उघडले- त्यांच्या दोन्ही बुभळांचा रंग विजांसारखा निळसर झालेला, डोळ्यांत वाकड्या तिकड्या विजा सळसळत होत्या ..बाबांनी हातवर करत ती सरल काठि वर आकाशात उंचावली. तसा त्या काठीच्या पुढच्या टोकातुन वाकड्य तिकड्या निळसर प्रकाशीत विद्युत किरणांचा साठा वेगाने आकाशाच्या दिशेने वर झेपावला जात पुर्णत आकाश उजळून निघाल. चौहीदिशेना उजेडपसरला. त्या कावळ्याच्या रुपात आलेली मायाविनी
एकटक रघुबाबांच्या हातात असलेल्या त्या काठीकडे लाल चमकील्या डोळ्याने पाहत राहीलेली..की तेवढ्यात ती.
" सैता ,सैता ! .." त्या कावळ्याच्या मुखातुन एक किन्नरी आवाज बाहेर पडला.त्या आवाजासरशी जंगलातली झाड थर-थरु लागली..कापू लागली..! झाडांचा वरचा शेंडा थरथरु लागला. झाडाची पाने खाली जमिनीवर गोल-फिरत थव्यासारखी पडू लागली. खालची माती आणी त्यावरचे पिवळे खडे थर थर करत नाचु लागले..!
एकच नांद घुमला..! " चांडाळ...चांडाळ...! येलगार ..! येळगार!"
थव्या थव्याने काळे कपडे घातलेली सैतानाची सेना धाड-धाड पावले वाजवत मालकाचा हुकूम मिळताच वार करण्यास धावली होती.
पुर्णत राहाजगडच्या जंगलातली झाडे सळ-सळत हालत होती! एकापाठोपाठ एक-एक सैनिक चित्कारत जंगलातून बाहेर पडत होता
त्यांची उंची,त्यांच देह-संख्यापाहुन राहाजगडची सेना भीतीअंगलट झाल्यासारखी कापू लागली! सर्वांना आपल्या डोळ्यांसमोर मृत्यु उभा दिसला ! यम जणु सैतानाच्या रुपात प्राण हरण करायला आला आहे!
पुढुन येणा-या सैतानाच्या सैनिकांच्या पावलांचा आवाज मनावर मळभ पसरवत होता की काय , राहाजगडची सेना युद्ध न करताच मृत्यु पत्कारल्या प्रमाणे स्त्ब्ध ऊभी राहीली होती..! आता कय होणार? देव तर मदतीला धावुन येणार नव्हता? आता ते सर्व मृत्युचा घास बनणार का?
की तेवढ्यात....
ढोलताशे ,नगारे वाजले ,
सनईचा सुर जसा वा-यावर चढला..
बाणांचा सुर घुमू लागला....सर्र ,सर्र ..सुई .सुई..हवेला कापत एक बाण अगदी वेगाने हवेतुन...राहाजगडच्या सैनिकांच्या डोक्यावरुन जात.. पुढुन धावत येणा-या एका सैतानी समर्थकाच्या डोक्यात घुसला..! तसा निर्जीव वस्तुप्रमाणे तो आठफुटी सैनिक खाली जमीनदोस्त झाला.
रघुबाबा,युवराज,बाकीच्या सैनिकांच्या मानाही ढोलताशे , वाजण्याचा आवाज ऐकुन गर्रकन मागे वळल्या. तस त्या सर्वांना पुढील दृष्य दिसल. राहाजगडचे महाराज श्री: दारासिंह उर्वरीत पाचशे सैनिकांसहित तिथे युद्धाचे वस्त्र परिधान करुन आलेले-आणि त्यांच्या हातात धनुष्य असुन एक डोळा बंद केलेल्या अवस्थेत ते उभे होते..ह्याचा अर्थ तो बाण त्यांनीच सोडला होता.
सनई ढोल ताशे रोमांचक कारक सुर घुमवत प्रत्येक सैनिकाच्या अंगावर शहारा आणत वाजत होते.
" सैनिकहो तैयार !" महाराजांचा आवाज चौहीदिशेना घुमला !
त्यांच्या ह्या वाकयासरशी ! त्यांच्या डाव्या आणि उजव्याबाजुला पन्नास-पन्नास अशे मिळुन एकुण शंभर सैनिक हातात धनुष्य घेऊन उभे राहीले. महाराजांनी आपला बंद मुठीचा डावा हात वर केला..! तसा त्या सर्व सैनिकांनी बाण धनुष्यात अडकवला. महाराजांनी आता मुठ खोल्ली आणी पाचही बोटांचा पंजा सरळ केला! तसा इकडे सैनिकांनी एक डोळा बंद करत धनुष्यबाणाची दोरी मागे खेचली! वाट पाहु लागलेली पुढील आंतिम इशा-याची. समोरुन काळ सेना चित्कारत वेगाने ह्या सर्वांच्या दिशेने मोठ-मोठ्या ढेंगा टाकत , हातात धारधार हत्यार घेऊन
त्यांचा घास घेण्यासाठी येत होते. महाराजांनी एक धारधार कटाक्ष त्या सर्वांवार टाकला आणी आपला दुसरा हात प्रतिज्ञा बोलतावेळेस उंचावतात तसा केला -रघुबाबा युवराज,पुढील सैनिकांकडे पाहत
हळुच खाली केला..! मायाविनी,यार्वशी,ढमाबाई,रामु सर्वजण कुत्सिक
हसत पुढील दृश्य पाहुन आनंदीत झाले होते ! कोणत्याही क्षणी त्यंचे सैनिक पुढील राहाजगड सैन्याला धारातीर्थ,म्रुत्यूच्या मुखात लोटणार जे होते. की तेवढ्यात त्यांना दिसल ..राहाजगडचे युवराज रघुबाबा-आंणि आजुबाजुला असलेली सैनिक खाली झुकली , दोन पायांवर बसली.
महाराजांनी वर धरलेला सरळ हात थोडासा वाकवला ! तसा अंतिम इशारा समजुन सर्व सैनिकांनी ..धनुष्याची दोरी सोडली..!
वातावरणातला काळ गोठला..
सेक्ंदाचा काटा घड्यालातुन
गायब झाला..! 25xच्या गतीने सर्वकाही घडू लागल.
सप सप बाणाची पात हवेला कापत भिंगरीसारख भिंगत , खाली बसलेल्या सर्व सैनिकांच्या चेह-यावर सावली पाडत दोन फुटांवरुन अगदी स्लोमोशनने सर्वांना रागावलेल्या मधमाश्यांसारखी जाताना दिसली..जो तो सैनिक डोळेफाडुन वरुन सप-सप हवेला कापत जाणा-या बाणांना डोळे फाडुन पाहत बसलेला. पुढुण येणा-या सेनेला ह्या सर्वाची कल्पनाही नव्हती...की तोच त्या सैतानी सैनिकांच्या काळजात,डोळ्यांत,डोक्याची कवटी फाडून,ते बाण अगदी वेगाने घुसु लागले. एक-एक सैनिकाचा देह निर्जीव वस्तीप्रमाने जमीन दोस्त होऊ लागला.मायाविनी, रामु,ढमाबाई,यार्वशी सर्वांच्या चेह-यावरच हसु झटकन मावळल आता तिथे आश्चर्यकारक भाव पसरले.
शंभर सैनिकांचे बाण संपताच ! ते सैनिक खाली बसले ! आणी मागे
बाण आडकवून आधीच तैयार असलेल्या सैनिकांनी पुन्हा स्प-स्प आवाजकरत बाण सोडले..व पुढुन येणा-या सैनिकांना म्रुत्युच्या घाटात उतरवल! प्रेतांच ढीग नी ढीग तिथे साचला गेला. परंतु त्या काळसैन्याची
हिम्मत,एकसेकंदासाठीही खालावली नाही ! गरजत ,चित्कारत ,हेल काढत मोठ्या संख्येने ते धावुन येतच होते.
" सैनिकांनो ! " महाराजांचा पुन्हा आवाज घुमला" बाण थांबवा! "
महाराजांनी अस म्हंणतच त्यांचे सैनिक बाण चालवायचे थांबले.
महाराजांनी फक्त एक कटाक्ष युवराजांकडे टाकला,धारधार नजरेने
मान खालीवर केली.तो इशारा युवरजांना समजला.युवराज खाडकन आपल्या जागेवर उभे राहीले.
" उठा माझ्या शूरवीरांनो ! " युवराजांचा गडगडाटी आवाज घुमला.
" आता वेळ आलीये! आपल्या सर्वांच रक्त गाळुन, आपल्या राहाजगडच रक्षण करण्याची! " युवराजांच्या ह्या छोठ्याश्या वाक्यावरही राहाजगडच्या सैनिकांच्यात आत्मविदारक विश्वास उतपन्न झाला! प्रत्येकाची छाती फुगवून आली.(धड,धड !) आवाज करत ढोल वाजत होते,सनईचा रोमांचक सुर,अंगावरचे केस रोमांचकपणे ताठरले गेलेले.एक-एक करत खाली बसलेले सैनिक उठुन उभे राहीले..
" हर-हरऽऽऽऽऽऽऽ! "एका सैनिकाच्या मुखातुन ह्या वाक्याचा स्वर अगदी कंठाच्या देठापासुन निघाला."महादेवऽऽऽऽऽ" एकसाथ सर्व सैनिक एकदाच ओरडले! धरती पावण होऊन उठली!
" आक्रमण!" युवराजांनी आपल्या तलवारीच्या पातीला पुढे करत,
आपल्या शूरसैनिकांना युद्धाचा आदेश सोडला. संत्याने हळूच रेड्यांची
दोरी ओढली..! तसे दोघे शिंग हलवत..पुढे धावु लागले.आणि त्या गाडीमागुन राहाजगडची सेनाही पिसाळलेल्या वाघासारखी धावुन आली. तलवारीच्या पातिंचा घासण्याचा आवाज चौहीदिशेना घुमू लागला.राहाजगडचे सैनिक आणी सैतानी सैनिकांची चांगलीच जुंपली गेली.
एका राहाजगडच्या सैनिकाने हातातली तलवार त्या भल्यामोठ्ठया
पहाडी राक्षसाच्या पायावर मारली , तसा तो काळे कपडे घातलेला ..
सैतानी समर्थक विव्हलत खाली झुकला..हीच संधी साधुन त्या राहाजगडच्या सैनिकाने हातातली तलवार वर हवेत उंचवली आणि वेगाने खाली आणत त्या सैतानाची मान धडापासुन वेगळी केली..
" आ.आ..!" तो सैनिक जल्लोष करु लागला की तेवढ्यात त्याच्या...छाताडातुन एक जाडसर तलवार रक्ताच्या चिळकांड्या उडवत बाहेर आली. मागे एक सैतानी समर्थक उभा होता.की त्याच्या पुढे कोंडूबा येऊन उभे राहीले..त्यांच्या हातात तलवार होती.

" काय रे हरामखोर ! मागुन वार कराचं ले हौस असाना! ये की माझ्या स्ंग खेळ!" कोंडूबाने त्या समर्थकाला खुन्नस दिली.जे ऐकुन तो चेकाळला.
" ये! म्हाता-या !" त्या सैनिकाच्या तोंडून एक गरजाना युक्त आवाज निघाला.त्याने हातातली ती जाडसर तलवार हवेत उंचावली...आणि कोंडूबाच्या दिशेने धावत सुटला.आजुबाजुला दोन शत्रु सैनिक एकमेकांना भिडत होते.तलवारीचा खलखलाट चौही दिशेना माजला होता.ते सैतानी समर्थक राहाजगडच्या सैनिकांना कापसाच्या बाहुल्यासारखे वर उचलुन जमिनीवर आपटुन ठार करत होते.
कोंडूबा एकटक त्या पुढुन येणा-या सैनिकाला पहू लागले , तलवार हवेत धरुन तो कोंडूबाचा शिरछेद करण्यासाठी पुढे-पुढे येत होता.
पाच-सहा पावल चालून तो कोंडूबा जवळ पोहचला, हातातली
तलवार वेगाने खाली आणली...परंतु तलवार खाली येण्या अगोदरच
कोंडूबा...अगदी शिताफीने शरीराची हालचाल करत वेगाने खाली झुकले ..! हातातल्या तलवारीची पात पोट फाडुन केव्हाची आत घुसुन गेली होती.त्या सैनिकाच निर्जीव शरीर आता कोंडूबाच्या खांद्यावर मीठी मारल्यासारख पडल होत.
यार्वशी X कोंडूबा युद्ध ..


" वाह कोंडूबा वाह ...खुप छान ! " कोंडूबांनी पुढे पाहील..समोर यार्वशी खुनशीपणे त्यांच्याकडेच पाहत उभा होता." अहो कोंडूबा , जरा आमच्या संग बी खेळा की!"
" अर खेलतो की ! लेय वर्षाचा हिशोब चुकता करायचाये !"
कोंडूबाने त्या सैनिकाच्या पोटातुन आपली तलवार स्प्पकन उपसून बाहेर काढली..! आणि बाजुलाच त्याच प्रेत धक्का देत खाली पाडल.
" लेय खाज हाई तुझ्या अंगात रांxxच्या ! " यार्वशी ...अपशब्द वापरत म्हणाले.
" काय करनार ! मर्द हाईना मी! बायल्यांवाणि मागुन वार करत नाही!
इथ " कोंडूबाने छाताडावर हात मारल." इथ छाताडावर वार करतु!"
कोंडूबा हसले.त्यांच्या ह्या वाक्यावर यार्वशी मात्र चेकाळला ,त्याचा अहंकार उफाळून .. उठला! दोघांच्याही तलवारी एकमेकांना घासल्या गेल्या.


रामु, ढमाबाई, कावळ्याच रुप असलेली मायाविनी तिघेजन एकसाथ युद्धांचा आनंद घेत उभे होते.
" रामू!" मायाविनी म्हणाली.
" जी!"
" आपले सैनिक त्यांच्यावर भारी पडु राहीलेय ! " रामु कुत्सिक हसला "पन हे युद्ध हाई रामु ! खेळ कस पलटल ! सांगु शकत नाय ! " रामुचा पांढरा चेहरा गंभीर झाला ! मले एक काम करायच हाऊ , ह्या गावांन एक , मसान हाऊ ! त्या मसणातले मूडदे जागवायचे हाऊ! त्यांना झोपेतुन उठवायच हाई मले !"
" जी ! तुम्ही इथली काळजी करु नका .म्या हाई इथच !" रामु म्हणाला.
"ठिक हाई म्या आलीच!" मायावीनीने आपले काळे पंख फडफडवले ..
उडून गेली..इकडे रघुबाबा हे सर्व पाहत होते! त्यांना आपल्या शक्ति मार्फत कानांनी सर्व काही ऐकु आले होते.. कानांत धोक्याची घंटा वाजत होती, सतर्कतेचा इशारा मिळत होता.रघुबाबा महाराजांन ज्वळ पोहचले.
" महाराज! "
" जी बाबा !"
" ती मायाविनी इथ आली हाई! "
" काय!" महाराज जरासे ओरडलेच.
" व्हिई! आण ती राहाजगडच्या मसनातल्या मेलेल्या पिरतांची झोप मोडाया गेली हाई! आण जर कधी..तिने त्या मुर्द्यास्नी उठिवल.तर हाहाकार माजल " रघुबाबा..
" मग बाबा ! आम्ही लागलीच आमचे सैनिक घेऊन तिथे पोहचतो..आणि !"
महाराज पटकन म्हंणाले.
" नाही महाराज! तिच्या शक्ति समोर मानवाच्या कुठल्या बी शस्त्राचा निभाव लागणार न्हाई! तिथ मलाच जाव लागणार हाई! हेच सांगाया म्या आलो हाई! माझ्या परिन जे व्हील..ते संमदी करील म्या!" रघुबाबांनी एक श्वास घेतला व सोडत.." माझा जिव गेला तरी चालल ! पर तिच उद्देश्य पुर होऊ देणार न्हाई!" रघुबाबा अस म्हंणतच निघुन गेले.
काहीवेळाने
" सैनिकांनो ! तोफा तैयार ठेवा ! " महाराजांच्या वाक्यावर
सैनिकांनी पाच-पाच असे मिळुन दहा तोफा दारु गोळ्यांनी भरुन तैयार ठेवल्या.महाराजांनी एक कटाक्ष जंगलाच्या मुख्या प्रथम झाडांवर
टाकला जिथून सैतानी काळसैनिक बाहेर पडत होते.
"सैनिकहो! ते काळ सैनिक जंगलातुन येत आहेत.आपल्याला काहीही करुन , जंगल मार्ग बंद करायच आहे! त्यासाठी
तोफांचे मुख थोडे वर करा! जेणेकरुन दारु गोळे जंगलातल्या झाडांवर पडतील!व झाडे पेट घेऊन मार्ग बंद होईल!"
..

युवराज X रामु,ढमाबाई.. युद्ध दोनासी एक शक्य

संत्याच्या गाडीला बांधलेले धारधार शिंगांचे -मजबुत शरीरयष्टीचे काळे रेडे समोर-येणा-या सैतानी सैनिकांना कापसाचे पुंजक्या प्रमाणे पाचफुट हवेत उडवत पुढे निघालेले. की तेवढ्यात संत्याची नजर तीस मीटर अंतरावर गेली. गाडीच्या रसत्यासमोर एक काळ धोतर घातलेला,डोक्यावर टक्कल,अंगाला पांढरट राख फासलेला ,माणूस म्हंणजेच रामु सावकार येऊन उभा राहिलेला..त्याच्या बाजुला ढमाबाई सुद्धा होत्या. रामुने हळकेच आपले दोन्ही हात जवळ आणले डोळे बंद करुन तो मंत्र म्हंणु लागला, तसा त्याच्या हातात लहान-आगीचा आकार अगदी वेगाने मोठा होताना दिसु लागला. पुढच्याक्षणाला त्या हातात एक आग्नि गोळा तैयार झाला होता.
" संत्या उतर !" युवराज मोठ्याने म्हंणाले.परंतु युवराजांच्या मुखातुन निघणा- स्वरा अगोदर तो गोळा रामुच्या हातुन सुटलेला..! युवराजांनी
धनुष्याला बाण अडकवल , पुढे असलेल्या गाडीच्या फळीवर पाय ठेवुन एक उडी घेत सर्व शरीर हवेत झोकून दिल....पुढुन येणा-या गोळ्याने त्यांच्या खालून जात ! संत्याला आपल मरण त्या गोळ्यात दिसल. आग्नि गोळा गाडीवर लाकडी फळ्यांचा बारीकश्या चीरफाळ्या उडवत फुटला..संत्याची शेवटची एक आर्तकींकाळी निघाली.
युवराजांनी हवेतच एक पाय थोड वर उचलत- मागच पाय सरळ ठेऊन
एक डोळा बंद करुन धनुष्यबाणाची दोरी सोडली. हवेला चीरत बाण..
रामुच्या दिशेने निघाला-जे पाहून ढमाबाई धन्याच्या काळजीपोटी रामुच्या मधोमध आल्या ! परंतु बाणाच्या पातीला धार पाजवलेली होती..! ढमाबाईंच्या कपाळातुन रगताची चिलखांडी उडवत बाणाची पातळसर पात ,कवटी फाडुन वेगाने मागच्या दिशेने निघुन जात.. थेट रामुच्याही कपाळामधोमध घुसली.. दोघांचही निर्जीव देह खाली जमिनीवर पडले. शलाकाने हे दृष्य पाहून तिचे डोळे अक्षरक्ष लाव्ह्यसारखे तापुन उठले.द्रोहकालचही ओठांवरच हसू पुसल गेल.
यार्वशी X कोंडूबा युद्ध .
दोन तलवारीच मिळ्ण होताच-ठण-ठण आवाज करत ठिंणग्या उडत होत्या. यार्वशी दात ओठ खात पुर्णत ताकदीने कोंडूबांच्या तलवारीच्या पातीवर घाव करत होता:-तो वेगाने आलेला वार कोंडूबा कधी अडवत होते -तर कधी हुकवत होते. यार्वशींच वय जेमतेम चाळीशीच्या पुढे होत..आणि कोंडूबा वयाने जेमतेम साठी गाठलेले परंतु अंगात जोशमात्र तरुणासारखा भिनभिनलेला . कोंडूबाने यार्वशींच्या पोटात लाथ घातली,विव्हळत यार्वशी जमिनीवर पडले! कोंडूबाने आपल्या हातातली तलवार अगदी वेगाने वर नेली!
" हरामखोर ! " अस म्हंणतच कोंडूबांनी वरची तलवार अगदी वेगान वरुन खाली आणली! कोणत्याही क्षणी यार्वशीचा शिरच्छेद होणार की
तोच यार्वशीने हातातल्या मुठीत खालची माती घेत ती कोंडूबांच्या डोळ्यांत फेकली !
" आ..आ..!" कोंडूबा विव्हळले ! डोळ्यांत वेदना झाल्या अंधुक दिसु लागल, त्यांच्या हातातली तलवारी खाली पडली. यार्वशीची क्प्टी चाल यशस्वी झाली.
" हिहिही!,खिखिखीखी!कस आंधळ्यावाणी करतय!" तलवार जमिनीवर टेकवून,तिचा आधार घेऊन यार्वशी किळसवाण हास्य करत उभा राहीला.
" ए म्हाता-या जाम जोश हाई र तुझ्यात ! तरण्याबांड जवान पोरीवाणी! थु.." यार्वशी तोंडातुन थुंकत म्हणाला. त्याने हातातली तलवार
गच्च धरली व दात ओठ खात डोळे वटारुन वेगाने मागे नेत..तिप्पट वेगाने पुढे आणली.आणी पुढच्याक्षणाला कोंडूबांच धड नसलेल शरीर धप्पकन खाली पडल...व तीन चार सेकंदानंतर त्यांच धड ही फूटबॉल प्रमाणे गोल-गोल भिंगत जात दोन पायांसमोर थांबल.

यार्वशी X महाराज
...द ड्रिम मैच ..

" कोंडूबा!" महाराजांच्या डोळ्यांतुन अश्रु बाहेर आले ! शब्दांत वर्णन करण्यापल्याडच्या भावना मनात धावुन आल्या. त्यांनी एक जळजळीत कटाक्ष यार्वशींवर टाकला ! एवढी वर्ष आपल्या भावनेसमवेत खेळ-खेल्ल.लहान-मोठ्या मांणसांचा बळी ज्या सैतानाने घेतला -त्यात यार्वशीही सहभागी आहेत हे समजल्यावर महाराजांच्या रागाची पातळी ओसंडून वाहू लागली-नाकातुन गरम श्वास बाहेर पडू लागले. इकडे महाराजांच्या आज्ञेनुसार दहाच्या-दहा तोफांच्या वाता पेटल्या ! धाड-धाड करत..
तोफांचे गोळे हवेत उडाले ! महाराज यार्वशीकडे लालबुंद डोळ्यांनी पाहत होते-तर त्या उलट यार्वशी दोन्ही हात हवेत उंचाऊन पिसाटलेल्या सैताना सारखा हसत सुटलेला. त्या दोघांच्याही डोक्यावरुन तोफेचे काळे गोळे स्लोमोशनने जाताना दिसत होते.
" आऽऽऽऽऽऽ" महाराजांच्या मुखातुन एक आतिशक्तिशाली गर्जना बाहेर पडली, तो आवाज ऐकुन ते दारु गोळे एक-एक करत राहाजगडच्या जंगलातल्या झाडांवर पडले- स्फोटकांचा आवाज चौहीदशेंना गुंजळा...
झाडांनी चट-चट आवाज करत पेट घ्यायली सुरुवात केली.जंगलातुन बाहेर येणारी काळ सेना आगीत जळून राख होऊ लागली..
महाराजांनी वेगाने यार्वशीच्या अंगावर हल्लाबोल केला...! हातातली
सोनेरी दांड्याची-त्यावर सिंहाची जबडा वासलेली आकृतीची तलवार
महाराजांनी हवेतुन खाली आणली..त्या तलवारीचा वार रोखण्यासाठी
यार्वशींनी आपली तलवार मधोमध धरुन ठेवली..परंतु महाराजांच्या तलवारीने सिंहाच्या वासलेल्या जबड्याने त्या तलवारीचा घास घेतला..
ठिँणग्या उडाल्या जाल झाल..यार्वशींच्या तलवारीची पात अक्षरक्ष चुराडा होत तुटली जात महाराजांच्या तलवारीने यार्वशीच्या डोक्याचा वेध घेत...डोक चीरत आत जात थेट दोन तुकडे केले. मेंदू बाहेर येत..कवटी चीरली गेली..रक्ताचा फवारा कारंज्यांसारखा महाराजांच्या चेह-यावर उडाला...! जणु सिंह शिकार करुन आल्यासारख महाराजांच तोंड त्या रक्ताने माखून निघाल.
XXXXXXXXXXXXXX
इकडे रक्तांचल महालात...

यार्वशींचा भयान अंत पाहून द्रोहकाल विस्फारलेल्या डोळ्यांनी खाडकन खुर्चीवरुन उठला. रामु ढमाबाई-यार्वशी तिघांचा अंत..कालोखाचा सम्राट अंधकारराजक ..अक्षरक्ष श्वास फुलले गेले होते त्याचे ही हे थरथराट दृष्य पाहून..! ..
XXXXXXXXXXXXX
एकापाठोपाठ राहाजगडच्या जंगलातल्या झाडांवर दारु गोळे आकाशातुन खाली स्फोट होत पडत होते..जंगलाचा पुर्णत भाग आगीने आपल्या तावडीत घेतलेल सुटका होणे आता शक्य नव्हत.
जंगलात असलेले सैतानी सैनिक जळुन खाक होत होते.
तर राहाजगडच्या सैनिकांनी युद्धात उतरलेल्या सैतानी सैनिकांना मारुन टाकल होत.आता तिथे कोणीच विरूद्ध सैनिक नव्हत.फक्त प्रेतांचा सडा पडलेला.कुठे राहाजगडची सैनिक तर कुठे ते काळसैनिक..! खालची ..जमीन त्या प्रेतांच्या रगताने माखून निघाली गेलेली..
चारही दिशेना रक्ताचा वास सुटला होता.
विरूद्ध सैनिकांचा खात्मा झाला गेलेला. राहाजगडचे सैनिक डोळ्यांतुन अश्रु गाळत स्तब्ध उभे होते. समोर कोंडूबांचा बिन धडाच प्रेत एका पांढरट कापडाखाली झाकल गेलेल..! त्या कपड्यावर लाल रक्त लागलेल. महाराजांनी आपले डोळे पुसले नजर कोंडूबांच प्रेत झाकलेल्या कपड्यावरुन काढुन घेतली.
" सावधान सैनिकहो !" महाराजांचा आवाज चौही दिशेना घुमला..!
सर्व सैनिक ताठमानेने उभे राहीले.
" कोंडूबांच्या जाण्याने आम्हाला ही वाईट वाटत आहे ! परंतु ही वेळ
दुखात बुडण्याची-शोक व्यक्त करण्याची नाही !" महाराजांची धार धार नजर सर्वसैनिक आणि बाजुला उभ्या युवराजांवरुन भिरभिरली.
" लढा अद्याप संपला नाही! " महाराज काहीवेळ थांबून म्हणाले."रघुबाबा , एका महाशक्तिशाली जादूगरणीशी लढा देण्यासाठी-राहाजगड स्मशानात पोहचले आहेत ! आणि आपल्यालाही तिकडेच जायच आहे !" महाराजांनी सर्वांकडे पाहील.." जिवाची पर्वा करु नका ..कारण आज जे मरणपावलेत..त्यांच मोठ्या गर्वाने इतिहासातल्या पानांवर ...नाव कोरल जाईल.! पुढचा युग ह्या वीरांच्या वीरमरणाने.. आपल्या गावाच ..नाव मोठ्या गर्वाने उच्चारेल !" महाराजांच्या मुखातुन निघणा-या प्रत्येक शब्दासरशी पुढील युवराज- सैन्यांच्या मनात रोमांचकारक चटके बसत होते..
शरीरावरचा एक नी एक केस ताठरला गेलेला..कानसुळ्या तापल्या गेलेल्या.
" तैयार आहात का सर्व?" महाराजांनी आपली तलवार वर उंचावली..
तसा पुढुन एकच नांद घुमला..
" होऽऽऽऽऽऽ!" दणानुण निघाल वातावरण सार..!

..परंतु पुढील धोका..काय होता...? नियतीने काय खेळ रचलेल..ह्या पासुन सर्व अनभिज्ञ होते..


XXXXXXXXXXXXXXXXX
समर्थांना ठावुक होत-अप्पा काहीतरी बोलतील..आणी तसंच झाल.
काहीवेळाने अप्पांचा डावा हात हळूच वर आला
आणी हाताच्या पाचही बोटांमधली तर्जनी वर करत ते इतकेच म्हणालें
" ते तु नियतीवर सोडून दे बाळ ! कारण हा लढा हे सर्व काही विधिलिखित आहे! आणी युद्धाचा अंत ह्या पर्वात नसुन, " अप्पा अजुन पुढे काही बोलणार होते की त्या गुलाबी आकाशात एक निळ्या रंगाची वीज कडाडली, तो आवाज ऐकुन अप्पांनी वर पाहिल! जणु विधात्यास नियतीची रणनीती कळवण चुकीच असाव! अप्पांनी जीभेवर आलेले शब्द लागलीच थांबवले. विषय बदलत म्हणाले." माझी निघायची वेळ झाली बाळ! जर कधी माझी आठवण आलीच तर पुर्णत मनाने हाक दे ! मी नक्कीच येईल." अप्पांच्या वाक्यासहित त्यांच्या पायांखाली असलेल पाणि एका जोरदार लाटेप्रमाणे त्यांच्या देहावर उडाल.. त्या जागी आता काही लहान लहान चमकीली धूलीकण दिसु लागली.
" अप्पा ! " समर्थांच्या मुखातुन पटकन आवाज निघाला. परंतु अप्पा केव्हाच निघुन गेले होते.
"काय म्हंणाले अप्पा ?सर्वकाही विधिलिखित आहे?.. ह्या युद्धाचा अंत ह्या पर्वात नाही? नक्की काय म्हंणायच होत..अप्पांना ! काय रहस्य ..आहे हे? "
समर्थ विचार करण्यात व्यस्त झालेले की तेवढ्यात सर्वरंगी द्वाराच विशाल द्वार त्यांच्या समोर उघडल........ज्या द्वाराला पाहून ...समर्थांनी ..आपली पाऊले उचल्ली.

क्रमश: अंतसुरु..

...


वाचक दोस्तांनो
कंमेंट🤘
रेटींग⭐,
स्टीकरर्स🎁,
नक्की द्या 🙏🏼 ..आणी फोलॉ करायला विसरु नका🤗 .

आणी लंक्या कुठ गेला? 🤔हा माझ्या पन लक्षात आहे विसरलो नाही मी त्याला😀 ! ते एक twist आहे! 😀ड्रेक्युला चाप्टर #2 मधल..जे की ..पुढच्या चाप्टर मध्ये. कळेलच! .. ☺...
आणि...पुढील भाग हा अंत असेल लक्षात असूद्या..! ..
.
..तो मिळते हे अगले एपिसोड में....

तिमीराची काजळी.. जशी चढेल प्रकाशावरी
कालोखी गर्भातुन वर येईल..भयाची..सवारी..

चौही दिशेना अंधार ....पसरेल..
त्यातुन..निघेल..किंकाळी....
आआआऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ"

आकाशात फडफडती तहाणी वटवाघुळे...
रगत ..हुंगत...येतील..राहाजगडवरी..! ...

लपलाय सावज अंधारात....
शोधुन..ड़सतीलssssssss......उरी

Rate & Review

Be the first to write a Review!